प्रेमात पडलोय ना? मग फक्त प्रेम करायचं ;)

Submitted by कविन on 19 April, 2013 - 02:25

दिसता ती उरात धडधड
ऐकत रहावी तिचीच बडबड

जगाकडे करुन पाठ
गिरवावे प्रेमाचे पाठ

हळूच धरावा तिचा हात
वाजेल गाणे मनात आत

बघतो जेव्हा तिच्याकडे
सोबत्यांचा पण विसर पडे

सोबती घालतात चिक्कार वाद
म्हणतात कंपूतून तुला करु बाद

आता सांगा ह्यांना समजत कसं नाही?
वेडं प्रेम वागतं असं, मी मुद्दाम वागत नाही

कळेल कळेल जेव्हा चालतील माझाच रस्ता
विचारायला सल्ले मग शोधतील माझाच पत्ता

तोपर्यंत मात्र सारं कानाआड करायचं
प्रेमात पडलोय ना? मग फक्त प्रेम करायचं

(ह्या काकाकचा प्रेरणास्त्रोत कोण आहे हे कळणार्‍यांना कळेलच Wink Proud :दिवा:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ..... सहजतेने मांडलंय.
"कळेल कळेल जेव्हा चालतील माझाच रस्ता
विचारायला सल्ले मग शोधतील माझाच पत्ता" >>> या ओळी विशेष वाटल्या.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :

(१) सादरीकरणात अधिकच खुलू शकेल असे वाटते.

(२) कविता विभागात कारुण्य, वैफल्य, विषण्णता इ. पेक्षा काही वेगळं वाचायला मिळालं..... बरं वाटलं.
वैयक्तिक मत/आवड ..... कृगैन.

धन्यवाद उकाका Happy

यात्र्या Lol

रोमात राहून वाचणार्‍या आणि इमेलून प्रतिसाद देणार्‍यांनाही इथेच धन्स Wink

कविता विभागात कारुण्य, वैफल्य, विषण्णता इ. पेक्षा काही वेगळं वाचायला मिळालं..... बरं वाटलं.
>>+१०

मस्तचै..:स्मित: