निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
थांकु गं शांकली ! अगदी
थांकु गं शांकली ! अगदी वनदेवीनी आशीर्वाद दिल्यासारखं वाटतय !
बहावा, गोल्डन बांबू , चिकू,
बहावा, गोल्डन बांबू , चिकू, रायआवळा पेरू आणि जांभळी तामण.>> मस्त .
बहावा अन तामण फुलायला लागले की भारी दिसतील एकदम.
बांबू फार इन्व्हेझिव्ह आहे. त्याच्या पसरण्यावर काटेकोर नियंत्रण ठेवा.
इथे The only way to control bamboo is to never plant it असं म्हणतात.
चिकू, पेरु, रायाआवळे म्हणजे बच्चे कंपनीची मज्जा होणार .
अगदी वनदेवीनी आशीर्वाद
अगदी वनदेवीनी आशीर्वाद दिल्यासारखं वाटतय !>>>>>>>>>>अगं ही सर्व निग करांतर्फे केलेली सदिच्छा आहे...........:स्मित:
नमस्कार लोकहो, मी इथे नेहमीच
नमस्कार लोकहो, मी इथे नेहमीच वाचत असते, पण आज पहिल्यांदाच लिहीते आहे.
मला एक माहिती हवी आहे. माझी एक इथली (अमेरिकन) मैत्रिण इतक्यातच TIFR, मुंबई ला जाऊन आली. तिने तिथे एक झाड पाहिले. खाली फोटो टाकला आहे. तिला त्याचे नाव हवे आहे. मी तसा थोड फार चेक केलं, पण एक तर तो फोटो तेव्हढा चांगला नाहीये आणि दुसरं म्हणजे त्या झाडाला पारंब्यासदृष्य दिसतंय, ते जरा गोंधळात टाकणारं आहे.
धन्यवाद!
अनुदोन(?), पारंब्या स्पष्ट
अनुदोन(?), पारंब्या स्पष्ट दिसत नाहीयेत. पण पारंब्या या बहुधा फाय्कस कुळामध्ये आढळतात. .
नि.ग. च्या बाराव्या किंवा
नि.ग. च्या बाराव्या किंवा तेराव्या भागात सुंदरबनचा उल्लेख होता. सुंदरबन हे नाव का पडले असावे याविषयी कोणीतरी विचारले होते. त्याचे तिथे उत्तर कोणी दिलेही असेल. इथे पुन्हा देत आहे. सुंदरबन हा पाणथळ भाग आहे. इथे मँग्रोव्ज चांगली वाढतात. त्यातलाच एक प्रकार इथे विपुलतेने आढळतो. या झाडाचे स्थानिक बंगाली नाव 'सुंदरी' असे आहे. त्यावरून या प्रदेशाला सुंदरबन हे नाव पडले. या झाडाचे शास्त्रीय नाव Heritiera littoralis (family strculiaceae) असे आहे. यातल्या लिटोरालिस शब्दावरून याची लिटोरल हॅबिटाट कळते. हे झाड चांगले तीस चाळीस फूट उंच वाढते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारी प्रदेशात ते आढळते. मुंबईच्या जिजामाता उद्यानातही नमुना म्हणून ते लावलेले आहे.
काल आमच्या गृपमध्ये
काल आमच्या गृपमध्ये ट्रेकिंगविषयी चर्चा चालू होती. तेंव्हा स्वप्निलने एक किस्सा सांगितला. एक गृप ट्रेकिंगला गेला असता रात्रीचे जेवण बनवायला घेतले. त्या गृपकडे चमचा नसल्याने एकाने झाडाची फांदी काढुन त्याने ढवळायला घेतले. रात्री जेवल्यानंतर सगळे झोपले. सकाळी उठल्यावर सगळ्यांचे संपूर्ण दात निखळुन पडले होते.
रामेठी-कामेठी असं काहीस त्या झाडाच नाव होतं. एकाचा उपयोग दात निखळुन पडण्यासाठी तर दुसर्याचा उपयोग दात मजबूत करण्यासाठी होतो.
जाणकार कृपया यावर अधिक प्रकाश टाकावा. जर कुणाकडे प्रचि असेल तर तेही इथे डकवा.
सकाळी उठल्यावर सगळ्यांचे
सकाळी उठल्यावर सगळ्यांचे संपूर्ण दात निखळुन पडले होते. <<< मी सुद्धा हा किस्सा ऐकला होता, पुण्यातील अभिनव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हा त्रास झाला होता ही घटना ८४-८५ मधली आहे
अवनी.. आहाहा.. कित्ती छान ..
अवनी.. आहाहा.. कित्ती छान .. बेस्ट ऑफ लक तुला आणी तुझ्या प्रेमाच्या झाडांना
जिप्सी.. ओ एम जी.. बाप्रे..
जिप्सी.. ओ एम जी.. बाप्रे.. अजबच किस्सा.. पहिल्यांदाच ऐकला..
जिप्सी, त्यालाच रामेठा,
जिप्सी, त्यालाच रामेठा, दातपाडी असं म्हणतात. पण हे नाव जरी असलं तरी प्रत्यक्षात खरंच असं घडतं की ही नुसती ऐकीव माहिती आहे हे जरा तपासून बघायला पाहिजे असं बहुतेक सर्व वन्स्पती तज्ञांचं मत आहे. किंवा हे आयुर्वेदाच्या अभ्यासकांना विचारायला पाहिजे. कारण जर खरंच असं घडत असतं तर दात काढायला डेंटिस्ट्सची गरजच उरली नसती. (हे माझं मत नसून वनस्पती तज्ञांचं मत आहे.)
अनुदोन, कदाचित ते झाड नांद्रुकाचंही असू शकेल.
धन्स सचिन, शांकली अधिक सर्च
धन्स सचिन, शांकली
अधिक सर्च केला असता मटाची हि लिंक मिळाली.
दातपाडी :- काही वनस्पती जशा औषधी, उपयुक्त असतात, तशा काही त्रासदायकदेखील असतात, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दातपाडी. या वनस्पतीची पानं दातावर घासली तर हिरड्या सुजतात अन दात सैल होऊन पडतात.
http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-6756600,prtpa...
मस्त रे लिंक जिप्स्या...
मस्त रे लिंक जिप्स्या... सोबतीला फोटू असते तर बरं झालं असत.न. का आहेत आणी मला दिसले नाहीत ??
का आहेत आणी मला दिसले नाहीत
का आहेत आणी मला दिसले नाहीत ?? >>>>वर्षूदी, फोटो नाही आहे.
हाँ .. फिर तो ठीकै
हाँ .. फिर तो ठीकै
अनुदोन ते झाड बहुतेक गुलाबी
अनुदोन ते झाड बहुतेक गुलाबी टॅबेबुया आहे. खाली गुलाबी सडा पडलाय बघ.
(pink tabebuia - नेटवरच्या फोटोंवर जाऊ नकोस... नेटवर दिसतात तशी याची पुर्ण गुलाबी झाडे मला अजुन तरी दिसलेली नाहीयेत. मुंबईतल्या हवेत हे झाड एकाच वेळी गुलाबी आणि हिरवे असते. पिवळा टॅबेबुया मात्र सगळी पाने गळवुन मगच फुलतो.)
मी संध्याकाळी या झाडाचा, पानांचा आणि फुलांचा फोटो टाकते, त्यावरुन मैत्रिण ओळखु शकेल हेच का ते...
आणि त्या पारंब्या नाहीयेत. पावसाळ्यात झाडावर वेली चढतात आणि नंतर सुकून अशा लोंबायला लागतात. बहुतेक त्या वेलीच आहेत.
फायकस जातीतल्या झाडाच्या पारंब्या जरी वरुन खाली येत असल्या तरी त्या वजनहीन अवस्थेत अधांतरी लटकताहेत अशा कधी दिसत नाहीत, त्यांच्यात भरपुर जोर असतो आणि तो नजरेला जाणवतोही.
परवा मी शांकलीला करंजाच्या
परवा मी शांकलीला करंजाच्या सड्याबद्दल बोललो, त्यावेळी माझ्या मनात, अंबवा तले फ़िरसे झूले पडेंगे
अशीच भावना होती. झाडाखाली फ़ुलांचा सडा बघितला कि माझी अवस्था,
आपने फ़ुल बिछाये, उन्हे हम ठुकराये
हमको डर है के ये तौहिने मुहोब्बत होगी.. असे काहीतरी येते. त्या पाकळ्या तूडवत जाणे मला तरी
अशक्य होते. मनात अनेक अनुभवलेले बहर आले.. त्याबद्दल.
१) प्राजक्त
प्राजक्ताच्या सड्याबद्दलच्या आठवणी श्रावणातल्या आहेत. अगदी उजाडता उजाडता झाडाखाली जावे,
आणि ती फ़ुले वेचावीत. पण जरा उन्हे चढली कि ती फ़ुले मलूल होऊन जातात. गंधही रहात नाही.
आणि मग प्राजक्ताची कथा ऐकली, आणि सहज ओळी आठवल्या, तीच उदासी.. तोच विरह.
रंगमहल के दस दरवाजे, न जाने कौनसी खिडकी खुली थी
सैंया निकस गये, रामा मै ना लडी थी..
२) बकुळ
बकुळीची तर तऱ्हाच वेगळी. फ़ुलाचा कणाएवढाही मोह नाही. उमलल्याबरोबर धरणीला अर्ध्य दिल्यासारखी
फ़ुले गळून पडत असतात. रुपारंगाचा अभिमान धरावा असे काही नसतेच पण जाता जाता, तळी माती
गंधवती करण्याची दानत मात्र तिच्याकडे असते. शेवटी आपले आपले असे काय मागे राहणार असते ?
असे तर ती सांगत नाही ना ?
अपनी कहानी छोड जा,
खुदकी निशानी छोड जा
कौन कहे इस ओर,
तू फ़िर आये ना आये
३) गुलमोहोर
गुलमोहोराचा वैशाखवणवा तसा डोळ्यांना त्रासाचाच होतो, पण त्याचा सगळा माज उतरवतो, तो वळवाचा
पाऊस. पाकळ्या, फ़ुले, मुक्या कळ्या, देठ सगळे सगळे उतरवले जाते.
आभाळात ओले रंग, चिंब चिंब माझे अंग
काय उपयोग आता, सावरुन तरी ?
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी, ऊभा राहे हरी
४) पळस
पळसाच्या बहराच्या माझ्या आठवणी आहेत त्या होळीशी निगडीत. अंगोपांगी बहरलेला पळस आणि
पायाशी पडलेला पाकळ्यांचा खच.
बिरजमे होली खेलत नंदलाल,
भरभर मारे रंग पिचकारी..
रंग गये सब ब्रिजके नरनारी..
उडत अबीर गुलाल, बिरजमे
५) कुंती
पावसाळा सरता सरता एके दिवशी अचानक चांदणे पडावे आणि वरुन कुंतीच्या पाकळ्यांची सुगंधी बरसात
व्हावी.
नाचत ना गगनात नाथा, ताऱ्यांची बरसात नाथा
नाव उलटली, नाव हरपली, चंदेरी दर्यात नाथा
६) करंज
करंजाचे बहरात आलेले झाड म्हणजे जणू हिरवाकंच शालू नेसलेली, अंगभर मोत्यांचे दागिने
ल्यायलेली नववधू. मोत्यांनीच शॄंगारलेल्या मंचकी जणू वाट बघते
आजा पिया तोहे प्यार दू, गोरी बैंया तोपे वार दू,
किसलिये तू इतना उदास..
पथ जो ये जुल्मी है, पिया तेरी गाँव के
पलकोंसे चुन डालुंगी मै, काँटे तेरे पाँव के
७) मोह
मोह नुसता बहरत नाही तर बरसतो, त्या सुंदरीला जणू खात्रीच असते, कि प्रियकर तिला सोडून
जाऊच शकत नाही..
मेरी मुहोब्बत मे तातिर है,
तो खीचके मेरे पास आओगे तूम
देखो हमारी होगी जीत
दोनो मिलके बंधेगी प्रीत
८) झकरांदा
झकरांदाचा बहर मला नेहमीच भारुन टाकतो. आभाळ, आभाळभर असलेला तो फ़ुलोरा,
जमिनीवर त्याच कृष्णनिळ्या फ़ुलांचा लहरणारा गालिचा. आसमंत भारून टाकणारा दरवळ,
तरंगत राहणारी फ़ुले.
नभ निळे, रात निळी,
कान्हाही निळा
झूलतो बाई रासझूला
९) बहावा
कोल्हापूरला रंकाळा रिक्षा स्टॅंडपाशी बहावा असा काही फ़ुलतो कि जणू सुवर्णालंकार ल्यायलेला
राजकुमारच.
नयने लाजवीत, बहुमोल रत्ना
नमवी पहा भूमी, जणू चालताना
१०) गायत्री
गायत्रीचा सडा मात्र मला वेगळाच अनुभव देतो. फ़ुलांचे निळे, आभाळी आणि धवल असे रंग
मला सड्यातही जाणवतात. पाकळ्यांचा आकार पत्त्यातील डायमंडस म्हणजेच चौकट सारखा,
बहारों फ़ुल बरसाओ, मेरा मेहबूब आया है,
मेरा मेहबूब आया है
११) चिंच
चिंचेखाली तर मोतिया, गुलाबी, पिवळ्या इवल्या इवल्या फ़ुलांचा सडा असतो. सगळ्यांच्या जशा
असतात तशाच चिंचेशी निगडीत आठवणी आहेत त्या लहानपणीच्या सवंगड्यांच्याच
तूला ते आठवेल का सारे ?
आठवणींच्या चिंचा गाभूळ
रुचतील काय तूला रे ?
आज हे लिहिताना सगळे मनातल्या मनात अनुभवले.
हीरा, तुमचे वाचन इतके अफाट
हीरा, तुमचे वाचन इतके अफाट आहे तर तुम्ही साहित्य अकादमीतर्फे बंगालीतुन मराठीत भाषांतरीत झालेले, बिभुतीभुषण बंडोपाध्याय यांचे आरण्यक हे पुस्तक नक्कीच वाचले असेल.
http://www.ntm.org.in/download/ttvol/volume2_N2/10%20-%20Translation%20R...
जंगलाविषयी प्रेम असलेल्या लोकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. जमीनदारी पद्धत कशी काय सुरू झाली, सगळ्या जमिनींच्या मालकी गावातल्या सावकारांकडेच कशा इ. प्रश्न मला नेहमी पडत. हे पुस्तक वाचताना असले सगळे जुने प्रश्न सुटतात.
मी मागेही इथे या पुस्तकाबद्दल त्रोटक लिहिलेले, पुस्तक लायब्ररीत मिळत नाहीय, उद्या परत शोधेन. मला परत एकदा नीट वाचायचे. पुस्तक १९३९ किंवा त्याआधी लिहिलेय आणि पुस्तकाचा काळ १९ व्या शतकातला आहे. याचा परिणाम पुस्तकाच्या भाषेवर झालाय. सुरवातीला जरा नेट लावाला लागतो वाचायला, पण एकदा पकड घेतली की खाली ठेववत नाही.
भालचंद्र, जिप्सी आणि यो नी
भालचंद्र, जिप्सी आणि यो नी इथे चंद्राचे सुंदर फोटो टाकले होते, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन माझा एक (क्षीण) प्रयत्न !
सध्या आमच्याकडे जरा वेगळ्याच आकाराचे कोबी मिळतात. चक्क तांब्यासारखा आकार असतो.
परवा गाडीतून रस्त्याशेजारी एक लालभडक कळ्यांनी लगडलेली वेल दिसली. नीट दिसावी म्हणून मला गाडीतून उतरुन बघायची होती, तर ड्रायव्हर म्हणाला कि जाऊ नकोस, खुप कोब्रा आहेत ( पोर्तुगीजमधे कोब्रा हे सामान्यनाम आहे विशेषनाम नाही. कुठल्याही सापाला कोब्राच म्हणतात. ) कालच्या प्रभातफेरीत कॉलनीला
लागून असलेल्या जंगलात शिरलो. पायवाट सोडून भरकटायचे नाही हे पत्थ्य पाळले. तर हि वेल दिसली.
मग लक्षात आले कि त्या कळ्या नसून फळेच आहेत.
वेलीची पाने तोंडल्यासारखी आणि फळे मिरचीसारखी. लालभडक असूनही एवढ्या संख्येने शाबूत म्हणजे
बहुदा विषारीच असणार. सोबत कॅमेरा नव्हता म्हणून घरी आणून फोटो काढला. विषारी असल्याची शंका आल्याने, जास्त हाताळली मात्र नाही.
वा चंद्राचा फोटो मस्त...
वा चंद्राचा फोटो मस्त...
किती सुंदर लिहिलेत दिनेश...
किती सुंदर लिहिलेत दिनेश...
वाहवा.. किती सुंदर सुंदर गाणी
वाहवा.. किती सुंदर सुंदर गाणी आणी त्यांच्याशी जुळणार्या आठवणींची फुलं..
दिनेश दा.. __/\__
तो लालभडक रंग किती दिलकश आहे..
कलशरूपी कोबी.. सो क्यूट!!!
वर्षू, हि सगळी गाणी माहीत
वर्षू, हि सगळी गाणी माहीत असणारी कमी लोक असणार इथे
हिरा, बी.बी.सी. ची गँजीस बघितली का ? त्यात सुंदरबनाचे सुंदर चित्रण आहे.
दिनेशदा अप्रतीम आणि अत्यंत
दिनेशदा अप्रतीम आणि अत्यंत आवडती गाणी! आणि त्यात्या फुलासाठी काय अॅप्रोप्रिएट गाणी! व्वा!
वा दा दिल खुश हुआ
वा दा दिल खुश हुआ
Dineshada mast post va te
Dineshada mast post va te photo.
sundarbanachi mahiti chhaanach aahe
Jipsy asuhi shakate ase
Jipsy asuhi shakate ase zaad.
Bhuiringnichi fale pan ashi jalun tyacha dhur datavar ghetala ki kid padate. Mazya aaine ha upay pratyaksha pahila aahe eka bahinivar kelela.
pann hi va ashi mahiti aapanch visarat chalalo aahot.
दा......... ___/\___
दा......... ___/\___
अफलातून वर्णन आणि ओघाने आलेली गाणी........नक्षत्रांचे देणे कार्यक्रम आठवला..
निसर्गात रंग रेषांचा तोल किती मस्त साधलेला असतो नै!!...त्या फळांचा लाल रंग, ती हिरवी हिरवी पानं आणि त्या वेलीच्या खोडाचं मोहक वळण...सगळंच मनोवेधक!! ये कौन चित्रकार है...
सुंदरी ची माहिती मस्त. ही खारफुटी प्रकारातली आहे ना... 'आसमंत' मधे (इंगळहाळीकरांच्या) खारफुटीबद्दल एक अख्खं प्रकरण आहे.
दिनेशदा अप्रतीम आणि अत्यंत
दिनेशदा अप्रतीम आणि अत्यंत आवडती गाणी! आणि त्यात्या फुलासाठी काय अॅप्रोप्रिएट गाणी! व्वा!
१००+ अनुमोदन !
आता ही झाडे-फुले नक्कीच माझ्या लक्षात राहतील
दिनेशदा,
(यावर एक जुनं गाणं आठवलं, आणी त्यात थोडा फेर फार केला )
फुलोंका नाता गाने से युं जोडते चलों, निग के इस पन्ने पे प्रेम कि गंगा ऐसे बहाते चलो !
नमस्कार नि ग कर्स! दिनेशदा,
नमस्कार नि ग कर्स!
दिनेशदा, फुले आठवणी आणि गाणी यांची छानच गुंफण.
अनिल,
फुलोंका नाता गाने से युं जोडते चलों, निग के इस पन्ने पे प्रेम कि गंगा ऐसे बहाते चलो !
खुप छान.
Pages