बटवा

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 8 April, 2013 - 02:37

हा क्रोशाचा बटवा Happy

आपलं नेहमीचं डिझाईन आणि दोन रंग वापरुन केलेला बटवा. हवा तेवढा आकार वाढवता येतो. गोलाकार सुद्धा करता येईल.

DSC02488-001.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम .....

क्यूटच दिसतोय. तुमच्या हातात खूपच सफाई आहे. काम अतिशय नेटकं दिसतं. >>>> +१००...

जये... अगं हे माहीतच नव्हतं... काय सुर्रेख दिसतो बटवा. मला खरच भयंकर कौतुक आहे अशा कलागुणांचं.... हे वीणकाम, क्रोशा, भरत काम, लक्ष्मण काम... आपली वाट ती नव्हेच हे मला खूप लवकर कळलं ते एका अर्थी बरच झालं. माझ्या सासूबाई, धाकटी जाऊ छान करतात असलं काही काही.
मुद्दाम कुणाला भेट म्हणून असं काही (आपण करून) देता आलं तर किती म्हणजे किती छान...
ही रंगसंगतीही माझ्या आवडीची आहे.

तहे दिल से शुक्रिया यारो ... Happy

दाद...... अगं हे सगळं मला मनापासून आवडतं करायला आणि ह्याचं कारण म्हणजे माझी आई. ती एकदम अफलातून करायची हे सगळं. प्रत्येक उन्हाळ्यात काहीतरी नवीन शिकायचंच असं तिचं म्हणणं असायचं आणि ती ते खरंही करायची. तिच्यामुळेच तशी आवड निर्माण झाली Happy

खूप सुंदर झालाय बटवा. रंगसंगती फार सुंदर दिसतिये.
एक भा.प्र. ..... ह्याला आतून अस्तर लावलंय का? किंवा लावावं लागतं का?

धन्यु शांकली Happy
अस्तर डार्क रंगाचं लावलं तर छान दिसेल. मी आत कागद ठेवलेत फोटो काढण्यासाठी Wink