हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!

Submitted by कर्दनकाळ on 23 April, 2013 - 06:50

हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!
जगा, जगू द्या, जिण्यात थोडी मिठास ठेवा!!

बनू नये मांडलीक कोणी कधी कुणाचे!
विचार, आचार, यांत माफक मिजास ठेवा!!

गमावलेली असोत स्वप्ने, हवी सबूरी.....
खुबीखुबीने अखंड चालू तपास ठेवा!

खुशाल संसारही जगाचा कुणी करावा!
बरोबरीने स्वत:स राखीव श्वास ठेवा!!

असो कितीही बिकट जरी वाट नागमोडी;
जरा विसावून, रोज जारी प्रवास ठेवा!

अनेक यात्रेकरू पुढे जायचे उद्याला......
पुढे जरी पोचलात, मागे सुवास ठेवा!

भले किती पायपीट आहे करावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेला निवास ठेवा!

पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा!

जगात कोणी कधी न राहो कुठे उपाशी!
भुकेजल्यांस्तव हशीखुशीने उपास ठेवा!

चुकून रस्ता तुम्हा घराचा न याद आला!
तुम्हा स्मरायास, उंबराही घरास ठेवा!!

*****************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे प्रोफेसर?<<<<<<<<<<
प्रॉब्लेम आपणास पडलेले दिसतात!
आमच्याकडे सोलुशन्स आहेत प्रॉब्लेम्स नाहीत!

सुवास म्हणजे पाऊलखुणा? मग मिठास म्हणजे बोटांचे ठसे असतील.
गझलचं नाव (पोलीस)तपास ठेवायला हरकत नाही

आपल्या अचाट कल्पनाशक्तीला व प्रतिभेच्या भरारीला तोड नाही! वा! वाहवा!

तर तपास चा अर्थ थेट नाही. थोडा थांबून विचार करावा लागतो. कशाचा तपास..

गमावलेल्या स्वप्नांचा तपास!

पहिल्या ओळीतच उत्तर आहे किरण!

शेर नुसता विधानात्मक न होता विचारप्रवर्तकच असायला हवा!

सोपं आणि बाळबोध याबद्दल माझा खूप गोंधळ होतोय

सोप लिहिणे अवघड असते!

बाळबोध आशय असेल तर शेरही बाळबोधच होतो!

टीप: सत्य हे नेहमी सोपे, सरळ, साधे व सुटसुटीत असते!
***********इति कर्दनकाळ

ही गझल बेफिकिरांच्या स्टाईलचा प्रयत्न केल्यासारखी वाटते आहे
बेफिकीर फारच डोक्यात बसलेले दिसत आहेत!...................................................... (अभिनंदन भूषणराव!)

शायरीने माझिया ओथंबलो मी!
मी कुणाची शायरी गिरवू कशाला?
*******इति कर्दनकाळ

पण नेहमीप्रमाणे preaching चा मोह आवरलेला नाहीत त्यामुळे गझलेच्या नावाखाली प्रवचन वाचते आहे असं वाटलं. नेहमीप्रमाणेच बरेच शेर loosely coupled आहेत. आणि नेहमीप्रमाणेच बर्‍याच ठिकाणी "बरं मग?" होते आहे.
असो.
<<<<<<<<<<<,,

अरे वा, आपण प्रवचनेही वाचता? तेव्हाच आपली मते इतकी रसाळ आहेत!
loosely coupled चे tightly coupled करून दाखवा! स्वागतच आहे!
पाहू तरी tightly coupled शेर कसा असतो ते!

नेहमीप्रमाणेच बर्‍याच ठिकाणी "बरं मग?" होते आहे.<<<<<<<<

अरे वा? म्हणजे आपण विचार देखल करता शेर वाचताना? कमाल आहे बुवा!

टीप: शेरात मग/नंतर/पुढे/मागे असे काही नसते, जे काय असते ते रोखठोक असते!

३५ पैकि १७ प्रतिसाद धागाकार्त्यांचे<<<<<

ही आकडेवारी ह.ह. यांना कळवायलाच हवी !!!
Happy

आणि त्यातही सगळेच्या सगळे माझं कसं बरोबर आणि तुम्ही/ वाचक/ विरोधी प्रतिसादक/ स्तुती न करणारे वगैरे कसे मुर्ख या टाईप्स!

बाकी चालू द्या!

आणि हां या पोस्टला प्रतिसाद दिला नाहीत तरी चालेल पण देणारच असाल तर एकाच पोस्टीत द्या....
नाही तर पहिल्या वाक्यासाठी एक पोस्ट, दुसर्‍यासाठी एक पोस्ट आणि तिसर्‍यासाठी एक पुर्ण निबंध अस नको

जमल्यास हे वाचा -
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/130887.html?1188382273
याला म्हणतात गझलेबद्दल मनापासुन कळकळ!

आपले २ प्रतिसाद बॅक टु बॅक
---------------------------------------------------------------------------------------------
कर्दनकाळ | 26 April, 2013 - 22:39 नवीन

तर तपास चा अर्थ थेट नाही. थोडा थांबून विचार करावा लागतो. कशाचा तपास..
गमावलेल्या स्वप्नांचा तपास! पहिल्या ओळीतच उत्तर आहे किरण!
शेर नुसता विधानात्मक न होता विचारप्रवर्तकच असायला हवा!
--------------------------------------------------------------------
कर्दनकाळ | 26 April, 2013 - 22:52 नवीन

नेहमीप्रमाणेच बर्‍याच ठिकाणी "बरं मग?" होते आहे.<<<<<<<<
अरे वा? म्हणजे आपण विचार देखल करता शेर वाचताना? कमाल आहे बुवा!
टीप: शेरात मग/नंतर/पुढे/मागे असे काही नसते, जे काय असते ते रोखठोक असते!
-----------------------------------------------------------------------------------------
कमाल आहे तुमची एका प्रतिसादात शेर विचारप्रवर्तक हवा, आणि लगेच पुढच्याच प्रतिसादात विचार केला तरी तुम्हाला ती कमाल वाटते.

असो तुम्हाला शुभेच्छा

३५ पैकि १७ प्रतिसाद धागाकार्त्यांचे<<<<<<<<<<<<<
छान, कलात्मक मोजणी केलीत! वा!

आणि त्यातही सगळेच्या सगळे माझं कसं बरोबर आणि तुम्ही/ वाचक/ विरोधी प्रतिसादक/ स्तुती न करणारे वगैरे कसे मुर्ख या टाईप्स!<<<<<<<<<<<<

का स्तुतीमुळे हुरळू मी? का निंदेने कचरू मी?
परमेश्वर आता देतो लेखणीस माझ्या वाणी!
थकतील हात खणताना, उरतील हिरे अर्थांचे!
या नव्हेत गझला माझ्या, या चैतन्याच्या खाणी!

जाऊ द्या, फार नका विचार करू, ते आपल्या डोक्यावरचे आहे!

मी हिशोबतपासणीस असल्याने "मोजायचे" काम उत्तमरित्या करतो.. Wink

कर्दनकाळ नावाचा तुमचा 5वा आयडी...:हाहा: ...मधले 3 सांगू का ... Wink

आज २८ एप्रिल रविवार !! सुट्टीचा दिवस !!
<<<आम्ही चाललो आमच्या कामाला!>>> त्यामुळे हे विधान पटले नाही
तद्दन पलायनवादी वाक्य !!!!!!

>>बुद्धीजीवी लोकांना रविवार वगैरे नसतो!
अरे पण आम्ही हे तुला का सांगत आहोत?<<

दुसर्‍या ऑळीत ३ मात्रा कमी वाटत आहेत का?

बाप रे, तो वैभवला गद्य प्रतिसाद होता होय.
मी आपला दोन्ही चरणात १४-१४ मात्रा ( बुध्दीजीवी लोकांना १४ + रविवार वगैरे नसतो १४) असलेले वृत्त गुणगुणून पाहिले
क्षमस्व

मतल्यातील जगा जगू द्या या शब्दसमूहाचा नक्की अर्थ काय? ( जियो और जिने दो असा शब्दार्थ नको) या शेरात `जगा जगू द्या' हा शब्दप्रयोग का वापरला आहे हे कळत नाहीये.
क्षमस्व

गजलुमिया,
कर्दनकाळांच्या गझलेने/शेरांनी फारच झपाटलेला दिसत आहात!
आमच्या गद्यातील मात्राही लोक मोजू लागलेले दिसतात! किती ही गझलदक्षता! वृत्तसंवेदनशीलता!
मायबोली गझलेत फारच पुढे पुढे चाललेली दिसते! चांगले आहे!
कर्दनकाळ खुश झाले!

मी पुढील प्रतिसादात झाल्या चुकीची माफी मागितली आहे.
असो `जगा जगूद्या' बद्दलचे माझे कुतुहल तसेच राहिले

आमचा मतला होता......
हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!
जगा, जगू द्या, जिण्यात थोडी मिठास ठेवा!!

आता या शेरातील आशयाकडे जरा बारकाईने पाहू या.....

या शेरातील कीप्रतिमा आहे ‘समास’ जी मतल्यात चालवणे हे आम्हास फारच कलात्मक वाटले!
लिहिताना पानावरती आपण समास ठेवतो.
समास आखणे / ठेवणे हे एक नीटनेटकेपणाचे लक्षण आहे!
समास ठेवण्यामागे /आखण्यामागे अनेक (सुप्त) हेतू असतात, जसे:
१) लिखाणातील एकंदर नीटनेटकेपणा
२) लिखाणातील एक शिस्त
३) लिहिलेले वाचताना किंवा चिंतन केल्यावर जर काही फेरफार करायचे असतील तर त्याला एक अवकाश/स्थान/वाव मिळावे! म्हणजेच अधिकच्या मजकुरालाही सामावून घेता यावे!
४) काही महत्वाच्या मुद्यांना तारांकित करता येते.....वगैरे
आता ही समासाची कल्पना आम्ही दैनंदीन जीवनात घडणा-या गोष्टींना लाऊन पाहिली!आणि वाटले की, अरे,
प्रत्येक गोष्टीत जर असा आपण समास ठेवला जगताना तर जगण्यात पण एक नीटनेटकेपणा येईल, शिस्त येईल, सुधारणा करायला वाव मिळेल इत्यादी.

म्हणून मतल्यातील पहिली ओळ प्रस्तावनापर व विचारप्रवर्तनपर अशी लिहिली................
हरेक गोष्टीमध्ये जरासा समास ठेवा!

आता दुस-या ओळीकडे वळू या............

जीवन सुसह्य व्हावे, आनंदी व्हावे यासाठी देखिल माणसाने जगण्याची कला अवगत करणे महत्वाचे असते!
जगतानाही एक शिस्त पाळायची असते. जगण्यातही एक गोडवा/मिठास ठेवणे हे आवश्यक असते.
म्हणजे आपले व आपल्याबरोबर इतरांचेही जगणे सुकर/सुलभ व आनंदी होते!

यासाठी वेळेला डोळेझाक करणे, तडजोड करणे, लवचीक असणे, दुस-याच्या जगण्याचा अधिकार मान्य करणे, स्वत:मधे बदल करायला तयारी असणे आवश्यक असते!
म्हणजेच आपणही आनंदाने हसून जगावे व दुस-यांनाही तसे जगू द्यावे!

हे सर्व वरील समास या प्रतिकात जे हेतू वर्णिले आहेत, त्यात अंतर्भूत आहेत!

म्हणून आम्ही दुसरी ओळ अशी लिहिली........
जगा, जगू द्या, जिण्यात थोडी मिठास ठेवा!

इथे जिण्यात थोडी मिठास ठेवा
जसे,
प्रत्येक गोष्टीत जरासा समास ठेवा असे म्हणायचे आहे!
जिण्यात थोडी मिठास ठेवणे= हरेक गोष्टीमधे समास ठेवणे
जिण्यात मिठास ठेवण्यासाठी जगा व जगू द्या या थोरांच्या घोषवाक्याच्या उपायोजनेचे महत्व आहे!
****************************************************
*****************************इति कर्दनकाळ

काय हो महामहोपाध्याय कर्दनकाळ?

तुमच्या या समास आणि मिठास या मिसर्‍यांमध्ये जर इतका जवळचा संबंध आहे, इतकी एकजीवता आहे, तर माझ्या या खालच्या शेराने तुम्हाला कावीळ का झालेली होती?

>>>साहसे खरे लिहायची इथेच आटली
कागदात आखला समास एक आपला<<<

या इथे आपण लिहिलेले प्रबंध आपल्यातील 'वकूब नसूनही जोपासलेला अहं' दाखवत आहेत.

काहून असा शब्दच अस्तित्वात नाही, त्यामुळे तो चालणार नाही!>>>>>>>
आपले अज्ञान असे जाहीरपणे वारंवार व्यक्त करू नये !!!
तुम्ही हा शब्द आयुष्यात अधी वाचला नाही म्हणजे हा मराठी भाषेत नाहीच आहे असे म्हणणे हा मूर्खपणा होय !!!
आपणास हा शब्द अस्तित्त्वात असूनही माहीत नसणे हे आपले भाषा दारिद्र्य आहे !!!

_________________________

समास ठेवा =स्पेस ठेवा अकमेकाना पुरेसा व्यक्तिगत खासगी जागा ठेवा म्हणजे सारखे इतरांच्यात डोकावू नका नाक खुपसू नका असा दोन ओळीत अर्थ सांगता आला असता

उगाच आपले पांडित्य दाखवण्यासाठी हातभर लांब प्रतिसाद दिलाय
मुळात त्या शेरास , त्याच्या अर्थबद्दल तेवढे समजून सांगायची गरजच नाही तो शेर पुरेसा स्पष्ट व लगेच समजेल असा आहे !!!(त्यासाठी खरेतर माझ्यातर्फे आपले अभिनंदन!!)

काहून असा शब्दच अस्तित्वात नाही, त्यामुळे तो चालणार नाही!>>>>>>>

सतीशजी:
काहून शब्द शब्दकोशात सापडला:

http://m.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0...

Pages