खगोलशास्त्रीय सटरफटर

Submitted by aschig on 9 July, 2010 - 00:50

फार खोलात न शिरता इथे खगोलशात्राशी संबंधीत काही त्रोटक factoids (सद्य आकलनानुसार) नियमीतपणे टाकायचा विचार आहे.

(१) विश्वाच्या मालमत्तेपासुन सुरुवात करु या: विश्वात पसरलेल्या दिर्घीका, त्यांचा व्याप व विश्वावे आकारमान वाढण्याचा वेग पहाता असे लक्षात येते की ५% पेक्षा कमी मालमत्ता दृष्य वस्तुमानात आहे (म्हणजे तुम्ही-आम्ही, ग्रह, तारे ई. थोडक्यात बॅरीऑन या प्रकारात मोडणारे कण - Baryonic matter). त्याच्या ५ पट वस्तुमान अदृष्य स्वरुपात (dark matter) असते, तर तब्बल 3/4 पसारा अदृष्य उर्जेच्या स्वरुपात असतो (dark energy). [८ जुलै २०१०]

(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]

(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]

(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही..
was just wondering, how would it be on a planet with 4 starts.. पण मग नाईटफॉल आठवली Happy

माधव, छान लेख
लेखात म्हणल्याप्रमाणे,
>> The wavelength of light ranges from hundreds of miles for long radio waves to one millionth of a nanometer for gamma rays
मला एक प्रश्ण होता, प्रकाशलहरींच्या तरंगलांबीला मर्यादा (मोठ्यात मोठी आणि लहानात लहान) आहेत का? असल्यास कशामुळे?
गुगलून मिळालेले उत्तर,
The limit for long wavelengths is the size of the universe itself, while it is thought that the short wavelength limit is in the vicinity of the Planck length,[2] although in principle the spectrum is infinite and continuous.
बघा, इथे आणि इथे.

सॅम, सर्व प्रकाशलहरी ह्या एकाच वेगाने (c) प्रवास करतात.

तरंगलांबी (wavelength) X वारंवारता (frequency) = वेग या सूत्रानुसार तरंगलांबी ० पेक्षा जास्त आणि प्रकाशाने एका सेकंदात कापलेल्या अंतराएवढी किंवा त्यापेक्षा कमी हवी.

>> तरंगलांबी ० पेक्षा जास्त हवी
अर्थात, तरंगलांबी negative असणार नाही. पण,
>> प्रकाशाने एका सेकंदात कापलेल्या अंतराएवढी किंवा त्यापेक्षा कमी हवी.
हे बरोबर वाटत नाही... जर तरंगलांबी c हुन जास्त झाली तर वारंवारता १ Hz हून कमी होईल पण त्यात काहीच problem नाही.
उदा. तरंगलांबी = २c तर वारंवारता = ०.५ Hz.

उगाच मराठी शब्द वापरु नका. आपण ओढुन ताणुन प्रत्येक english शब्दाला मराठी शब्द तयार करायची गरज नाही. आहे तसे english शब्द वापरा, पाहिजे तर देवनागरी लिपि मधे लिहा.
English ने हजारो पर भाषेतील शब्द घेतले. उगाचच प्रतिशब्द करण्यात वेळ नाही घालवला.

माझ्या लहानपनी 'आकाशाशि जदले नाते' नावाचि लेख माला यायचि 'सकाल' मध्ये.... नक्शत्रे अनि राशि या बरोबर धुमकेतु, आकाशगन्गा मि पाहिले आहेत. अगदि स्पायरल आकाशगन्गा सुध्या!
सध्या माझ्यकदे ति कात्रने नाहित्....मि थेव्लि होति लेखाचि कात्रने पन आता नाहित्....खजिना गेल्यासारखे वातते आता......कुथे मिलेल अगदि तशि माहिति?...

आशिष, आज उद्याकडे शोधायचा झाल्यास कुठे बघावे? नेटवर बहुतेक १२ नंतरचीच माहिती सापडतेय. मुंबईतून बघण्यासाठी वेळ आणि अंदाजे जागा सांगू शकशील का?

अश्चिग, ११-१२ नंतर तो क्षितीजापासून अजून वर दिसणार आहे का? तुम्ही लोकं ग्रिफिथ किंवा तत्सम कुठे जाणार आहात का पहायला? तसं असल्यास प्लीज सांग नक्की.

माधव, rmd, आजपासूनच दिसायला हवा.
हा अजुन एक दुवा पहा (पुढच्या महिन्याभराची लोकेशन्स आहेत) :
http://www.space.com/20091-comet-pan-starrs-night-sky-stargazing-tips.html

rmd, शहरापासून दूर गेल्यास आकाश जास्त चांगले दिसेल. आम्ही तर काही दिवस नाही जाणार ग्रिफीथला, पण तिथे नेहमीच अनेल लोक छोट्या दुर्बिणी घेऊन येतात. तिथे गेल्यास नक्की दिसेल.

क्वेसार्सच्या शोधाला ५० वर्षे झाली त्या निमित्ताने खालील लेख प्रसिद्ध झाला:
http://www.caltech.edu/content/fifty-years-quasars

तीन वर्षांपुर्वी आम्ही जेंव्हा खगोलशास्त्राच्या नव्या ईमारतीत बदलून आलो तेंव्हा माझ्या वाट्याला मार्टीनच्या दोन खुर्च्या आणि कॉफी टेबल आले. क्वेसार्सवरील माझ्या काही पेपर्स इतकेच तेही महत्वाचे Happy

काही समजले नाही. कॅलिफॉर्नियातील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अजून माहिती देऊ शकतील का? Happy

नंदिनी, त्या कॅलिफॉर्नियातील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांना हाच प्रश्न माबोवर टाकायला सांगा. Happy
आ.न.,
-गा.पै.

नंदिनी, समजण्यासारखे तिथे काही लिहीलेच नाहीये - इकडच्या दोन गोष्टी घेऊन तिकडे जोडणे यातला हा प्रकार आहे Sad

वर दूसरी एक लिंक दिली होती, ती वाचून वरील 'लेख' प्रसूत झाला
http://www.telegraphindia.com/1130218/jsp/nation/story_16574453.jsp

मित्रहो !
१). थीन्ग्स एक्सिस्टिन्ग इन व्हीजीबल ( रीचेबल ), स्पेस & नोटिस्ड, हॅज अनईमॅजिनेबल व्हास्ट एरिया कव्हर्ड & कन्ट्रोल्ड.
२). स्टिल एक्सिस्टिन्ग बट बियॉन्ड व्हीजीनीटी ( रीच ) & अन्-नोन, इज फॉर शूअर मच बीगर & आउट ऑफ एक्सिस्टिन्ग रीच ऑफ अवर करन्ट लेव्हल ऑफ नॉलेज.
३). ओन्ली वन हीन्ट ईज देअर, द स्पेस, इट कव्हर्स ऑल & एव्हरिथिन्ग. सो, व्हॉट हॅपन्ड अबाउट द थॉट ऑफ रीचीन्ग टिल द एन्ड ऑफ द स्पेस ? ऑर से युनिव्हर्स / मल्टीव्हर्स ? बीसाईडस् स्टडी ऑफ अदर थिन्ग्स स्कॅटर्ड इन स्पेस ?
४). खगोल शास्त्राविषयी एक गोष्ट स्पष्ट आहे. . . . ह्या विषयात आजपर्यन्त जितकि इनव्हेन्शन्स झाली असतील ती सर्व डिस्कवरी साठीच झालि.
५). भौतिक शास्त्र अजुन म्हणाव तेव्हढ प्रगत नाहि, पण हो, जीतकी प्रगती झालि आहे, तिथुन दिशा मात्र मीळते पुढे जायला. ( चाचपडत ).
६). डोळ्यान्वरचा चश्मा मी काढला, कि मला आजकाल सगळे काही स्पष्ट दिसते.
. . . . म्हणजे एक्सिस्टिन्ग नॉलेज चा उपयोग करुन मी दृष्टी सरळ करुन घेतली. . . .
७). आईनस्टाईनची खूप आठवण येते कधी-कधी, तो म्हणायचा . . . . एनी ईण्टॅलीजण्ट . . कॅन मेक थिन्ग्स बिगर अ‍ॅण्ड कॉम्प्लिकेटेड, बट इट टेक्स, अ माईण्ड ऑफ अ‍ जीनीयस टू मेक थिन्ग्स ईजी अ‍ॅण्ड सीम्पल टू अ‍ॅचिव्ह.
८). बाकी सर्वान्चे प्रतिसाद वाचले कि, सगळ्या गोष्टी कश्या सोप्या दिसतात,
थॅन्क्यु ऑल, चालु द्या . . . .

Pages