किलांबा हि अंगोलातली एक गृहवसाहत. ( अशा अनेक आहेत. ) चिनी सरकारने बांधलेली हि वसाहत,
काहि आकसापोटी नेटवर घोस्ट वसाहत म्हणून प्रसिद्ध आहे.
मी स्वतः गेल्याच आठवड्यात इथे रहायला आलो. काल एक समविचारी ( अविचारी म्हणा हवं तर ) मित्र भेटला आणि हि वसाहत आम्ही पायी पायी फिरत पिंजून काढली. एरवी गाडीतून जाताना हे सगळे नीट बघता येत नाही.
आणि खात्री पटली कि भुतं वगैरे काही नसतात. ( माझ्यासारखे सुपरभुत आल्यामूळे पळून गेली का ? )
गेल्याच वर्षी हि वसाहत खुली झाली. एवढी वसाहत भरायला वेळ लागणारच. सध्या नवनवीन कुटुंब दाखल होत
आहेत. आतली कामे पण सुरुच आहेत. पण एकंदर बांधकाम आणि त्यापेक्षा रंगसंगती मला खुपच आवडली.
फोटो काढल्यावर लक्षात आले कि बांधकामात वक्र रेषा आणि गोलाकार अगदी क्वचितच वापरले आहेत. व्यंकट ( वक्र ) म्हणजेच सौंदर्य हि कल्पना पण टाकावी लागली.
तर चला एक फेरी मारुया !
हे आहे प्रथम दर्शन
माझी स्ट्डी रुम
माझी "प्रयोगशाळा"
किचनच्या बाल्कनीतून दिसणारे दॄष्य
शाळा आणि मैदान. प्रत्येक विभागात अशा शाळा आहेत ए पासून व्ही पर्यंत विभाग दिसले आणि प्रत्येक विभागात २०/२५ बिल्डींग्ज दिसतात.
एक पॅनोरामा
पार्किंग ची सोय
घरासमोरची गल्ली
चिमुकला पाहुणा, काल माझ्या कपडे वाळत घालायच्या तारेवर होता.
वसाहतीत गुलमोहोर, पिंपळ, शंकासूर, क्रेप, काशिद अशी बरीच झाडे नव्याने लावली आहेत. सहसा या अँगलने आपण झाडाकडे बघत नाही.
घरातून दूरवर दिसणारे स्टेडीयम
आता तुरळक गुलमोहोर फुलू लागलाय
रस्ता
पॅनोरामा २
मधेच उद्यानासाठी जागा आहे.
बरीच मोठी बाग होणार आहे.
अशीही हिरवाई
अशीपण
शाळा
संध्याकाळ १
संध्याकाळ २
आणि अंगोलातला हा पुराणपुरुष.. बाओबाब. कॉलनीतही आहेच !
अधिक माहितीनुसार इथे एकंदर ७५० बिल्डींग्ज आहेत आणि एकंदर २४,००० पेक्षा जास्त घरे आहेत
सह्ही आहेत सगळे फोटो... काय
सह्ही आहेत सगळे फोटो... काय वेल प्लॅन्ड टाऊनशिप आहे हो..आणि खूपच (खरंतर विस्ताराने प्रचंड) मोठी दिसतिये.
देखणी आहे वसाहत! फोटो
देखणी आहे वसाहत!
फोटो अप्रतिम!
मस्त फोटो दिनेशदा.. कलरफुल
मस्त फोटो दिनेशदा.. कलरफुल वसाहत...
मस्त - फोटो आणि वसाहत दोन्ही
मस्त - फोटो आणि वसाहत दोन्ही
पण इतक्या छान वसाहतीला घोस्ट वसाहत का म्हणतात बूवा???
wow. पण रस्त्यावर ट्राफिकच
wow.
पण रस्त्यावर ट्राफिकच दिसत नाहीये
छान आहे वसाहत असे स्वच्छ
छान आहे वसाहत
असे स्वच्छ रस्ते आणि फुटपाथ बघयची सवय नाही
वॉव दिनेशदा! काय सह्ही आहे ही
वॉव दिनेशदा! काय सह्ही आहे ही वसाहत, वेल प्लॅन्ड आणि फोटोही!
तुमच्या प्रयोगशाळेतलं ते सिलिंडर किती छान दिसतय..
अवांतरः
चीनने बांधलीत काय..
कालच वाचले की चीनला आफ्रिका खंडामधे बराच इंटरेस्ट आहे. त्यामुळे चीनी सरकार अशा कामांमधे आफ्रिकन देशांच्या सरकारला मदत करतोय.
ओ हो - काय भन्नाट आहे ही
ओ हो - काय भन्नाट आहे ही वसाहत - दिनेशदा, केव्हा येऊ तिकडे ?
फोटो काढल्यावर लक्षात आले कि बांधकामात वक्र रेषा आणि गोलाकार अगदी क्वचितच वापरले आहेत. व्यंकट ( वक्र ) म्हणजेच सौंदर्य हि कल्पना पण टाकावी लागली. >>>> अरेरेरे, किती ही अरसिकता !!! नशिब, सगळी झाडे, वेलीही अगदी सरळ सोट वाढवल्या नाहीत ते ....
ग्रेट दिनेशदा! किती निटनेटकी
ग्रेट दिनेशदा! किती निटनेटकी आणि टापटिपीची कॉलनी.
सुंदरच! तुमची स्टडी रुम, प्रयोगशाळा सगळच.
छान आहे वसाहत असे स्वच्छ
छान आहे वसाहत
असे स्वच्छ रस्ते आणि फुटपाथ बघयची सवय नाही>++१०००
किति मस्त वाटत आहे हे फोटो पाहुन .....
सगळंच सुंदर आहे.
सगळंच सुंदर आहे.
नव्यानेच हा देश प्रगती करत
नव्यानेच हा देश प्रगती करत असल्याने बँक कर्ज वगैरे मिळवण्यासाठी वेळ लागत असावा ( शांकली ??) म्हणून लोक येत नसावेत. मुख्य रस्त्याच्या कडेवरील इमारतीत तळमजल्यावर दुकानाची जागा सोडलीय. आता दुकाने पण उघडत आहेत.
अजून तशी बरीच घरे रिकामी आहेत. ( म्हणून घोस्ट टाऊन म्हणत असावेत ! ) पण आता रहदारी वाढतेय. काल रजा होती म्हणून, नाहीतर गाड्या असतात. बस सर्व्हीस पण आहे.
चीनला या सगळ्याच्या बदल्यात अंगोलाकडून पेट्रोलियम पुरवठा होणार आहे. उभयपक्षी फायद्याचा सौदा आहे.
शशांक ताबडतोब फुलणारी झाडे ( शंकासूर ) १/२ वर्षात फुलणारी झाडे ( गुलमोहोर ) आणि सावली देणारे वृक्ष ( पिंपळ ) अशी छान विभागणी आहे. त्या झाडांची नियमित निगाही राखली जातेय. पहाटेलाच सर्व कचरा उचलला जातो.
तेव्हा या सगळ्यांनी !
दिनेश मस्तच आहेत फोटो, तुमची
दिनेश मस्तच आहेत फोटो, तुमची प्रयोगशाळा जास्तच आवडली.
सर्वच फोटो छान, आपली
सर्वच फोटो छान, आपली प्रयोगशाळा अगदी अद्ययावत् दिसते आहे. अगदी वापरून पहावीशी वाटते आहे.
सेम पिंच दक्षिणा...
सेम पिंच दक्षिणा...
अप्रतीम ! परदेश अनुभवणे हा पण
अप्रतीम ! परदेश अनुभवणे हा पण एक अतीशय सुखद अनूभव असतो. सुंदर पद्धतीने केलेली आखीव रेखीव रचना, स्वच्छता, टापटीप खरच खूप छान वाटले. किचन फारच आवडले.:स्मित:
मस्तच आहे कॉलनी.
मस्तच आहे कॉलनी.
सुंदर आहे अगदी घरासमोरची
सुंदर आहे अगदी
घरासमोरची गल्ली >>> गल्ली काय दा, अगदी राजपथच वाटतोय.
दिनेशदा , खूपच छान फोटो आहेत.
दिनेशदा , खूपच छान फोटो आहेत. अगदी चित्रातल्यासारखे वाटले. खूप छान प्लॅन्ड रचना आहे.
तुमची प्रयोगशाळाही छान आहे.
या प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांचे फोटो वारंवार बघायला मिळू देत हीच प्रार्थना .
दिनेशदा...गृहकर्जासाठी
दिनेशदा...गृहकर्जासाठी बँकांमधे वेळ लागतो हे अगदी २००% खरंय
मस्तच आहे. मला दुबईच्या
मस्तच आहे. मला दुबईच्या डिस्कवरी गार्डनचीच आठवण झाली अगदी.
रंग मस्त ब्राईट आहेत एकदम !
रंग मस्त ब्राईट आहेत एकदम !
व्वा, मस्त फोटो दिनेशदा,
व्वा, मस्त फोटो दिनेशदा, तूम्ही मस्त वर्णन केले आहे.
सुंदर, स्वच्छ आहे कॉलनी.
सुंदर, स्वच्छ आहे कॉलनी. माणसं रहायला आली की जास्त चांगलं वाटेल मुंबईत आयुष्य काढलेल्यांना निर्मनुष्य रस्ते, इमारती वगैरे कितीही सुंदर असल्या तरी करमणार नाही.
सुंदर प्र.ची. अन वसाहत दोन्ही
सुंदर प्र.ची. अन वसाहत दोन्ही , भारतातील प्रकल्पांशी सध्यातरी तुलना न केलेली बरी , एक भाबडा प्रश्न हा देश आपल्या पेक्षा श्रीमंत आहे का दा ? शाळा स्वप्नवत आहेत हो......
दादाश्री, अजून श्रीमंतीचे
दादाश्री, अजून श्रीमंतीचे मोजमाप व्हायचे आहे. पेट्रोलियम तर आहेच पण हिर्यांचे पण भरपूर साठे आहेत.
या दोन उद्योगात भरपूर प्रगती झाली आहे. बांधकाम व्यवसाय तेजीत आहे. बाकीची क्षेत्रे मात्र जरा मागे आहेत.
हो ना अश्विनी, या सगळ्या फोटोंत मिळून किती माणसे दिसताहेत, तेसुद्धा मोजावे लागेल. तशी एरवी जाग असते, काल सुट्टीमूळे जरा सुनेसुने होते.
मस्त आहे टाऊनशिप.... नि तुमची
मस्त आहे टाऊनशिप.... नि तुमची प्रयोगशाळा पण
सुंदर प्रचि आणि वर्णन
सुंदर प्रचि आणि वर्णन
सुंदर
सुंदर
वसाहत तर सुंदर आहेच! फोटोही
वसाहत तर सुंदर आहेच! फोटोही सुरेखच आहेत.
निमंत्रणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असल्या स्वर्गात आम्हालाही बोलावणारे आहेत म्हणावं!
Pages