४ मध्यम बटाटे उकडुन, साले काढुन, चौकोनी फोडी करुन
१ जरा मोठा बटाटा उकडुन, साले काढुन, कुस्करुन. हातानेच साधारण बारीक कुस्करुन थोडे पाणी घालुन सरसरीत करावा.
धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ – चवीनुसार
एका कढईत तेल तापवुन, हिंग मोहरी चि फोडणी करुन त्यात उकडलेल्या बटाटाच्या चौकोनी फोडी किंचीत खरपुस कराव्यात. आता त्यात धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ, साखर – चवीनुसार घालुन आधी लिहिलेला कुस्करलेला बटाटा आणी साधारण पाउण वाटी पाणी घालावे. भाजी व्यवस्थित उकळावी, त्या वेळेस पाणी बर्यापैकी आटते. हवे असल्यास अजुन थोडे पाणी घालावे. कोथीबीर घालुन बंद करावा.
मध्य प्रदेशात रेल्वे स्टेशन वर अशा प्रकारे केलेली भाजी आणी पुरी मिळते असे ऐकले आहे. माझ्या सासरी ही भाजी करतात. त्याला झांसी स्पेशल असे म्हणतात. भाजीची कन्सिस्टन्सी पळीवाढी असते. गरम फुलक्या आणी हा रस्सा छान लागतो.
सकाळी केली होती , आवडली.
सकाळी केली होती , आवडली.
माझी आई यात दाण्याचं कूटपण
माझी आई यात दाण्याचं कूटपण घालते आणि फोडणीत लसूण, मस्त लागतो हा रस्सा भाताबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा नुसता चमच्याने खायचा.
बंगळुरूमध्येे अशी भाजी आणि पुरी हा नाश्ता खाल्ला आहे.
Pages