Submitted by अनुराधा म्हापणकर on 25 April, 2013 - 06:20
एक कविता माझी
माझ्या आकाशी उडणारी
एक कविता माझी
तुला मला जोडणारी
एक कविता माझी
तुझ्याशी मला तोडणारी
एक कविता माझी
माझी मलाच भिडणारी
एक कविता माझी
माझ्यावर उगाच चिडणारी
एक कविता माझी
किरकिरी, उगाच रडणारी
एक कविता माझी
वहीच्या पानावर फडफडणारी
एक कविता माझी
इवल्याशा चिटो-यावर तडफडणारी
कविता कविता कविता.. !
प्रत्येक कपट्यात मला सापडणारी
मीच होते, माझ्या कवितांना
वाहत्या पाण्यात नेऊन सोडणारी
तरी उरलीच..
एक कविता माझी..
माझ्या स्पंदनात अखंड धडधडणारी !
एक कविता माझी.. !!
अनुराधा म्हापणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली आहे फक्त 'एक कविता
चांगली आहे
फक्त 'एक कविता माझी' हे रिपीट न करता केवळ पुढच्या ओळी येऊ दिल्यात तर आणखी सहज होईल वाचायलाही वै.म. गै.न.
वैभवशी सहमत ,खर तर मी नंतर ती
वैभवशी सहमत ,खर तर मी नंतर ती ओळ वगळून वाचली .छान वाटली .
मला वाटतं जर ती ओळ वगळुन
मला वाटतं जर ती ओळ वगळुन वाचले, तर पूर्ण कविता ही एकाच कविते विषयी बोलेल, पण न कंटाळता जर प्रत्येक वेळेस तीच ओळ सारखी वाचली तर मला असे कळले कि कवि प्रत्येक वेळेस एका वेगळ्या कविते विषयी बोलत आहे.
आणी बहुतेक कवि सुद्धा हेच सांगु इच्छिते ? अनुराधा . . . . काय मी म्हणतो तेच आहे ना ?
नाहितर . . . .
मीच होते, माझ्या कवितांना
वाहत्या पाण्यात नेऊन सोडणारी . . . .असं तुम्ही लिहिले नसते !
राग मानु नये . . . . मला स्वतःला कविता लिहिता येत नाही, आत्तापर्यंत एकच केली.
"एक कविता माझी" ही ओळ वगळू
"एक कविता माझी" ही ओळ वगळू नका. कारण मी प्रत्येक नव्या कवितेविषयी ते लिहिले आहे. माझ्या (कविच्या) अनेक कविता आहेत.. त्यातली माझी एक कविता अशी आहे, आणि एक तशी आहे.. म्हणजे "आकाशी उडणारी" कविता वेगळी , "तुला मला जोडणारी" वेगळी... and so on... म्हणून ती ओळ पुन्हा पुन्हा वापरली आहे.
धन्यवाद !