किलांबा हि अंगोलातली एक गृहवसाहत. ( अशा अनेक आहेत. ) चिनी सरकारने बांधलेली हि वसाहत,
काहि आकसापोटी नेटवर घोस्ट वसाहत म्हणून प्रसिद्ध आहे.
मी स्वतः गेल्याच आठवड्यात इथे रहायला आलो. काल एक समविचारी ( अविचारी म्हणा हवं तर ) मित्र भेटला आणि हि वसाहत आम्ही पायी पायी फिरत पिंजून काढली. एरवी गाडीतून जाताना हे सगळे नीट बघता येत नाही.
आणि खात्री पटली कि भुतं वगैरे काही नसतात. ( माझ्यासारखे सुपरभुत आल्यामूळे पळून गेली का ? )
गेल्याच वर्षी हि वसाहत खुली झाली. एवढी वसाहत भरायला वेळ लागणारच. सध्या नवनवीन कुटुंब दाखल होत
आहेत. आतली कामे पण सुरुच आहेत. पण एकंदर बांधकाम आणि त्यापेक्षा रंगसंगती मला खुपच आवडली.
फोटो काढल्यावर लक्षात आले कि बांधकामात वक्र रेषा आणि गोलाकार अगदी क्वचितच वापरले आहेत. व्यंकट ( वक्र ) म्हणजेच सौंदर्य हि कल्पना पण टाकावी लागली.
तर चला एक फेरी मारुया !
हे आहे प्रथम दर्शन
माझी स्ट्डी रुम
माझी "प्रयोगशाळा"
किचनच्या बाल्कनीतून दिसणारे दॄष्य
शाळा आणि मैदान. प्रत्येक विभागात अशा शाळा आहेत ए पासून व्ही पर्यंत विभाग दिसले आणि प्रत्येक विभागात २०/२५ बिल्डींग्ज दिसतात.
एक पॅनोरामा
पार्किंग ची सोय
घरासमोरची गल्ली
चिमुकला पाहुणा, काल माझ्या कपडे वाळत घालायच्या तारेवर होता.
वसाहतीत गुलमोहोर, पिंपळ, शंकासूर, क्रेप, काशिद अशी बरीच झाडे नव्याने लावली आहेत. सहसा या अँगलने आपण झाडाकडे बघत नाही.
घरातून दूरवर दिसणारे स्टेडीयम
आता तुरळक गुलमोहोर फुलू लागलाय
रस्ता
पॅनोरामा २
मधेच उद्यानासाठी जागा आहे.
बरीच मोठी बाग होणार आहे.
अशीही हिरवाई
अशीपण
शाळा
संध्याकाळ १
संध्याकाळ २
आणि अंगोलातला हा पुराणपुरुष.. बाओबाब. कॉलनीतही आहेच !
अधिक माहितीनुसार इथे एकंदर ७५० बिल्डींग्ज आहेत आणि एकंदर २४,००० पेक्षा जास्त घरे आहेत
छान आहे वसाहत. रंगसंगतीही छान
छान आहे वसाहत. रंगसंगतीही छान दिसते. झाडे मोठी झाली अजुन खुप मस्त दिसेल वसाहत.
दिनेशदा, स्वच्छ, आखीव-रेखीव
दिनेशदा,
स्वच्छ, आखीव-रेखीव आणि शीस्तबद्ध वसाहत आवडली
वा! दिनेशदा मस्त टूर झाली
वा! दिनेशदा मस्त टूर झाली वसाहतीची! अगदी स्वच्छ आणि नेटकी आहे.
प्रयोगशाळाही इतकी छान आहे की प्रयोग करायला अगदी मजा येत असेल.!
आणि "गल्ली" शब्द जरा बोचला बरं! आमच्या नगरात या खरी गल्ली पहायची असेल तर!
दिनेश दा..खूपच सुबक आणी नीट
दिनेश दा..खूपच सुबक आणी नीट आहे वसाहत.. घरही मोकळ ढाकळ छान वाटतय हवेशीर..
आणी ते निरभ्र आकाश.. साऊथ ईस्ट एशिया च्या मेट्रोजमधे कध्धी कध्धी दिसणार नाही...
(No subject)
खूपच उजाड वाटली .. का कोणास
खूपच उजाड वाटली .. का कोणास ठावूक..
सिमेंटचे जंगल... लाईनीने अश्या इमारती पाहून विचित्र नाही वाटत? (मलातरी).
मस्त फोटो दिनेशदा केंव्हा
मस्त फोटो दिनेशदा
केंव्हा येऊ??
मस्ताय. अगदी आपल्याकडे अशा
मस्ताय. अगदी आपल्याकडे अशा मोठ्या वसाहती असतात तशीच दिसतीये. फक्त अजून मोठी वाढलेली झाडं नसल्याने काहीशी रुक्ष वाटतीये.
ही वसाहत बघून मी पाहिलेली अशी पहिली वसाहत आठवली - ठाण्याची श्रीरंग सोसायटी.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
सुंदर...
सुंदर...
व्वाह!!! कसली सुंदर जागा आहे
व्वाह!!! कसली सुंदर जागा आहे ही! मस्त प्रचि
Pages