दरवर्षीप्रमाणेच यंदाही लेक मागे लागली होती की इस्टर साठी काहितरी कर. मागची २ वर्षे खाऊ करुन दिला होता -
चॉकलेट नेस्ट अॅंड इस्टर एग्ज केक
आणि इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'
पण यंदा तेव्हढा वेळ नव्हता मिळणार, म्हणून काय करुन द्यावे असा विचार डोक्यात चालु होता. मागच्या आठवड्यात लेकीच्या शाळेत रिड्युस-रियुज-रिसायकल वर प्रेझेंटेशन होते. तेव्हापासुन लेक मागे लागली होती की आपण पण काहितरी रिसायकल करु. म्हंटलं चला मग रिसायकल्ड पेपरचीच इस्टर बास्केट बनवु लेक पण खुष झाली. मला वेळ नाही म्हणून तिलाच कामाला लावले
**********************
इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)
साहित्य:
जुनी मासिक / कॅटलॉग्ज चे कागद;
एका बाजुनी वापरलेले पांढर कागद (प्रिंटींग साठी वापरतो ते);
गिफ्ट रॅपिंगचे वापरलेले कागद किंवा पोस्तर कलर्स;
प्लॅस्टिकचा बोल;
मैदा;
सजावटीसाठी सामान - स्टिकर्स, ग्लिटर्स, प्लॅस्टिक जेम्स इ इ ऐच्छिक.
क्रमवार कृती:
१. मासिकाच्या कागदांचे हातानेच फाडुन तुकडे केले. हे काम लेकीने अगदी आवडीने आणि पटापट केले
२. एका वाटीत मैदा घेऊन त्यात पाणी घालुन पेस्ट बनवली (साधारण डोश्याच्या पिठाची कंसिस्टंसी).
३. कागदाच्या तुकड्यांना एका बाजुला मैद्याची पेस्ट लावुन ते प्लॅस्टिक च्या बोलला आतुन चिकटवले (बाहेरुन चिकटवले तरी चालतिल). तुकडे एकावर एक ओव्हरलॅप होतिल असे चिकटवले. जितके जास्त लेयर्स कराल तितका बोल मजबुत बनेल.
४. प्लॅस्टिकचा बोल आतल्या कागदाच्या लेअर्स सकट कडकडीत उन्हात वाळायला ठेवला. आतला कागदाचा बोल पूर्ण वाळल्यावर प्लॅस्टिकच्या बोल पासुन हलकेच सोडवुन घेतला. याला पूर्ण दीड दिवस लागला. जितक जाड बोल तितका वाळायला वेळ जास्त.
५. पांढर्या कागदाच्या साधारण एक इंच रुंदीच्या आणि ३ इंच लांबीच्या पट्ट्या कापुन घेतल्या. या पट्ट्यांच्या वापरलेल्या बाजुला मैद्याची पेस्ट लावुन तयार कागदाच्या बोलला या पट्ट्या नीट चिकटवुन घेतल्या. बोलच्या कडेवर लावताना पट्टी आधी थोडी मुडपून घेतली आणि मग ती बाहेरुन आत चिकटवली. या कामाला मला मदत करावी लागली. पट्ट्या बोलच्या आतुन आणि बाहेरुन लावल्या. बोल परत थोडावेळ वाळायला ठेवला. हे पटकन वाळते
६. तयार बोल आम्ही आधी पोस्टर कलर्सनी रंगवणार होतो पण मग अर्ध्यात आमचा मूड चेंज झाला आणि पेशन्स ही संपत आला म्हणून तयार बोलला रंगीत कागदाचे तुकडे चिकटवले. आम्ही फक्त बाहेर्रुन लावलेत कारण आत लेकीला इस्टर एग्ज ची चित्र चिकटवायची होती. हवे तर दोन्ही बाजुनी रंगित तुकडे किंवा एका बाजुला रंगित तुकडे आणि एका बाजुला पोस्टर कलर्स असे करता येइल
७. तयार बोलची बास्केट बनवण्यासाठी त्याला गिफ्ट रॅपिंग रिबिन लावली.
इस्टरच्या सुमारास बाजारात प्लॅस्टिकची अंडी मिळतात (चॉकलेट एग्ज बनवण्यासाठी) ती आण्ली. प्रत्येक एगात (लेकीचा शब्द ) एक छोटी चिकन ठेवली. बोलमधे रिसायकल्ड प्लॅस्टिक कागदाच्या पट्ट्या गवत म्हणुन ठेवल्या (मागे आणलेल्या घरी होत्याच ). त्यावर चिकन वाली एग्ज ठेवली आणि भरपूर चॉकलेट एग्ज ठेवली. झाली आमची इस्टर बास्केट तयार लेक खुष!!!
उद्यापासुन ४ दिवस शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आज सकाळीच बास्केट शाळेत गेली आहे... दुपारी मिळेलच कसा झाला एग हंट तो रिपोर्ट
लाजो एकदम मस्त आयडिया सुरेख
लाजो एकदम मस्त आयडिया सुरेख दिसतेय बास्केट.तुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी
कौतुक वाटतं .
लाजो... कित्ती क्रिएटिव्ह
लाजो... कित्ती क्रिएटिव्ह आहेस्,मस्त आहे आयडिया..
लाजो _/\_ एगातली चिकन आवडली.
लाजो _/\_
एगातली चिकन आवडली.
लाजो , मस्त !
लाजो , मस्त !
लाजो तुला ___/\___ काय काय
लाजो तुला ___/\___
काय काय येतं गं तुला!! आणि नेहमीप्रमाणेच ही रिसायकल्ड बास्केट अप्रतिम!! लेक लकी आहे हं!!
मस्त आयडिया.. ऑफीसमधे इस्टर
मस्त आयडिया..
ऑफीसमधे इस्टर केक्स्,एग्ज साठी एका बेकरीची अॅड लागलीये... बघितल्यावर आधी तुझ्या गेल्या वर्षीची रेसिपी आठवली
was expecting your post
काहीही म्हणणार नाही.. फक्त
काहीही म्हणणार नाही..
फक्त _____________/\______________
खासच गं !!
खासच गं !!
मस्त आहे बास्केट!
मस्त आहे बास्केट!
सुरेख दिसतेय बास्केट.तुझ्या
सुरेख दिसतेय बास्केट.तुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी
कौतुक वाटतं .>>>>>+++११११११११११११११११
मस्त.
मस्त.
मस्त!
मस्त!
कल्पना भारी आहे.
कल्पना भारी आहे.
वेळ नसतांना सुद्धा इतके
वेळ नसतांना सुद्धा इतके केलेस!!!! ग्रेट!!
सुरेख दिसतेय बास्केट.तुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी
कौतुक वाटतं .>>++१११
छान कल्पक प्रकार !
छान कल्पक प्रकार !
लाजो, आप मेरी गुरूमैय्या
लाजो, आप मेरी गुरूमैय्या हो...
तुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी कौतुक वाटतं>> जेवढे पाहीजेत तेवढे मोदक / इस्टर एग्ज!!!
तुझ्या सगळ्या क्रियेटिव्हीटीच्या लिंक्स फेवरिटला टाकून ठेवल्यात... दोनेक वर्षांत लागतीलच त्या...
दोघी मायलेकी खरंच खूप हौशी आहात... क्रियेटिव्हीटीच्या निमित्ताने तुमच्यातील बंध आणि हे क्षण खरंच अनमोल आहेत... जास्तीत जास्त अनुभवण्यासाठी आणि नंतर आठवण्यासाठी!!! खूप हेवा आणि कौतूक वाटतंय मला!!!
लेकीपेक्षा आईचा उत्साह काकणभर
लेकीपेक्षा आईचा उत्साह काकणभर जास्त आहे .बास्केट खूप सुंदर झाली आहे.आवडते काम मिळाल्याने लेकी ने मन लावुन केले आहे त्यामुळे शाळेत नक्कीच वाखाणले जाईल.
कसलं क्युट दिसतय हे प्रकरण
कसलं क्युट दिसतय हे प्रकरण
मायलेकींचा उत्साह भारीच आहे
खुप खुप धन्यवाद मंडळी लेक,
खुप खुप धन्यवाद मंडळी
लेक, तिच्या मित्र-मैत्रिणी आणि क्लासटिचर सगळ्यांना जाम आवडले
मुलांना खेळायला आणि खायला एग्ज मिळल्यामुळे खुष आणि क्लासटिचर रिसायकल्ड पेपरचा बोल बघुन खुष तर आमच्या बाईसाहेब शाबासकी मिळाली आणि कौतुक झाले म्हणुन हवेत
परत एकदा आभार
भारी आहेत तुझे उद्योग लाजो.
भारी आहेत तुझे उद्योग लाजो. एकदम क्रिएटिव्ह
वा ...लाजो.......धन्य आहेस
वा ...लाजो.......धन्य आहेस गं!
तो रीसायकल्ड कागदाचा बोल मस्तच!
मस्तच मस्त
मस्तच मस्त
सहीच. लेकीने शाळेत एकदम भाव
सहीच. लेकीने शाळेत एकदम भाव खाल्ला असेल त्या बास्केट्मुळे
मस्त! खुप छान झाली आहे
मस्त! खुप छान झाली आहे बास्केट. बर झाले बोलला बाहेरुन रंग लावायला कंटाळा केलात ते. त्यापेक्षा बाहेरुन लावलेल्या रंगीबेरंगी पट्याच जास्त छान दिसतात. तुझ्या कल्पकतेचे कौतुक वाटते.
लाजोजी तुमचा उत्साह जबराट !
लाजोजी तुमचा उत्साह जबराट ! खूप क्रिएटिव्ह आहेस.
Thanks loks!
Thanks loks!