Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धादिनेश, धन्यवाद! घट्ट
श्रद्धादिनेश, धन्यवाद! घट्ट पाक आवडत नाही आणि एकदा तो आत ही गेला नव्हता.
सीमा, तुझी रेसीपी पाहिली. आवडली. पण सध्या २ चि.मि. पडून आहेत. ते संपले की मग मी तुझी रेसीपी नक्की ट्राय करणार.आहे. बायदवे, तू हेवी क्रीम घालतेस का?
स्नेहा, स्ट्रॉबेरीचा पाक छान
स्नेहा, स्ट्रॉबेरीचा पाक छान होतो. फोडी करून साखरेच्या पाकात जरा शिजवायच्या. फ्रिज मधे टिकते.
स्ट्रॉबेरीज दे धाडुन इथे...
स्ट्रॉबेरीज दे धाडुन इथे... माझ्या लेकीला प्रचंड आवडतात
स्ट्रॉबेरी सॉस / कुली (coulis) करता येइल स्लो कुकर मधे. स्ट्रॉबेरीज, लिंबाचा रस आणि साखर... नेट वर रेसिपीज आहेत बर्याच. http://www.epicurious.com/recipes/food/views/Strawberry-Coulis-234239
स्ट्रॉबेरी जॅम, मिल्कशेक, आईस्क्रिम, चीजकेक, साधा केक आणि मफिन्स (ब्लुबेरीज ऐवजी स्ट्रॉबेरेज चे तुकडे), शॉर्टकेक्स, चॉकलेट डीप्ड स्ट्रॉबेरीज....
http://www.taste.com.au/recipes/collections/strawberry+recipes
पुदिन्याची टिकाऊ चटणी कशी
पुदिन्याची टिकाऊ चटणी कशी बनवावी? (१५-२० दिवस तरी टिकावी)
नारळ घालायचा नाही आणि लसूण
नारळ घालायचा नाही आणि लसूण किंचित कमी घालायची.
लिंबू पिळायचे. ८-१० दिवस फ्रीजमधे आरामात टिकते.
व्हीनीगर चालत असेल तर
व्हीनीगर चालत असेल तर व्हीनीगरमधे साखर घालून त्याला उकळी आणायची मग त्यात पुदीना + मिरची + मीठ + जिरे + आले अशी पाणी न घालता वाटलेली चटणी टाकून परत एक कढ आणायचा. नीट ढवळून थंड करुन बाटलीत भरायची. वर्षभरही टिकेल.
सुका पुदीना मिळाला तर कोरडी चटणी करुन ठेवता येते. आयत्यावेळी दह्यात किंवा चिंचेच्या पाण्यात भिजवायची. ( पुदीन्याची कोरडी पूड, गल्फ मधे मिळते. भारतात मिळते का याची कल्पना नाही. मोठ्या मसाल्याच्या दुकानात मिळत असेल. )
दाक्षिणात्य प्रकारच्या पुदिना
दाक्षिणात्य प्रकारच्या पुदिना पोडीची ही रेसिपी.
अकु, काय सुरेख रंग आहे
अकु, काय सुरेख रंग आहे पोडीचा!
भरपूर ऊन किंवा डिहायड्रेटर असेल तर आंबापोळी स्टाइल स्ट्रॉबेरीपोळी करायची. ब्लेंडर मधून काढायचे आणि एक कप पल्पला १ टी स्पून लिंबाचा रस घालायचा. साखर घालायची गरज नाही. २-३ दिवसात तयार होते. मी उन्हात कारमधे ठेवते. तुकडे कापून ग्रॅनोला, ट्रेल मिक्समधे घालायचे किंवा नुसतेच खायचे.
रच्याकने काल रात्री बकलावा केला. मस्त झाला. आभार :ऑलरेसिपी वरची मॉडिफाय केलेली रेसिपी, विद्याकने सुचवलेला विडियो आणि धीर देणारा नवरा
माझ्या मुलाचा वाढदिवस बागेत
माझ्या मुलाचा वाढदिवस बागेत करायचा विचार चालु आहे तर काय बनवू सुचत नाहिये म्हणजे न्यायला सोपे, काही सान्डायला नको , पोटही भरले पाहिजे, ग्रिलवर गरम कसे करायचे कहि तरि starter, lunch आणि desert हवय. कॄपया मदत करा. साधारण ४० लोकासाठी.
शुगोल, मी गिट्स च्या गुलाबजाम
शुगोल, मी गिट्स च्या गुलाबजाम मिक्स मधे एक-दिड टे.स्पु. मिल्क पावडर टाकते. थोड घट्ट भिजवते.
स्वाती२, थॅक्स, पण खंरच कधी कधी खुप अवघड वाटणार्या रेसिपी अशा यु-ट्युब वर पाहुन पाहुन सोप्या वाटु लागतात. तुझी स्ट्रॉबेरीपोळी ची आयडिया मस्त आहे. आणि कारमधे सुकवायची आयडिया तर त्याहुन मस्त.
वीणा, किती वर्षाचा मुलगा आहे,
वीणा, किती वर्षाचा मुलगा आहे, किती वयोगटातील मुले असणार,मेनु व्हेज कि नॉन्व्हेज हे काहीच लिहीले नाहीस. ईथे तसे बरेच मेनु बर्याचजणांनी लिहीले आहेतच. पण बागेत वाढदिवस साजरा करायचा तर मेनु सुटसुटीत असावा... सगळे तु घरी करणार कि काही विकतचे आणणार?.... पावभाजी, वडापाव, दहीवडे, मिसळ्+पाव, रगडापॅटीस, इड्ली+चटणी, चिकन तंदुर, चिकन नगेट्स, एखादा भाताचा प्रकार ,केक तर असेलच पण हव असेल तर अजुन त्याच्या जोडीला आईस्किम असेल तर मुले एकदम खुष.
वीणा, हा प्रश्न "बेत काय
वीणा, हा प्रश्न "बेत काय करावा" इथे जाउन विचार. माझ्याही आधी हे लक्षात आले नाही, आणि मी पण उत्तर इथेच लिहीले. Sorry ! हे काढायचे कसे?
मला कांदा लसूण मसाल्याची
मला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी हवी आहे . इथे शोधली पण प्रमाणासह हवी आहे .
इथे आहे, IE मध्ये
इथे आहे, IE मध्ये पहा-
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93126.html?1134078719
हो विद्याक माझी चुक झाली इथे
हो विद्याक माझी चुक झाली इथे टाकुन "बेत काय करावा" इथे जरा टाकुन पाहते. धन्यवाद.
धन्यवाद, नी, दिनेशदा,
धन्यवाद, नी, दिनेशदा, अकु!!
काल एक मोठ्ठी जुडी आणलीय पुदिन्याची. करुन बघेन.
स्वाती पुदिना वाळवूनही ठेवता
स्वाती पुदिना वाळवूनही ठेवता येतो.
चांगली हिरवी गार पानं निवडायची. स्वच्छ धुवून स्टीलच्या ताट्लीत कडक उन्हात ठेवायची. २ दिवसात अगदी चुरचुरीत वाळतात. हातानेच क्रश केली की छान पावडर होते.
पराठ्यात, चटणीत, कडधान्यांच्या उसळीवर, विशेष्तः छोल्यांवर ... भुरभुरायला होते.
आणि स्वाद ताज्या पुदिन्याच्या जवळपासच!
माझ्याकडे नेहेमी असते.
नाचणीची आंबील कशी करतात? इथे
नाचणीची आंबील कशी करतात? इथे असेल तर लिंक द्या.
धन्स मानुषी.
धन्स मानुषी.
आंब्याचा रस साठवून कसा
आंब्याचा रस साठवून कसा ठेवायचा?
काळजीवाहू नाचणी दळून आणायची
काळजीवाहू
नाचणी दळून आणायची आधी थोडं पीठ थंड पाण्यात चांगलं मिक्स करायचं. मग चांगलं मिक्स झालं की गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं. उकळी आली की नाचणी पिठाचं पाण्यात कालवलेलं मिश्रण घालून सतत ढवळत रहायचं. थोडं मीठ जिरेपूड बा. चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरती साखर खालून चांगलं शिजवायचं . वरून तेल, मोहोरी, भरपूर हिंग, हिरवी मिरची याची फोडणी द्यायची. व नंतर गोड ताक/दही घालून खायला घ्यायच.
इडली -डोशाबरोबर टॉमेटो ची
इडली -डोशाबरोबर टॉमेटो ची चटणी देतात.. ती कशी करतात ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/39630 हा एक प्रकार मस्त लागतो टो चटणीचा...
अय्या इश्य वगैरे.. धन्स अकु!
अय्या इश्य वगैरे..
धन्स अकु!
इं.ग्रो. मधून पहिल्यांदीच
इं.ग्रो. मधून पहिल्यांदीच ज्वारीचं पीठ आणलंय..टॉटल फ्लॉप ...थोडंसं मळायला घेतलं तरी मोडायला लागतंय. भाकरी-बिकरी दूरची गोष्ट ...काय करू? मला संध्याकाळी भाकरी खा असा सल्ला दिलाय तो अमलात आणायचा पहिलाच प्रयत्न मोडीत निघणार असं दिसतंय.. बाजरीचं पुर्वी आणलं होतं तेव्हा अगदी छोट्या भाकर्या तरी ़जमत होत्या हे ज्वारी प्रकरण एकदम फ्लॉप झालंय...:(
मला अगदी सुपर डूपर मोठ्या भाकर्या येणार नाहीत हे माहित होतं पण इथे म्हण्जे छोट्या पुरीइतकाही गोल करणं शक्य नाही आणि केला गेलाच तर पोळपाटावरून उठणार नाहीतची ग्यारेंटी...
लाजो आणि स्वाती,
लाजो आणि स्वाती, धन्यवाद...फारच भन्नाट आयडियाज आहेत...स्ट्रॉबेरीपोळी मस्तच वाटते आहे.
लाजो, शक्य असते तर नक्की पाठवल्या असत्या
वेका , भाकरिचे पिठ गरमं
वेका , भाकरिचे पिठ गरमं पान्यात मळुन बघ...
वेका -- अर्चू म्हणतेय तसं गरम
वेका -- अर्चू म्हणतेय तसं गरम पाण्यात भिजवुन बघ. माझी एक मैत्रिण अगदी ऊकळतं पाणी टाकते पिठात आणि चमच्याने मिक्स करते, मग कोमट झालं की मळून भाकरी करते. नाहीतर मग थोडी कणिक मिक्स करता येईल, चिकटपणा येण्यासाठी..........
वेका, इकडच्या पिठाचा असाच
वेका, इकडच्या पिठाचा असाच प्रोब्लेम होतो. मी पण उकळते पाणी व थोडी कणीक मिक्स करते. आणि तांदळाच्या पिठीवर चक्क लाटते. मला भाकरी थापता येत नाही. पण वरच्या प्रमाणे पिठ भिजवले तर भाकर्या मस्त होतात.
भाकरीचा नाद सोडून द्यावासा
भाकरीचा नाद सोडून द्यावासा वाटत असेल तर मुठिये करता येतील. मेथी, दुधी, गाजर ईत्यादी भाज्या घालून हेल्दी ऑप्शन.
Pages