..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैसे कोई जीये,
हा बुझा दिये, राह के सभी दिये ??

गीता दत्त / हेमंत कुमार / लता -- या तिघांनी स्वतंत्रपणे गायलेय हे गाणे.

०५/००४ चे उत्तर अजून आलेले नाही Happy

वैजयंतीमाला, संध्या, रिना रॉय, श्रीदेवी... यांच्या यादीत या चित्रपटाच्या नायिकेचे नाव बसवता आले असते, पण "गाणे" कमी पडले ! ( दुसरा क्ल्यू )

स्निग्धा, बरोबर. तुमच्यासाठी चर्चगेटच्या एशियाटिक मधले मलई सँडविच.
०५/०५ वाणीला ग्रॅज्युएट झाल्या झाल्या एका खाजगी कंपनीत नोकरी लागली. तिचं ऑफिस फोर्टमधल्या एका जुनाट इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर होतं. त्या इमारतीचे प्रशासन यथातथाच होतं. जिन्यात स्वच्छता, दिवे यांची वानवाच होती. कधी संध्याकाळी उशिरापर्यंत थांबायला लागलं, तर ऑफिसातून बाहेर पडताना वाणीला धाकधुक होत राही, त्यामुळे ती उशिरापर्यंत थांबायला तयार नसे. ही गोष्ट तिचा बॉस अजयच्या लक्षात आली. कारण कळल्यावर त्याने वाणीला इमारतीच्या बाहेरून जाणार्‍या नागमोडी/चक्राकार जिना दाखवला. स्ट्रीट लाइट्समुळे, आजूबाजूच्या दुकानांच्या झगमगीत दिव्यांमुळे त्या जिन्यावर चांगला उजेड असे. तिला चर्चगेटपर्यंत सोबत करता यावी, म्हणून अजयही तिच्यासोबतच ऑफिसातून निघू लागला.
अजयचे आभार मानताना वाणी कोणते गाणे म्हणेल?

तुम जो हुए मेरे हमसफर रस्ते बदल गए
लाखों दिये मेरे प्यारे की राहों में जल गए
चित्रपट 12 O'clock गीता-रफी, गुरुदत्त- वहिदा. संगीत ओ पी

अगदी आठवणीतले गाणे, पण नाही सुचले...
तिथून जरा पुढे गेलात, तर के रुस्तम कडचे आईस्क्रीम पण मिळेल कि ! मी दर भारतभेटीत जातोच जातो !

०५/००४ ( तिसरा क्लू )

या चित्रपटातली गाणी आपल्या सर्वांच्या एवढ्या आवडती आहेत कि आजही अंताक्षरीत ती आठवतातच.
पण असे भाग्य, या गाण्याला मात्र लाभले नाही.

०५/००४

मी चौथा क्लू देतोय.. हे गाणे आणखी एका चित्रपटात पण आहे.
पण मूळात हे गाणे या दोन्ही चित्रपटासाठी लिहिलेले नव्हतेच.

प. पू. बापूला पिया कुठे रे ?

०५/००४ - हा शेवटचा क्लू

कथानक, दिग्दर्शन, अभिनय, संगीत या सर्व बाबतीत हा चित्रपट श्रेष्ठ मानला जातो.
या गाण्याला खुप करुण संदर्भ आहे. चित्रपटातही आणि महाराष्ट्राच्या सद्यस्थितीतही.

प. पू. बापूला पिया कुठे रे ?>>>>ते आधीच्या कोड्यातलं "आडु" (पिच) सारखा काहिसा इथेपण संदर्भ असेल म्हनुन आपलं सहजच... Proud

"अल्ला मेघ दे पानी दे..." ???

अगदी बरोब्बर, जिप्स्या

०५/००४

आजच्या पेपरमधली सनसनाटी बातमी.

प.पू. आसारामबापूंना, ऐरोली नगरपालिकेने रंगपंचमीला पाणी न दिल्याने ते भयंकर खवळले आणि त्यांनी नको तो "अतिरेकी" निर्णय घेतला. ( हा निर्णय घेण्याचे धाडस तर महात्मा गांधींनाही झाले नव्हते. )
त्यांचे अनुयायी अंधानुयायी, त्यांनी मात्र आशा सोडली नाही, बापूंच्या नव्या भजनात पण त्यांनी साथ दिली..
तर बापू आणि अनुयायी कुठले गाणे म्हणतील ?

उत्तर

अल्ला मेघ दे, पानी दे, छाया दे ( बापू )
रामा मेघ दे, श्यामा मेघ दे ( शिष्य )

आणखी लिहितो.

गाईड मधे अगदी शेवटी हे गाणे येते. त्याला जबरदस्तीने साधु बनवतात त्यावेळी. गाणे सचिन देवबर्मन यांच्या
आवाजात आहे. हेच गाणे पलको कि छाँव मे मधे, किशोर कुमार / आशाच्या आवाजात आहे.

मूळात हे बंगाली लोकगीत आहे. म्हणून तर सगळ्या देवांचा उल्लेख आहे.

गाईड मधे आशाचे एकही गाणे नाही, वहिदाचा नागिन धुन वर नाच आहे, पण त्या नाचाला गाणे नाही.
( हा नाच यू ट्यूबवर आहे. )

पण हे गाणे क्वचितच रेडीओवर लागते.

आसाराम बापू यांनी धर्मांतर वगैरे केले तर.. अशी कल्पना केली मी. म. गांधीना पण धर्मांतराची ऑफर केली गेली होती. पण त्यांनी ती मानली नाही.

०५/०६ मधू दहावीला गेली, तरी पुढे काय करायचे ते तिला ठरवता येत नव्हते. एसेसी म्हटलं की ट्युशन क्लासेस आलेच. मधूच्या गडगंज श्रीमंत वडिलांनी तर तिच्यासाठी घरीच खाजगी शिकवण्या लावल्या होत्या. सायन्ससाठी तिला स्पेशालिस्ट ट्युटर होते. अनुक्रमे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पीएचडी करणार्‍या संध्या आणि मेघमाला तिला ते ते चॅप्टर्स शिकवत होत्या. नववीची परीक्षा संपल्या संपल्या या दोघी रोज तिची शिकवणी घ्यायला यायच्या. पण मधूला काही त्यांच्या शिकवण्यात रस वाटत नव्हता. त्या दोघी फारच बोsssर मारतात असे ती म्हणे. पण काही दिवसांनी जीवशास्त्राचे चॅप्टर्स - 'लाइफ सायन्सेस' शिकवायला तिला एक हँडसम यंग डॉक्टर आला. तो इतका विक्षिप्त की आपले नावही त्याने सांगितले नाही. मधू त्याला Dr Who म्हणायची. पण त्याचे शिकवणे तिला आवडले; तिला लाइफ सायन्सेसची गोडी लागली. इतकी की आपणही मेडिकललाच जायचे असे तिने ठरवले. अशा मनःस्थितीत ती कोणते गाणे म्हणेल?

एक गेस,

रोज श्याम आती थी, मगर ऐसी ना थी
रोज रोज घटा छाती थी, मगर ऐसी ना थी
ये आज मेरी जिंदगी मे कौन आ गया ..

इम्तिहान / लता / तनुजा

मामी, अजून अज्ञातवासात का ?

०५/००७

साने आणि लेले हे रत्नागिरीतले शेजारी. नवल म्हणजे कोब्रा असून त्यांचे एकमेकांशी पटत होते. त्याहून नवल म्हणजे त्यांनी पार्टनरशिप मधे एक आमराई विकत घेतली. त्या दोघांनी मिळून तिथे एक नेपाळी, राखणदारीस ठेवला. नेपाळी असल्याने त्याचे नाव अर्थातच बहादूर होते. तो कुणालाही आमराईत येऊ देत नसे पण सान्यांची केतकी आणि लेल्यांचा वरुण, अभ्यासाच्या निमित्ताने आमराईत तासंतास बसत असत. दोघात काहीतरी चालले आहे हे बहादूरला कळत होते, पण मालकांच्यांच मुलांबद्दल तो कोणाला सांगणार ? तो आपल्या शेजार्‍यांना सांगत असे. ते म्हणत, तूला काय करायचेच, त्यांच्याकडे लक्ष ठेवायचे तूझे काम नाही, तर तो कुठले गाणे म्हणेल ?

बरोबर कि जिप्स्या ( पण सोप्पेच होते Happy )

०५/००७

साने आणि लेले हे रत्नागिरीतले शेजारी. नवल म्हणजे कोब्रा असून त्यांचे एकमेकांशी पटत होते. त्याहून नवल म्हणजे त्यांनी पार्टनरशिप मधे एक आमराई विकत घेतली. त्या दोघांनी मिळून तिथे एक नेपाळी, राखणदारीस ठेवला. नेपाळी असल्याने त्याचे नाव अर्थातच बहादूर होते. तो कुणालाही आमराईत येऊ देत नसे पण सान्यांची केतकी आणि लेल्यांचा वरुण, अभ्यासाच्या निमित्ताने आमराईत तासंतास बसत असत. दोघात काहीतरी चालले आहे हे बहादूरला कळत होते, पण मालकांच्यांच मुलांबद्दल तो कोणाला सांगणार ? तो आपल्या शेजार्‍यांना सांगत असे. ते म्हणत, तूला काय करायचेच, त्यांच्याकडे लक्ष ठेवायचे तूझे काम नाही, तर तो कुठले गाणे म्हणेल ?

उत्तर :-

अम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
एक मेमशाब है, शात मे शाब भी है
मेमशाब शुंदर शुंदर है, शाब भी खुबशुरत है
दोनो पाश पाश है, बाते खाश खाश है
दुनिया चाहे कुश भी बोले, हम तो कुश नही बोलेगा

हमरा एक पडोशी है, नाम जिसका जोशी है
वो पाश हमरे आता है, और हमको ये शमजाता है
जब दो जवान दिल मिल जायेंगे, तो कुश ना कुश तो होंगा
दो शे चार हो शकते है, आठ शे साथ हो शकते है
जो करता है वो पाता है,
अरे अपने बाप का क्या जाता है

चित्रपट : कसौटी, गायक किशोर कुमार, पडद्यावर प्राण. संगीत : कल्याणजी आनंदजी

या गाण्याचे गायन आणि प्राणची अदाकारी खास, शॉरी खाश आहे.

अरे आज गेले कुठे सगळे ?

मी एकटाच खिंड लढवतोय कि !!

०५/००८

जास्मिन कुळातील फुलात ( जाई, जुई, सायली वगैरे ) सुगंध असला तरी रंग नसतातच. तर शशांक आणि शांकलीने एक प्रयोग करायचा ठरवले. यातल्या अनेक वेलींचा संकर करुन त्यांनी प्रयोगशाळेत एक वेल वाढवली.
आणि त्यांच्या प्रयोगांना यश आले. सुगंध आणि रंग यांचा अनोखा मिलाप असलेले फुल आले त्या वेलीला. इतकेच नव्हे तर एकाच फुलात, अनेक रंग दिसू लागले.

अर्थात ते फुल बघायला, नि.ग. वरचे सगळे शशांक शांकलीच्या घरी गेले. सर्वांनी त्या फुलाचे अनोखे रंग बघून, नवल केले. वर्षूला मात्र मनात असूनही येता येत नव्हते. तिने जिप्स्याला फोटो पाठवायची विनंती केली..

मग सगळ्यांना लक्षात एक गोष्ट आली. त्या दोघांनी हि वेल, प्रयोगशाळेत, कृत्रिम प्रकाशात वाढवली होती.
तिला प्रकाश अजिबात सहन होत नसे. अगदी एक नाजूक फांदी जर दिवसा प्रकाशाकडे नेली तरी कोमेजत असे. रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही प्रयोग अयशस्वी ठरला. त्यामूळे जिस्प्सी फ्लॅश वापरायला घाबरत होता.
पण वेलीच्या मनात काय होते, हे ती गाण्यात कसे सांगेल ?

जूही की कली मेरी लाडली
नाज़ों की पली मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली, ओ मेरी लाडली????

Pages

Back to top