४ मध्यम बटाटे उकडुन, साले काढुन, चौकोनी फोडी करुन
१ जरा मोठा बटाटा उकडुन, साले काढुन, कुस्करुन. हातानेच साधारण बारीक कुस्करुन थोडे पाणी घालुन सरसरीत करावा.
धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ – चवीनुसार
एका कढईत तेल तापवुन, हिंग मोहरी चि फोडणी करुन त्यात उकडलेल्या बटाटाच्या चौकोनी फोडी किंचीत खरपुस कराव्यात. आता त्यात धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ, साखर – चवीनुसार घालुन आधी लिहिलेला कुस्करलेला बटाटा आणी साधारण पाउण वाटी पाणी घालावे. भाजी व्यवस्थित उकळावी, त्या वेळेस पाणी बर्यापैकी आटते. हवे असल्यास अजुन थोडे पाणी घालावे. कोथीबीर घालुन बंद करावा.
मध्य प्रदेशात रेल्वे स्टेशन वर अशा प्रकारे केलेली भाजी आणी पुरी मिळते असे ऐकले आहे. माझ्या सासरी ही भाजी करतात. त्याला झांसी स्पेशल असे म्हणतात. भाजीची कन्सिस्टन्सी पळीवाढी असते. गरम फुलक्या आणी हा रस्सा छान लागतो.
फोटो टाकला असता तर बर झालं
फोटो टाकला असता तर बर झालं असतं..
रविवारी केली होती तेव्हा फोटो
रविवारी केली होती तेव्हा फोटो नाही काढला, आता परत केली की टाकेन फोटो
बटाट्याचे भारतभर किती
बटाट्याचे भारतभर किती प्रकारचे रस्से केले जातात त्याला सीमाच नाही. फोर्ट मधे, दादाभाई नौरोजी रोडला समांतर जो रस्ता जातो (बहुतेक अग्यारी लेन) तिथे पुर्वी मथुरा नावाचे छोटेसे हॉटेल होते, तिथे खाल्लीय मी अशी पुरी भाजी. मस्त लागते.
छानच लागते अशी भाजी आणी
छानच लागते अशी भाजी आणी पुरी..
छान पाकॄ. यात टोमॅटो अॅड
छान पाकॄ. यात टोमॅटो अॅड केले तरीही चालेल, असे वाटतय
ह्या भाजीत फोडणीत बडिशोप
ह्या भाजीत फोडणीत बडिशोप घातली तर छान वास येतो.
मी काल केली होती ही भाजी. छान
मी काल केली होती ही भाजी. छान झाली होती. समई ने लिहिल्याप्रमाणे मी पण भाजलेल्या बडिशेपेची पूड घातली.
धन्यवाद, लीना.
@दिनेशदा तुम्हाला बोरा बजार
@दिनेशदा
तुम्हाला बोरा बजार लेन अभिप्रेत आहे का?
तिथल्या पंचम पुरीवाल्याची पुरीभाजी प्रख्यात होती.
ही भाजी दोन वेळा बनवली...
ही भाजी दोन वेळा बनवली... बडीशेप आणि थोडा ओवा घातला. खुप छान झाली.
बडीशेप आणि ओवा चांगला लागेल.
बडीशेप आणि ओवा चांगला लागेल. प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.
आज हा रस्सा केला होता.
आज हा रस्सा केला होता. बडीशेप, ओवा घालून. अतिशय छान चव आहे या भाजीला. वरून कोथिंबीर घातली भरपूर. अगदी मध्य प्रदेशात व उत्तरेकडे ठेल्यांवर द्रोणात मिळणार्या बटाटा भाजी व पुरीची आठवण झाली! धन्यवाद.
मीही केली ही भाजी काल. एकदम
मीही केली ही भाजी काल. एकदम सोपी आणि मस्त आहे. बडीशेपची पूडही घातली धने-जिरे यांच्या पुडीबरोबर. आवडली. धन्यवाद.
या वर दिलेल्या मसाल्यांत
या वर दिलेल्या मसाल्यांत बडिशोप तर खूप मस्त लागतेच.. त्याबरोबर थोडी कलौंजी,जि र्याची तुपातली फोडणी ही ,आणी थोडसं अमचूर आंबटपणाला... स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.. तोंपासु
मी पण काल केली होती ही भाजी.
मी पण काल केली होती ही भाजी. अर्थात आधी कैक वेळा केलीये. सोपी , नो खटाटोप ,कमी वेळात होणारी अफाट चवीची भाजी आहे ही.
मी पंचफोडण की फोरण वापरते ह्या भाजीला.
बटाटा.... नशीब देवाने बटाटा
बटाटा.... नशीब देवाने बटाटा तयार केला.. नाही तर माझ्यासारख्या निम्म्या भाज्या न खाणार्याचे हालच झाले असते... माझी आजी मस्त करते हा प्रकार... वरुन भरपुर कोंथिबिर घालते....
सोपी , नो खटाटोप ,कमी वेळात
सोपी , नो खटाटोप ,कमी वेळात होणारी अफाट चवीची भाजी आहे ही. >>>>> प्रचंड अनुमोदन
कालच केली होती ही भा़जी, घरच्यांना खूप आवडली. धन्यवाद, लीना.
विनार्च, भाजीचा फोटो अगदी
विनार्च, भाजीचा फोटो अगदी 'चमचमीत' कॅटॅगरीतला आलाय!! आमच्याकडे दोनदा ही भाजी झाली करून, पण दोन्ही वेळेला भाजीचा रंग अगदी सौम्यच आला होता.
विनार्च, भाजीचा फोटो अगदी
विनार्च, भाजीचा फोटो अगदी 'चमचमीत' कॅटॅगरीतला आलाय!! >>> + १००
मी पण ही भाजी केली होती तेव्हा तेव्हा लाल तिखट घालूनही तपकिरी - धन्याजिर्याच्या पावडरीचा रंग आला होता.
मी पण ही भाजी केली होती
मी पण ही भाजी केली होती तेव्हा तेव्हा लाल तिखट घालूनही तपकिरी - धन्याजिर्याच्या पावडरीचा रंग आला होता.>>> अगदी सेम. माझी पण तपकिरी झाली. आत्ताच केली होती. पण एक्दम चविष्ट!
विनार्च, सही आहे फोटो!
विनार्च, सही आहे फोटो!
वॉव.. तोंपासु फोटो,
वॉव.. तोंपासु फोटो, विनार्च.....
मस्त फोटो, विनार्च.
मस्त फोटो, विनार्च.
आहाहा... विनार्च, कसला चटपटीत
आहाहा... विनार्च, कसला चटपटीत दिसतोय रस्सा!!!
आता करुन बघायलाच हवा हा रस्सा
प्रचिबद्दल विनार्च चे आभार.
प्रचिबद्दल विनार्च चे आभार. बघायला पाहीजे (खाऊन)
विनार्च, कसला सॉलिड तोंपासु
विनार्च, कसला सॉलिड तोंपासु दिसतोय रस्सा
मी आज केलेली.. आवडली..
मी आज केलेली..
आवडली..
विनार्च, एकदम कातिल फोटो आहे.
विनार्च, एकदम कातिल फोटो आहे.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद. फोटो ही छान आहे.
मी काल केला. मस्त चव आली
मी काल केला. मस्त चव आली होती.......
आत्ताच केला होता रस्सा. मस्त
आत्ताच केला होता रस्सा. मस्त चव, आवडली सगळ्यांना.
Pages