Submitted by वैभव फाटक on 27 March, 2013 - 05:08
तुला प्रत्येकदा सांभाळले गेले
चुका माझ्याच होत्या मानले गेले
कुठेसा सांडला शेंदूर थोडासा
पुढे देऊळ तेथे बांधले गेले
जराशी घेतली बाजू तुझी मी अन
तुझ्याशी नाव माझे जोडले गेले
तसा लाचार तो नव्हताच आताही
भुकेने पाय त्याचे ओढले गेले
नवी मी जोडली नाती कशासाठी ?
पुराणे पाश त्याने तोडले गेले.
वैभव फाटक ( २७ मार्च २०१३)
http://vaibhavphatak12.blogspot.in/2013/03/blog-post_27.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुटे सर! पुराणातली वांगी
मुटे सर!
पुराणातली वांगी पुराणात.
अशीच म्हण आहे ती!
तुम्हाला ती हरदासाची कथा माहित नाही का?
हरदास आपले पुराण संपवून घरी येतो, आपल्या पत्नी बरोबर!
कथेत तो लोकांस सांगत होता की चातुर्मासात वांगी खाऊ नये वगैरे......
घरी आल्यावर जेव्हा भाजी कोणती करायची असे पत्नीने विचारले तेव्हा हे हरदासबुवा वदले.....वांग्याची भाजी करा, वांगी स्वस्त झाली आहेत!
हे ऐकून पत्नी म्हणाली, आहो, आताच तुम्ही कथेत काय सांगितले की वांगी खाऊ नयेत चातुर्मासात म्हणून!
तेव्हा हरदासबुवा उद्गारले................
आहो, ती पुराणातील वांगी पुराणात!
चला बरे, तुम्ही आपली मस्त वांग्याची भाजी करा, भूक लागली आहे!
ही आहे या म्हणीमागील कथा! आता बोला!
म्हणीचा अर्थ असा ................
धर्मशास्त्रातील गोष्टी धर्मशास्त्राच्या चर्चेच्या वेळी बोलावयाच्या, आचराणाच्या वेळी विचारात घ्यावयाच्या नाहीत!
...................इति गझलप्रेमी
कुठेसा सांडला शेंदूर
कुठेसा सांडला शेंदूर थोडासा
पुढे देऊळ तेथे बांधले गेले
तसा लाचार तो नव्हताच आताही
भुकेने पाय त्याचे ओढले गेले >>>> हे दोन सर्वात आवडले.
केवळ सुरेख गजल ....
केवळ सुरेख गजल ....
Pages