स्वयंपाकासाठी मातीची भांडी
Submitted by लोला on 27 March, 2013 - 01:55
स्वयंपाकासाठी मातीची भांडी पूर्वीपासून वापरली जातात. त्यातल्या पदार्थांना स्वर्गीय चव येते. आजच्या जमान्यात वापरण्यासाठी अशी भांडी उपलब्ध आहेत. त्याबद्दल इथे लिहीता येईल.
मी नुकतेच "निर्लेप" ने बाजारात आणलेले "भूमी" हे भांडे घेतले. सुबक आकार, मजबूत, छान आहे. त्याच्यावर प्रक्रिया ( २ तास पाण्यात भिजवून ठेवणे) करुन त्यात वांग्याची भाजी केली. मंद आचेवर असूनही भांडे व्यवस्थित लगेच तापले. फोडणीसाठी तेल आधी घालून मग भांडे गॅसवर ठेवले. भाजी नेहमीच्या वेळेत शिजली, छान लागली.
वापर, निगा यांची सर्व माहिती माहितीपुस्तिकेत आहे. यासोबत एक पाककृतींचे पुस्तकही मिळते.
विषय:
शब्दखुणा: