जेव्हा एखाद्या वाक्यरचनेतून एकाहून अधिक अर्थ ध्वनित होतात तेव्हा श्लेष अलंकार साधला जातो. या गाण्यातही अशाच प्रकारे वाक्यरचनेतून दोन अर्थ आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे प्राथमिक श्रवणातून जो अर्थ निघतो त्यातही नेहमीच्या पारंपारिक विचारांपेक्षा एक नवा आधुनिक विचार प्रकट केलाय जो निदान मला तरी अतिशय महत्वाचा वाटतो.
सुरूवातीचे ५० सेकंद केवळ वाद्यांचा आवाज आणि लताचा ओलाप ऐकू येतो. त्यानंतर गीताचे शब्द सुरू होतात.
नदीया बहती है तुमसे कहती है ...
सागरसे मुझको मिलना नही है, सागरसे मिलके मै खारी हो जाऊंगी।
या ओळींमधूनच आपल्या लक्षात येतं की गीतकार एक वेगळा नवा विचार आपल्यासमोर मांडतोय. नेहमी नदी सागरा मिळते, नायक नायिकेचे नाव सागर सरिता असणे वगैरे गोष्टी आपण चिक्कारदा ऐकल्या आहेत. इथे नदी सांगतेय की मला सागराला भेटायचंच नाहीये. त्याला भेटून माझं पाणी खारट होईल. आता हा विचार नवा जरी असला तरी चूकीचा नक्कीच नाहीये. नदीचं पाणी एकदा सागरात मिसळलं की ते खारटच होणार.
बांधलो मुझे, रोक लो मुझे; मै तुम्हारी हो जाऊंगी ।
बघा म्हणजे ही नदी म्हणतेय की मला सागराला जाऊन मिळण्यापासून थांबवा, अडवा. मी तुमच्या उपयोगी पडेन. जुनाट विचारांचे लोक धरणे बांधायला विरोध करीत त्या पार्श्वभूमीवर तर हा विचार अधिकच प्रेरणादायी वाटतो. शिवाय मला यातून जाणवलेला एक छुपा दुसरा अर्थ असा की वरवर ऐकायला जरी हे गीत नदीचे आत्मवृत्त प्रकारातील वाटत असले तरी खोलवर ते कुठेतरी एका स्त्रीचे आत्मवृत्त आहे. ती म्हणतेय की माझे घरचे माझा कल न पाहता, माझ्या मनाचा विचार न करता मला कुणाच्या तरी गळ्यात बांधतील, जे की मला पसंत नाही. त्या अगोदर माझ्या मनाचा विचार करणार्या, माझी आवडनिवड जोपासणार्या कुणीतरी मला आपली बनवा. थोडक्यात हा घरच्यांनी ठरविलेला विवाह विरुद्ध प्रेमविवाह असा सामना आहे आणि ही स्त्री आपल्या प्रियकराला साद घालतेय. तिच्या मनात जी पारंपारिक नवर्याची प्रतिमा आहे तिला तिने सागराची उपमा दिली आहे आणि तिला हव्याहव्याशा वाटणार्या प्रियकराला तिने धरणाची उपमा दिलीय.
नाव तो क्या गांव बह जाते है मेरी चाल मे ऐसी रवानी।
बांधलो मुझको बहक न जाए चंचल चंचल जवानी का पानी॥
नदीच्या प्रवाहाला असणार्या वेगाचा अंदाज आला नाही तर नौका तर डुबतेच आणि कधी काळी जर नदीने रौद्र रूप धारण केलं तर गावंच्या गावं पाण्याखाली जातात. तेव्हा या पाण्याच्या प्रवाहाला वेळीच आवर घाला असंही ही नदी सूचवितेय. पुन्हा याच शब्दांचा स्त्रीच्या संदर्भामध्ये अर्थ शोधला तर स्त्रीच्या आकर्षण प्रवाहात बुडालेला टायटॅनिक मधला प्रियकर देखील आठवेल आणि स्त्रियांना मिळविण्याकरिता पुरूषांनी केलेली युद्ध आणि त्यात बेचिराख झालेल्या राज्यांच्या कथाही आठवतील. वेळीच योग्य हाती हे तारूण्य सुपूर्त झालं नाही तर नेमकं काय होईल याचा अंदाज तिलाही नाही म्हणूनच ती म्हणतेय बहक न जाए चंचल चंचल जवानी का पानी.
मेरी आंचलमें है अमृत वह देदे जो नयी जिंदगानी।
आंगन आंगन बरसेगा कंचन, जानसे तुमको मै प्यारी हो जाऊंगी।
इथेही पुन्हा आंचलमें अमृत हा शब्द नदीच्या संदर्भात पाणी या अर्थाने तर स्त्रीच्या संदर्भात दूध ह्या अर्थाने वापरला असून दोन्हींमूळे नवजीवन मिळते. त्याचप्रमाणे नदीच्या पाण्याने शेते पिकून सोन्यासारखे धान्य प्रत्येक अंगणी बरसेल तर स्त्री घरादाराचं सोनं करून टाकेल आणि या दोघीही त्यांच्या कुटुंबियांना (नदीचं कुटुंब तर अख्खा गावच) प्राणप्रिय होतील.
रेत जहां, खेत लहराएंगे जागेगी धरतीकी ममता सोयी।
प्यार तुम्हे दुंगी, बहार तुम्हे दुंगी, प्यासा रहेगा न पनघट कोई।।
आज जिथं वाळवंट आहे उद्या तिथे नदीच्या पाण्यामुळे शेते बहरतील. पुरुषांचं आयुष्य काम, धंद्या निमित्त कराव्या लागणार्या ढोरमेहनतीमुळे वैराण वाळवंटासारखंच असतं. प्रेयसीच्या रुपाने येऊन स्त्री त्याला प्रेम देते आणि त्याची ही तहान भागविते हा भाव अतिशय सुरेख पद्धतीने व्यक्त झालाय.
मेरा नामोनिशां फिर होगा कहां, मै जो समंदर में खोई।
मुझे अपनालो, गांव मे बसालो, तुम्हारीही सारी की सारी हो जाऊंगी॥
मी जर त्या खारट समुद्राला जाऊन मिसळले तर मग माझ्या गोड्या पाण्याचं अस्तित्व काय राहणार? मला इथेच आपलं बनवा. या गावातच मला थांबवा म्हणजेच धरण बांधा. माझं पाणी तुमच्याच उपयोगी पडू द्या.
पूर्वी मुलीच्या घरचे केवळ जात, धर्म, पैसा, अडका यांनी भुलून जाऊन मुलीला कुठेतरी दूरच्या शहरी विवाह करून पाठवायचे. तिथे तिचा पती बहुतेकदा तिचे मन जाणु न शकणारा, अरसिक, शुष्क मनोवृत्तीचा असायचा अशा हकीकती आपल्याला ठाऊक आहेतच. अशाच पतीला तिने खारट समुद्राची उपमा दिलीय. अशा घरात माझं अस्तित्व ते काय असणार? त्यापेक्षा गावातल्याच तिच्या अस्मितेला जपणार्या एखाद्या तरूणाने तिचा प्रियकर बनुन तिला आपलं बनवावी हिच तिची इच्छा दिसतेय.
गीतलेखनाबरोबरच लताचा आवाज आणि कानाला सुखावणारं संगीत या जमेच्या बाजू आहेत. तीन दशकांपूर्वीच्या नई इमारत या चित्रपटातील ह्या गीताला पडद्यावर साकारलंय विद्या सिन्हा, परीक्षित सहानी, अमरिश पुरी आणि इतर सहकलाकारांनी.
परंपरेने ठरवून दिलेला समुद्र हा नायक झुगारून आपल्या मनातला खरा नायक धरणच आहे असे ठासून सांगणार्या सरितेच्या या गाण्याचा आस्वाद एकदा तरी जरूर घ्यावा.
द्वयर्थी??? हा शब्द निराळ्या
द्वयर्थी??? हा शब्द निराळ्या अर्थाने वापरला जातो ना?
चांगला लेख. धन्यवाद.
चांगला लेख. धन्यवाद.
कुठल्याही कलाकृतीकडे पाहताना
कुठल्याही कलाकृतीकडे पाहताना आपली पार्श्वभूमी, अनुभवविश्व, अभिव्यक्ती या बाबी अत्यंत महत्वाच्या असतात. त्यानुसारच ती कलाकृती आपल्याला भावते. इथे देखील लेखकाने त्याची अभिव्यक्ती वाचकांसमोर ठेवल्याबद्दल मानावेत तेव्हढे आभार थोडेच आहेत.
सीनेमे जलन, आखोंमे तुफान सा
सीनेमे जलन, आखोंमे तुफान सा क्यूं है
इस शहर में, हर शख्स परेशान सा क्युं है
ही गझल ऐकताना अर्थातच कुणाला शायराने अस्वस्थतेचं काय बेमालूम वर्णन केलंय असं वाटेल. अशी अस्वस्थता अनुभवलेल्या प्रत्येकाला हे गीत त्याबद्दलच आहे असं वाटेल. अर्थात प्रत्येकाच्या मनात असणा-या भावना वेगळ्या, जडणघडण वेगळी. दिल्लीतल्या डिसेंबरात झालेल्या दुर्दैवी घटनेत त्या अभागी तरुणीचा मित्र तिच्यासाठी झुंजला तर तिच्याकडे वेगळ्या भावनेने पाहणा-या त्या नराधमांच्या मनात जी भावना होती अशी भावना मनात असणा-यासाठी हे गीत कामुकतेला आवाहन करणारे वाटू शकेल. या शहरातली प्रत्येक व्यक्ती आपल्याच सारखी कामाग्नीत जळतेय असंही त्याला वाटू शकेल.
यात कुणी चूक आहे असं कसं म्हणता येईल ?
चेतन सुभाष
चेतन सुभाष गुगळे,
गीतपरिचयाबद्दल धन्यवाद! वेगळा विचार आहे. पण यास श्लेष म्हणता नाही येणार. इथे एका अक्षरसमूहातून वेगवेगळे अर्थ प्रकट होत नाहीयेत.
यातले नदी हे गावातल्या एका तरुणीचे रूपक आहे. साधारणत: कवितेत रूपकाचा आवाका एखाददोन कडव्यांपुरता मर्यादित असतो. मात्र इथे पूर्ण गीतास सलगपणे रूपक लागू पडते. त्यामुळे हे गीत वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे.
असं आपलं माझं मत.
आ.न.,
-गा.पै.
तिच्याकडे वेगळ्या भावनेने
तिच्याकडे वेगळ्या भावनेने पाहणा-या त्या नराधमांच्या मनात जी भावना होती अशी भावना मनात असणा-यासाठी हे गीत कामुकतेला आवाहन करणारे वाटू शकेल. या शहरातली प्रत्येक व्यक्ती आपल्याच सारखी कामाग्नीत जळतेय असंही त्याला वाटू शकेल.
यात कुणी चूक आहे असं कसं म्हणता येईल ?<<<
अतिशय सुमार, अभिरुचीहीन आणि अपरिपक्व पोस्ट! निषेध! शहरयारच्या त्या गझलेतील कोणताही मिसरा कोणीही ऐकला आणि ऐकणारा नराधम येथपासून ते संत यातील कोणीही असला तरीही हा असला अर्थ कधीही निघू शकणार नाही. असला अर्थ काढण्यासाठी किंवा कोणीतरी काढू शकेल असे म्हणण्यासाठी जी मानसिक जडणघडण आवश्यक असावी तिचा परिचय मात्र झाल्यासारखे वाटत आहे. पांडित्यप्रदर्शनाच्या कार्यक्रमात 'सीनेमे जलन' या गझलेतील अत्युत्तम अभिव्यक्तीची बेजबाबदार चिरफाड झालेली पाहून कीव करण्याशिवाय उपाय राहिलेला नाही.
चेतनजी - अवांतर पोस्टसाठी क्षमस्व!
-'बेफिकीर'!
ही पोस्ट बेफिकीर यांच्या
ही पोस्ट बेफिकीर यांच्या अभिरुचीसाठी नव्हती. राग येण्याचं कारण नाही आणि सुमार म्हणण्याचं कारणही नाही. बेफिकीर यांची बौद्धीक दिवाळखोरी वेगळी उलगडून सांगण्याची गरज नाही. इथं जे काही म्हणायचं आहे ते धडधडीत आहे . बेफिकीरने त्याचा निषेध करावा इतकी इतपत त्याची समज नाही. धन्यवाद.
पांडीत्यप्रदर्शन हा शब्द कोण वापरतंय ? कविता अशीच लिहावी असं नियमच जाहीर करणारा बेफिकीर ? किरणने असला फालतूपणा कधीही केलेला नाही आणि हेच मत अंतिम असा दावा कुठल्याही पोष्टीत केलेला नाही.
असला अर्थ काढण्यासाठी कुणीतरी
असला अर्थ काढण्यासाठी कुणीतरी नराधमच असला पाहीजे.
हेच म्हणायचं आहे. जेव्हां ग्रेसच्या ती गेली तेव्हां या ओळीत बेफिकीरला सूर्य एक मनोरुग्ण दिसू शकतो तर नराधमांचं काय ?
ग्रेसवर झालेली चर्चा
ग्रेसवर झालेली चर्चा मायबोलीवर झालेली नाही. सवयीनुसार अत्यंत नवखे नांव असलेला आय डी घेऊन तिसर्याच साईटवर तुम्ही ती चर्चा एका लेखाद्वारे सुरू केलीत आणि तुमच्या चर्चाप्रस्तावात / लेखात चिंतनाचा लवलेष नसल्याने आणि निव्वळ प्रतिसादप्राप्ती हा स्वस्त हेतू उघड असल्याने तेथील (ज्यांच्यात मी स्वतःला कधी गणू शकत नाही याची नम्र जाणीव आहे) खर्याखुर्या साहित्य जाणकारांनी त्या चर्चाप्रस्तावाची / लेखाची अभूतपूर्व टर उडवली व हुर्यो केली. तेथील मॉडरेशन प्रक्रियेतील नियमावलीनुसार तुमचे बहुतांशी प्रतिसाद भडकाऊ, निरर्थक असली विशेषणे लागली जाऊन शून्य गुणांसह ग्रे होऊन अर्धवट दिसेनासे झाले व त्यायोगे त्या प्रतिसादांचा योग्य तो बहुमान तेथे जागच्याजागीच झाला. अर्थात, मी माझी मते नेहमीप्रमाणेच 'आय डी कोणाचा' हे न बघता स्पष्टपणे मांडली आणि तेथे बावचळून काहीच न करता आल्याने त्या दिवसापासून आपण येथे ***लीला सुरू केल्या आहेत. त्या चर्चेची लिंक येथे देऊन येथील कोणताही धागा भरकटवण्याची माझी इच्छा नाही म्हणून मी आजवर ती लिंक दिलेली नाही.
मात्र केविलवाणी आंतरजालीय अवस्था व मनोवस्था गाठली गेल्यामुळे आता जळीस्थळीकाष्ठीपाषाणी आपण तोच विषय (ग्रेस) सर्वत्र काढत आहात हे पाहून माझे अनेक दिवस मस्त मनोरंजन होत आहे, त्यासाठी आभार!
चेतन यांच्या या धाग्यावर माझी ही शेवटची पोस्ट! त्या स्थळावरील ती लिंक मी मायबोलीवर कधी दिलीच तर तुमचा जो दिव्य पोपट झालेला होता तो सर्वांना दिसेलच. पण ते असो!
अॅडमीन व चेतन - चर्चा अवांतर झाल्याबद्दल दिलगीर आहे.
-'बेफिकीर'!
चेतनजी चांगला लेख. अतिशय
चेतनजी चांगला लेख.
अतिशय सुमार, अभिरुचीहीन आणि अपरिपक्व पोस्ट! निषेध! >> अनुमोदन, त्या पोस्टीचा निषेध!
सीनेमे जलन, आखोंमे तुफान सा क्यूं है
इस शहर में, हर शख्स परेशान सा क्युं है
दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूँढे,
पत्थर की तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यूं है
तन्हाई की ये कौन सी मंजिल है रफीकों
ता-हद्द-इ-नज़र एक बयाबान सा क्यूं है
क्या कोई नै बात नज़र आती है हम में
आईना हमें देख के हैरान सा क्यूं है
- याचा अर्थ असा कोणी काढत असेल तर अशी लोक माबोवर कशी काय राहु दिली जातात हा प्रश्नच आहे!
बेफिकीर, किती धादांत खोटं
बेफिकीर,
किती धादांत खोटं बोलतोस ? मी फेसबुक वर गझल संबंधात लिहीलेली पोस्ट इथे कॉपी पेस्ट करून तू इथल्या एका आयडीला जर मी पिसं काढायची ठरवली अमूक तमूक होईल तर अशी दर्पोक्ती केलेली आहेस. काढ ना पिसं. पण फेसबुकवर. माझ्या पोस्टी तिथे आहेत. मायबोलीवर नाहीत. तू असा त्रास देत सुटल्याने मला पुन्हा यावं लागलं तर तू तत्परतेने माझा आयडीच ब्लॉक केलास कि. म्हणून तर तुझ्या सगळ्या पोस्टी एकत्र करून एका बाफवर टाकलेल्या आहेत. लिंका देऊ का इथल्याच ?
तुझी ती वादग्रस्त पोस्ट अॅब्स्ट्रॅक्ट आर्टच्या धाग्यावर आहे. तो धागा मायबोलीवर आहे. अशा प्रकारच्या कविता आणि अर्थ लावणे हा मूर्खपणा आहे हे तू अनेकदा मायबोलीवर लिहीलेले आहेस. तू दुस-या संस्थळाचा उल्लेख का करतो आहेस ? तुला वाटतंय माझी हुर्यो उडाली म्हणून ? तुझी इथे अनेकदा हुर्यो उडालेली आहे. जिथल्या गुणांकन पद्धतीचा तुला गौरव करावासा वाटतोय, तिथे माणूस गेल्यावर कसे व्यक्त व्हावे याबद्दलची तुझी पोस्ट इथे कॉपी पेस्ट केलेली आहे. त्या पोस्टबद्दल अनेकांनी बेफिकीर हा काय लायकीचा माणूस आहे, त्याच्या नादाला लागूच नये असं मत व्यक्त केलेल आहे. गंमत म्हणजे त्या पोस्टला रोचक असं म्हटलं गेलंय. या गुणांकनावर तुझा विश्वास असेल यात शंका नाही. कारण गाथाचित्रशती या स्पर्धेत माझ्या लेखाला बक्षीस मिळालं नाही म्हणून आनंद व्यक्त करणा-या तुझ्या अनेक पोस्टी निकालच्या पोस्टवर होत्या. त्यावेळी तू स्वतः स्पर्धेत भाग घेतलेला नव्हतास, मात्र निकालाच्या बाफवर ठाण मांडून बसला होतास. तुझ्या समर्थकांना तुझं वागणं खटकणं शक्य नाही इतका तू आणि तुझा कंपू माझा द्वेष करतात. त्याचं मला सोयरसुतक नाही. निकालाचं मला काहीच वाटलं नाही. कारण मोहिनी पवार या इथल्याच एका सदस्याने तुझ्या सांगण्यावरून काढलेल्या ड्युआयडीने मला बक्षीस मिळणार नाही हे आधीच सूचित केलं होतं. तो लेख महिनाभर डिलीट झालेला नव्हता. गंमत म्हणजे निकालानंतर तो लेख वर आल्याबरोबर तत्परतेने डिलीट झाला. तात्पर्य : तो लेख बक्षिसासाठी लिहीलेला नव्हता आणि त्याबद्दल तुला झालेल्या आनंदाने माझं मनोरंजनच झालं होतं. तू त्यावेळी मोहिनी पवार हा आयडी माझा असल्याचे एसेमेस देखील लोकांना पाठवले होते अशी ऐकीव माहिती होती माझी. पण मी शांत याच्याचसाठी राहिलो कि एक ना एक दिवस सगळं उघड होईल. माझे एखाद्या सदस्याबरोबर मतभेद झाले कि अचानक झपाट्याने एखादा ड्युआय येतो आणि एकतर मला अद्वातद्वा तरी बोलतो किंवा विरुद्ध पार्टीचा आयडी तुमचा विरोधक असेल तर मला समर्थन देतो, यामुळे सुरूवातीला मी अस्वस्थ होत होतो. आता नाही. असे अनेक ड्युआय कुणाचे आहेत हे इथलं लहान मूलही ओळखतं.
तर त्या संकेतस्थळाचा मुद्दा काढलाच आहेस तर मी तिथे तुझ्या बेफिकीर या नावाप्रमाणे चित्रकार हे उपनाम घेतले. त्याबद्दल विचारण्याचा तुला काहीच हक्क नाही. तिथे कुणीच नावाने पोस्ट टाकत नाही. चिंतातूर जंतू या नावाचा माणूस असू शकेल का ? दुसरं म्हणजे मी तिथे काही तिलकधारी, गझल समीक्षक, गंभीर विदूषक, चंपी, भुणभुण असं नाव घेऊन चर्चा केलेली नाही. बेफिकीर या नावाशिवाय सुरूवातीला तू गंभीर समीक्षक या नावाने आत्ता तिलकधारी ज्या पद्धतीने पोस्टी टाकतो आहे तशा पोस्टी टा़कत होतास. सुरूवातीला तू कबूल होत नव्हतास, पण उघडा पडल्यावर गंस हा आयडी तू तुझा आहे हे कबूल केलंस. तिलकधारी हा तुझा आयडी नाही असं तू म्हणतोस. पण तिलकधारी मायबोलीवर मार्च महिन्यात येणार आहे, तिलकधारीने असं केलं होतं अशा अनेक पोस्टी तुझ्या आहेत. असो. तो तू असू देत नाहीतर आणखी कुणी, त्याला गझलेतलं ज्ञान असल्यास त्या ज्ञानास तो पात्र नाही इतकाच त्या पोस्टींचा अर्थ.
तुझी ती पोस्ट इथेच मायबोलीवर आहे. जर तू त्या ओळीचा अर्थ मला समजला नाही असा पवित्रा घेऊन अर्थ विचारला असता तर मी मला माझी समज जितपत आहे तिथपर्यंत समजावण्याचा प्रयत्न केलाही असता. पण तुझा इगो आड येत असावा. अर्थ वगैरे विचारण्यापेक्षा तू तुझ्या उर्मट आणि उद्धट स्वभावाचे दर्शन घडवत मला तर या ओळीत सूर्य मनोरुग्ण दिसतो आहे अशी मल्लिनाथी केलीस आणि अनेकांचे मनोरंजन केलेस. फक्त ** च्या नादी लागू नये हे माहीत असल्याने कुणी तिथं सहभाग घेतला नाही आणि इतका टोकाचा अर्थ या ***ने काढलाच आहे तर कशाला आपण कॉबोर्ड झिजवा, म्हणून तुझ्यापुरता तो अर्थ बरोबर आहे असं म्हटलं.
त्यावर आणखी एका ठिकाणी असल्या कविता लिहायच्याच कशाला असा प्रश्न विचारलास. तुझी ही बडबड आता असह्य झाल्याने प्रतिवाद करतो आहे. कविता काय तू सांगशील तशी प्रत्येकाने लिहायची ? मला तर कविता अजूनही पुरेशी कळालेली नाही. मी तर सुरुवातीला तुलाही तू या क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती आहेस असं म्हटलं होतं. ते ही त्याच बाफवर. पण तुझ्या त्या पोस्टींनी माझा भ्रमनिरास झाला. गझलेसाठी ती उर्दू, फार्सीचा इतका अभ्यास करू शकतोस, तर मराठीत या प्रतिमा अशा का वापरल्या जातात यासाठी मराठी कवितेचा प्रवास वर वर चाळायला काय हरकत आहे ? या प्रतिमा मराठीत कशा रूढ झाल्या हे तुला स्वतःलाच त्यातून कळालं असतं. माझ्यासारखा कच्चा माणूस काय सांगणार याबाबतीत ? पण स्वतःचा उथळपणा हा असल्या कवितांवर तोंडसुख घेऊन तुला काढायचाच होता म्हटल्यावर थांबवायचं कुणी आणि का ? मी कोण सांगणार कि गझलेच्या दृष्टीकोणातून कवितेकडे पाहू नकोस म्हणून ?
तुला आज राग कशाचा आलाय ते सांगू का ?
सकाळी तू कवितेत शास्त्रीय सत्य असलं पाहीजे असा सल्ला प्रोफेसरांना दिलास. त्यावर मी मराठीतल्या काही कवितातल्या ओळी दिल्या ज्यात शास्त्रीय सत्यं नाहीत. तू उर्दू शायराचा अवमान होतो. त्याने दिलेल्या शिकवणीनुसार लिहावं असा नवाच फतवा जाहीर केलास.
मी एक हौशी आणि अर्धकच्चा कवी आहे तरीही विचारायचं धाडस करतो, कविता म्हणजे काय शिकवणी लावून करायची गोष्ट वाटली का ? ते काही कराटे स्कूल वाटलं का ? फैजची मतं त्याच्या कवितेसाठी, शायरीसाठी. शिकवणूक हा काय प्रकार काढलास ? आणि अवमान होत असेल तर कल्पनाचमत्कृती अलंकाराचं काय करायचं ?
तू शेवटची पोस्ट टाक नाहीतर काहीही कर. तुला जशास तशी भाषा इथून पुढे वापरणार हे लक्षात ठेव. काय करायची ती कारवाई कर. माझा पुढचा आयडी तयार आहे. मी इथे आलो तेच तू लोकांना किरण समजून त्रास दिल्याने.
भारतीय या नावाने पुन्हा तेच
भारतीय या नावाने पुन्हा तेच लिहीण्याची काय गरज आहे ? माझ्या एका बाफवर **न ठेवल्याने मायबोली सोडल्यावर तू अनेकांना ते माझे ड्युआय आहेत असा समज करून घेऊन त्रास दिलासच ना ? मग आता तुला थेट त्रास दिला तर आदळआपट कशाला करतोस ?
आणि बेफिकीर स्वतःला समजत नाही
आणि बेफिकीर स्वतःला समजत नाही म्हणून दुर्बोध असा अर्थ काढणा-याला तू जाणकार म्हणू शकतोस मी नाही. माझ्यापुरती दुर्बोध असा पवित्रा जो कुणी घेईला त्याला आक्षेप असण्याचं कारण नाही. पण पि़कासोला दुर्बोध असा शिक्का मारणारे तुझ्यासारखे लोक ते चित्रं एखाद्याला समजतंय या कल्पनेने कासावीस होऊ शकतात. तू एका ठिकाणी याला मूर्खपणा असा शब्द वापरला आहेस. यावरून तुझी लायकी काय ते समजून येतंय. याच कारणासाठी तुला कधी प्रतिवाद केला नाही हे आता तरी तुझ्या डोक्यात शिरेल ही अपेक्षा !
तुला आज राग कशाचा आलाय ते
तुला आज राग कशाचा आलाय ते सांगू का ?
सकाळी तू कवितेत शास्त्रीय सत्य असलं पाहीजे असा सल्ला प्रोफेसरांना दिलास. त्यावर मी मराठीतल्या काही कवितातल्या ओळी दिल्या ज्यात शास्त्रीय सत्यं नाहीत. तू उर्दू शायराचा अवमान होतो. त्याने दिलेल्या शिकवणीनुसार लिहावं असा नवाच फतवा जाहीर केलास.<<<
तुमचा गैरसमज झालेला आहे. प्रोफेसरांनी कैलासरावांच्या गझलेवर शास्त्रीयदृष्ट्या करेक्ट गझल असावी (असे कोणा इब्राहीम फैज यांचे मत असल्यामुळे) असे लिहिल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या गझलेतील अशास्त्रीय बाब मी मुद्दाम दाखवून दिली. तुम्ही तेथे काय लिहिले आहेत त्याची मी दखलही घेतलेली नाही. माझ्या दृष्टीने तुमची मते नगण्य आहेत.
भारतीय, तुम्ही तुमचे नांव किंवा इतर काही डिटेल्स कृपया शेअर करावीत म्हणजे तुम्ही कोणीतरी भिन्न व्यक्ती आहात हे लोकांना कळेल. किरण यांना ते कळावे किंवा नाही कळावे अशी माझी काहीही आवश्यकता नाही.
नगण्य असतं तर काहीच वाटलं
नगण्य असतं तर काहीच वाटलं नसतं. पण इथे चाललेली आदळआपट पाहून तसं वाटत नाही हे ही खरं
भारतीय, तुम्ही तुमचे नांव किंवा इतर काही डिटेल्स कृपया शेअर करावीत म्हणजे तुम्ही कोणीतरी भिन्न व्यक्ती आहात हे लोकांना कळेल. किरण यांना ते कळावे किंवा नाही कळावे अशी माझी काहीही आवश्यकता नाही. ???
मला आवश्यकता नाही. माझा एक परममित्र आहे, त्याचा एक विनोद इथं सांगतो.
एक माणूस एकदा दुकानात जाऊन विचारतो " हा टीव्ही कितीला दिला ?"
तो दुकानदार म्हणतो, मूर्खांना आम्ही काहीही विकत नाही
दुस-या दिवशी तो माणूस पुन्हा स्त्री चा वेष घेऊन जातो आणि टीव्ही कितीला विचारतो
दुकानदार पुन्हा म्हणतो मूर्खांना आम्ही टीव्ही विकत नाही
काही दिवसांनी तो माणूस सरदार बनून दुकानात जातो आणि टीव्हीची किंमत विचारतो
दुकानदार पुन्हा म्हणतो आम्ही मूर्खांना टीव्ही विकत नाही
असं खूपदा होतं शेवटी तो माणूस वैतागून म्हणतो, मी इतके वेगवेगळे गेट अप केले, पण तुम्ही कसं काय ओळखता ?
दुकानदार शांतपणे उत्तरतो
कारण तो टिव्ही नाही, मायक्रोवेव्ह आहे..
वरच्या उदाहरणात देखील ती शहरयार यांच्या गझलमधली पहिली द्विपदी नराधमाला कांमुक वाटू शकेल असं म्हटलंय ज्याचा अर्थ कुठल्याही शहाण्याच्या लक्षात येईल. एखाद्याची चूक होऊ शकते, पण दोन माणसं एकच चूक करतात तेव्हां ?
तेव्हां आपले डिटेल्स आपल्याकडेच ठेवा. मागे एकदा तुमच्या एका फिमेल ड्युआय ने मला कोर्टात खेचण्याची धमकी दिलेली. तो किस्साही इथे द्यायचा मोह होतोय.
येथे आदळाअपट चाललेली नसून
येथे आदळाअपट चाललेली नसून निर्भया या अतिशय संवेदनशील विषयातील क्रूरकर्म्यांना शहरयारचा तो मिसरा / शेर स्वतःच्या अर्थाने हवा तसा वाटू शकेल या पोस्टची कीव करणे चालू आहे.
बेफिकीर स्वतःची फजिती
बेफिकीर
स्वतःची फजिती टाळण्यासाठी निर्भया या विषयाचे गलिच्छ राजकारण खेळण्याचे थांबव. या पलिकडे मी आणखी काहीही सांगू शकत नाही. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो कि, स्त्री कडे पाहणारे दोन दृष्टीकोण त्या घटनेत स्पष्ट झाले होते. एक तिचा मित्र, ज्याने जिवाची बाजी लावली आणि दुसरे ते क्रूर कर्मा. त्यांच्यासारखी जडण घडण असेल तर त्यांना शहरयारच्या त्या अजरामर रचनेतही तेच दिसेल जे त्यांच्या मनात आहे. तू उगाचच लोकांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करतो आहेस. त्यात फक्त तुझा माझ्याबद्दलचा द्वेष आहे.
निर्भया या विषयाबाबत तू किती संवेदनशील आहेस ते त्या वेळी झालेल्या चर्चेतून समोर आलेलं आहे. ड्रेसकोड आणि निर्भयाची घटना यावेळी तुझी संवेदनशीलता मायबोलीने पाहिलेली आहे. त्यावेळी तुला इतकं झोडपलं गेलं ( जे गरजेचं होतं) कि तू सहानुभूती मिळवण्यासाठी चक्क पत्नीच्या दु:खाचं भांडवल करणारा लेख लिहीलास. त्या लेखातही तू कुठेच नसल्याचं जाणवलं. त्या लेखातही नायक इंटरनेटवरच व्यग्र असल्याचं दिसलं. पुन्हा मिस माया दास च्या वेळी झोडपलं गेल्यावर तू आत्मचरित्र लिहीलंस. त्यात पुन्हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलास. ही तुझी सवय जुनीच आहे.
माझा कैलासरावांबद्दलचा आदर
माझा कैलासरावांबद्दलचा आदर अधिकच द्विगुणीत झाला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रोफेसरांबद्दल मनात राग न ठेवता त्यांना दुरुत्तरे केली नाहीत. साहीत्याचा त्यांचा व्यासंग, शांतपणे चर्चा करण्याची पद्धत यामुळे ज्या काही व्यक्तींबरोबर चर्चा व्हावी असं वाटतं त्यात त्यांचा समावेश होतो.
माझ्याकडून पूर्णविराम.
Kiran..., >> शहरयार यांच्या
Kiran...,
>> शहरयार यांच्या गझलमधली पहिली द्विपदी नराधमाला कांमुक वाटू शकेल असं म्हटलंय
मला तुमच्या आणि बेफिकीर यांच्या भांडणात रस नाही. पण वरील विधान मूलत: विसंगत (फॅक्च्युअली इनकरेक्ट) आहे म्हणून तुमच्या निर्देशास आणू इच्छितो. तुम्ही संपूर्ण गीत कामुक वाटू शकते असं लिहिलं आहे.
चूकभूल द्यावीघ्यावी.
आ.न.,
-गा.पै.
गापै तुम्ही अगदी व्यवस्थित
गापै
तुम्ही अगदी व्यवस्थित दाखवून दिलंत. मला हवा होता तितकाच भाग आधी देऊन पोस्ट लिहीलेली आहे. गीत हा शब्द चुकीचा आहे. पुढच्या पोस्टमधे द्विपदी हा शब्द आलेला आहे. पहिल्या पोस्टमधेही पहिली द्विपदी आणि तिचा जो रूढ अर्थ आहे तोच दिलेला आहे. याच ओळींचा आणखी कुणी कसा अर्थ घेऊ शकतो इतकाच विषय होता. मी आता इथे हक्काने म्हणू शकेन.. क्यूं बाल कि खाल निकाल रहे हो गीत हा शब्द चुकून आलेला आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच.
आणि लगेचच बेफिकीर यांचं उदाहरण ते सिद्धही करतंय.
ती गेली तेव्हां रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे, तो सूर्य सोडवीत होता
या ओळींचा अर्थ मी दुस-या एका बाफवर दिलेला आहे. पुन्हा देतो. पावसाचं कुंद वातावरण आहे. मेघांची दाटी आहे. त्यात सूर्याची किरणं गुंतल्याने खाली पोहोचत नाहीत हे दृश्य आहे. अर्थात अंधारून आलंय. इथे सूर्य हा पराक्रमाचं प्रतीक आहे. त्याची किरणं मेघात अडकल्याने तॉ सोडवण्यात तो इतका गुंतला आहे कि त्याच्या पराक्रमाचा (प्रखरतेचा) त्याला विसर पडलेला आहे. हे हतबलतेवरचं भाष्य आहे.
बेफिकीर यांनी सांगितलं कि यात सूर्य तर मला मनोरुग्ण वाटतो आहे आणि किरणं म्हणजे हॉस्पिटलमधे अॅडमिट करण्यासाठी आलेले वॉर्डबॉय. तर मुद्दा हाच कि, जशी जडणघडण तशी कविता दिसते.
धन्यवाद.
बेफिकीर यांनी सांगितलं कि यात
बेफिकीर यांनी सांगितलं कि यात सूर्य तर मला मनोरुग्ण वाटतो आहे आणि किरणं म्हणजे हॉस्पिटलमधे अॅडमिट करण्यासाठी आलेले वॉर्डबॉय.<<<
मला माझेच म्हणणे पटणे हा प्रकार बरेच दिवसांनी झाल्यामुळे हसू आले
तुमच्या ड्युआय ना पटत असतंच
तुमच्या ड्युआय ना पटत असतंच कि ते. जसं भारतीय आणखी... जाऊ द्या , लगेच सायबर लॉ वगैरे वगैरे आणि मामींच्या चाळीशीच्या धाग्यावर तुमची फिमेल आयडी म्हणते.. मी नंतर येतो
नंतर काय म्यांव ...
आणखी एक, आमीर खानची सत्यमेव
आणखी एक,
आमीर खानची सत्यमेव जयते ही मालिका सुरू असतानाची गंमत. बेफिकीर यांना आमीर खानची अॅलर्जी आहे हे उघड आहे. त्याच्या एका एपिसोडवर (त्यांना पटणारी ) त्यांची स्वतःची मतं मांडल्यावर जी व्हायची ती शोभा झालीच. मग पुन्हा काही ते उगवले नाहीत. पण त्यांच्या हितचिंतक असणा-या तीन फिमेल आयडींनी आमीर खानवर टीका करताना ठराविक अंतराने त्याचा रिसर्च कसा चुकीचा आहे हे सांगताना आपला सोर्स काय सांगावा, तर माझ्या मोलकरणीने सांगितलं... तिघीच्या तिघी.
असं काही झालं कि आम्ही मूर्खांना टीव्ही विकत नाही हा जोक झटकन आठवतो.
बेफिकीर
इथे लिहीलेली सगळी गंमत आहे. खरंतर माझंच चुकीचं आहे. तुमच्या चुका दाखवून, तुम्हाला सावध करून लोकांचं मनोरंजन बंद केलं तर मला पुन्हा फोन येतील.... या वेळी निषेधाचे.
पण वरील विधान मूलत: विसंगत
पण वरील विधान मूलत: विसंगत (फॅक्च्युअली इनकरेक्ट) आहे म्हणून तुमच्या निर्देशास आणू इच्छितो. तुम्ही संपूर्ण गीत कामुक वाटू शकते असं लिहिलं आहे.<<<
गामासाहेब!
फार वेळ घालवू नका ह्यांच्यावर! हजारोंना हजारदा 'मी आता माबो सोडत आहे, अकाऊंट डिलीट करा बिरा' सांगून ते इथेच एन्ड होतात. अॅडमीननाही कंटाळा आला आहे ह्यांच्या विपूंचा!
मी आता कंटाळा आल्यामुळे निघत आहे. वेळ मिळेल तेव्हा उद्या कधीतरी हा धागा पाहीन!
अॅडमीननाही कंटाळा आला आहे
अॅडमीननाही कंटाळा आला आहे ह्यांच्या विपूंचा!
यांना फोन करून सांगतात का ते
चला जाऊ द्या. मला आधी काय फोन आले होते माहीत आहे का बेफिकीर ? कशाला शेणात दगड मारता ? पण यावेळी मी धुलवड खेळलो. एकदाच आणि शेवटची. शिमगा पण केला.
गप्प बसलं कि तुमच्यासारखे भलतेच अर्थ काढतात म्हणून.. जा आता. उद्या उतरल्यावर आलात कि आपली फजिती झालीय हे लक्षात येईल. तशी अपेक्षा आहे, लक्षात यावं म्हणून. नाहीच आलं तर खुदा खैर करें. !
पुढच्या वाटचालीला शुभेच्छा !
(No subject)
फारच सपक .. . . . ह्या पेक्षा
फारच सपक ..
.
.
.
ह्या पेक्षा आनंद शिंदेंच्या गीतांचे रसग्रहण लिहा
" शेजारिण बाई , तुमचा टीव्ही ,आमच्या पोरांना पाहुन द्या ...."
तुमच्या रसग्रहण आणि comments
तुमच्या रसग्रहण आणि comments मुळे माबोकरांची नक्किच करमणुक झाली आहे. त्याबद्द्ल thanx
::फिदी:
माबोकरांची नक्किच करमणुक झाली
माबोकरांची नक्किच करमणुक झाली आहे. त्याबद्द्ल thanx >>>
अहो आभार कसले मानताय ? तुमचे आभार मानायचे संधी आम्हालाही मिळू द्यात. तुमच्या प्रोफाईलला तुम्ही संगीत शिकताय आणि ते ही पाच वर्षे असं लिहीलंय. माझं सोडून द्या. इथे माझा ज्यांच्याशी वाद झडलाय त्या बेफिकिरांच्या गझला पहा एकदा. एखाद्या गझलेला चाल लावा, रेकॉर्ड करा आणि इथे टा़का. मायबोलीकर कौतुकच करतील. अर्थात तुम्हाला हे पटत असेल तर..
पण तुमचा ओढा विशिष्ट करमणुकीकडे असेल, तर अशा करमणुकीला इथं तोटा नाही. बाकि, आपली मर्जी.
किरण तुमचा झगडा तुमच्या पाशी
किरण
तुमचा झगडा तुमच्या पाशी ठेवा. आणि माझे प्रोफाईल वाचुन त्यावर बोलण्यापेक्षा आणि आमची करमणुक कशात आहे याचा study करण्यापेक्षा स्वतःचे परिक्षण करा. तुमची भाषा आणि प्रत्येकजण तुमच्या विरोधात असल्याचा पवित्रा सोडलात तर मी असे का म्हटले ते लक्षात येईल. मी पहिल्यांदाच हा धागा पाहिला आणि माझी करमणुक झाली म्हणुनच मी तसे म्हटले. कुणावरही वैयक्तिक टिका करण्यामध्ये ना मला इंटरेस्ट आहे ना माझी आवड एव्हढी सवंग आहे.
फक्त मुळ मुद्दा कोणता होता हेच विसरून जायला होते म्हणुन मला हसू आले आणि हो माझी आवड माझी मर्जी, मला ठरवू देत.
तुमचा त्रागा समजतो; पण असल्या comments मुळे तुम्हीच स्वतःचा ओढा सवंग करमणुकी कडे(टीका) करताय हे लक्षात घ्या. बाकी तुमची मर्जी.