
स्वयंपाकासाठी मातीची भांडी पूर्वीपासून वापरली जातात. त्यातल्या पदार्थांना स्वर्गीय चव येते. आजच्या जमान्यात वापरण्यासाठी अशी भांडी उपलब्ध आहेत. त्याबद्दल इथे लिहीता येईल.
मी नुकतेच "निर्लेप" ने बाजारात आणलेले "भूमी" हे भांडे घेतले. सुबक आकार, मजबूत, छान आहे. त्याच्यावर प्रक्रिया ( २ तास पाण्यात भिजवून ठेवणे) करुन त्यात वांग्याची भाजी केली. मंद आचेवर असूनही भांडे व्यवस्थित लगेच तापले. फोडणीसाठी तेल आधी घालून मग भांडे गॅसवर ठेवले. भाजी नेहमीच्या वेळेत शिजली, छान लागली.
वापर, निगा यांची सर्व माहिती माहितीपुस्तिकेत आहे. यासोबत एक पाककृतींचे पुस्तकही मिळते.
याला २ वे नॉन्स्टिक कोटिन्ग आहे. आतून आणि बाहेरुनही. तेल कमी लागते. हे भांडे गॅस, मायक्रोवेव आणि कन्वेक्शन अव्हनमध्येही ठेवले तर चालते.
स्वच्छ करताना फार न घासता सोप आणि कोमट पाणी यांनी धुवायचे.
मंद आचेवर ठेवायचे
थेट गॅसवर न ठेवता मध्ये एक नेहमीचा मेटल स्टँड ठेवावा.
याबरोबर एक लाकडी spatula मिळत. मेटलच्या पळ्या वापरु नयेत.
हे फोटो
सीमा तुमचं भांडं फोडणीला
सीमा तुमचं भांडं फोडणीला चालतं का? मार्शल्समध्ये जायला हवं एकदा
धन्यवाद
लोला कोटिंग आहे तर चमचे वापरताना आणि स्वच्छ करताना काळजी घे
जगातलं स्वस्त मातीचं भांडं वॉव फोटो कुठाय
पुन्यात कुम्भार वाद्यात अशी
पुन्यात कुम्भार वाद्यात अशी अनेक मातीची भान्दी रोज वापरयल मिल्तात एक्दम स्वस्त अन मस्त आहेत.आम्ही घरी तिच वापरतो....वर्श झाल...
स्वाती, हो का? मी तुझ्यासारखं
स्वाती, हो का?
मी तुझ्यासारखं तांदूळ वैरून भात करण्यासाठी त्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं तर तेलाचे सूक्ष्म कण तरंगताना दिसले, त्यामुळे मी शंकीत झाले.
मातीची भांडी मस्त आहेत.. मला
मातीची भांडी मस्त आहेत..
मला पण आता अशी भांडी घ्यायचा मोह होतोय..
मंजूडी, शंकित होऊ नकोस. पोरस
मंजूडी, शंकित होऊ नकोस. पोरस मटेरिअल असल्याने सुरुवातीला हे अपरिहार्य आहे.
याच कारणासाठी दुधादह्याची भांडी बाकी स्वयंपाकासाठीच्या भांड्यांपासून वेगळी ठेवत असावेत.
ओ बाई, तुम्हाला अजून त्यात
ओ बाई, तुम्हाला अजून त्यात फोडणी घालायचा धीर झालेला नाही आणि शंकित होऊ नको काय!
मग हा तेलाचा कोट बसल्यावर मातीची चव कशी येणार?
ओ लोला, मातीची भांडी वापरणारे
ओ लोला, मातीची भांडी वापरणारे भात आणि भाजीला निरनिराळी भांडी वापरत नसतील का? तुम्ही एकच भांडं सग्गळ्या सग्गळ्याला वापरणार आणि वर तक्रारही करणार?
>> मग हा तेलाचा कोट बसल्यावर मातीची चव कशी येणार?
ते बिनकोटेड भांडी वापरून पहा म्हणजे कळेल.
हे भांडं अ.ब चौकातल्या 'नीलम'
हे भांडं अ.ब चौकातल्या 'नीलम' मध्ये पाहिलं. १. ५ litre १६०० रू. ला.
अरे मी हा बाफ पाहिलाच नव्हता.
अरे मी हा बाफ पाहिलाच नव्हता. मला ते आतून नॉन स्टिक कोटिंग हा प्रकार काही झेपला नाही. व्हॉट्स द पॉइन्ट ऑफ मातीचे भांडे? असे वाटले
मी भारतात कुंभारवाड्यातून एक मातीचे भांडे घेतले होते. त्यात दम आलू, चिकन करी वगैरे रस्से असले सही व्हायचे! हो आणि मातीचा फ्लेवर होताच थोडा. काही विशेष काळजी घेतली नव्हती, नुस्ते गरम पाणध्यवाधूत होते वापरून झाल्यावर. पण बहुधा काही महिन्यांनी त्याच्या छिद्रांत तेल मुरत गेले अन नंतर मला भाज्यांना तेलाचा विशिष्ट वास येतोय असं वाटलं. मग ते भांडं फेकलं. नंतर दुसरं आणणं जमलंच नाही समहाऊ. पण आवडेल तसे पुन्हा आणायला.
मग कोटिंगचा पॉईंट कळला ना?
मग कोटिंगचा पॉईंट कळला ना?
नाही ना. त्यापेक्षा दुसरं
नाही ना. त्यापेक्षा दुसरं मातीचं भांडं आणलं की झालं. कुंभारवाड्यातून आणलेलं साधं मातीचं भांडं किंमत बघता ३-४ महिन्यात परत नविन आणलं तरी चालतंय. ट्राय करून पहा भारत वारीत लालू.
त्यात होईल ते मी गोड मानून
त्यात होईल ते मी गोड मानून खाणार.>>> मिसळीचा कट वगैरे त्यात केलात तर तोही गोड मानून खाणार? मग कशाला आणायचं मातीचं भांडं?

बाकी दिसतंय विंटरेस्टिंग!
म्हणजे ३-४ महिन्यांत
म्हणजे ३-४ महिन्यांत भांड्यासाठी भारतवारी करायची होय
आणि एकदा मिसळ केली की पुढचं सगळं मिसळीच्या चवीचं गोड मानून खावं लागेल..
एक फु स देऊ का ? दोन भांडी
एक फु स देऊ का ? दोन भांडी आणा. एक गोड पदार्थांसाठी आणि एक तिखटासाठी
मातीच भान्ड वापरयच कस ते
मातीच भान्ड वापरयच कस ते कुम्भार सान्गतो कि वास वगेरे नाइ येत...
माझ्या मुलाने साध्या मडक्यात
माझ्या मुलाने साध्या मडक्यात चिकन केले होते.खूप चांगले लागते असे म्हणत होता. बाकी संक्रातीच्या सुगडात
दही पण छान लागते.
मिट्टिकूल या ब्रॅंडबद्दल
मिट्टिकूल या ब्रॅंडबद्दल मध्यंतरी वाचनात आले होते. आज सर्फिंग करताना हा त्यांचा कूकर सापडला. कोणी वापरला आहे का? किंवा त्यांचे इतर काही प्रॉडक्ट्स वापरलीत?
http://www.nethaat.com/item-details/clay-pressure-cooker/1687.htm
मिट्टिकूल >>> ह्यचा तवा
मिट्टिकूल >>> ह्यचा तवा वापरात आहे माझ्या जावेकडे, चांगला आहे. अगदी कमी किंमत म्हण्जे ३०/- रु. आसपास आहे. पुण्यात नळ स्टॉपपाशी मिट्टिकूलची एजन्सि आहे. त्याची इतरही काही मातीपासून बनवलेली प्रॉडक्टस तिथे बाघायला मिळ्तात. (उदा. हिरव्या भाज्या टिकवण्यासाठी फ्रिज कम पाणी साठवण्याचा डेरा, कुकर, भाजीसाठी भांड वै.)
Radhika_P, नळ स्टॉपपाशी नक्की
Radhika_P, नळ स्टॉपपाशी नक्की कुठे?
मातीच्या भांडयातला स्वयंपाक
मातीच्या भांडयातला स्वयंपाक 'डीडी पोधगाई ' आणि इतर तमिळ टिव्ही
चानेलवर पाहायला मिळतो .
त्यांचा पोंगल (संक्रातीची तांदळाची खीर यातच करावी लागते .
नताशा, समुचित मध्ये ही भांडी
नताशा, समुचित मध्ये ही भांडी भेटतील.
Ok
Ok
नताशा, समुचित मध्ये ही भांडी
नताशा, समुचित मध्ये ही भांडी भेटतील. >>>> हो तिथे मिळ्तात ही भांडी आणि अजुनही बरेच काही . कमी खर्चामध्ये पर्यावरणपुरक इंधनाचे पर्याय (बायो/सोलरबेस), धुरविरहीत घरात वापरता येणारी शेगडी आणि तिचे इंधन (बार्बेकु).... बरेच काही...इन्ट्रेस्टींग !
पर्यावरणपुरक उपक्र्म राबवण्याच्या प्रयात्नात आहेत हे समुचितवाले. महर्षि कर्वेच्या कुटुबियांची ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी आणि पर्यावरणरक्षाणासाठी काम करणारी संस्था आहे ही.
(खरतर ही माहिती ह्या धाग्यावर लिहिणे योग्य नाही, पण समुचितचा विषय निघाल्यामुळे माहिती दिल्याशिवाय रहावले नाही.)
त्यांचा पत्ता द्या ना
त्यांचा पत्ता द्या ना नळस्टॉपजवळचा. त्या लिंकमधे पुण्यातला पत्ता/नंबर दिलेला नाही.
साईटवर "CONTACT US' मधे आहे
साईटवर "CONTACT US' मधे आहे पत्ता.
कोणी मातीची भांडी वापरत आहेत
कोणी मातीची भांडी वापरत आहेत का? season कशी करावीत?
मातीचा तवा पुण्यात कुठे मिळेल
मातीचा तवा पुण्यात कुठे मिळेल?
दिवाळीत कुंभारवाड्यात पणत्या
दिवाळीत कुंभारवाड्यात पणत्या खरेदी करायला गेले होते तेव्हा तिथे बघितला होता..
इच्छुकांसाठी माहिती -
इच्छुकांसाठी माहिती - महाबळेश्वरहुन येताना वाईजवळ (अगदी मुख्य रस्त्यावरच) एक मातीच्या भांड्यांचं दुकान आहे. नेहमीच्या माठ, सुरई, कुकिंगची भांडी या व्यतिरिक्त बऱ्याच कलाकुसरीच्या वस्तू पण छान मिळतात.
फेसबुकवर एका कुकिंगच्या धाग्यावर खूप पॉसिटीव्ह रिव्युज वाचले म्हणून मी दोन भांडी आणली. पण आणल्यावर उत्साह संपला. दोन वर्ष ती भांडी न वापरता पडून आहेत. दुकानात दोन्ही भांड्यांच्या सिझन करायच्या दोन वेगळ्या कृती सांगण्यात आल्या होत्या. पण आता मी विसरले. या दोन वर्षात परत एकदाच महाबळेश्वरला जाणं झालं, त्या दिवशी नेमकी दुकानाची सुट्टी होती. तर कोणी सांगू शकेल का की
1. भांडी सिझन कशी करतात?
2. आणि सगळ्या भांड्यांना एकच कृती चालेल का?
3. दोन वर्षे न वापरल्यामुळे ती भांडी वाया गेली असतील का? तसं असेल तर सिझन करण्याचे कष्ट घेऊन वाया जाण्याऐवजी आधीच त्यात रोपं लावून टाकते
माझ्या आजीकडे ना तिची स्वतःची
माझ्या आजीकडे ना तिची स्वतःची खास पाण्याची एक सुंदर घाट असलेली सुरई होती. तिला एकीकडे असा वाघाचं तोंड होतं. एका बाजूला कलती करून पाणी ओतावे लागायचं. काय गार पाणी व्हायचं त्यात.. अहाहा...मी इकडे पुण्यात खूप ठिकाणी शोधली. कुठेही मिळाली नाही. ऑनलाईन साईटवर जग किंवा जार आहेत पण अशी सुरई मात्र नाही. कुणाला जर काही कल्पना असेल कुठे मिळू शकेल तर सांगा मंडळी.
Pages