बटाट्याचा रस्सा - झांसी स्पेशल

Submitted by leenas on 19 July, 2011 - 05:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मध्यम बटाटे उकडुन, साले काढुन, चौकोनी फोडी करुन
१ जरा मोठा बटाटा उकडुन, साले काढुन, कुस्करुन. हातानेच साधारण बारीक कुस्करुन थोडे पाणी घालुन सरसरीत करावा.
धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ – चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

एका कढईत तेल तापवुन, हिंग मोहरी चि फोडणी करुन त्यात उकडलेल्या बटाटाच्या चौकोनी फोडी किंचीत खरपुस कराव्यात. आता त्यात धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ, साखर – चवीनुसार घालुन आधी लिहिलेला कुस्करलेला बटाटा आणी साधारण पाउण वाटी पाणी घालावे. भाजी व्यवस्थित उकळावी, त्या वेळेस पाणी बर्यापैकी आटते. हवे असल्यास अजुन थोडे पाणी घालावे. कोथीबीर घालुन बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

मध्य प्रदेशात रेल्वे स्टेशन वर अशा प्रकारे केलेली भाजी आणी पुरी मिळते असे ऐकले आहे. माझ्या सासरी ही भाजी करतात. त्याला झांसी स्पेशल असे म्हणतात. भाजीची कन्सिस्टन्सी पळीवाढी असते. गरम फुलक्या आणी हा रस्सा छान लागतो.

माहितीचा स्रोत: 
सासर
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटाट्याचे भारतभर किती प्रकारचे रस्से केले जातात त्याला सीमाच नाही. फोर्ट मधे, दादाभाई नौरोजी रोडला समांतर जो रस्ता जातो (बहुतेक अग्यारी लेन) तिथे पुर्वी मथुरा नावाचे छोटेसे हॉटेल होते, तिथे खाल्लीय मी अशी पुरी भाजी. मस्त लागते.

मी काल केली होती ही भाजी. छान झाली होती. समई ने लिहिल्याप्रमाणे मी पण भाजलेल्या बडिशेपेची पूड घातली.
धन्यवाद, लीना.

आज हा रस्सा केला होता. बडीशेप, ओवा घालून. अतिशय छान चव आहे या भाजीला. वरून कोथिंबीर घातली भरपूर. अगदी मध्य प्रदेशात व उत्तरेकडे ठेल्यांवर द्रोणात मिळणार्‍या बटाटा भाजी व पुरीची आठवण झाली! धन्यवाद.

मीही केली ही भाजी काल. एकदम सोपी आणि मस्त आहे. बडीशेपची पूडही घातली धने-जिरे यांच्या पुडीबरोबर. आवडली. धन्यवाद.

या वर दिलेल्या मसाल्यांत बडिशोप तर खूप मस्त लागतेच.. त्याबरोबर थोडी कलौंजी,जि र्‍याची तुपातली फोडणी ही ,आणी थोडसं अमचूर आंबटपणाला... स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.. तोंपासु

मी पण काल केली होती ही भाजी. अर्थात आधी कैक वेळा केलीये. सोपी , नो खटाटोप ,कमी वेळात होणारी अफाट चवीची भाजी आहे ही.
मी पंचफोडण की फोरण वापरते ह्या भाजीला.

बटाटा.... नशीब देवाने बटाटा तयार केला.. नाही तर माझ्यासारख्या निम्म्या भाज्या न खाणार्याचे हालच झाले असते... माझी आजी मस्त करते हा प्रकार... वरुन भरपुर कोंथिबिर घालते.... Happy

सोपी , नो खटाटोप ,कमी वेळात होणारी अफाट चवीची भाजी आहे ही. >>>>> प्रचंड अनुमोदन Happy
कालच केली होती ही भा़जी, घरच्यांना खूप आवडली. धन्यवाद, लीना.

2013-04-017.jpg

विनार्च, भाजीचा फोटो अगदी 'चमचमीत' कॅटॅगरीतला आलाय!! Happy आमच्याकडे दोनदा ही भाजी झाली करून, पण दोन्ही वेळेला भाजीचा रंग अगदी सौम्यच आला होता.

विनार्च, भाजीचा फोटो अगदी 'चमचमीत' कॅटॅगरीतला आलाय!! >>> + १०० Happy

मी पण ही भाजी केली होती तेव्हा तेव्हा लाल तिखट घालूनही तपकिरी - धन्याजिर्‍याच्या पावडरीचा रंग आला होता.

मी पण ही भाजी केली होती तेव्हा तेव्हा लाल तिखट घालूनही तपकिरी - धन्याजिर्‍याच्या पावडरीचा रंग आला होता.>>> अगदी सेम. माझी पण तपकिरी झाली. आत्ताच केली होती. पण एक्दम चविष्ट!

Pages