आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
कृपया, चौथ्या भागातील १००
कृपया, चौथ्या भागातील १०० कोडी झाली की हा धागा वापरण्यास सुरुवात करावी.
अभिनंदन मामी, सिनियर
अभिनंदन मामी,
सिनियर सिटीझन्सचा मान ठेवावा, एवढीच विनंती. ( खास करुन स्वप्नासाठी म्हणजे स्वप्ना_राज साठी, नाहीतर सगळे माझ्या स्वप्नात याल. )
कोडे नं ५/००१ :
कोडे नं ५/००१ :
५/००१: इतनी शक्ती हमें देना
५/००१:
इतनी शक्ती हमें देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना..
शक्ती कपूर पाहून हेच गाणे आठवले. आणि शिवाय एन ए आहेच.
हमको मनकी शक्ती देना ??
हमको मनकी शक्ती देना ??
नाही श्रद्धा / दिनेशदा... ती
नाही श्रद्धा / दिनेशदा...
ती बाई ओळखा दिनेशदा.... तुम्ही नक्कीच ऐकलेलं गाणं आहे....
अरे, आली सुध्दा इथे जनता!
अरे, आली सुध्दा इथे जनता! त्या बीबीला टाळं लावायला सांगायचं का अॅडमिनना?
दिनेशदांनी ऐकलेलं गाणं म्हणजे मला नक्कीच माहित नसणार ही बाई अॅना नावाची कोणी आहे का? असेल तर गाण्यात 'आना' असू शकतं.
नाही स्वप्ना..... ही बाई त्या
नाही स्वप्ना..... ही बाई त्या काळात भलतीच गाजली होती.... काही क्लु दिले तर दिनेशदा आणि माधव पटकन ओळखतिल.... इतरही फोटोंचे अर्थ लावा लोक्स....
क्लु नंबर १) ह्या बाईचा
क्लु नंबर
१) ह्या बाईचा अत्यंत गाजलेला सिनेमा ज्यात तिला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले....
ओहो, पूजा बेदीची आई तर नव्हे?
ओहो, पूजा बेदीची आई तर नव्हे? प्रोतिमा बेदी? ती चित्रपटात होती का? किंवा रेहाना सुलताना. तिला दस्तक मध्ये अॅवॉर्ड मिळालं होतं. मग गाण्यात 'रहे ना' किंवा 'रहना' हे शब्द असणार.
रेहानाच वाटतेय. प्रोतिमा बेदी
रेहानाच वाटतेय. प्रोतिमा बेदी चित्रपटात नव्हती कधी.
बैंया ना धरो ओ बलमा न करो
बैंया ना धरो ओ बलमा न करो मोसे रार
गाणं बरोबर वाटतंय, दस्तक
गाणं बरोबर वाटतंय, दस्तक मधलंच ना हे? पण ह्यात शक्ती कुठून आला? रार म्हणजे शक्ती का?
रार म्हणजे वाद / भांडण --
रार म्हणजे वाद / भांडण -- म्हणजेच शक्ती कपूर !!!!
>>रार म्हणजे वाद / भांडण इथे
>>रार म्हणजे वाद / भांडण
इथे डॉली बिन्द्रा अधिक चपखल बसली असती
शक्ती कपूरने रंगवलेले बलमा हे
शक्ती कपूरने रंगवलेले बलमा हे प्रसिद्ध पात्र असेल.
भरत मयेकर बिंगो.... ह्या
भरत मयेकर बिंगो.... ह्या धाग्यातिल पहिलं कोडं तुम्ही उलगडलत.... तुम्हाला मगाशी माधव ने मला दिलेल्या पुपो पैकी एक पुरण पोळी ( मामी च्या पावलांवर पाउल ठेवते)
कोडे ५/००१:>>>
बैंया ना धरो ओ बलमा न करो मोसे रार
शक्ति कपुर म्हणजे "मेरा बलमा"....
चला सुरुवात झाली.....
०५/००२ केनयाचा डॅनियल
०५/००२
केनयाचा डॅनियल ओब्लिसांजोचे लग्न, युगांडाच्या हिना पटेल शी झाले. तो तिला फिरायला म्हणून नैरोबीच्या
कार्निव्होर हॉटेलमधे घेऊन आला. आपल्याला हव्या त्या प्राण्याचे म्हणजे जिराफ, झेब्रा, क्रॉकोडाईल, एलिफंट,
ऑयीस्ट्रीच वगैरेंचे स्टेक तिथे आपल्यासमोर बार्बेक्यू करुन देतात.
तिथेच त्याने एक छोटेसे क्वार्टर पण बूक केले होते. त्याने आपल्या चॉईसचा स्टेक मागवला. आणि दोघे त्या घरात, जेवायला बसणार एवढ्यात त्याला रोमँटीक मूड आला.. तर ते दोघे कुठले गाणे म्हणतील
क्लू, डॅनियलला हिंदी येते पण
क्लू, डॅनियलला हिंदी येते पण फार मोठी वाक्ये नाही बोलत तो. ३/४ शब्दांचीच वाक्य करतो. आणि हिना पटेल, तशी भारतीय संस्कारातच वाढली आहे
दिनेशदा... इतकं नॉनव्हेज कोडं
दिनेशदा... इतकं नॉनव्हेज कोडं मी आयुष्यात पहिलं नव्हतं.....फिदी...
आता भारतीय सिनेमा, इंटरनॅशनल
आता भारतीय सिनेमा, इंटरनॅशनल झाला ना ? केनयात हिंदी सिनेमे अतीव लोकप्रिय आहेत. बहुतेक सर्व आफ्रिकन देशांत ते आहेत. भाषा कळली नाही तरी त्यांना चित्रपट आवडतात. आणि कार्निव्होर बद्दलचा, सर्व मजकूर अगदी खरा आहे. मी प्रत्यक्ष ती जागा बघितली आहे.
आता दूसरा क्लू - या चित्रपटातील ३ कलाकारांनी खरी नावे, हिंदु, ख्रिश्चन आणि मुसलमान धर्मातली आहेत.
पण त्यांचे धर्म तेच आहेत, असे नाही.
बापरे खुप कठीण आहे त्यातला
बापरे खुप कठीण आहे
त्यातला क्ल्यु जरी ओळखला तरी मला गाण ओळखल्याच समाधान मिळेल
राजकुमार आहे का त्यात ?
राजकुमार आहे का त्यात ?
राजकुमार नाही त्यात, तितका
राजकुमार नाही त्यात, तितका जूनाही नाही.
किरण खेर होती का ? आठवत नाही ( हा तिसरा क्लू )
इथे माझ्यासारखं ढ माणूस उगीच
इथे माझ्यासारखं ढ माणूस उगीच चक्कर टाकून जातं.
आणि त्यातून दिनेशदा तुम्हीही ?किती प्रकारे न्यूनगंड आणाल ?
गाणं सांगितलं तर खुपच सोपं
गाणं सांगितलं तर खुपच सोपं वाटेल.
नावात काय आहे ? ( चौथा क्लू )
माझ्या साठी क्ल्यु हेच कोड
माझ्या साठी क्ल्यु हेच कोड झालय
५/००२: छोटासा घर है ये मगर
५/००२:
छोटासा घर
है ये मगर (स्टेक)
तुम इसको पसंद कर लो
... दरवाजा बंद कर लो (भारतीय संस्कार. हे नायिकेच्या तोंडी आहे)
बरोबर श्रद्धा ! इट टेक्स अ
बरोबर श्रद्धा ! इट टेक्स अ जिनियस टु सॉल्व्ह सच अ कोडं !
ज्याला उत्तर आलेय, त्यानेच पुढचे कोडे द्यावे असा नियम करावा काय ?
बाप्रे....अवघड होतं हो
बाप्रे....अवघड होतं हो दिनेशदा!!
श्रद्धा...द ग्रेट! अभिनंदन!
Pages