Submitted by कर्दनकाळ on 23 April, 2013 - 06:50
हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!
जगा, जगू द्या, जिण्यात थोडी मिठास ठेवा!!
बनू नये मांडलीक कोणी कधी कुणाचे!
विचार, आचार, यांत माफक मिजास ठेवा!!
गमावलेली असोत स्वप्ने, हवी सबूरी.....
खुबीखुबीने अखंड चालू तपास ठेवा!
खुशाल संसारही जगाचा कुणी करावा!
बरोबरीने स्वत:स राखीव श्वास ठेवा!!
असो कितीही बिकट जरी वाट नागमोडी;
जरा विसावून, रोज जारी प्रवास ठेवा!
अनेक यात्रेकरू पुढे जायचे उद्याला......
पुढे जरी पोचलात, मागे सुवास ठेवा!
भले किती पायपीट आहे करावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेला निवास ठेवा!
पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा!
जगात कोणी कधी न राहो कुठे उपाशी!
भुकेजल्यांस्तव हशीखुशीने उपास ठेवा!
चुकून रस्ता तुम्हा घराचा न याद आला!
तुम्हा स्मरायास, उंबराही घरास ठेवा!!
*****************कर्दनकाळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गझल आवडली कर्दनकाळजी. जवळपास
गझल आवडली कर्दनकाळजी. जवळपास सारेच शेर आवडले. 'ठेवा' ऐवजी 'ठेवू' असेही एकदा करून पाहिले. कृ गै न.
धन्यवाद
मस्त गझल !
मस्त गझल !
छान!!!
छान!!!
धन्यवाद भूषणराव! काल लिहिलेली
धन्यवाद भूषणराव! काल लिहिलेली गझल होती!
आपली सूचना आवडली!
भूषणराव, मेल पाहिलत का?
भूषणराव, मेल पाहिलत का?
धन्यवाद बंडोपंत, धन्यवाद
धन्यवाद बंडोपंत, धन्यवाद गणेशजी!
भूषणराव आमच्या गुरुवर्यांची
भूषणराव आमच्या गुरुवर्यांची एक गझल मनात झिरपलेली होती, त्यामुळे कदाचित 'ठेवा' असा काफिया आमच्या ओठांवर आला असावा!
त्यांच्या गझलेचा मतला होता..........
जगाशी फार सांभाळून बोला!
नको ते नेमके टाळून बोला!
जगाशी फार सांभाळून बोला नको
जगाशी फार सांभाळून बोला
नको ते नेमके टाळून बोला<<<
मतला मस्त आणि फारच स्वच्छ आहे. इतके स्वच्छ लिहिता यायला हवे.
खरे आहे भूषणराव! शेवटी ते
खरे आहे भूषणराव! शेवटी ते गुरू आहेत! आमचे स्वप्नही असे स्वच्छ सुटसुटीत लिहिण्याचेच आहे!
सुंदर सर
सुंदर सर
धन्यवाद अरविंदराव!
धन्यवाद अरविंदराव!
गझल छान. फक्त अनेक यात्रेकरू
गझल छान.
फक्त
अनेक यात्रेकरू पुढे जायचे उद्याला......
पुढे जरी पोचलात, मागे सुवास ठेवा!
>> या शेरात दोन ओळींमध्ये घट्ट संबंध जाणवला नाही. यात्रेकरू जाण्याचा आणि सुवासाचा काय संबंध?
हा शेर वगळायलाही हरकत नाही. तसेही चिकार शेर आहेतच या गझलेत.
अवांतर - स्वतःला खरं ठरवणारी पानभर स्पष्टीकरणे देऊ नका. तुमच्या शेराच्या स्पष्टीकरणांइतकंच तुमच्या शेरानेच बोलायला हवं अशी अपेक्षा आहे.
यात्रेकरू जाण्याचा आणि
यात्रेकरू जाण्याचा आणि सुवासाचा काय संबंध?<<<<<<<<<
शेरातील शब्दांचा/प्रतिकांचा फारच शारिरीक अर्थ बहुधा आपण घेत असावेत, असे आपल्या प्रश्नावरून जाणवले!
इथे सुगंध ही प्रतिमा आहे! पुढे गेलेल्यांनी मागाहून/उद्याला जाणा-या यात्रेकरूंसाठी सुवास मागे ठेवावा, म्हणजे काही पाऊलखुणा /(नक्शेपा) मागे ठेवाव्यात ज्यांचा त्यांना मार्गदर्शनासाठी उपयोग व्हावा!
आता पाऊलखुणांना सुवासच का म्हटले असे विचारलेत तर इतकेच म्हणेन की, हे ज्याच्या त्याच्या पिंडावर/ प्रतिभेवर/ अभिरुचीवर त्याची प्रतिमासृष्टी अवलंबून असते! समझनेवालेको इशारा काफी है!
टीप: कविता ही वक्रोक्ती असते जिच्यात कवीची कलात्मकता दिसून येते!
हा शेर वगळायलाही हरकत नाही<<<<<<<अनावश्यक सुचवणी!
तसेही चिकार शेर आहेतच या गझलेत याला कोणतेही मोजमाप नाही!
अवांतर - स्वतःला खरं ठरवणारी पानभर स्पष्टीकरणे देऊ नका. तुमच्या शेराच्या स्पष्टीकरणांइतकंच तुमच्या शेरानेच बोलायला हवं अशी अपेक्षा आहे.<<<<<<<<<<<<<<,
लहान तोंडी मोठा घास!
तुमच्या शेरानेच बोलायला हवं <<<<<<<<<<<अगदी खरे! सगळ्यांनी
( आपल्यासकट) लक्षात ठेवावे असा शेरांचा निकष!
**************कर्दनकाळ
एकाही शेराचा उल्लेख न
एकाही शेराचा उल्लेख न केल्याबद्दल अनेक धन्यवाद!
शेर बोलके आहेत की, नाहीत माहीत नाही पण आपल्या प्रतिसादाची लकब मात्र बोलकी आहे!
<<<रोज जारी प्रवास ठेवा!>>>
<<<रोज जारी प्रवास ठेवा!>>> जारी हा हिंदी शब्द आहे, 'चालू' प्रवास ठेवा चालेल ना? की आधी चालू तपास ठेवा वापरलंय म्हणून नाही वापरलं?
अगदी बरोबर!शब्दाची
अगदी बरोबर!शब्दाची पुनारावृती टाळण्यासाठीच जारी हा सर्वश्रुत व बोली भाषेतील शब्द वापरलेला आहे!
तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे
तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे प्रोफेसर? प्रतिसादकांनी तुमच्या गझलांवर नेमके कसे प्रतिसाद द्यावेत अशी अपेक्षा आहे? शेराचा उल्लेख केला नाही ते मनाला लावून घेतलंत. ज्याचा उल्लेख केला, त्यावर थयथयाट करणारा प्रतिसाद दिलात. एकीकडे थेट, प्रांजळ प्रतिसाद हवेत म्हणता आणि त्यात थोडी जरी नकारात्मकता दिसली की प्रतिसादकाचा वकुब, त्याची न शिकण्याची इच्छा इ इ काढून मोकळे होता.
तुमच्या आजवरच्या फार फार क्वचित गझलांवर मी प्रतिसाद दिले आहेत. तेव्हा, मी सध्या देत असलेल्या प्रतिसादांवरून माझी पारख कृपया करू नका. मी अदर दॅन इंटरनेट, कुठल्याच गझलकाराच्या संपर्कात नसतो. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, एकाच तराजूमध्ये मायबोलीवरच्या समस्त गझलकारांना तोलू नका. आता गझलेतल्या तुमच्या अनुभवापेक्षाही फक्त तुमच्या वयाचा मान ठेवायला हवा, असं मला तुम्ही दिलेल्या गेल्या काही प्रतिसादांनंतर वाटू लागलं आहे. तुम्हाला प्रत्युत्तरे करण्यात वेळ तर निघून जाईलच, पण गझलेकडे दुर्लक्ष होईल आणि एकंदरीतच गझलेबद्दल माझी, इतर वाचकांची मतं बदलतील. मला यात सहभागी व्हायचंच नाही. तेव्हा हेमाशेपो.
नितांतसुंदर !
नितांतसुंदर !
जारी हा सर्वश्रुत व बोली
जारी हा सर्वश्रुत व बोली भाषेतील शब्द>>>>>>
मग माझ्या गझलेतील "काहून" ने तुमचे काय घोडे मारले होते काय ???????
प्रखर शब्दात खेद व्यक्त करीत आहे !!!
~वैवकु
गमावलेली असोत स्वप्ने, हवी
गमावलेली असोत स्वप्ने, हवी सबूरी.....
खुबीखुबीने अखंड चालू तपास ठेवा!
पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा!
हो दोन शेर विशेष आवडले. मुखडा वाला शेर रोखठोक आहे. तर तपास चा अर्थ थेट नाही. थोडा थांबून विचार करावा लागतो. कशाचा तपास.. आणि उत्तरही मिळून जातं. थोडा विचार करायला लावणारा शेर आवडण्याकडे माझा कल आहे. अर्थात, ही माझी वैयक्तिक आवड असेल, कदाचित गझलेच्या विकासामधे ती मिसफिटही असेल. माहीत नाही.
भले किती पायपीट आहे करावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेला निवास ठेवा!
कदाचित म्हणूनच हा शेर विशेष वाटला नाही. सोपं आणि बाळबोध याबद्दल माझा खूप गोंधळ होतोय. असो.
आनंदयात्री, तुम्हाला
आनंदयात्री, तुम्हाला काव्यकर्णबधिर हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
>>चुकून रस्ता तुम्हा घराचा न
>>चुकून रस्ता तुम्हा घराचा न याद आला!
तुम्हा स्मरायास, उंबराही घरास ठेवा!!
क्या बात है!
गझल छानच ! तुमच्या नेहमीच्या
गझल छानच !
तुमच्या नेहमीच्या गझलांपेक्षा अगदी वेगळी वाटली..कॄ.गैं.न.
पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा>>> अत्यंत खूब
सुवास म्हणजे पाऊलखुणा? मग
सुवास म्हणजे पाऊलखुणा? मग मिठास म्हणजे बोटांचे ठसे असतील.
गझलचं नाव (पोलीस)तपास ठेवायला हरकत नाही.
एकही शेर न आवडल्यामुळे एकाही शेराचा उल्लेख करता येत नाही. पण तुमचे प्रतिसाद सगळे आवडले मात्र.
हे पण प्रोफेसरच आहेत? दुसरा
हे पण प्रोफेसरच आहेत? दुसरा काहीतरी आयडी होता ना? कुठला ते आठवत नाही पण हा नक्की नव्हता.
ही गझल बेफिकिरांच्या स्टाईलचा प्रयत्न केल्यासारखी वाटते आहे. पण नेहमीप्रमाणे preaching चा मोह आवरलेला नाहीत त्यामुळे गझलेच्या नावाखाली प्रवचन वाचते आहे असं वाटलं. नेहमीप्रमाणेच बरेच शेर loosely coupled आहेत. आणि नेहमीप्रमाणेच बर्याच ठिकाणी "बरं मग?" होते आहे.
असो.
आणि नेहमीप्रमाणेच बर्याच
आणि नेहमीप्रमाणेच बर्याच ठिकाणी "बरं मग?" होते आहे.<<<
सर्व
सर्व रसिकांचे/गझलकारांचे/कैवा-यांचे/असंतुष्टांचे/संतुष्टांचे/ गझलधुरीणांचे/गझलशिक्यांचे/पट्टीच्या पोचलेल्या गझलकारांचे आभार!
कर्दनकाळजी असे पलायनवादी होवू
कर्दनकाळजी असे पलायनवादी होवू नका
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत हा आमचा अधिकार आहे जो आपंण डावलू शकत नाही
मी माझा प्रश्न पुन्हा विचारतो.....................जोवर उत्तर मिळत नाही तोवर पिछा सोडणार नाही !!!!
___________________________________________
वैभव वसंतराव कु... | 25 April, 2013 - 01:40
जारी हा सर्वश्रुत व बोली भाषेतील शब्द>>>>>>
मग माझ्या गझलेतील "काहून" ने तुमचे काय घोडे मारले होते काय ???????
प्रखर शब्दात खेद व्यक्त करीत आहे !!!
~वैवकु
_____________________________________________
आम्ही प्रतिसादातून केवळ टिका करीत आहोत इतकेच वरवर वाटत असले तरी आतून आम्हाला ही गझल अतीशयच आवडली आहे हे वेगळे सांगणे न लगे !!!!!
छान.
छान.
कर्दनकाळजी असे पलायनवादी होवू
कर्दनकाळजी असे पलायनवादी होवू नका
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत हा आमचा अधिकार आहे जो आपंण डावलू शकत नाही
मी माझा प्रश्न पुन्हा विचारतो.....................जोवर उत्तर मिळत नाही तोवर पिछा सोडणार नाही !!!!
___________________________________________
वैभव वसंतराव कु... | 25 April, 2013 - 01:40
जारी हा सर्वश्रुत व बोली भाषेतील शब्द>>>>>>
मग माझ्या गझलेतील "काहून" ने तुमचे काय घोडे मारले होते काय ???????
प्रखर शब्दात खेद व्यक्त करीत आहे !!!
~वैवकु<<<<<<<<<<<<<<<,
वैवकु, पलायनावाद आमच्या रक्तात नाही, अन्यथा मायबोलीवरील थिल्लर, टवाळखोर पोकळ तथाकथित प्रतिसादांनी एखादा केव्हाच इथून पळाला असता! आम्ही त्यातले नाहीत! आम्ही पुरून उरणा-यातले आहोत! असो.
जारी म्हणजे चालू...........चालते, पण काहून चालत नाही कारण जारी हा वैध शब्द आहे! मोडतोड करून जन्मास घातलेला नव्हे! काहून असा शब्दच अस्तित्वात नाही, त्यामुळे तो चालणार नाही!
Pages