लग्नघरी भिंतीवर जिथे शुभ विवाह व नवरानवरीचे नाव लिहीतात तिथे मडक्यांची दोन बाजूला रास रचली जाते. आमच्याकडे त्याला आयर्या म्हणतात. माझ्या नणंदेच्या लग्नातील ही मडकी सगळी अडगळीत पडलेली होती. परवा अशीच पाहीली आणि काहीतरी करावे असे वाटले. त्यातले एक मडके उचलले.
आता सामानाची जुळवा जुळव केली. फेव्हीकॉल घरात होताच. एक छोटी काळ्या रंगाची ऑइल पेंटची डबी आणली. श्रावणीचा रंगाचा ब्रश होताच. माझ्या एका मोडक्या क्लिपला शिंपल्यांची फुले होती, श्रावणीच्या न वापरत्या माळा, मणी टाकाऊ क्लिपच्या वरची फुले जमा केली.
मडके स्वच्छ धुवून त्याला ऑईल पेंट लाऊन तो सुकवला.
शिंपल्यांची फुले एकत्र व श्रावणीच्या क्लिप वरची छोटी फुले बाजूला अशी रचना करुन चिकटवली. नंतर त्यातली एक माळ घेउन ती मडक्याच्या वरच्या भागाला अडकवली व खाली लोंबकळणारी माळ शेप मध्ये लोंबकळत नव्हती म्हणून तिला फेवीकॉलने चिकटवली. आणि हा पॉट तयार झाला.
एका ग्लास मध्ये पाणी घालून त्यात फुले ठेवली. व तो ग्लास ह्या पॉट मध्ये ठेवला.
आणि अशा तर्हेने आमच्या घरचा कोपरा नविन वस्तुने सजला.
माबोवर अनेक सुंदर कलाकुसर करणारे कलाकार आहेत. माझ्याकडे अजुन ५-६ पॉट शिल्लक आहेत. कृपया मला आयडीयाज सांगा अजुन.
नळ ठिबकत असतो तेव्हा लावतो ना
नळ ठिबकत असतो तेव्हा लावतो ना seal त्याची डीझाईन बनवायची. व रंगवायची.
मातीचे पॅटर्न करून चिकटवायचे व रंगवायचे.
जागु, खुप छान दिसतो आहे पॉट.
जागु, खुप छान दिसतो आहे पॉट. मोती तर एकदम खुलुन दिसतात काळ्या पॉटवर. झंपीने सांगीतल्या प्रमाणे M-seal ची फुले, पाने करुन लावता येतीलच पण छोटे आरसे, रेडिमेड फुले, सुकवलेली प्रेस फुले+पाने वापरुन डेकोरेट करता येतील, किंवा एमसिलचे डिस्ने कार्टुन चे आकार बनवुन किंवा पेन्ट करुन श्रावणी च्या पेन, पेन्सिल ,क्राफ्ट्च्या वस्तु ठेवण्यासाठी देता येईल, एमसिलचे गोल कव्हर करुन त्याला नाणी टाकता येईल एवढे भोक करुन ते पॉटला लाउन श्रावणीला मनी बॅक म्हणुन देता येइल.
जागु मस्तच गं, झंपी,विद्याक
जागु मस्तच गं, झंपी,विद्याक ने दिलेले सजेशन्स पण खूप आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिस्त्याची साले लावून
पिस्त्याची साले लावून डेकोरेशन करायचे आणि मग पॉटच्या रंगाला शोभेल अशा रंगाने पिस्त्याची साले रंगवायची. मस्त दिसतात. काळ्यावर/लालवर सोनेरी रंगाची साले खूप उठून दिसतात. त्याच्या जोडीला आरसेपण मस्त दिसतात.
वा ! मस्त ग जागू धान्यांच्या
वा ! मस्त ग जागू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धान्यांच्या दाण्यांचे डिझाईन कर. ( भिजवलेल्या कडधान्यातले न भिजलेली वाणं यासाठी उपयुक्त होतील. )
पण तुझ्या लौकिकाला साजेलशी एकच सूचना करू शकते मी : माशांच्या काट्यांचा वापर करून सजव
मस्तच.... एकदम क्लासिक
मस्तच.... एकदम क्लासिक
मस्त.
मस्त.
मस्त दिसतोय पॉट कापडाचे
मस्त दिसतोय पॉट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कापडाचे कोलाज करता येइल - बांधणीचे कॉमन आहे.. दुसरे कुठलेतरी ट्राय कर.
लेकीलाच सजवायला दे एखादा पॉट... ग्लिटर्स, टिकल्या, रंगित कागदाचे तुकडे इ इ लावता येतिल.
अजुन कल्पना सुचल्या की लिहिते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा जागू - सह्ही झालंय..... पण
वा जागू - सह्ही झालंय.....
पण तुझ्या लौकिकाला साजेलशी एकच सूचना करू शकते मी : माशांच्या काट्यांचा वापर करून सजव डोळा मारा
सॉरी अगदीच राहावले नाही >>>>> अवल ........ हा हा हा.....
मस्त..
मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर ! अनेक चेहरेही दाखवतां
सुंदर !
![faces.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u13291/faces.JPG)
अनेक चेहरेही दाखवतां येतील. उदा. -
नारळाची दोरी आधी पॉट ला गोल
नारळाची दोरी आधी पॉट ला गोल बांधायची अर्ध्या भागात मग मध्ये वरून खाली असे मध्ये गोलाकार (कप ची दांडी असते तशी दोन गुंडाळ्या) मोकळं सोडून बांधायचे …बस एवढच आणि मग त्यावर कलर स्प्रे करायचा हे वाळले कि कडक होते … छान दिसतं नैसर्गिक एकदम
पूर्ण पिवळा रंग देऊन वेगवेगळे
पूर्ण पिवळा रंग देऊन वेगवेगळे स्माइलिज काढता येतात …
.
.
जागू मस्तच झालेत पॉट,
जागू मस्तच झालेत पॉट, त्यावरची फुलं, नक्षी सगळच छान जमलय....
मस्त प्राजु
मस्त प्राजु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही जागू. मस्त झालेय. त्यांना
सही जागू. मस्त झालेय.
त्यांना असे रंगवुन हँगींग कुंड्या म्हणुन वापरता येईल. अर्थात तुझ्याकडे जागेची कमी नाहिये. तरिही सुचले ते लिहिले.
झक्कास!
झक्कास!
सुंदरच झालंय गं !!
सुंदरच झालंय गं !!
सगळ्यांच्या आयडीयाज खुप छान
सगळ्यांच्या आयडीयाज खुप छान आहेत. खुप खुप धन्यवाद.
आता पुढच्या पॉटच्या तयारीला लागते.
लाजो खर तर हा पॉट इतक्या लवकर श्रावणी मुळेच झाला. तिचा अभ्यास झाला की ती माझ्या मागे लागायची चल आपण ते करु. मग रात्री अभ्यास संपवून आम्ही दोघी हे उद्योग करत होतो.
अवल काट्यांऐवजी सुके मासेच चिकटवते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सुंदर सजवलेय.. तूमच्या
सुंदर सजवलेय.. तूमच्या किनार्यावरच अनेक शंख शिंपले मिळतील, सजावटीसाठी !
सुंदर......
सुंदर......
जागू, एका मडक्याला बाहेरुन
जागू,
एका मडक्याला बाहेरुन लाल/निळा/पिवळा ऑईलपेंट लावायचा.किंवा गेरु लावुन त्यावर वॉर्निश चा कोट करायचा.पण थोडासा ओला असतना पुढील काम करायचे आहे.एका टेबलवर ३/३ उदबत्त्या एका उदबतीच्या स्टँडवर लावायच्या.त्या खोलीतील दार व खिडक्या लावुन घ्यायच्या जेणेकरुन पेटलेल्या उदबतीतुन निघणार्या धुराला वारे लागणार नाही.तो एकाच दिशेने वाहील वा झोत एकसारखा असेल्.आता डाव्या हातात मडके आडवे धरुन [तिरके धरुन]या धुराच्या झोतावर इंग्रजी "एस "आकारात गोल फिरवावे.दुसर्या हाताने मडक्याला आधार देत ते गोल फिरवायचे आहे.दुसर्या हाताला रंग लागु नये म्हणुन प्लास्टीक पिशवी रबरबँड च्या सहाय्याने अडकववावी किंवा दिस्पोसेबल ग्लोव्स असल्यास तो लावावा.उदबतीच्या काळ्या धुराने न पसरणारे ,परमनंट असे सुंदर डिझाईन आपोआप तयार होते.मडके धुरापासुन अगदी जवळ धरले तर गडद रंग आणि थोडेसे लांब ;२ इंचावर धरले तर हलका रंग चढतो.
सुंदर ग जागू तै भाऊकाका
सुंदर ग जागू तै
भाऊकाका![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दिनेशदा, श्रद्धा, जाई
दिनेशदा, श्रद्धा, जाई धन्यवाद.
सुलेखा ताई आयडीया भारीच.
खुप छान ...
खुप छान ...
छानच
छानच
जगुदि सुरेख........
जगुदि सुरेख........
खूपच मस्त....
खूपच मस्त....
जागू कमाल आहे बाई तुझी. काय
जागू कमाल आहे बाई तुझी. काय मस्त केल आहेस ग. आणि श्रावणी पण तुझ्या सारखीच एक्स्पर्ट होणार्रस दिसतय.
प्रतिसादातल्या कल्पना पण आवडल्या.
Pages