Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव.. खरी मुंबई आता दिसेल
वॉव.. खरी मुंबई आता दिसेल मला... भारीये माहिती..
भारती ने डकवलेले फोटोज तर एकदम खास
.
.
<< बरं. तुम्ही पण जायचात का?
<< बरं. तुम्ही पण जायचात का? >>
<< हस्नाबाद दर्ग्याला "मुंबईचा मीनी ताज" म्हणतात >> माझ्या वरच्या पोस्टनंतर कुतूहल म्हणून माझ्या तिथल्या मित्राचा फोन शोधून काढून त्याच्याशीं बोललों. आजही तें मराठी कुटूंब तिथेंच आहे. अर्थात, कुटूंबातील बरीचशीं मुलं मोठी झालीं, शिकलीं व इतरत्र स्थायिकही झालीं. भाजीचा मळा जावून तिथं आंब्याची व केळींची लागवड झाली आहे. बैलांची मोट केंव्हाच नाहीशी झाली आहे. क्रिकेटऐवजी
आतां तिथं फूटबॉलची चलती आहे. हिज हायनेस आगाखान हल्लीं भारतात सहसा येत नाहीत व मुंबईत तर नाहीच. बाकी कांही खास बदल नाही. [दर्ग्याला 'हेरिटेज स्टेटस' मिळाल्याने फारसा बदल होण्याची शक्यताही कमीच].
[ माझ्या मित्राने दिलेली अधिक माहिती : क्रिकेटर -कम- जरनॅलिस्ट मकरंद वांयगणकर यानी हल्लीच टाईम्स ऑफ इंडियासाठी हस्नाबादच्या माजी रणजीपटू क्रिकेटर अब्दुल इस्माईलची मुलाखत घेतली. ' माझ्या क्रिकेट करिअरचं खरं श्रेय माझ्या घरच्यासारखेच असलेल्या दर्ग्यामागच्या त्या मराठी कुटुंबालाच जातं' , असं त्याने आवर्जून सांगितलं ! ]
मस्त माहिती जमा होतेय. रोज
मस्त माहिती जमा होतेय. रोज काहीतरी नवीन कळतय. मला अजुनपर्यंत हसनाबादविषयी काहीच माहिती नव्हती.
आता नंबर आठवत नाही) शेवटचा
आता नंबर आठवत नाही) शेवटचा स्टॉप वरळी असायचा > ४६ नंबर... गणपतराव कदम मार्गे वरळीला जाते.
कोणीतरी मुंबईच्या बीडीडी चाळी आणि त्यांच्या इतिहासाबद्दल लिहा ना. >> ते इंग्रजांनी बांधलेले जेल होते अस ऐकल आहे... खखोदेजा.
३८५ रस्त्याच्या मधूनच सुटायची > हो... पुर्वी त्या सर्कलच्या आत बस थांबायच्या... नंबर लक्षात नाहीत.
पण खलाशी लोकांचे अनुभव मात्र मी एकदा खरंच लिहिणार आहे. > खरच लिव. :p
माझे आजोळ बीडीडीत होते.
माझे आजोळ बीडीडीत होते. खिडक्यांना मोठे मोठे गज आणि पॅसेजमधे अंधार असायचा त्यामुळे जेलसारखेच वाटायचे.
त्यामुळे नक्की जेल कसे असतात ते माहिती नाही. फक्त ऐकीव माहीतीशी बीडीडी चाळींचे साधर्म्य वाटते म्हणुन.
मी कधीही जेलमधे गेलो नाही
३८५ रस्त्याच्या मधूनच सुटायची
३८५ रस्त्याच्या मधूनच सुटायची > हो... पुर्वी त्या सर्कलच्या आत बस थांबायच्या... नंबर लक्षात नाहीत.<<<<<< ३८५ आणि ३५१.
एक अनुभव लिहू का? माझी
एक अनुभव लिहू का?
माझी मुंबईतली पहिली नोकरी चालू झाली २५ जुलै २००५ ला. आणि मग २६ जुलै नामक प्रकरण झालं त्यानंतर मुंबईमधे जुन्या बिल्डिंग पडण्याचं एक सत्र चालू झालं. त्यावेळेला फ्रीप्रेसमधे हे सगळं मी बघायचे. नगपाड्यातली सदफ बिल्डिंग पडली होती तेव्हा मी सकाळी साडेचारला तिथे पोचले होते. तेव्हाचे काही अनुभव माझ्यासाठी अजूनही नाईटमेअर्स आहेत.
बिल्डिंग का पडत आहेत? असुरक्षित बिल्डिंग्ज कुठल्या आणि त्या कशा आयडेंटीफाय केल्या जातात त्यासाठी होणार्या प्रोसीजरसाठी म्हाडा अधिकार्यांच्या पाठून तब्बल चार दिवस लागून मी एक भलीमोठी स्टोरी केली होती. त्यावेळेला मुंबईचं हे चाळजीवन फार जवळून पाहिलं. अनुभवलं असं म्हणता येणार नाही पण पाहिलं मात्र अवश्य.
त्याचवेळेला अशाच बिल्डिंग स्टोरीसाठी मुंबईच्या खूप जुन्या आणि अगदीच बदनाम वस्तीतूनही दिवसच्यादिवस भटकले होते. तेव्हाचे अनुभव तर बेफाट आहेत. तेही लिहेन अधून्मधून इथे.
दिनेशदा, >> ३८५ रस्त्याच्या
दिनेशदा,
>> ३८५ रस्त्याच्या मधूनच सुटायची
अगदी अगदी! काय बोललात.
मी खूप लहान होतो. तेव्हा आईवडिलांबरोबर एकदा तिथून चढलो होतो. बशीत बसायचं तर स्टॉप पाहिजे. अधिकृत थांब्याशिवाय लोक चढत होते ते पाहून मौज वाटली. आम्हाला चेंबूरला जायचं होतं. दादरहून कुर्ल्याला जाऊन लोकल बदलावी लागेल. नाहीतर घाटकोपरला जाऊन ३८५ पकडावी लागेल. तर मग दादरवरूनच पकडूया की ३८५. अशी काहीशी आईवडिलांची चर्चा आठवते.
आज मी सरळ टॅक्सी करेन. पण त्या दिवसांतली बशीने फिरायची मौज काही वेगळीच होती.
आ.न.,
-गा.पै.
आशुतोष०७११, दुसरी बस ३५१
आशुतोष०७११, दुसरी बस ३५१ होती...? मला ३८१ वाटते.
आ.न.,
-गा.पै.
http://housing.co.in/blog/201
http://housing.co.in/blog/2013/04/11/from-bombay-to-mumbai-in-pictures/
भाऊ गिरगावातले काय? कुठले हो?
भाऊ गिरगावातले काय? कुठले हो?
जपानी गार्डन अजूनही छान आहे की. आणि तिथली ती हत्तीची घसरगुंडी.
बकुळीचं झाड आहे त्या बागेत.
आणि तिथल्या कुटुंबसखीचा बटाटवडा अफाट असायचा. आता मिळतो का माहीत नाही.
चर्नी रोडसमोरचं सैफी हॉस्पिटल किती मोठं आणि फॅन्सी झालंय आता!
जपानी गार्डनच्या दुसर्या बाजूला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. ठाकुरद्वारच्या सिग्नलवरून चर्नी रोडच्या विरुद्ध बाजूने निघालं की ते फेमस सुरेश ड्रेसवाले. शाळेच्या नाटकांसाठी भाड्याने तिथून ड्रेसेस आणायचो आम्ही कायम. 'विनय लंच होम' त्याच्या समोरच ना? तिथली मिसळ मस्त असते.
गिरगावात ६६ नंबरची डबलडेकर त्या आर्यन शाळेआधीच्या कॉर्नरवर अशी वळायची की आता ही नक्की उलटणार असं वाटायचं! मुंबईचे बस ड्रायव्हर शूरवीर बाकी!
माझे वडील BEST मधे होते इलेक्ट्रिक हाऊसला. लंडनमधल्या डिस्कार्डेड बसेस आपल्याकडे स्वस्तात विकत घेतात असं काहीतरी त्यांच्याकडून लहानपणी ऐकल्याचं आठवतं.
वर्षू, हे तुझ्यासाठी खणून
वर्षू, हे तुझ्यासाठी खणून काढले पुनः.. तत्कालीन टी पार्टी ,ताज महाल हॉटेल

आणि हा चौरस्ता...
आणि हा चौरस्ता...

चौकात दिसतोय तो खडा पारसी,
चौकात दिसतोय तो खडा पारसी, अजुनही आहे पण लक्षात येणार नाही अशा कोपर्यात
अश्विनी, माझी आर्टिकलशिप पण
अश्विनी, माझी आर्टिकलशिप पण ठाकूरद्वारलाच होती. त्यामूळे ११ वाजायच्या आधी एक मिनिटही ऑफिसला जायचे नाही असा बाणा असल्याने आम्ही तिथेच बसत असू. त्याच काळात तिथे कुटुंब सखी यांचे पोळी भाजी केंद्र सुरु झाले. अगदी स्वस्तात मिळायची ती. त्यामूळे दुपारचे जेवण तिथेच व्हायचे.
तिथून पुढे गेल्यावर साड्यांच्या दुकानात बायकांचे पुतळे असतात त्याचा कारखाना होता. घाऊक रित्या पाय, हात वगैरे करुन रस्त्यावरच वाळवत असत.
शिल्पा नवलकर कधी कधी दिसायची. एकदा चित्रा पालेकर पण दिसली होती.
तिथून मेट्रो कडे ऑडीटला जाताना आम्ही त्या कब्रस्थानातूनच जात असू. काही भिती वगैरे वाटायचीच नाही.
मला तो साहित्य संघाकडे जाणारा ब्रिजपण आवडायचा. पुर्वी त्याला लागून एक पडकी बिल्डींग होती, आता
चकाचक झालीय.
ठाकुरद्वारच्या सिग्नलवरून
ठाकुरद्वारच्या सिग्नलवरून चर्नी रोडच्या विरुद्ध बाजूने निघालं की ते फेमस सुरेश ड्रेसवाले. शाळेच्या नाटकांसाठी भाड्याने तिथून ड्रेसेस आणायचो आम्ही कायम.>>> त्या सुरेश ड्रेसवाल्याकडली तर हसून लोळवणारी आठवण आहे. एकदा गणेशोत्सवात आम्ही लहान मुलांची नाटकं बसवली होती आणी आम्ही दोघी तिघी मैत्रिणी सुरेश ड्रेसवाल्याकडे पोरं मापासाठी घेऊन गेलो. एवढं लटांबर पाहून त्याने थांबायला सांगितलं. तेवढ्यात महाराष्ट्राबाहेरची एक खेळाडूंची टीम तिथे आली. त्यांच्या दोन म्होरक्यांनी सु.ड्रे. ला विचारले "आपके यहा गद्दा मिलेगा?"
(आम्ही तिथेच पोट धरुन हसायला लागलो. सु.ड्रे आणि म्होरक्याचे चेहरे बघण्याजोगे).
नाकावर टिच्चून आम्ही सासरे सुनेने गिरगावच्या गप्पा हाणल्या असत्या 
सु.ड्रे : हा हा! मिलेगा. पत्रेका चाहिये या लकडी का?
मोरक्या : ऑ!!!! पत्रेका और लकडीका भी रहता है? दिखाओ तो.
सु.ड्रे : ठहरो. (वरच्या पोटमाळ्याच्या झडपेतून डोकावणार्या नोकराला दाखवायला सांगितलं) ये देखो.
म्होरक्या : गद्दा गद्दा..... ये नहीऽऽऽ
सु.ड्रे वाल्याने हनुमानाच्या गदा त्याला दाखवल्या होत्या आणि त्या टीमला झोपण्यासाठी गाद्या हव्या होत्या.
-------
कुटुंबसखीचे वडे तर अफलातून. क्रांतीनगरसमोरच्या शिवसेनेच्या वड्यापेक्षाही ते आवडायचे मला. माझ्या लग्नानंतर मला कळलं की माझे सासरे रोज साहित्य संघात जायचे आणि रोज तिथले वडे मागवून स्वतः खायचे आणि खिलवायचे. माझ्या लग्नाआधीच सासरे गेले. पण गिरगाव कनेक्शन कळल्यावर मला नेहमी वाटायचं की ते असते तर बाकिच्यांच्या
------
"उत्तम भेळपुरी हाऊस" पण असंच फेमस होतं चर्नीरोडच्या मरिन लाईन्ससाईडच्या जिन्याजवळचं.
>> ऑ!!!! पत्रेका और लकडीका भी
>> ऑ!!!! पत्रेका और लकडीका भी रहता है? दिखाओ तो.

स्वाती, ऑपेरा हाऊस आहे का गं
स्वाती, ऑपेरा हाऊस आहे का गं अजून? मी तिथे अमिताभ राखीचा 'बरसात की एक रात' बघितला होता दुसर्या बाल्कनीत बाकड्यावर बसून. तसे तिथे खूप बघितले होते पण दुसरी बाल्कनी पाहून ते 'ऑपेरा हाऊस' असताना कसं असावं असा विचार करत होते. तिथे ब्रिटिशांच्या काळात ऑपेरा व्हायचे ना?
<<दुसरी बस ३५१ होती...? मला
<<दुसरी बस ३५१ होती...? मला ३८१ वाटते >>
आनगापै: ३८१ घाटकोपर (पु) ते अणुशक्ती नगर हो..
हँगिंग गार्डनच्या पायथ्याशी असलेल्या, पारशी विहिरीसंबंधी पण लिहा कोणितरी - वाळकेश्वरच्या आत्येच्या घरातुन वर घिरट्या घालाणारी गिधाडं दिसायची...
दुसरी ३५१. ती दादर टी टी ते
दुसरी ३५१. ती दादर टी टी ते चेंबुर कॉलनी अशी जायची.
३८५ दादरला जाताना सुमननगरहून जायची पण घाटकोपरला जाताना, सी टी आय ( आता सी एल आय / प्रियदर्शिनी ) पासून हायवेने जायची. तिला सायन ते अमरमहाल मधे स्टॉपच नव्हता. आम्ही सुमननगर / शिवसृष्टी वाल्यांनी तो मिळवला. मग एव्हरार्ड नगर वाल्यांना पण मिळाला.
त्या बसला गांधी मार्केट असे दोन स्टॉप होते. एक किंग्ज सर्कलजवळचा आणि दुसरा घाटकोपरचा.
त्या बसला ग्लास फॅक्टरी असा पण स्टॉप होता आणि वरच्या मजल्यावरुन त्या कारखान्यातले दृष्य दिसायचे.
तसेच ३११ वरुन विमानतळाच्या आतले ( सध्या जिथे किंगफिशरची विमाने पडीक आहेत तिथले ) दिसायचे.
अजूनही दिसते.
३३२, कुर्ला - आगरकर चौक ( अंधेरी ) ला अपर डेकवर जरीमरी / बैलबाजार नंतर जर मोठे विमान टेक ऑफ साठी उभे असेल तर विमानाच्या शेपटाची, गरम हवा मिळते.
सुरेश ड्रेसवाला खरेच खूप जुना
सुरेश ड्रेसवाला खरेच खूप जुना आहे ७५ वर्शाचे आहेत ते मालक. त्यांची ममी कॉस्मेटिक्स ही कंपनी आहे. व ते पावडर बनवितात. आमचे पावडर साठीचे सुगंध मार्केट ऑफिस प्रिन्सेस स्ट्रीट मधून घेत असतात. आजच त्यांचा फोन आला होता व माझ्यासाठी काय पाठवलेत असे त्यांनी विचारले. पावडर बरोबर त्यांनी ते ड्रेस भाड्याने देतात ते पत्रकही मला पाठवले आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. अवर मुंबई.
अश्विनी, नाही. कितीतरी वर्षं
अश्विनी, नाही. कितीतरी वर्षं झाली ऑपेरा हाऊस बंद झाल्याला. तिथे शॉपिंग मॉल होणार असं तेव्हा कानावर पडायचं पण पुढे काही झालं नाही. खरंतर इतकी मोक्याची जागा आहे ती!
मीही पाहिला होता तो 'बरसात की एक रात' तिथे! आणि मीही दरवेळी इमॅजिन करायचे त्याचं गतवैभव!
ऑपेराज नाही माहीत, आपली संगीत नाटकं होत असत माझ्या माहितीनुसार. बालगंधर्व, दीनानाथ वगैरेंनी तिथे परफॉर्म केलेलं होतं म्हणे.
बीडीडी चाळीसारख्या इमारती
बीडीडी चाळीसारख्या इमारती बाँबे सेंट्रल, बर्याचशा पोलीस क्वार्टर्स मध्ये हि आहेत्/होत्या.
३८५ हा रुट बेस्टचा प्रॉफिटेबल रुट्स पैकी एक होता. घाटकोपरहुन दर ३० मिनिटांनी बस सुटायचीच, त्याव्यतिरिक्त गरोडिया नगर वरुन सकाळी स्पेशल बसेस सुटायच्या. गर्दीच्या वेळेला बर्याचदा (डबल घंटी), दादर वरुन बस सुटली कि थेट अमर महालला थांबायची...
http://www.archive.org/stream
http://www.archive.org/stream/ReportOfTheBombayDevelopmentCommittee/bomb...
हा १९१४ सालचा एक भलामोठा रिपोर्ट आहे. सिटी इम्प्रुव्मेन्ट ट्रस्ट नावाच्या एका संस्थेकडे मुंबईच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम दिले होते. त्याचे निष्कर्ष आणि शिफारशी यात आहेत. त्यातले दूरदर्शित्व खरोखर थक्क करणारे आहे. त्यातली एक जोरदार शिफारस अशी आहे की बीबीसीआय रेल वे ने ग्रॅन्ट रोड ते कुलाबा हा आपला रेल मार्ग भुयारी करावा. याचे अनेक फायदे दिले आहेत.. आणखी एक फार पाठिंबा न मिळालेली शिफारस अशी आहे की बीबीसीआय च्या लांब पल्ल्याच्या गाड्या दादरमार्गे व्हीटीला वळवाव्यात. हा प्रवाशांचा अधिकचा भार व्हीटी स्टेशन हाताळू शकणार नाही असा तांत्रिक रिपोर्ट मिळाल्याने ती बारगळली. माहीम वुड्स हा भाग धनवंतांच्या निवासासाठी विकसित करण्यात यावा, त्यासाठी बीबीसीआय ने माहीम वुड्स. ते ग्रँट रोड असा वळण मार्ग (लूप) टाकावा हा मार्ग माहीम पासून किनार्या किनार्याने वरळी, लव्ह ग्रोव्ह करीत पुन्हा पूर्वेकडे वळून ग्रॅन्ट रोडला मूळ मार्गाला येऊन मिळावा अशीही जोरदार शिफारस आहे त्यात. शिवाय मुंबईच्या पश्चिम किनार्याचे सुंदर दृश्य विद्रूप होऊ नये आणि मुंबईच्या वायुवीजनातला मुख्य पश्चिम वारा प्रदूषित न होता सर्व मुंबईभर खेळावा यासाठी असे मंजूर केले आहे की पश्चिम किनारपट्टी हा फक्त निवासी पट्टा म्हणून राखून ठेवावा. जे काही उद्योग, गिरण्या, फॅक्टर्या, कचेर्या,गोदामे,बंदरसंबंधित उद्योग असतील ते सर्व पूर्व किनार्यावरच उभारले जावेत. गिरणी मालकांना आणि इतरही उद्योजकांना त्यांच्या त्यांच्या कर्मचार्यांसाठी निवासव्यवस्था करणे बंधनकारक असावे. अशा अनेक शिफारशी आहेत. त्या अंमलात येऊ शकल्या असत्या तर मुंबईचे आजचे रूप कितीतरीवेगळे, अधिक सुंदर झाले असते.
मस्त चालल्याहेत गप्पा.
मस्त चालल्याहेत गप्पा. गिरगांव,दादर,फोर्ट,भायखळा,बीडीडी चाळी,भाऊचा धक्का,खडा पारसी,प्रत्येक ठिकाणची/लँडमार्कजवळची मुंबई वेगळी तरी एकजिनसी. किती रंग,किती ढंग प्रत्येक जातीजमाती धर्माचे.किती जणांनी लेखणी चालवली हिच्यावर पण ही मावली नाही कोणाच्याच कल्पनेत.आपण मुळात मध्यमवर्गीय जाणिवांचे म्हणून पुलंच्या गोडगुलाबी चष्म्यातून हिच्याकडे बघणं सोपं जात होतं आपल्याला एके काळी..
पण हिची यथार्थ रुपं /विरूपं सुकेतू मेहतांच्या मॅक्सिमम सिटीमधून चर्चेत आली,त्याहीआधी भाऊ पाध्ये ,नामदेव ढसाळ,दिलीप चित्रे,किरण नगरकर या सर्वांनी हिचे कल्चर शॉक्स पोचवले आपल्यापर्यंत.हिचं अर्थकारण हेमंत देसाईंच्या 'भोवळ'मध्ये सुंदर चितारलं गेलं.. हर्षद मेहताच्या पडझडीच्या काळातलं.
वरच्या यादित प्रमोद नवलकरांना
वरच्या यादित प्रमोद नवलकरांना टाका. त्यांची नवशक्तितली, भटक्याची भ्रमंती फार लोकप्रिय होती.
होय जी, इतरही बरीच नावे
होय जी, इतरही बरीच नावे दर्दींकडून येतीलच
मुंबईत हुतात्मा चौक या
मुंबईत हुतात्मा चौक या चौकाशिवाय इतर चौकांची नावे तितकिशी रुळलीच नाहीत. बेस्ट बसेसवर मात्र ती नावेच लिहिलेली असतात.
काही आठवतात ती अशी.
पं. पलुस्कर चौक ( ऑपेरा हाऊस ) नगर चौक ( व्ही:टी.) रा. ग. गडकरी चौक ( शिवाजी पार्क ) आगरकर चौक ( अंधेरी ) महाराणा प्रताप चौक ( दोन आहेत, एक माझगावला आणि एक मुलुंडला ) शामप्रसाद मुखर्जी चौक ( रीगल ) . राणी लक्ष्मी चौक ( सायन ). अजून बरेच असतील.
सर्कल्स पण होती..
खोदादाद सर्कल ( दादर ), किंग्ज सर्कल, सायन सर्कल, ( या तिन्ही ठिकाणी फ्लायओव्हर झालेत. ) हाजी अली सर्कल ला मोठी बाग होती. ती नष्ट झाली. प्रियदर्शिनी सर्कल ला पण सगळीकडून कात्री लागली.
अजून आर. के. स्टूडियो जवळचे शिवाजी सर्कल मात्र तग धरुन आहे.
स्वाती, मॅजेस्टिकही बरीच
स्वाती, मॅजेस्टिकही बरीच वर्षं पडून होतं. तिथे व्यापारी संकूल आणि थिएटर होणार असं ऐकलं होतं पण थिएटर काही झालं नाही. ऑपेरा हाऊस आम्ही गिरगाव सोडायच्या आधीच बंद झालंय पण पुन्हा बांधलं का हे माहित करुन घ्यायचं होतं.
वाळकेश्वर भाग मस्त शांत होता. आताही असावा. बहुतेक करुन सारस्वतांच्या इमारती होत्या तिथे. माझ्या कॉलेजमधल्या सारस्वत मैत्रिणी आणि मित्रांकडे (देसाई, गिंडे, वरेरकर, रांगणेकर वगैरे आडनावं होती त्यांची) जायच्या निमित्ताने वाळकेश्वरला जाणं होत असे. मला वाटतं १०३, १०७ जायची ना तिथे? तिथून पायर्या उतरुन बाणगंगा तलाव, तिथून पुढे त्या इमारती. २ मैत्रिणींच्या घराच्या बाल्कनीला लागून धोबी घाट होता आणि पलिकडे समुद्र. राजभवनाकडे आलेली हेलिकॉप्टर्स दिसायची तिथे.
Pages