आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
धन्स भरत! मला ह्या दोघांनी
धन्स भरत! मला ह्या दोघांनी चित्रपटात एकत्र काम केलंय हेच माहित नव्हतं. हे गाणंही मी अन्नू कपूरच्या सोनी मिक्सवरच्या प्रोग्रॅममध्ये प्रथम पाहिलं आणि ऐकलं.
जिप्सी, मला वाटलं तू चित्रकोडंच घातलंयस.
स्वप्ना, राज कपूर - मधुबाला
स्वप्ना, राज कपूर - मधुबाला यांचे नायक नायिका म्हणून पदार्पण एकाच चित्रपटात झाले. नीलकमल . दिग्दर्शक केदार शर्मा. त्यानंतर त्यांनी कधी एकत्र काम केल्याचे पाहिले नव्हते.
स्वप्ना ०५/०१२ओळखा १. त्या
स्वप्ना
०५/०१२ओळखा
१. त्या चित्रपटाचे शिर्षक गीत
२. एकाच चित्रात दोन मोठ्ठे क्लु लपले आहेत.
भरत, असं होय? मला एकच नीलकमल
भरत, असं होय? मला एकच नीलकमल माहित होता - मनोजकुमार, राजकुमार आणि वहिदाचा.
जिप्स्या रे, सगळी कोळीगीतं आठवून झाली माझी. आता ह्या बीबीवर कोडी फक्त घालायची, सोडवायचा यत्न करायचा नाही असं ठरवलंय मी.
ही घ्या माझ्याकडून ३
ही घ्या माझ्याकडून ३ कोडी:
०५/०१३:
०५/०१४: हे मराठी आहे. सोप्पं
०५/०१४:
हे मराठी आहे. सोप्पं आहे एकदम.
०५/०१५:
०५/०१५:
०५/०१४४: धुंद मधुमती रात
०५/०१४४:
धुंद मधुमती रात रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे
(क्लू: मधुमती, रजनी)
०१३मध्ये त्या पुड्या कसल्या
०१३मध्ये त्या पुड्या कसल्या आहेत कळत नाहीये.
०१३मध्ये त्या पुड्या कसल्या
०१३मध्ये त्या पुड्या कसल्या आहेत कळत नाहीये.>>>>मिलन सुपारी आहे बहुतेक.
जिप्स्या रे, सगळी कोळीगीतं
जिप्स्या रे, सगळी कोळीगीतं आठवून झाली माझी.>>>>चला मी उत्तर सांगुनच टाकतो.
०५/०१२
पिया संग खेलुं होरी, फागुन आयो रे
चुनरीया भीगोले गोरी फागुन आयो रे
पिया - मोरा पिया घर आया ओ रामजी
होरी - आगरी भाषेत होडीचा उच्चार "होरी" असा करतात.
फागुन - मार्च महिना कॅलेंडर (होळी आणि फाल्गुन दोन मोठ्ठे क्लु)
सर्वांना होळीच्या शुभेच्छा!!!
हे सुंदर गाणं येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=stFZF5RNGZQ
०५/०१५ आंखों में क्या जी -
०५/०१५ आंखों में क्या जी - रुपहला बादल
बादल में क्या जी - किसीका आंचल
आंचल में क्या जी - अजब सी हलचल
०५/०१३ घडी घडी मेरा दिल धडके
०५/०१३ घडी घडी मेरा दिल धडके हाय धडके क्यों धडके?
आज मिलन की बेला में सरसे चुनरिया क्यों सरके?
०५/०१३ घडी घडी मेरा दिल धडके
०५/०१३
घडी घडी मेरा दिल धडके हाय धडके क्यों धडके?
आज मिलन की बेला में सरसे चुनरिया क्यों सरके?
०५/०१४:
धुंद मधुमती रात रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे
०५/०१५
आंखों में क्या जी - रुपहला बादल
बादल में क्या जी - किसीका आंचल
आंचल में क्या जी - अजब सी हलचल
श्रध्दा आणि भरत - साजूक तुपात
श्रध्दा आणि भरत - साजूक तुपात भिजलेल्या पुरणपोळ्या आणि........ग्लासभरून भांग
कोणी आहे का आज इथे? का सगळे
कोणी आहे का आज इथे? का सगळे लॉन्ग लीव्हवर???
थंड पडलेत का सगळे????
थंड पडलेत का सगळे????
आर्या....मी आहे ग इथे. कोणी
आर्या....मी आहे ग इथे. कोणी असेल तर कोडी घालेन म्हणते.
मी ५ दिवसांच्या सुट्टीवर
मी ५ दिवसांच्या सुट्टीवर
भारतीताईंचे कोडे अजुन बाकी आहे ना?
कोडं ०५/०१६: क्लू: जुनं
कोडं ०५/०१६:
क्लू: जुनं मराठी चित्रपटगीत
कोडं ०५/०१७: क्लू: जुनं
कोडं ०५/०१७:
क्लू: जुनं मराठी चित्रपटगीत
कोडं ०५/०१८: मराठी भावगीत
कोडं ०५/०१८:
मराठी भावगीत
कोडं ०५/०१७:>>>>> काजल रातीनं
कोडं ०५/०१७:>>>>>
काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी कधि रे येशिल राजा
कोडं ०५/०१८: परीकथेतील
कोडं ०५/०१८:
परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का
भाव दाटले मनी अनामिक साद तयाला देशील का
कोडं ०५/०१६:>>>कुंकु आणि
कोडं ०५/०१६:>>>कुंकु आणि प्राण ?
माझ्या कपाळीचं कुकु???
जिप्स्या......हॅटट्रिक
जिप्स्या......हॅटट्रिक केलीस.......:फिदी:
कोडं ०५/०१६ माझ्या कपाळीचं
कोडं ०५/०१६
माझ्या कपाळीचं कुकु, कवतिकाने किती बाई निरखू
जीव भरला भरला भरला, खरं वाटंना, वाटंना, वाटंना
(चित्रपटः तांबडी माती)
कोडं ०५/०१७:
काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी कधि रे येशिल राजा
(चित्रपटः हा खेळ सावल्यांचा)
कोडं ०५/०१८:
परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का
भाव जागले मनी अनामिक साद तयाला देशील का
हे "जागले" आहे का "दाटले"?
बक्शीशी?????? जे काही बक्षीस
बक्शीशी??????
जे काही बक्षीस देशील त्यातले अर्धे तुझे "परीकथेतील राजकुमारा...." गाण्यासाठी. मस्त गाण्याची आठवण करून दिलीस. आता घरी तेच ऐकतोय.
हे "जागले" आहे का "दाटले"?>>>>>भाव "दाटले"च आहे (चुकीची दुरूस्ती केली )
अरेच्चा...आम्ही येइपर्यंत
अरेच्चा...आम्ही येइपर्यंत ओळखली गेलीसुद्धा???
जिप्स्या...वेल डन!
>>जे काही बक्षीस देशील
>>जे काही बक्षीस देशील त्यातले अर्धे तुझे
सह्ही! मग तुला चटकदार भेळ आणि थंडगार फालुदा बक्षीस!
आर्या, no worries pal! आपुन धुंडधुंडके गाने निकालनेवाला हय. मला फार मराठी गाणी माहित नाहीत. पण जी माहित आहेत त्यावर इथे कोडी घालायचा प्रयत्न करणार आहे.
Pages