आईसबॉल होणारे बेडुकराव...
( Survival of the sickest by Dr. Sharon Moalem and Jonathan Prince - या पुस्तकाच्या आधारे हा लेख लिहिलेला असून याचे सर्व श्रेय "वर्षू नील" ला जाते. कालच बर्षूने या पुस्तकाची ओळख निसर्गाच्या गप्पा (भाग१३) द्वारे करुन दिली. हे पुस्तक अशा अनेक गंमती जमतीने भरलेले असून अतिशय रंजकपणे लेखकाने यात अनेक शास्त्रीय गोष्टींचा उलगडा केलेला आहे.)
.
.
.
१९८० च्या आसपास डॉ. केन स्टोरे हा कॅनडातील एक बायोकेमिस्ट बर्फात रहाणार्या किड्यांचे संशोधन करायला उत्तर अमेरिकेत सपत्नीक फिरत होता. तिथे त्याला कळले की वूड फ्रॉग नामक काही बेडूक शीतनिद्रेपेक्षा (का हिमनिद्रा) (हायबरनेशन) आश्चर्यकारक जीवन जगतात. शोध घेता घेता त्याला एक वूड फ्रॉग मिळाला. गंमत म्हणजे केनकडून तो बेडुक त्याच्या कारमधेच प्लॅस्टिक बॅगमधे रात्रभर राहिला. त्या रात्री नेमकी गोठवणारी थंडी (शून्याखाली तापमान दाखवणारी) पडली.
सकाळी उठून केनने पाहिले की बिचारा बेडुक त्या थंडीने गोठून पार बर्फ झालेला. केनला फार वाईट वाटले, त्याने अत्यंत निराश होऊन त्या संपूर्ण गोठलेल्या बेडकाला आपल्या घरात आणले. केन त्याच्याकडे हताश होऊन पहात होता.
आणि इथेच खरी गंमत सुरु झाली .....
- हळूहळू त्या बेडकावर घरातील तापमानाचा (रुम टेंपरेचरचा) असर होऊ लागला - जस जसा तो बेडुक वितळला (नॉर्मल रुम टेंपरेचरला आला) तसतसा तो गोठलेला बेडुक झोपेतून जागा झाल्यासारखा चारी पाय ताणू लागला, त्याचा श्वास-उच्छ्वास सुरु झाला आणि नंतर तो चक्क टेबलावर उड्या मारु लागला व त्याचा विशिष्ट आवाजही काढू लागला. आता केनने हे सर्व स्वतःच्या डोळ्याने पाहिल्याने त्याला काय खरे व काय खोटे हेच समजेना.
मग चौकशीअंती त्याला कळाल्या त्या गोष्टी अशा होत्या -
उत्तर अमेरिकेत सापडणार्या या बेडकाला निसर्गाने काही विशेष गोष्टी प्रदान केल्या होत्या. साधारणतः जिथे अतिशय थंडी पडते (शून्याखाली तापमान दाखवणारी : उणे काही डि. सेल्सियस) तिथले अनेक प्राणी शीतनिद्रेत जातात. यात हे प्राणी गाढ झोपी जातात. त्यांच्या शरीरात फॅट्सचे प्रमाण इतके असते की त्याचे एक सुरक्षा कवचच तयार होते. या प्राण्यांचे सर्व मेटॅबॉलिझम (चलनवलन) अतिशय मंदावते व त्यांची अतिशय कमी उर्जा वापरली जाते. पण या सर्व प्राण्यांमधे जिवंतपणाची लक्षणे दिसतात. जेव्हा केव्हा वसंत (स्प्रिंग) ऋतू येतो तेव्हा हे प्राणी या हिमनिद्रेतून बाहेर येऊन नेहेमीसारखे व्यवहार सुरु करतात.
पण या वुड फ्रॉगची गोष्टच पूर्ण वेगळी आहे. जेव्हा केव्हा गोठवणारी (शून्याखाली तापमान दाखवणारी) थंडी पडते तेव्हा हा बेडुक चक्क गोठून बर्फ होतो. त्याच्यात जिवंतपणाचे एकही लक्षण दिसत नाही - हृदयाचे ठोके, श्वास-उच्छ्वास, कुठल्या अत्याधुनिक उपकरणाने मोजता येईल अशी मेंदूची कार्यशीलता हे काही एक त्याच्या ठिकाणी दिसत नाही - कारण सहाजिकच आहे तो पूर्ण गोठूनच जातो ना... पण आश्वर्याची गोष्ट अशी की त्याच्यातील "जीवन" संपलेले नसते. कारण जेव्हा वसंत (स्प्रिंग) ऋतू येतो तेव्हा हे महाशय चक्क हळूहळू जागे होतात (का वितळतात ) व नेहेमीचे जीवन सुरु करतात.
हे सारे होते कसे -
जेव्हा बेडकाच्या सभोवतालचे तापमान शून्याच्या आसपास येऊ लागते ते त्या बेडकाच्या त्वचेला जाणवू लागते - तिथून त्याच्या सार्या शरीरभर काही बदल सुरु होतात -
त्याच्या रक्तातील व अवयवातील पाणी हळूहळू बाहेर पडून उदरपोकळीत जमा होते (मूत्र तयार होऊन त्याचे विसर्जन होण्याऐवजी). त्याची लिव्हर कार्यरत होऊन रक्तातील शर्करा व अल्कोहोलिक शर्करा ही जवळजवळ शंभरपटीने वाढते. आता ही शर्करा जी वाढते त्याचा उपयोग असा होतो की जेव्हा तो बेडुक गोठला जातो तेव्हा त्याच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या नाजूक भित्तिका (सेल वॉल्स) या तीक्ष्ण आईस क्रीस्टल्समुळे भोके पडून खराब होऊ शकतात त्या होत नाहीत.
एक साधी गोष्ट पहा - फ्रीजर चेस्टमधे (उणे शून्य तापमानात) पाणी ठेवले तर त्याचे आईस क्यूब तयार होतात - जे खाताना आपण कुडुम कुडुम आवाज करत ते फोडतो व खातो - म्हणजेच हे आईस क्रिस्टल्स किती कठीण असतात - पण त्याच पाण्यात जरा साखर, दूध व फ्रिजिंग जेल घाला व ठेवा फ्रीजर चेस्टमधे - आईस्क्रीम तयार होते -खाताना किती मऊ मऊ लागते ना....
पाण्यात जेव्हा शर्करा, प्रोटीन्स व क्रायोप्रिझर्व्हेटिव घातले जाते तेव्हा तीक्ष्ण आईस क्रिस्टल्स तयार होऊ शकत नाहीत. नेमके हेच त्या बेडकाबाबत घडते. याचबरोबर याच्या शरीरात फायब्रिनोजेन (ब्लड क्लॉटिंग फॅक्टर) ची ही खूप निर्मिती होते ज्यामुळे फ्रिजिंग होताना अवयवांना होणारी हानि टाळली जाते.
जरी त्याच्या शरीराबाबत अजूनही काही काही गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडत असतील तरी ही मुख्य गोष्ट घडते जी त्याच्या शरीरातील "जीवन" शाबूत ठेवते ....
.....अजून त्याच्या शरीरातील सर्वच्या सर्व गोष्टी शास्त्रज्ञांना समजल्यात असे नाहीत .
.... पण......
....भविष्यात कोणा शास्त्रज्ञाला ही सर्व प्रक्रिया समजली व माणसासाठी ती उपयोगात आणता आली तर !!!!
(Rana sylvatica म्हणजेच हा वूड फ्रॉग)
छान माहीती आहे
छान माहीती आहे
छान माहिती. हायबरनेशन माहित
छान माहिती. हायबरनेशन माहित होतं पण हे नवीनच आहे.
गंमतच आहे !.. नवीन माहीती
गंमतच आहे !.. नवीन माहीती
हायबरनेशन बद्दलपण वाचायला आवडेल.
खुपच छान माहिती.
खुपच छान माहिती.
एवढंच म्हणेन ऐतेन... आणि
एवढंच म्हणेन ऐतेन...:) आणि अर्थातच इथे पोस्टल्याबद्दल धन्यवाद!
खूपच छान माहिती शशांकजी. अजून
खूपच छान माहिती शशांकजी. अजून वाचनात जी जी माहिती येईल ती देत चला प्लीज. तुमचे अध्यात्मावरचे लिखाण पण छानच असते.:स्मित:
शशांक, अरे व्वा.. खूप्पच
शशांक, अरे व्वा.. खूप्पच उत्साही आहेस रे.. लग्गेच पुस्तक मिळवून वाचून इथे शेअर ही करतोयेस..
खूप छान वाटल. आणी तुझ कौतुक ही
खूपच छान माहिती शशांकजी, अन
खूपच छान माहिती शशांकजी, अन तुमचा जीवनातला सर्वांगीण रस प्रकट करणारी.
शशांक, अरे व्वा.. खूप्पच
शशांक, अरे व्वा.. खूप्पच उत्साही आहेस रे.. लग्गेच पुस्तक मिळवून वाचून इथे शेअर ही करतोयेस..
खूप छान वाटल. आणी तुझ कौतुक ही
+१११
छान माहिती.. अवांतर =
छान माहिती..
अवांतर = सिल्व्हेस्टर स्टॅलोन आणि सँड्रा बुलक चा एक सिनेमा होता, त्यात त्याला असे गोठवून ठेवलेले असते. त्याची प्रेरणा हा बेडूक असावा.
असाच एक सुरवंट पण असतो. फ्रोझन प्लॅनेट मधे दाखवलाय तो.
इंटरेस्टिंग!!
इंटरेस्टिंग!!
अमेझिंग.. मस्त माहिती
अमेझिंग.. मस्त माहिती
छान माहिती. आईसक्रीम -
छान माहिती. आईसक्रीम - क्रिस्टल न्याय पटला. सुंदर सहज लिखाण.
अवांतर : दिनेशदांच्या उल्लेखावरून आठवले: स्टॅलोन, आर्नल्ड श्वार्त्झनीगर यांच्या अभिनयाला 'वूडन' यावरूनच म्हणतात की काय?
शशांक फारच छान माहिती दिलीस,
शशांक फारच छान माहिती दिलीस, धंन्यवाद
मायनस तपमानात झाडंसुधा कशी जगत असतीलना. त्यांच्यातल्या पाण्याचही बर्फ होऊ शकत. प्राण्यांमधे साखर जाळून उर्जा निर्मीती होते तशीही सोय झाडांकडे नाही.
शशांक, उत्तम लेख. हृदयाचे
शशांक, उत्तम लेख.
हृदयाचे ठोके, श्वास-उच्छ्वास, कुठल्या अत्याधुनिक उपकरणाने मोजता येईल अशी मेंदूची कार्यशीलता हे काही एक त्याच्या ठिकाणी दिसत नाही >> डोक्यातला किडा परत वळवळू लागला - 'चेतना / जीवंतपणा म्हणजे नक्की काय मग?'
वॉव. मस्त माहिती शशांक.
वॉव. मस्त माहिती शशांक.
हृदयाचे ठोके, श्वास-उच्छ्वास,
हृदयाचे ठोके, श्वास-उच्छ्वास, कुठल्या अत्याधुनिक उपकरणाने मोजता येईल अशी मेंदूची कार्यशीलता हे काही एक त्याच्या ठिकाणी दिसत नाही >> डोक्यातला किडा परत वळवळू लागला - 'चेतना / जीवंतपणा म्हणजे नक्की काय मग?' >>>>
>> हेच तर शास्त्रज्ञांना सतावते ना...... एखादी साधी पेशी (पेशी समूह) अशा प्रकारे लॅबमधे गोठवता येते - कितीही काळ...
पण..... एखादा मोठा प्राणी ???? फार मोठ्ठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही ....... आणि नुसता गोठवून काय उपयोग, पुन्हा तो नेहेमीप्रमाणे कार्यरत होणे - विचारच करता येत नाही आपल्याला .........
ही चेतना, जीवन म्हणजे नक्की काय आहे - खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे - नुसते शास्त्रज्ञच काय सगळ्यांपुढेच ......
मध्यंतरी डिस्कव्हरी का अॅनिमल प्लॅनेट - कुठेतरी दाखवत होते - न्यू बुद्धा हॅज अराईव्हड - कित्येक दिवस बी बी सी ची टीम रात्रंदिवस त्याचे वेगवेगळ्या कॅमेर्याने शूटिंग घेत होते (उत्तरांचल का नेपाळमधील घटना) - पण तो झाडाखाली बसलेला माणूस ना काही खात-पीत होता ना कुठले विसर्जन (मूत्र, वगैरे) - तरीही चेहेर्यावर डिहाड्रेशनचे चिन्हही नव्हते...... अर्थात लांबूनच शूटिंग चालू होते - पण अत्याधुनिक कॅमेर्यांनी - कोण तापमान मोजतंय तर कोण अजून काही ......
सगळंच अतर्क्य ....
आणि अचानक तो माणूस गायब झाला ...... कुठे गेला, केव्हा गेला काही काही पत्ता लागला नाही .......
मी ही बराच वेळ तो इपिसोड पहात होतो - सगळं आधुनिक विज्ञानाच्या आकलनापलिकडे - एवढेच शास्त्रज्ञ म्हणत होते ....
माहिती इथे शेयर केल्याबद्द्ल,
माहिती इथे शेयर केल्याबद्द्ल, शशांकजी धन्यवाद !
शशांक,एक सजेशन, तू आता या
शशांक,एक सजेशन, तू आता या पुस्तकाचं भाषांतरच करून टाक मराठीत.. खूप फायदा होईल मराठी वाचकांना..
शशांक पुरंदरे, उत्तम आणि रंजक
शशांक पुरंदरे, उत्तम आणि रंजक माहिती. जीव पूर्णपणे गोठूनही 'मरत' नाही. ऐकावं ते नवलंच!
आ.न.,
-गा.पै.
माधव, >> 'चेतना / जीवंतपणा
माधव,
>> 'चेतना / जीवंतपणा म्हणजे नक्की काय मग?'
माझ्या माहितीप्रमाणे आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये (मॉडर्न मेडिकल सायन्स) life ची अधिकृत व्याख्या उपलब्ध नाही. मायबोलीवरचे डॉक्टरलोक अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते.
आ.न.,
-गा.पै.
मस्त माहिती !
मस्त माहिती !
खरचं रंजक आहे माहिती. अजुन
खरचं रंजक आहे माहिती. अजुन डिटेलमधे वाचायला आवडले असते
इंटरेस्टिंग. अजून माहिती
इंटरेस्टिंग. अजून माहिती वाचायला आवडेल.
मस्त माहिती. धन्यवाद शशांक
मस्त माहिती.
धन्यवाद शशांक
चांगली रंजक माहिती.
चांगली रंजक माहिती.
गंमतच आहे !.. आवडले.
गंमतच आहे !.. आवडले.
शशांक हे खूपच इन्टरेस्टिन्ग
शशांक हे खूपच इन्टरेस्टिन्ग आहे.
एका गोष्टीतही असे सगळेच्या सगळे......संपूर्ण राज्य, राजा राणी राजकन्या.....इ.इ. शीतनिद्रेत जातात असं आहे. बालपणी अशी एक गोष्ट ऐकल्याचं आठवतंय!
वा! शशांकजी, फारच छान माहिती
वा! शशांकजी, फारच छान माहिती दिलीत! इंटरेस्टिंग!!
शशांक,एक सजेशन, तू आता या
शशांक,एक सजेशन, तू आता या पुस्तकाचं भाषांतरच करून टाक मराठीत.. खूप फायदा होईल मराठी वाचकांना.. >>> अनूमोदन
व्वा शशांक, फारच मस्त माहिती. कालच माझ्या मुलाला वाचून दाखविली. त्याला फारच आवडल.
Pages