मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीठाची पोती घेऊन हे लोक घरोघरी फिरायचे. एका मापाने खडे मीठ विकायचे>>> हो हो अगदी. आमच्या पार्ल्याला सुद्धा यायचा .

पूर्वी मुंबईत बरेचदा कडकलक्ष्मी आणि त्याचं कुटुंब दारोदार ( बिल्डीन्ग टू बिल्डींग) फिरायचे .

शिवाजीपार्कला जिप्सीच्या कॉर्नरला पेट्रोलपंपासमोर बसतो>>> दादरला मावशीकडे गेल्यावर जेव्हा रात्री सारेजण शिवाजी पार्कला राऊड मारायला जायचो तेव्हा कुल्फी खायचा (मस्ट) प्रोग्राम हा तिथल्याच एखाद्या कट्ट्यावर बसून .व्हायचा .

मुंबईत मिळणारे खारे शेंगदाणे Happy

ग्रांटरोड वरचे मेरवान आणि त्याचा मावा केक हा सुद्धा मस्ट लिस्ट मधला

आणि मुंबई स्पेशल कडक पाव Happy तो तर न विसरता येणारा Happy कडक पाव आणि घरच लोणी .

पाववाला:
सकाळी दुधवाल्यानंतर यांचा नंबर असायचा. हे लोक सायकलवरुन घंटी वाजवत, पाववाला पाववाला ओरडत फिरायचे.
अनेकदा नाश्त्याला चहा-पाव असायचे. आताही येतात का पाववाले?

मला वाटते पावाला खादाडीत महत्वाचे स्थान देणारे शहर मुंबईच असावे. वडापाव, भुर्जीपाव, दाबेली, पावभाजी ई. पदार्थ तर मुंबईनेच जन्माला घातले आहेत.
हैद्राबादमध्ये वडापाव तर 'बॉम्बे वडापाव' म्हणुन विकतात

आणि इडलीवालेही असतात ना! सायकलीवर मागे इडलीचं भलंमोठं पातेलं असतं आणि चटणी, सांबाराचे डबे असतात. सायकलवर बसून पाँ पाँ भोंगा वाजवत येतात.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-10-27/food-reviews/3306...

>>ही पण यादी वाढवा

दोन्ही मुन्नाभाई, तलाश, जॉगर्स पार्क, ट्रॅफिक सिग्नल, हरिच्शंद्राची फॅक्टरी

>>ही पण यादी वाढवा
नसिरुद्दिन, अनुपम खेरचा A Wednesday.

अफ्फाट माहिती,भन्नाट प्रचि..धन्स सावली
आणि सगळेचजण मस्त रंगलेत..

आपल्याचकडे नव्या नजरेने पहावं तसं आहे हे.धन्स मामी हे सगळं बाहेर आणल्याबद्दल.

दिनेशदा,चित्रपटांमध्ये कसे विसरू शकतो आपण 'सिंहासन', तोही चक्क अरूण साधूंच्या अविस्मरणीय 'मुंबई दिनांक'' या कादंबरीवर आधारलेला अन त्यातला निळूभाऊंचा अर्करूप पत्रकार दिगू..

दिनेशदा,

पंजाब आणि फ्रंटियर दोन्ही मेल गाड्या बॅलर्ड पियर वरून सुटायच्या. पंजाब मेल कल्याणमार्गे (हल्लीच्या) मध्यरेल्वेने जाणार ते बरोबराय. पण फ्रंटियर मेल बोरीवलीमार्गे कशी जाईल? दादरला (हल्लीच्या) पश्चिमरेल्वेवर येऊन बहुतेक...?

आ.न.,
-गा.पै.

<< पंजाब आणि फ्रंटियर दोन्ही मेल गाड्या बॅलर्ड पियर वरून सुटायच्या. >> मीं बर्‍याच वेळां बॅलॉर्ड पियरच्या बोटीच्या धक्क्यावर जात असे. तिथपर्यंत एक रेल्वे लाईन व प्लॅटफॉर्म होता पण त्याला 'मोर्ल स्टेशन' असं कांहीसं नांव होतं. पॅसेंजर व माल वहातुकीच्या बोटी लागत त्या धक्क्याच्या अगदीं लगतच हा प्लॅटफॉर्म होता. मला तें जुनं 'सायडींग' असावं असं वाटायचं. अर्थात आतां त्या धक्क्याच्या आसपासही सुरक्षा व्यवस्थेमुळे जातां येत नाही.

व्ही टी स्टेशन..
VTStation1.jpg
ट्रामवे ऑफिस म्हणजेच आताचे ईलक्ट्रिक हाउस..
TramwayCompanyOffice_ElectricHouse.gif
अपोलो बन्दर
AppoloBunder.jpg
कुलाबा कॉजवे
ColabaCausway.gif
गेट वे ऑफ ईन्डिया
GatewayOfIndia_andTaxis.gif
नेहरु प्लेनेटॉरियम
nehruplanetorium.jpg
ऑल्ड बर्मन रोड
OldBurmanStree.jpg

मी काढलेली काही मुंबईची चित्र
पवई लेक
Powai lake.jpg

नॅशनल पार्क
NP.jpgNational Park.jpg

मंड्पेश्वर बोरिवली

Mandpeshwar.jpg

वर्सोवा मासळी बाजार
Versova fish Market.jpg

फाऊंटन
Fountain.jpg

आरे कॉलनी

Aaarey colony.jpg
बाणगंगा
banganga.jpg

फोटो एडीट्/साईझ युनिफॉर्म नाहिये म्हणुन क्षमस्व

<<पूर्वी मुंबईत बरेचदा कडकलक्ष्मी आणि त्याचं कुटुंब दारोदार ( बिल्डीन्ग टू बिल्डींग) फिरायचे>> अजूनही फिरतात Happy पाटील मस्तच आहेत चित्र

साहिल शहाजी,
तडक ८० वर्षांपूर्वीच्या मुंबईत प्रत्यक्ष घेवूनच जाते ही अफलातून क्लिप ! धन्यवाद.
क्लिपमधे शेवटीं मलबार हिलवरून दाखवलेली चौपाटी व गिरगांव अगदीं हल्लींपर्यंत अशींच होतीं व अजूनही बव्हंशी अशीच आहेत !

अकरावीत असताना आम्ही बांद्रा च्या ओपन थिटर मध्ये एक सिनेमा पण बघितलाय सगळ्या मित्र मैत्रिणीनी मिळून . आणि विलापारले ला चंदन जुहु मध्ये पण आत्ता चंदन चुहू चा परिसर इतका बदललाय ना क्रोमा हरे राम हरे कृष्ण मदिरामुळे थेटर कुठे ते शोधाव लागत

मनःपूर्वक धन्यवाद शहाजी.
ही क्लिप पाहिल्यावर इथं बर्‍याच जणांचं दुमजली व दोन डब्यांची ट्राम याबद्दलचं असलेलं कुतूहल आता शमलेलं असेल !! Wink

वर्सोवा नि बाणगंगा सोडले तर बाकीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाउन आलो असल्याने पाटीलांची चित्रे खूपच आवडली.. नेहमीच आवडतात.. Happy

जुन्या मुंबई बद्दलच्या दोन्हीही लिन्क्स मस्त Happy

पाटील : मुंबईची चित्र सुरेख Happy

आरे कॉलनीमधेही हल्ली गाड्यांची भयानक गर्दी वाढली आहे Sad

मामी तुझे आभार मानायला हवेत. >>> +१

जबरदस्त क्लीप्स,

मुंबईच्या आठवणी............... हे सर्व भ न्नाट चाललय !!

पुर्वी मी माझ्या आजोबांच्याकडुन अनेकदा ऐकलेला किस्सा - १९४२-४५, दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या जहाजामध्ये प्रचंड स्फोट झाला व त्या जहाजातील असणार्‍या (???) सोन्याच्या विटा गिरगाव वगैरे भागात उडाल्या होत्या. दिनेशदा / भाउ नमसकर / इतर जाणकारांनी यावर जास्ती प्रकाश टाकावा, ही विनंती. Happy

Pages