स्वयंपाकासाठी मातीची भांडी पूर्वीपासून वापरली जातात. त्यातल्या पदार्थांना स्वर्गीय चव येते. आजच्या जमान्यात वापरण्यासाठी अशी भांडी उपलब्ध आहेत. त्याबद्दल इथे लिहीता येईल.
मी नुकतेच "निर्लेप" ने बाजारात आणलेले "भूमी" हे भांडे घेतले. सुबक आकार, मजबूत, छान आहे. त्याच्यावर प्रक्रिया ( २ तास पाण्यात भिजवून ठेवणे) करुन त्यात वांग्याची भाजी केली. मंद आचेवर असूनही भांडे व्यवस्थित लगेच तापले. फोडणीसाठी तेल आधी घालून मग भांडे गॅसवर ठेवले. भाजी नेहमीच्या वेळेत शिजली, छान लागली.
वापर, निगा यांची सर्व माहिती माहितीपुस्तिकेत आहे. यासोबत एक पाककृतींचे पुस्तकही मिळते.
याला २ वे नॉन्स्टिक कोटिन्ग आहे. आतून आणि बाहेरुनही. तेल कमी लागते. हे भांडे गॅस, मायक्रोवेव आणि कन्वेक्शन अव्हनमध्येही ठेवले तर चालते.
स्वच्छ करताना फार न घासता सोप आणि कोमट पाणी यांनी धुवायचे.
मंद आचेवर ठेवायचे
थेट गॅसवर न ठेवता मध्ये एक नेहमीचा मेटल स्टँड ठेवावा.
याबरोबर एक लाकडी spatula मिळत. मेटलच्या पळ्या वापरु नयेत.
हे फोटो
धन्यवाद सिंडी.
धन्यवाद सिंडी.
भांडं छान दिसतंय. मागे मला
भांडं छान दिसतंय.
मागे मला रैनाने मूबईतल्या कोणत्यातरी प्रदर्शनातून घेतलेले, एक मातीचे भांडे (काळ्या रंगाचं कसलंही कोटींग नसलेलं, झाकणासहित) गिफ्ट दिले होते. बिर्याणी मस्त होते त्या भांड्यात.
नंतर खुर्जामध्येही मातीची बरीच भांडी बघितली. तिथून दोन कढया आणि एक झाकणवालं भांडं आणलंय. पण त्या भांड्यांवर ग्लेझिंग केलेलं आहे, त्यामूळे मातीची चव उतरत नाही पण नेहेमीपेक्षा वेगळी, छान चव येते. तिथे तवे, स्किलेट वैगरे पण मातीमध्ये अॅव्हलेबल होते.
मातीच्या गुणधर्मांबाबत गूगल
मातीच्या गुणधर्मांबाबत गूगल सर्च केल्यावर इथे ही माहिती सापडली :
(किती विश्वसनीय आहे कल्पना नाही.)
• 1 The first is that clay is somewhat porous. Heat and moisture circulate through the pot during cooking, unlike with metal or enamel-lined pots. Chef Charles Phan from The Slanted Door in San Francisco describes the cooking as "slow, even, delicate" in his ode to Bram Cookware in the latest Saveur 100. Most pots are also made with micaceous clay (clay containing mica flecks), and mica acts as a natural insulator.
• 2 The second thing that that makes these pots special is that the clay is alkaline. In a recent interview on KCRW's Good Food, clay pot maker Felipe Ortega explained that the clay will interact with acidity in the food, neutralizing the pH balance. Something that is naturally very acidic, like a tomato sauce, will take on some natural sweetness when cooked in a clay pot. (Ortega even said that he will only drink coffee out of a clay mug because it tastes more robust and he hardly has to add sweetener!)
What strikes us as most significant is that all of these unique properties of clay pots are completely canceled out if the pot has been glazed (except for its ability to absorb heat and cook food evenly). Our natural instinct is to think of a glaze as preserving the clay pot, but in this case, it sounds like a glaze would be a disservice.
मस्त दिसतय भूमीचं भांडं. पण
मस्त दिसतय भूमीचं भांडं. पण नॉन-स्टिक कोटींग उगीच निर्लेपचं आहे म्हणून लावलय कां? मातीच्या भांड्यातल्या भाज्यांना एक विशिष्ट चव येते ती कशी येणार या कोटींगमुळे?
माझ्याकडे एक कढईच्या आकाराचं बिना झाकणाचं मातीचं भांडं आहे. गेली दोन वर्षं बर्यापैकी रेग्युलर वापरात आहे. अजिबात काही चिकटत/करपत नाही. छान स्वच्छही होतं. खरपूस चव येते भाज्यांना. मी ते पार्ल्यातल्याच एका मातीच्या वस्तू विकणार्याकडून विकत घेतलं होतं. ६० रु. ना.
ग्लेझिंगवाला आणि पहिला पॉइंट
ग्लेझिंगवाला आणि पहिला पॉइंट पटला. दुसर्याबद्दल माहिती नाही.
ग्लेझ्ड आणि नॉन ग्लेझ्ड साधे अशी दोन्ही मातीची भांडी वापरल्यावर माझा प्रेफरंस नॉन ग्लेझ्ड भांड्याला आहे.
मी पण पुढच्या भारत्वारीत एक
मी पण पुढच्या भारत्वारीत एक मातीचं भांड घेणार पण कसलही कोटिंग नसलेलं घेइन.
शर्मिला, माझं पंधरा रुपयांना
शर्मिला, माझं पंधरा रुपयांना घेतलेलं आहे. (नाहीच राहवत सांगितल्याशिवाय! :P)
पण स्वाती तुझी अजून त्यात
पण स्वाती तुझी अजून त्यात फोडण्या कराय्ची हिंमत नाही झालेली ना?
अशी छोटी मातीची भांडी दही लावायला पण मस्त की म्हणजे दह्यात पाणी नाही होणार(?)
पंधरा?? आणि मला वाटतं होतं
पंधरा?? आणि मला वाटतं होतं जगातलं सर्वात स्वस्तातलं मातीचं भांड माझ्याकडे आहे कारण वर्ल्ड ट्रेड सेंटरमधल्या एका लाइफस्टाईल एक्झिबिशनमधे मी तेच भांडं अठराशे रुपयांना पाहीलं होतं.
शर्मिला, बाईंनी ते भांडं
शर्मिला, बाईंनी ते भांडं केरळला घेतलं. तेव्हा त्या किमतीत तिकिटाचे पैसे मिळवले तर तुझ्याकडचं भांडं अजूनही जगातलं सर्वात स्वस्त आहे
अहो, पण आम्ही भांडं घ्यायला
अहो, पण आम्ही भांडं घ्यायला म्हणून केरळला नाही गेलो.
लोला मस्त आहे भांंडे १५
लोला मस्त आहे भांंडे
१५ रुपये, नका हो असे कुंभारांच्या पोटावर पाय देवू.
Non stick coating खरच glaze चे अस़ते का?
मला वाटले ़ मातीचे भांडं भाजायच्या आधी त्याला तेल लावुन किंवा अगदी वस्त्रगाळ माती पाण्यात कालवुन (terra sigillata) त्याचा सुकलेल्या भांड्यावर हलका थर देतात आणि भांडं पॉलीश करतात. अश्या पॉलीशमुळे छिद्र बुजून मस्त चकाकी येते, एकदम non stick भांड्याचा glossy feel व look येतो. अर्थात त्यामुळे भांडे सछिद्र रहात नाही.
रूनी, त्याने सांगितलेलीच
रूनी, त्याने सांगितलेलीच किंमत होती ही. आई सवयीने त्यातही घासाघीस करणार होती, पण मी नाही करू दिली.
भांडं देखणं आहे. कश्यावर
भांडं देखणं आहे. कश्यावर ठेवलंय?
रूनी, तू ऑर्डर घेतेस का? इथेच
रूनी, तू ऑर्डर घेतेस का? इथेच तुला बर्याच ऑर्डर्स मिळतील.
शिवाय तू सांगितलेल्या किंमतीला विकत घेईन. घासाघीस करणार नाही.
असामी, वर अपडेट केलेल्या
असामी, वर अपडेट केलेल्या माहितीत लिहिलंय मायक्रोवेव आणि कन्वेक्शन चालेल म्हणून. इलेक्ट्रिक रेंजवर चालायला हरकत नाही.
मृ, गॅसवर ठेवलंय.
मला आवडले म्हणून घेतले आहे काय कोटिन्ग फिटिन्ग न बघता. त्यात होईल ते मी गोड मानून खाणार.
गॅसवरची जाळी आत्ता लक्षात
गॅसवरची जाळी आत्ता लक्षात आली.
रुनी, मी वर लिंक दिलेलं
रुनी, मी वर लिंक दिलेलं दोनाबे बघून कसलं कोटिंग, ग्लेझ आहे ते सांगतेस का?
शर्मिला, पार्ल्याच्या
शर्मिला, पार्ल्याच्या दुकानाचा पत्ता दे.
हो पार्ल्याच्या दुकानाचा
हो पार्ल्याच्या दुकानाचा पत्ता दे. तिथल्या लोकांना कामाला लावण्यात येइल!
विजय स्टोर्सच्या कॉर्नरवर
विजय स्टोर्सच्या कॉर्नरवर बसतो तो मातीची भांडीवाला. पण तो ती नेहमी ठेवत नाही. त्याला सांगीतलं तर तो आणून देतो. आणि गॅरंटी अजिबात देत नाही. मिट्टी है, कभी भी टूट सकती है, असं सांगतो
मी दोनेक दिवसांमधे जाऊन चौकशी करुन येईन. लेटेस्ट किंमत वगैरे.
(*आम्ही कमिशन घेत नाही )
सायो, ते दोनाबे मलातरी ग्लेझ
सायो, ते दोनाबे मलातरी ग्लेझ केल्यासारखं वाटतंय.
नेटवर अजून काही फोटो बघितले दोनाबे चे तर त्यात काही ग्लेझ्ड आणि काहीब्नॉन ग्लेझ्ड अश्या दोन्ही प्रकारचे पॉट्स दिसले.
बहूतांशी ग्लेझ्ड पॉट्स अव्हन मावेमध्ये वापरता येतात.
धन्यवाद शर्मिला. ग्लेझ/कोट
धन्यवाद शर्मिला.
ग्लेझ/कोट केले नाही तर छिद्रं रहातात आणि एकदा त्यात काही बनवले की ते अडकते आणि भांडे नीट साफ होत नाही म्हणे. खरं आहे काय हे?
भांड्यात केलेली भाजी फारच
भांड्यात केलेली भाजी फारच सुरेख दिसते आहे.
मी त्या सरसमधून मातीचा तवा आणि झाकण असलेली हंडी घेतली आहे. तवा तापवला की भयाण वास येतो, त्यामुळे तो बादच झालाय. आणि भांड्यात एकदा भरली वांगी केली, भाजी सुर्रेख झाली पण फोडणीचा तवंग छिद्रात अडकून राहिलाय अशी मला(च) शंका येते, त्यामुळोए त्याचा उपयोग आता फक्त बिर्याणी (कधी काळी करेन तेव्हा) लावायला.
छिद्रांत तेल साठून ती आपोआपच
छिद्रांत तेल साठून ती आपोआपच नॉनस्टिक होत जातात. त्यात काही अस्वच्छ नाही. बिडाचे तवे वगैरे असेच वापरून वापरून तेल मुरून नॉनस्टिक होतात.
भाजी करुन झाल्यावर मी लगेच
भाजी करुन झाल्यावर मी लगेच काढून ठेवते आणि मग गरम पाण्यात लिक्विडसोप घालून ते त्या भांड्यात भरुन मग जरावेळाने धुते. स्कॉचब्राईटने हलक्या हाताने स्वच्छ केलं की कसलाही वासबिस किंवा तेलकटपणा रहात नाही. स्वाती म्हणते तसं सच्छिद्रतेमुळे थोडफार तेल आत झिरपत असणारच.
तव्याला गरम झाल्यावर वास येत असेल तर मीठाचे पाणी त्यावर शिंपडून आपण डोश्याकरता बिडाचा तवा जसा सिझन्ड करतो तसं करायचं. म्हणजे तेलाचा हात फिरवून पुन्हा पाणी शिंपडणे. मातीच्या भांड्यांना तसाही सुरुवातीला जरासा वेगळा वास येतोच. भांडी वापरात नसतील तेव्हा ब्लॉटिंगपेपर्स किंवा टिश्यू पेपर्स त्यात घालून ठेवावे.
माझ्याकडे मातीचे भांडे आहे ते
माझ्याकडे मातीचे भांडे आहे ते Made in Italy आहे. मार्शल मधून २० डॉलरला घेतले. मातीचा वास येतो थोडाफार. ग्लेझ्ड असावे. असे आहे साधारण .फक्त कलर ऑरेंज आहे. आतून मातीचे आहे हे कळते. माझ्याकडच्या भांड्याचा फोटो उद्या टाकेन.
मार्शल आणि home goods मध्ये खुप भांडी आहेत असली.
माझ्याकडे मातीचा तवा (खापरी),
माझ्याकडे मातीचा तवा (खापरी), दोन तव्या म्हणजे ज्यात रस्सा, भाजी वगैरे करतात ती मातीची भांडी आहेत. फोटो काढून टाकते नंतर.
हे तवे म्हणजे खापरी कुंभाराकडे तयार झालेले. ह्यात चुलीवरच्या खापर्या वेगळ्या आणि गॅसवरच्या वेगळ्या असतात. चुलीवरच्या थोड्या पातळ असतात आणि चुलीवरच्या जाड असतात.
अरे वा मस्तच भांडी आणि चर्चा
अरे वा मस्तच भांडी आणि चर्चा ..
मलाही घ्यायचा मोह होतो आहे आता ..
रूनी, तू कुम्भार असलीस तरी आम्ही ग्राहक असल्यामुळे आपल्याला एकमेकांच्या भावना समजून घेणं कठिणच जाईल ..
बाकी सगळ्या बाबतीत "पार्ले" शेवटी ग्रेटच ..
सीमा , मार्शल्स् / होमगूड्स् मध्ये लवकरच चक्कर मारेन ..
धन्यवाद!
हे सीमानी दाखवलेले भांडे
हे सीमानी दाखवलेले भांडे म्हणजे आपल्याकडे चीनी मातीच्या बरण्या असतात तसे आहे का?
Pages