नसतेस ऑनलाईन तू, इंट्रेस्टच निघून जातो,
तुजवीण कुणी आवडेना, पण ऑप्शन पाहून घेतो...
येतो मी फेसबूकवरती, बोलण्या तुझ्याशी काही,
असतेस ऑफलाईन तू, मज काही समजत नाही,
मग दोनदोनदा तुझ्या त्या, प्रोफाईलवरती जातो,
अन् प्रोफाईलच्या पिकला, मी तासन् तास पहातो...
दिसतात तुझ्या अपडेट, कोपर्यात उजव्या जेव्हा,
आहेस ऑनलाईन तू, हे कळते मजला तेव्हा,
पण चॅटींगसाठी तुजला का भाव गडे लागतो?
क्षणभर बोलायासाठी, मी रात्रभर जागतो...
तू तरीही बोलत नाही, काहीही सांगत नाही,
वाटे जरी "खूपच झाले", तरी वाट बघत मी राही...
या फेसबूकाचासुद्धा, आता कंटाळा येतो,
काहीही मिळकत नाही, पण त्रास फुकाचा होतो...
एवढे करूनही जेव्हा, मज तुझी आठवण येते,
ना राहवून ती मजला, मग येथे घेऊन येते,
नवनवीन पाखरांचा, मज पत्ता मिळूनी जातो,
क्षणभर का होईना मी, अन् तुलाच विसरून जातो...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२५/३/२०१३ - रात्रौ. ११.२०)
ब्लॉगवर पूर्वप्रकाशीत
मित्रा, छान अहे कविता. फक्त
मित्रा, छान अहे कविता. फक्त तिला सान्ग तिचिच कविता.
मस्त रे... भन्नाट जमलीय..
मस्त रे... भन्नाट जमलीय..
हर्षल, फारच छान. काहीच्या
हर्षल, फारच छान.
काहीच्या काही कविता असे खुणांमधे का लिहिले आहे?
छान अहे कविता
छान अहे कविता
धन्यवाद शैलेश, चिमुरी, माधवी
धन्यवाद शैलेश, चिमुरी, माधवी आणि विनायक
माधवी : मला ही कविता उगाच सुचली, आणि थोडीशी सेंटी करण्याऐवजी थोडी विनोदी करायचा प्रयत्न नाही जमला, म्हणून 'काकाक' केलं...
थोडी फार अशीच
थोडी फार अशीच !!
http://www.maayboli.com/node/40258
मंदार : वाचली होती ही मी
मंदार : वाचली होती ही मी तुम्ही गारवाच्या आधीचा मोनोलॉग स्टाईलमध्ये लिहिलिय, मी 'नसतेस घरी तू जेव्हा' ही संदीप-सलील च्या कवितेच्या चालीवर लिहिलिय
चांगला प्रयत्न आहे!!१
चांगला प्रयत्न आहे!!१
आवडली ,मजा आली.
आवडली ,मजा आली.
धन्यवाद मंदार, विक्रांत
धन्यवाद मंदार, विक्रांत
सहीच्..........सुंदर झालीये
सहीच्..........सुंदर झालीये एकदम....
छान ..... शेवटचं कडवं विशेष.
छान ..... शेवटचं कडवं विशेष.