घुसमट
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
11
आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष
भावनांची सालपटे
अविश्वासाचा आसूड
रान सुकलेही नाही
पेटली उन्मादी चूड
धुमसत्या निखार्यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार
जीवघेणी तटस्थता
आत धुमसे वादळ
सुखी भविष्याची आस
रिती काळाची ओंजळ
विषय:
प्रकार:
शेअर करा
सही ! शेवटच्या चारोळी खासच
सही !
शेवटच्या चारोळी खासच एकदम.
प्रत्येक ओळ आवडली धन्यवाद
प्रत्येक ओळ आवडली
धन्यवाद
धन्यवाद डॅफोडिल्स आणि
धन्यवाद डॅफोडिल्स आणि बेफिकीर.
छान शेवटच्या चारोळी सुंदर
छान
शेवटच्या चारोळी सुंदर जमल्यात
(No subject)
छान आहे, आवडली जानेवारीत
छान आहे, आवडली
जानेवारीत म्हणजे अलिकडेच लिहीलीस की. दिसली नाही नवीन लेखनात. ओह! रंगीबेरंगी मध्ये आहे नाही का? रिक्षा फिरवायची होती की. 
धन्यवाद बुवा! पहा.. रिक्षा न
धन्यवाद बुवा!
पहा.. रिक्षा न फिरवताच तुम्ही शोधलीत की नाही? याचं अप्रूप जास्त आहे.
घुसमटीची / अस्वस्थतेची सुंदर
घुसमटीची / अस्वस्थतेची सुंदर अभिव्यक्ती ..
(No subject)
आत्ममग्न हुंदक्यांचे मखमली
आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष
धुमसत्या निखार्यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार
<< विशेष आवडले! सुंदर...
आंसू