पॉट (मडके) वरील कलाकुसर.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 April, 2013 - 15:50

लग्नघरी भिंतीवर जिथे शुभ विवाह व नवरानवरीचे नाव लिहीतात तिथे मडक्यांची दोन बाजूला रास रचली जाते. आमच्याकडे त्याला आयर्‍या म्हणतात. माझ्या नणंदेच्या लग्नातील ही मडकी सगळी अडगळीत पडलेली होती. परवा अशीच पाहीली आणि काहीतरी करावे असे वाटले. त्यातले एक मडके उचलले.

आता सामानाची जुळवा जुळव केली. फेव्हीकॉल घरात होताच. एक छोटी काळ्या रंगाची ऑइल पेंटची डबी आणली. श्रावणीचा रंगाचा ब्रश होताच. माझ्या एका मोडक्या क्लिपला शिंपल्यांची फुले होती, श्रावणीच्या न वापरत्या माळा, मणी टाकाऊ क्लिपच्या वरची फुले जमा केली.

मडके स्वच्छ धुवून त्याला ऑईल पेंट लाऊन तो सुकवला.

शिंपल्यांची फुले एकत्र व श्रावणीच्या क्लिप वरची छोटी फुले बाजूला अशी रचना करुन चिकटवली. नंतर त्यातली एक माळ घेउन ती मडक्याच्या वरच्या भागाला अडकवली व खाली लोंबकळणारी माळ शेप मध्ये लोंबकळत नव्हती म्हणून तिला फेवीकॉलने चिकटवली. आणि हा पॉट तयार झाला.

एका ग्लास मध्ये पाणी घालून त्यात फुले ठेवली. व तो ग्लास ह्या पॉट मध्ये ठेवला.

आणि अशा तर्‍हेने आमच्या घरचा कोपरा नविन वस्तुने सजला.

माबोवर अनेक सुंदर कलाकुसर करणारे कलाकार आहेत. माझ्याकडे अजुन ५-६ पॉट शिल्लक आहेत. कृपया मला आयडीयाज सांगा अजुन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages