मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रँड कॅनियन माझ्या माहिती प्रमाणे उपन्गरातला पहिला डिस्क <<< बहुधा स्वतंत्र म्हणुन पहिलं असेल कदाचित, पण लिला त्यापेक्षा ही जुने, सायक्लॉन माहित नाही कधी सुरु झाले ते. ग्रँड कॅन्यन व होस्ट इन मध्ये नंतर नंतर एकदम चिप पब्लिक यायला सुरु झाले.

संजीव, रात्रीची मुंबई कधी पाहिलीच नाही. <<< अश्विनी, काही नाही तरी गिरगाव हुन जवळ मरिन लाईन्स ला क्विन्स नेकलेस पाहाच :). माबो वर अमोघ (स्मितहास्य) ने क्विन्स नेकलेस चे एक मस्त प्र चि ही डकवले आहे.

३१ डिसेंबर साजरं करण्यासाठी आम्ही मित्र मैतरणी गेटवे ला जात होतो, पण तिकडे नंतर फारच गर्दी होत होती, आणि नंतर नंतर तर फार गैर प्रकार घडु लागले, म्हणुन जाणे बंद झाले.

मस्त धागा..... खूप इंट्रेस्टींग माहिती मिळतीय!
लहानपणी सुट्ट्यात खूप निवांत येणं व्हायच मुंबईला.... रात्रीचा रातराणीचा प्रवास करुन पहाटे पहाटे मुंबईला पोहचून ५-५.३० वाजताच्या मस्त रिकाम्या लोकल्स मधून आत्त्याच्या घरी जाण्यात काही मजाच वेगळी होती

आता विचार करुन सुद्धा हसू येते पण त्या काळी एका गोष्टीसाठी मुंबईच्या लोकांचा फार हेवा वाटायचा ती म्हणजे मुंबईला दुरदर्शनची दुसरी वाहिनीही दिसायची Wink

होय अल्पना श्रीरंग साबडे मार्ग आहे गोरेगावात
ते तुमचे आजोबा होते
ग्रेट

हीरा खूपच माहितीपूर्ण प्रतिसाद
पहाडी स्कूल या नावाने पूर्वेत एक म्युनिसिपल स्कूल आहे
टोपीवाला यांचे नावाचे नवीन थेटर आता पश्चिमेत होतेय
देसाई सामंत इत्यादी प्रभृतीचे गोरेगाव पूर्वेचे कायापालट घडवला
आता दिँडोशी एन एन पी या भागात मराठी मध्यमवर्गीयांची एक वसाहतच झाली आहे

जागुताई हो ग
मी ही ओ पी गार्डनला जाते
कधीकधी

सुदैवाने तो भाग थोडातरी हिरवा आहे
पावसाळ्यात काय छान वाटत तिथे

टोपीवाला सिनेमागृह पूर्वी पण होतं ना गोरेगावात जाई? मामी पूर्वी ज्या दवाखान्यात काम करायची ते टोपीवाला सिनेमागृहाच्या शेजारी होतं असं पुसटसं आठवतंय मला.

मामा २० वर्षांपूर्वी गोरेगावातून अंधेरीला रहायला गेला. त्यानंतर बरीच वर्षं मामाकडे आल्यावर गोरेगावात चाळीतल्या बाकीच्या लोकांना भेटायला एखादी चक्कर व्हायची. गेल्या ५-६ वर्षांपासून मुंबईत जाणं /रहाणं होत नाही.

हिरा, माझा जन्म ज्या स. का: हॉस्पिटलमधे झाला तिथे पण १९७२ पर्यंत आमराई होती. त्या आमराईत आणि आमच्या घराच्या मधे केवळ एक भिंतच होती. नंतर तिथे एक वॉर्ड बांधला.
या स. का. पाटील हॉस्पिटलमधेच वहिदा रेहमान, धर्मेंद्र आणि जया भादुरी यांच्या "फागुन" चे काही चित्रीकरण झाले होते.
वहिदा, जया, विजय अरोरा, सोनिया सहानी सगळेच होते. आमचा दिवसभर मुक्काम तिथेच होता. वहिदा त्याकाळाही फेमस होती तरी सर्व पब्लिकमधे सहज मिसळत होती. बाकीचे सगळे आखडू होते.

आम्ही मालाडहून चेंबूरला यायला, गोरेगाव - सायन अशी २४१ नंबरची बस घेत असू. ती आरे कॉलनीतून येत असे. पुढे ट्राँबेच्या आजीकडे जायला, मानखुर्द पर्यंत रेल्वे आणि मग बैलगाडीतून जावे लागे.

होय अल्पना
पूर्वीच सिँगल थिएटर पाडून मोठा मल्टिपेक्स ऊभा राहतोय तिथे
आता तर चाळीपण पाडून टाँवर पण ऊभे राहिलेत

माझ्याकडे एक पुस्तक आहे केव्हातरी जुन्या टाकलेल्या पुस्तकातुन रस्त्यावर अत्यल्प किमतीत विकत घेतलेलं
Bombay : A Photorama
Photographic exhibition about
The rise and growth of Bomabay from Year 1661 to 1931
पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषात आहे. आणि मुंबई महानगरपालिकेने बनवुन घेतले आहे.
त्यातली चित्रे / प्रचि कोणी काढली याचा काहीच पत्ता नाही. कोणाला क्रेडीट दिलेले नाही.
पण १६६१ ते १९३१ असा कालावधी आहे म्हणजे चित्रे अतिशय जुनी ( ८० वर्षापेक्षा अधिक ) असल्याने प्रताधिकाराचा प्रॉब्लेम नसावा असे वाटते. त्यातली काही चित्रे इथे देत आहे.


१६७२ साली डॉ. जॉन फ्रायरने बनवलेला मुंबईचा नकाशा. ( Oldest available map )

सावली, माझ्याकडेही अशी दोन-तीन फार जुनी पुस्तकं आहेत. ती माहिती वाचताना आणि ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो बघताना हरवून जायला होतं. Happy

जाई त्यावेळी मालाड पुर्वेला, अहमदाबाद रोडवर जायला रस्ता नव्हता. ( डेड एंड होता ) उत्कर्ष मंदिरच्या मागे एक तळे होते आणि तिथून थेट अहमदाबाद रोड पर्यंत मोकळे कुरण होते.
१९७३ ला मालाड पुर्वेला पहिली बेस्ट बस आली. तोपर्यंत रिक्षा देखील नव्हत्या. टांगेच होते. स्टेशन ते दत्त मंदिर असे भाडे आठ आणे होते.

रस्ते मोकळेच असायचे आम्ही रस्त्यातच खेळत असू !

सावली तो भाग आता एक भिंत म्हणून गोदीच्या आत राहिलाय असे वाचले होते.
रच्याकने व्हीटी पासून एक रेल्वेलाईन, अपोलो बंदर पर्यंत म्हणजे जवळजवळ गेटवे पर्यंत जाते आणि त्यातून केवळ गोदीचा माल जातो.

सध्या बधवार पार्काजवळ एक भाग दिसतो तिथपर्यंत बी.सी.सी. आय. रेल्वे होती आणि तिथेच ट्रामचे घोडे पण ठेवले जात असेही वाचले.

वुडहाऊस रोडवरील जुने कुलाबा रेल्वे स्टेशन (१८९६). चर्चगेट ते कुलाबा हि रेल्वेलाईन १९३० साली बंद करण्यात आली

धम्माल येतेय वाचताना.

मागच्या वर्षी, लेकीच्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थांचं आणि त्यांच्या पालकांचं एक गेट-टुगेदर आणि लंच असा कार्यक्रम होता. त्याआधी ३-४ हौशी आयांनी मिळून ट्रेझर हंट ठेवली होती. एनसीपीए ला भेटून आम्ही मग त्यांनी हातात दिलेल्या कागदावरून द.मुंबईतली ठिकाणं शोधली, त्या त्या ठिकाणी मोबाईलवरून फोटो काढून लगेच पाठवले. इतरही काही गोळा करायचं होतं. उदा. महालक्ष्मी स्टेशनला उतरून चर्चगेटपर्यंतचं सिंगल तिकीट काढायचं होतं, ब्रीचकँडीच्या डोनटशॉपचं मेन्युकार्ड घेऊन यायचं होतं वगैरे. सगळ्यात शेवटचा क्ल्यु हा गेट-टुगेदरच्या व्हेन्युचा होता - हार्ड रॉक कॅफे. जी मंडळी सगळ्यात पहिले पोहोचली त्यांना बक्षिस मिळालं. त्या रविवारी पंचवीसेक कार्स द.मुंबईभर क्लु शोधत फिरत होत्या. मज्जा आली.

सगळे इतके भरभरून लिहिताहेत ना! मुंबईबद्दल किती बोलू असं झालंय प्रत्येकाला. खूप छान छान आठवणी एकत्र होताहेत. आणि फोटो तर एकसे एक आहेत.

धागा यशस्वी करणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद. Happy

मालाड पुर्वेला कुमुद छुगानी ( जून्या काळची नटी ) रहात होती. कधी कधी ती दिसायची पण !
संगीता थिएटरचे नाव आधी जोहरा होते. त्याचे उद्घाटन करायला नूतन आली होती. तिचा, गौरी नावाचा चित्रपट तिथे लागला होता. नंतर हेमा मालिनी आणि राज कपूरचा, सपनोंके सौदागर लागला मग मनोजकुमारचा, बेईमान.. तोपर्यंत मालाड पुर्वेला थिएटर नव्हते. पश्चिमेला कस्तुरबा आणि न्यू ईरा होते.


वरळी आणि शिवडीचा किल्ला

ट्रेझरहंट ची कल्पना भारीये. पण त्यासाठी थोडी मुंबईची माहिती असायला हवी.

बायदवे कोणाला ते लायनगेट यलोगेट काय प्रकरण आहे ते माहितेय का
>>> जाई, ती खरंच दारं आहेत. नेव्हीचं ऑफिस गेटवेजवळ आहे, त्याभोवती मोठी लांबचलांब भिंत आहे. आतमध्ये जाण्यासाठी ही दारं आहेत.

मामी.. ट्रेझर हंट ची आयडिया खूपच मस्त गं.. थॉटफुल्ल्ल !!
सावली.. अमेझिंग आहेत फोटोज... जाने कहाँ गये वो दिन........!!!!!
आताशी मुंबई ला डाऊन टाऊन सोडलं तर अजून कुठे जावसं वाटत नाही..

आह्हा.. म्युझियम मधे क्युरेटर च्या पदावर होते आत्याचे मिस्टर तेंव्हा प्रत्येक सुट्टीम्युझियम च्या आवारातच असलेल्या त्यांच्या भल्यामोठ्या अपार्टमेंट मधे गेलीये.. >> वॉव, वर्षुताई. मस्तच गं.

सावली, जुन्या चर्चगेटचा फोटो लै भारी. चर्चगेट, रॅम्पार्ट रो ही नाव तिथे जी तटबंदी होती (किल्लाही होता बहुतेक) त्यावरून पडली आहेत असं ऐकून आहे. अजूनही काही नाव अशी आहेत. आठवली की लिहिते नाहीतर इतर कोणी लिहा.

मामी, आपले शाळेचे / कॉलेजचे रस्ते परत पायी पायी फिरुन घेतो मी नेहमी कसलं मस्त वाटतं.

मुंबईत काही अजिबात न बदलेल्या गोष्टी आहेत...

गेटवे, जी.पी.ओ., सेंट्रल लायब्ररी, व्ही.टी. मुंबादेवी देऊळ, क्रॉफर्ट मार्केट, पोद्दार कॉलेज, रुईया कॉलेज, विल्सन कॉलेज, मुसाफीर खाना, के रुस्तम... यादी वाढवा बरं....
आणि काही लोक... डबेवाले, चौपाटीचे चंपीवाले, कान कोरून देणारे ( मला या लोकांबद्दल गूढ वाटते ) जूँ मारनेकी दवा ( एक मोठा बोर्ड त्याला खाली एक चाक, त्यावर हाताने रंगवलेली चित्रे ) विकणारे, महालक्ष्मीच्या साधुबेलाजवळ आणि बाबूलनाथाच्या पायरीवर दिसणारे साधु, जैन साध्वी, महापालिकेचे झाडूवाले ( यांचे पगार आता एवढे वाढलेत कि ते आणखी लोकांना स्वतःसाठी नेमतात असे ऐकले ) पोस्टमन, वसईचे भाजीवाले, दादर स्टेशनसमोरचा बासरीवाला, रेल्वेतले शिर्डीवाले साईबाबा गाणारे, रेल्वेतली भजनी आणि हौशी गायक मंडळी......

Pages