हा पदार्थ मला लहानपणी खूप आवडायचा. आई बरेच वेळा आमच्यासाठी उकड बनवायची. लहान मुलांना देण्यासाठी एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि करायला सोपा पदार्थ. अगदी ५-१० मिनिटात तयार होतो आणि पौष्टीक, पोटभरीचा ऑप्शन आहे.
अगदी दीड-दोन वर्षाच्या मुलांना पण खाऊ घालू शकतो. फक्त एवढ्या लहान मुलांसाठी उकड बनवताना अगदी कणभर मिरची घालावी, म्हणजे मिरचीची चव तर लागेल पण उकड अजिबात तिखट लागणार नाही.
साहित्यः
तांदूळाची पिठी ३ टेबलस्पून, कढिलिंबाची २-३ पानं, मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर
आंबटपणासाठी २-३ थेंब लिंबूरस किंवा १-२ चमचे किंचित आंबट दही
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, (बोटाच १ पेर) मिरची दोन तुकडे करून
(या साहित्यात अंदाजे ३-४ वाट्या उकड तयार होईल)
कृती:
१) प्रथम एका बाऊलमध्ये तांदळाची पिठी घेऊन त्यात ३ वाट्या पाणी घाला. आंबटपणासाठी दही वापरणार असाल तर तेही यात घाला. पिठाच्या गुठळ्या रहाणार नाहीत इतपत मिश्रणात एकजीव करून घ्या.
२) एका पॅनमध्ये तेल घेऊन मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात अनुक्रमे हिंग, हळद , कढिलिंब, मिरची घालून परता. मग त्यात तांदूळ पिठीचे मिश्रण घाला. आणि डावाने ढवळत रहा.
३) आता त्यात (स्टेप १ मध्ये दही घातले नसेल तर) लिंबू रस घाला. मग चवीनुसार मीठ, साखर घाला. कोथिंबीर घाला. मिश्रण अधेमधे ढवळत रहा. अन्यथा पिठाच्या गुठळ्या होतील.
४) लवकरच मिश्रण दाट होऊ लागेल. उकड अजून थोडी पातळ हवी असेल तर त्यात गरजेनुसार पाणी घालून परत मिश्रण एकसारखे करून घ्या.
५) परत एकदा चव पाहून चवीनुसार (मिरची, मीठ, साखर, लिंबूरस/दही) यापैकी जे हवे असेल ते घाला.
६) गरम गरम उकड वरून तूप घालून खा
टीपः
१) तांदळाची पिठी पाणी घालून शिजवल्यानंतर बरीच दाट होते. त्यामुळे २-३ टेबल्स्पून तांदळाची पिठी घेतली तरी त्याची २-३ वाट्या पातळ उकड तयार होते.
२) लहानांसाठी करायची असल्यास पातळ करावी. मोठ्यांसाठी करायची असल्यास दाट केली तरी चालेल.
ही पा.कृ. आहारशास्त्र आणि
ही पा.कृ. आहारशास्त्र आणि पाककृती मध्ये कशी हलवायची?
पा.कृ. लिहिताना 'आहारशास्त्र आणि पाककृती' असा ऑप्शनच मिळाला नव्हता :-/
मस्त! माझा आवडीचा पदार्थ.
मस्त!
माझा आवडीचा पदार्थ.
मोठ्यांचीपण आवडीची. हळदीचा
मोठ्यांचीपण आवडीची. हळदीचा रंग, मिरची, कढीलिंब, लसूण, वरून थोडेसे तेल ..अहाहा !!
फोटो हवा होता!
उकड माझाही आवडीचा पदार्थ! मला
उकड माझाही आवडीचा पदार्थ!
मला उकड बर्याचदा गव्हाच्या चिकासारखी का लागते काय माहित
यम्मी
चेरी, कुठल्याही पाककृतीच्या
चेरी, कुठल्याही पाककृतीच्या पानावर गेल्यावर उजव्या कोपर्यात, नवीन पाककृती हा ऑप्शन दिसेल. तिथे क्लीक केल्यावर सगळे सोपे होईल.
माझ्याही आवडता पदार्थ. बर्याच वेगवेगळ्या तर्हेने करतात. याचे धनश्रीचे तयार मिक्स पण मिळते.