आताच महिला दिनानिमित्त 'घर दोघांचे' वर आपण अनेक प्रतिक्रिया वाचल्या. पसरवणारे नी आवरणारे असे वर्गीकरण कसे झाले, कामांचे वाटप फार पूर्वीपासून असे का आहे, हल्ली काही वर्षांत यात होत चाललेले बदल आधीपासूनच का नाही झाले असे बरेच प्रश्न पडले होते. त्याचवेळी एक पुस्तक वाचनात आले - Why men don't listen and women can't read maps. लेखक Allan and Barbara Pease यांनी लिहीलेले हे पुस्तक मजा म्हणून वाचायला चांगले वाटले.
कृपया लक्षात असूद्या की इथे मी माझी मते किंवा मला पटणारी मते देत नसून लेखकद्वयींची मते देत आहे.
लेखकांनी यात ' शास्त्रीय ' म्हणून माहिती दिली आहे. सगळ्याच गोष्टी खर्या असतील व पटतील असे नाही पण मनोरंजक नक्कीच आहेत. मानवी मेंदूची झालेली उत्क्रांती त्यांनी सांगितलीय. इतर प्राण्यांतही तशाच प्रकारे ती झालीय फक्तं प्रगती कमी. म्हणजे स्त्री व पुरूष यांच्या मेंदूंची वेगवेगळी उत्क्रांती झालीय. त्यासाठी त्यांनी मेंदूंचे स्कॅनस्, एकच गोष्टं करताना दोन्ही प्रकारच्या मेंदूंमध्ये उद्दिपित होत असलेले वेगवेगळे भाग, विद्यापीठांमधिल अभ्यास असे बरेच काही दिले आहे.
पक्षांमधे एक जोडीदार अंडी उबवण्याचे काम करतो तर दुसरा त्यावेळेत अन्न शोधून आणून जोडीदाराचे पोषण करतो. इथे मादीनेच घरट्यात बसले पाहीजे असे नाही कारण एकदा अंडी घालून झाली की कोण उबवतंय हे सर्वच पक्षांमधे महत्वाचे नसते. सस्तन प्राण्यांमधे मात्र माता बाळाचे पोषण करत असल्याने तिला बाळाजवळ थांबावेच लागे तसेच त्यापुर्वीही गरोदरपणाचा काही काळ विश्रांती घ्यावी लागे (बरेचदा). त्यामुळे मादीने गुहेत रहायचे व नराने अन्न मिळवायचे ही वाटणी किमान त्याकाळापुरती तरी झाली. मनुष्य प्राण्यातही तेच झाले. पूर्वी एक स्त्री अनेक मुलांना जन्म देत असल्याने बराच काळ स्त्री एका ठिकाणी सुरक्षित व पुरूष अन्नाच्या शोधार्थ बाहेर अशी वाटणी झाली. कित्येक हजारो वर्षे हे होत राहिले व त्या त्या कामासाठी पूरक बदल मेंदूतही होत गेले.
पुरूषांना शिकारीसाठी एका ठिकाणी शांत बसून शिकारीची वाट पहायला लागायची तर त्यांची दृष्टी, एकाग्रता, आवाज ओळखायची तसेच आवाज काढायची शक्ती, दूरवरून आपल्या घरी परत येण्यासाठी जागा लक्षात ठेवणे, मनातल्या मनात नकाशे बनवणे इत्यादिंसाठी पूरक बदल झाले. स्त्रीया घरात लहान मुले व वृद्ध यांच्या बरोबर राहत असल्याने भरपूर बोलणे, हालचालींमधील बदल टिपणे, अव्यक्त संकेत समजणे, माया करणे, आपले वास्तव्याचे ठिकाण नीटनेटके ठेवणे इत्यादिंसाठी त्यांच्या मेंदूत बदल घडले.
लेखकांच्या म्हणण्यानुसार, हजारो वर्षांनंतरही हे आताच्या स्त्री-पुरूषांमधे दिसून येते. हे सामान्यीकरण आहे. सगळ्यांच्या बाबतीत असेच दिसेल असे नाही परंतु बर्याच प्रमाणात आजच्या मानवात या गोष्टी पहायला मिळतात. सर्वांना सारे करणे शक्य होते परंतु झालेल्या नैसर्गिक बदलांमुळे प्रत्येकाला त्यासाठी करावे लागणारे कष्टं कमी-जास्तं असतात. स्त्रीयांना रिव्हर्स पार्किंग शिकायला लागणारा वेळ पुरूषांना तेच शिकण्यासाठी लागणार्या वेळेपेक्षा जास्तं असतो. बोलता बोलता एखादी गोष्टं वाचून समजून घेण्यासाठी पुरूषांना स्त्रीपेक्षा जास्तं वेळ लागतो. दूरवरची एखादी वस्तू पुरूषांना नीट दिसते परंतु स्त्रीला त्याबरोबरच अनेक वस्तू दिसत असल्याने नेमकी एखादी वस्तू दिसायला किंचित जास्तं वेळ लागतो. तेच जवळची वस्तू पाहताना जसे फ्रीजमधिल लोणी किंवा कपाटातील मोजा, पुरूषांना स्त्रीयांपेक्षा जास्तं वेळ लागतो. झोपताना टपटप वाजणारे पाणी पुरूषांपेक्षा स्त्रीयांना जास्तं त्रासदायक वाटते. झोपल्यावर दूरवर काही खुट्टं झालं तर पुरूष लवकर जागे होतात पण हेच बाजूला झोपलेल्या बाळाने टँहँ केलं तर स्त्री तुलनेने लवकर जागी होते. डावा व उजवा मेंदू जवळजवळ समप्रमाणात काम करत असल्याने डावी उजवी बाजू सांगताना स्त्रीया जरा गोंधळतात पण पुरूषांना डावीकडे वळ उजवीकडे वळ वगैरे नीट समजतं.
लेखकद्वयींनी अशी बरीच उदाहरणे दिलीत. असेही सांगितलेय की सोशल कंडिशनिंग नसेल तरीही वागण्याचा कल स्त्री-पुरूषांमधे वेगवेगळा असतो व तो बदलायचा असेल तर प्रयत्न करावे लागतात. जसे लहान मुले एका ठिकाणी आहेत व त्यांना प्रथमच खेळणी दिली तर मुलींनी बाहुल्या निवडायचे व मुलांनी गाडी किंवा तत्सम चालणारे हलणारे काहीतरी निवडायचे प्रमाण खूप जास्त असते.
मजा म्हणून खालची प्रश्नावली सोडवून बघा. तुमचा मेंदू feminine आहे की masculine यासाठी ही वापरावी असे लेखक म्हणतात. अजुनही आपणावर परंपरागत, नैसर्गिक पगडा आहे की आपण समानतेकडे चाललो आहोत हे यात पाहता येईल.
गुण पद्धती -
तुम्ही पुरूष असाल तर -
१ - प्रत्येक 'अ' पर्यायासाठी १० गुण घ्या
२ - प्रत्येक 'ब' पर्यायासाठी ५ गुण घ्या
३ - प्रत्येक 'क' पर्यायासाठी ५ गुण वजा करा
तुम्ही स्त्री असाल तर -
१ - प्रत्येक 'अ' पर्यायासाठी १५ गुण घ्या
२ - प्रत्येक 'ब' पर्यायासाठी ५ गुण घ्या
३ - प्रत्येक 'क' पर्यायासाठी ५ गुण वजा करा
एखादा प्रश्न तुम्हाला लागू होत नसेल तर ५ गुण घ्या.
Highly masculine - शून्याहून कमी
Masculine - ० ते १८०
Neutral - १५० ते १८० (overlap)
Feminine - १५० ते ३००
Highly feminine - ३०० च्या वर
कोणत्या पडावाच्या जास्त जवळ जाताय यावरून लिंगनिरपेक्ष विचारसरणीपासून तुम्ही किती दूर आहात ते पाहता येईल. लेखकांनी मात्र हे सांगताना तुमचा मेंदू किती masculine व किती feminine आहे ते पहा असे म्हटलेय..
( गुण नाही दिले तरी पर्याय वाचून कळून येतेच )
कृपया मजा म्हणूनच याचा उपयोग करा. हे असे काही नसते किंवा हे discrimination आहे अशा पद्धतीचे वाद होऊ नयेत अशी आशा बाळगून मी लेखकांनी दिलेले तीस प्रश्न देऊन माझे प्रवचन संपविते. जयहिंद जय महाराष्ट्र
१ - नकाशे वाचणे (गूगल मॅपस्, जीपीएस मधले वगैरे रस्ते शोधत असतानाचे नकाशे) तुम्हाला -
अ - कठीण पडते व तुम्ही इतरांची मदत मागता
ब - ज्या दिशेला जायचे त्याप्रमाणे नकाशा फिरवून नंतर पाहता
क - कसाही नकाशा धरला तरी नीट नकाशाप्रमाणे जाता येते
२ - एखादी कठीण पाककृती / वस्तू टीव्हीवर पाहत/ऐकत करत असताना फोन आला तर तुम्ही -
अ - टीव्ही पाहात कृती करता करता फोनवर बोलता
ब - टीव्ही बंद करून कृती करता करता फोनवर बोलता
क - फोन करणार्यास सांगता की नंतर काॅल करेन व कृती करता
३ - मित्रमैत्रीणी घरी येण्यासाठी पत्ता विचारत असताना तुम्ही -
अ - नकाशा काढून देऊन पूर्ण खाणाखुणा सांगता किंवा किंवा दुसर्या कोणाला समजावायला सांगता
ब - त्यांना जवळपासचे काय माहित आहे विचारून तिथून कसे यायचे ते सांगता
क - इथून इथे या, मग असे वळून असे मग इथे वगैरे माहिती तोंडीच देता
४ - एखादी कल्पना किंवा concept समजावून सांगताना तुम्ही शक्यतो -
अ - कागद-पेन, खडू-फळा आणि हातवारे-हालचाल (body language and gestures ) यांचा वापर करता
ब - हातवारे-हालचाल करत तोंडीच सांगता
क - तोंडीच व स्पष्ट मुद्यांत सांगता
५ - चांगला चित्रपट पाहून परत येताना तुम्ही -
अ - चित्रपटातील दृश्ये मनात घोळवता
ब - दृश्ये व त्यात काय सांगितलेय याबद्दल बोलता
क - चित्रपटात मुख्यत्वे काय सांगितलेय ते बोलता
६ - चित्रपटगृहामध्ये तुम्हाला बसायला आवडणारी जागा ( बरोबर असलेल्या लोकांच्या )
अ - उजवीकडे
ब - कुठेही
क - डावीकडे
७ - तुमच्या मित्र/मैत्रिणीकडे काही यांत्रिक वस्तू चालत नाहिये तर तुम्ही सर्वप्रथम -
अ - अरेरे, मग तू आता काय करणार, कसे करणार, वाईट झालं, असे बोलून सहानुभूती देता
ब - दुरूस्तीसाठी चांगली व्यक्ती / जागा सुचवता
क - कसे दुरुस्तं करता येईल ते पाहून स्वतः प्रयत्न करता
८ - तुम्ही नवीनच एखाद्या जागी आहात व कोणी तुम्हाला उत्तर दिशा विचारली तर तुम्ही -
अ - तुम्हाला माहीत नाही हे प्रांजळपणे कबूल करता
ब - थोड्या विचारांती ही असावी अशी शक्यता वर्तवता
क - विनासायास बरोबर सांगता
९ - कार पार्किंगसाठी जागा मिळालीय पण कार रिव्हर्स लावावी लागणार आहे तर तुम्ही -
अ - दुसरी जागा शोधता
ब - थोडे पुढेमागे करत रिव्हर्स लावता
क - व्यवस्थित, एका फटक्यात कार रिव्हर्स लावता
१० - तुम्ही टीव्ही पाहत असताना फोन आला तर तुम्ही -
अ - टीव्ही बघता बघता आरामात फोनवर गप्पा मारता
ब - टीव्हीचा आवाज कमी करून फोन घेता
क - टीव्ही बंद करून इतरांना शांत रहायला सांगून फोन घेता
११ - तुमच्या आवडत्या कलाकाराचे नवीनच गाणं तुम्ही ऐकलं तर तुम्ही -
अ - काही ओळी आपोआप नंतर लक्षात राहतात व त्या गुणगुणता
ब - अगदीच सोपं गाणं असेल तर नंतर थोडंफार आठवतं
क - नेमकं गाणं कसं होतं ते आठवत नाही पण काही शब्द आठवतात
१२ - बर्याच गोष्टींमधे शक्यता वर्तवताना तुम्ही -
अ - इंट्यूशन वापरता
ब - उपलब्ध माहिती व गट फीलिंग वापरता
क - उपलब्ध माहिती व निष्कर्ष वापरता
१३ - तुमच्याकडील चावी हरवलीय असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही -
अ - जोपर्यंत तिची खरच गरज नाहीय तोपर्यंत ती न शोधता बाकी कामे करता
ब - बाकी कामे करता करता चावी कुठे ठेवली ते आठवत राहता
क - चावी शेवटी कधी हातात होती तेव्हापासूनचा तुमचा वावर आठवून पाहता जेणेकरून चावी कुठे ठेवली असेल ते आठवेल व चावी मिळाल्यावर बाकी कामे करता येतील
१४ - तुम्ही एखाद्या हाॅटेलच्या खोलीत किंवा दुसर्या कोणाच्या घरी आहात व तुम्हाला दूरवरून सायरनचा आवाज आला तर तुम्हाला -
अ - आवाज नेमका कुठून येतोय हे कळणार नाही
ब - नीटच लक्ष देऊन ऐकले तर आवाज कोणत्या दिशेने येतोय हे कदाचित सांगता येईल
क - आवाज कुठून येतोय हे लगेच सांगता येईल
१५ - तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात व तिथे सात-आठ नवीन ओळखी झाल्या तर दुसर्या दिवशी -
अ - सर्व लोकांचे चेहरे तुम्हाला लक्षात राहतील
ब - काही लोकांचे चेहरे लक्षात राहतील
क - त्यांची नावे लक्षात राहण्याची शक्यता जास्तं आहे त्यांच्या चेहर्यांपेक्षा
१६ - सुट्टीत तुम्हाला फार्महाऊसला जायचेय व तुमच्या साथीदाराला समुद्रकिनार्यावरील रिसाॅर्टमधे. तुमची निवड योग्य आहे हे पटवून देण्यासाठी तुम्ही -
अ - प्रेमाने समजावाल की तुम्हाला फार्महाऊसला जायला खूप आवडते व बाकी बरोबर जाणारे लोकही तिथे जास्त मजा करतात
ब - सांगाल की आत्ता फार्महाऊसला गेल्यास तुम्हाला जास्त आनंद होईल, पुढच्यावेळी समुद्रकिनार्यावर जायला तुम्हाला चालेल
क - मुद्देसूद समजावाल जसे फार्महाऊस जवळ आहे, स्वस्त आहे, खेळ व आराम यासाठी तेथे सगळ्या गोष्टी जास्त व्यवस्थित सांभाळल्या जातात, इ.
१७ - दिवसभरात कायकाय कामे करायचीत ते ठरवण्यासाठी तुम्ही -
अ - शक्यतो कामाची यादी लिहून काढता
ब - कायकाय करायचेय याची मनात यादी करता
क - मनातल्या मनात कोणाला भेटायचेय, कुठे जायचेय, काय करायचेय हे सर्व पाहता ( picture in your mind )
१८ - तुमचे मित्र/ मैत्रिण त्यांच्या काही वैयक्तीक प्रश्नाविषयी तुमच्याशी बोलायला आले तर तुम्ही -
अ - सहानुभूती दाखवता व समजून घेता
ब - प्रश्न आपल्याला वाटतो तेवढा काही कठीण नसतो असे सांगून ते कसे हे समजावता
क - अनुकूल पर्याय कोणते आहेत व प्रश्नाचे निरसन कसे करावे याबद्दल सल्ले देता
१९ - दोन वेगवेगळ्या जोडप्यांतील दोघांचे एकमेकांबरोबर काहीतरी गुपचूप लफडे चाललेय तर तुम्हाला ते कधी कळेल ?
अ - लवकरच तुम्हाला कळून येईल
ब - थोडा वेळ गेल्यानंतर कळू शकेल
क - कदचित तुमच्या लक्षात येणारही नाही
२० - जीवनामधे ढोबळपणे काय असावे तुम्हाला वाटते ?
अ - मित्रमैत्रीणी असणे व आजूबाजूच्या लोकांबरोबर आनंदाने राहणे
ब - इतरांबरोबर खेळीमेळीने रहावे पण त्याबरोबरच वैयक्तिक स्वातंत्र्यही असावे
क - आपली उद्दिष्टे सफल करावी, इतरांकडून मान कमवावा व आपले असे एक स्थान मिळवावे
२१ - पर्याय दिल्यास कसे काम करायला तुम्हाला आवडेल?
अ - समजून घेणार्या पूरक अशा सहकार्यांबरोबर
ब - इतरांबरोबर पण त्याबरोबरच तुमची स्वतःची स्पेस असावी
क - एकट्याने काम करायला
२२ - तुमची वाचनाची आवड -
अ - काल्पनिक कथा व कादंबरी
ब - मासिके व वर्तमानपत्रे
क - सत्यकथा व आत्मचरित्रे
२३ - खरेदी करताना बरेचदा -
अ - आवेगामधे ( on impulse ) खरेदी करता, मुख्यत्त्वे 'विशेष' किंवा सूट असलेल्या गोष्टी
ब - मुख्य गोष्टी ठरवलेल्या असतात पण जसजसे दिसेल तसे घेत जाता
क - त्यावर काय लिहीलेय, ते कशापासून बनवलेय वगैरे वाचत, किमतींतील फरक पाहून मग घेता
२४ - झोपणे, उठणे , जेवणे हे तुम्ही -
अ - तुम्हाला करावेसे वाटते तेव्हा करता
ब - ठराविक वेळेप्रमाणे परंतु बदल करायला हरकत नसते
क - बहुतेकदा ठराविक वेळीच..
२५ - तुम्ही नुकतेच नविन नेकरीत रुजू झालात व तेथील बर्याच कर्मचार्यांना भेटलात. त्यातील कोणीतरी तुम्हाला तुमच्या घरी फोन केला तर तुम्हाला -
अ - आवाज लगेच ओळखता येईल
ब - आवाज ओळखायला थोडा वेळ लागेल
क - आवाज ओळखणे खूप कठीण जाईल
२६ - कोणाशी वादविवाद करताना सर्वात जास्त त्रास होतो तो -
अ - दुसरी व्यक्ती शांत राहिली किंवा काहीच प्रतिसाद देत नसेल तेव्हा
ब - जेव्हा तुमचा मुद्दा दुसरे समजूनच घेत नाहीत
क - त्यांचे प्रतिवाद व उचकवणारे प्रश्न ऐकून ( probing and challenging questions)
२७ - शाळेत स्पेलिंग टेस्ट व निबंध लिहीणे
अ - दोन्ही तुमच्यासाठी सोपे होते
ब - एक तुमच्यासाठी ठीकठाक होते पण दुसरे नाही
क - दोन्ही तुमच्यासाठी काही फार सोपे नव्हते
२८ - नृत्य, जॅझ इत्यादिंमधे
अ - एकदा सगळ्या स्टेपस् शिकल्यावर तुम्हाला संगीत जाणवू लागते (feel)
ब - थोड्या स्टेपस् जमतात पण इतरांबरोबर गडबडून जाता
क - संगीत व वेळ यांचा मेळ घालणे कठीण जाते
२९ - प्राण्यांचे आवाज काढणे तुम्हाला
अ - नाही जमत
ब - थोडंफार जमतं
क - चांगलं जमतं
३० - कंटाळवाण्या दिवसानंरत काय करायला तुम्हाला आवडतं?
अ - मित्रमैत्रीणी किंवा कुटुंबासोबत त्यासंबंधी बोलणे
ब - इतर लोक त्यांच्या दिवसाबद्दल सांगत असतील ते ऐकणे
क - वर्तमानपत्र वाचणे, टीव्ही पाहणे व न बोलणे
८०
८०

चला आम्हे मायनस मधे १ -
चला आम्हे मायनस मधे
१ - नकाशे वाचणे (गूगल मॅपस्, जीपीएस मधले वगैरे रस्ते शोधत असतानाचे नकाशे) तुम्हाला -
क - कसाही नकाशा धरला तरी नीट नकाशाप्रमाणे जाता येते
२ - एखादी कठीण पाककृती / वस्तू टीव्हीवर पाहत/ऐकत करत असताना फोन आला तर तुम्ही -
अ - टीव्ही पाहात कृती करता करता फोनवर बोलता
३ - मित्रमैत्रीणी घरी येण्यासाठी पत्ता विचारत असताना तुम्ही -
क - इथून इथे या, मग असे वळून असे मग इथे वगैरे माहिती तोंडीच देता
४ - एखादी कल्पना किंवा concept समजावून सांगताना तुम्ही शक्यतो -
क - तोंडीच व स्पष्ट मुद्यांत सांगता
५ - चांगला चित्रपट पाहून परत येताना तुम्ही -
क - चित्रपटात मुख्यत्वे काय सांगितलेय ते बोलता
६ - चित्रपटगृहामध्ये तुम्हाला बसायला आवडणारी जागा ( बरोबर असलेल्या लोकांच्या )
क - डावीकडे
७ - तुमच्या मित्र/मैत्रिणीकडे काही यांत्रिक वस्तू चालत नाहिये तर तुम्ही सर्वप्रथम -
क - कसे दुरुस्तं करता येईल ते पाहून स्वतः प्रयत्न करता ( आणि प्रोब्लेम कमी न करता जास्त होतो)
८ - तुम्ही नवीनच एखाद्या जागी आहात व कोणी तुम्हाला उत्तर दिशा विचारली तर तुम्ही -
अ - तुम्हाला माहीत नाही हे प्रांजळपणे कबूल करता
९ - कार पार्किंगसाठी जागा मिळालीय पण कार रिव्हर्स लावावी लागणार आहे तर तुम्ही -
ड - मी गरिब मुलगा आहे
१० - तुम्ही टीव्ही पाहत असताना फोन आला तर तुम्ही -
अ - टीव्ही बघता बघता आरामात फोनवर गप्पा मारता
११ - तुमच्या आवडत्या कलाकाराचे नवीनच गाणं तुम्ही ऐकलं तर तुम्ही -
अ - काही ओळी आपोआप नंतर लक्षात राहतात व त्या गुणगुणता
१२ - बर्याच गोष्टींमधे शक्यता वर्तवताना तुम्ही -
क - उपलब्ध माहिती व निष्कर्ष वापरता
१३ - तुमच्याकडील चावी हरवलीय असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही -
ब - बाकी कामे करता करता चावी कुठे ठेवली ते आठवत राहता
१४ - तुम्ही एखाद्या हाॅटेलच्या खोलीत किंवा दुसर्या कोणाच्या घरी आहात व तुम्हाला दूरवरून सायरनचा आवाज आला तर तुम्हाला -
क - आवाज कुठून येतोय हे लगेच सांगता येईल
१५ - तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात व तिथे सात-आठ नवीन ओळखी झाल्या तर दुसर्या दिवशी -
क - त्यांची नावे लक्षात राहण्याची शक्यता जास्तं आहे त्यांच्या चेहर्यांपेक्षा
१६ - सुट्टीत तुम्हाला फार्महाऊसला जायचेय व तुमच्या साथीदाराला समुद्रकिनार्यावरील रिसाॅर्टमधे. तुमची निवड योग्य आहे हे पटवून देण्यासाठी तुम्ही -
क - मुद्देसूद समजावाल जसे फार्महाऊस जवळ आहे, स्वस्त आहे, खेळ व आराम यासाठी तेथे सगळ्या गोष्टी जास्त व्यवस्थित सांभाळल्या जातात, इ.
१७ - दिवसभरात कायकाय कामे करायचीत ते ठरवण्यासाठी तुम्ही -
क - मनातल्या मनात कोणाला भेटायचेय, कुठे जायचेय, काय करायचेय हे सर्व पाहता ( picture in your mind )
१८ - तुमचे मित्र/ मैत्रिण त्यांच्या काही वैयक्तीक प्रश्नाविषयी तुमच्याशी बोलायला आले तर तुम्ही -
क - अनुकूल पर्याय कोणते आहेत व प्रश्नाचे निरसन कसे करावे याबद्दल सल्ले देता
१९ - दोन वेगवेगळ्या जोडप्यांतील दोघांचे एकमेकांबरोबर काहीतरी गुपचूप लफडे चाललेय तर तुम्हाला ते कधी कळेल ?
क - कदचित तुमच्या लक्षात येणारही नाही...... (आम्हाला आमचे कामधंदे आहेत दुसर्यांना बघत बसायला वेळ नाही )
२० - जीवनामधे ढोबळपणे काय असावे तुम्हाला वाटते ?
क - आपली उद्दिष्टे सफल करावी, इतरांकडून मान कमवावा व आपले असे एक स्थान मिळवावे
२१ - पर्याय दिल्यास कसे काम करायला तुम्हाला आवडेल?
क - एकट्याने काम करायला
२२ - तुमची वाचनाची आवड -
क - सत्यकथा व आत्मचरित्रे
२३ - खरेदी करताना बरेचदा -
क - त्यावर काय लिहीलेय, ते कशापासून बनवलेय वगैरे वाचत, किमतींतील फरक पाहून मग घेता (शेवटी जकातवाले आम्ही )
२४ - झोपणे, उठणे , जेवणे हे तुम्ही -
क - बहुतेकदा ठराविक वेळीच..
२५ - तुम्ही नुकतेच नविन नेकरीत रुजू झालात व तेथील बर्याच कर्मचार्यांना भेटलात. त्यातील कोणीतरी तुम्हाला तुमच्या घरी फोन केला तर तुम्हाला -
क - आवाज ओळखणे खूप कठीण जाईल
२६ - कोणाशी वादविवाद करताना सर्वात जास्त त्रास होतो तो -
क - त्यांचे प्रतिवाद व उचकवणारे प्रश्न ऐकून ( probing and challenging questions)
२७ - शाळेत स्पेलिंग टेस्ट व निबंध लिहीणे
क - दोन्ही तुमच्यासाठी काही फार सोपे नव्हते
२८ - नृत्य, जॅझ इत्यादिंमधे
क - संगीत व वेळ यांचा मेळ घालणे कठीण जाते
२९ - प्राण्यांचे आवाज काढणे तुम्हाला
अ - नाही जमत
३० - कंटाळवाण्या दिवसानंरत काय करायला तुम्हाला आवडतं?
क - वर्तमानपत्र वाचणे, टीव्ही पाहणे व न बोलणे
साती, सही है... मला पर्याय
साती, सही है... मला पर्याय वाचतानाच कळत होतं मी टिपीकल आहे ते
फोनवरून जीपीएस बघताना फोन हव्या त्या दिशेने फिरवल्याशिवाय कळतच नाही 

उदयन, प्रश्न व पर्याय वाचून मायनस की इंट्यूशन ?
१६५
१६५
जल्ला आमी १८०. न्युट्रल की
जल्ला आमी १८०. न्युट्रल की फेमिनाईन?
बेफि, मंजुडी, तुम्ही नैसर्गिक
बेफि, मंजुडी, तुम्ही नैसर्गिक बंधनांना झुगारून देण्यात यशस्वी झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन
( मला लागलेला अर्थ आहे. खखो लेखकद्वयी जाणे
)
म्हणजे?
म्हणजे?
सोनूआयडोन्टशेतीविथयू
सोनूआयडोन्टशेतीविथयू
म्हणजे तो न्युट्रलचा पट्टा
म्हणजे तो न्युट्रलचा पट्टा आहे व नैसर्गिक मस्क्युलाईन वा फेमिनाइन बिहेवियर न दाखवता तुम्ही नाॅर्मल ह्युमन असे सध्याच्या विकसीत मानवाला योग्य असे बिहेवियर दाखवताय असे म्हणायचे होते. हा माझा कयास आहे. साती रिव्हर्स गियरमधे सुसाट असाव्यात
हेलबाॅय, लेटस् शेती टू डिसशेती
बेफी हे पहा Highly masculine
बेफी हे पहा
Highly masculine - शून्याहून कमी
Masculine - ० ते १८०
Neutral - १५० ते १८० (overlap)
Feminine - १५० ते ३००
Highly feminine - ३०० च्या वर
छान आहे धागा
छान आहे धागा
गिरीजा, ते पाहिले होते, धन्स,
गिरीजा, ते पाहिले होते, धन्स, पण सोनू काय म्हणत होत्या ते लक्षात येत नव्हते, तूर्त ते लक्षात आल्याचे नोंदवत आहे.
(अवांतर - प्रत्यक्षात पुरुष असणार्या पण स्त्री आय डी घेणार्यांचा - किंवा उलटे - येथे गोंधळ होणार असे वाटू लागले आहे)
अहो पण १५० च्या खाली स्कोअर
अहो पण १५० च्या खाली स्कोअर जाईलच कसा कोणाचा?
सातींनी अडीच वगैरे मार्क घ्हेतले आहेत का मधेच?
अर्र्र्र्र्र्र्र्र कंप्लीट
अर्र्र्र्र्र्र्र्र कंप्लीट चुकलेच माझे. ते 'मायनस पाच' पाहिलेच नाही राव मी! मी तेही पाचच समजून चाललो होतो.
आता माझाही स्कोअर कमी होणार
बेफिकीर, तुम्ही १०-१५ सेमी
बेफिकीर, तुम्ही १०-१५ सेमी दूरवरच्या स्केईनवरील गोष्टी नीट वाचल्या नाहीत, पण दोन तीन फूटांवरच्या पात्रांचे वर्णन डिटेल करता.
हे नक्कीच वरच्या लेखाप्रमाणे टिपीकल मस्क्यूलाईन असावे.
माझा योग्य स्कोअर फक्त २० आला
माझा योग्य स्कोअर फक्त २० आला आहे २०
बगा,म्या म्हनलं न्होतं टिपिकल
बगा,म्या म्हनलं न्होतं टिपिकल मस्क्युलैन!
आमला लोकं वळकायसाटनी हे स्कोर लिवित बसयची गरज न्है!
१७०
१७०
२५० पण मला कळालं नाही हे सगळं
२५०
पण मला कळालं नाही हे सगळं काय आहे?
नैसर्गिक बंधनांना झुगारुन म्हणजे?
अरे पण इथे मिनिमम ५ गुण
अरे पण इथे मिनिमम ५ गुण घ्यायचेत तेंव्हा ३० * ५ = १५०
म्हणजे कमित कमीच १५० असु शकतात
लोकांनो तुमचे ८०-२० असले कसले आले?
उणे पाच करायचे वाचले नाहीस
उणे पाच करायचे वाचले नाहीस का?
(अवांतर - प्रत्यक्षात पुरुष
(अवांतर - प्रत्यक्षात पुरुष असणार्या पण स्त्री आय डी घेणार्यांचा - किंवा उलटे - येथे गोंधळ होणार असे वाटू लागले आहे)
>>
तेच तर म्हणतो कारण जो रीझल्ट येईल तो नक्की कोणाचा माझा की डु आय डीचा हा लई घ्होळ आहे

http://www.bbc.co.uk/science/
http://www.bbc.co.uk/science/humanbody/sex/add_user.shtml
ड्यूआयड्यांचा एकच अंब्रेला
ड्यूआयड्यांचा एकच अंब्रेला मेंदू नसतो का?
हे राम गडबडीत उणे पाच
हे राम

गडबडीत उणे पाच पाहिलेच नाहीत
परत करते आता थोड्यावेळाने
भरल्या पोटी
केलं संपादित. ' -५ गुण घ्या '
केलं संपादित. ' -५ गुण घ्या ' ऐवजी ' ५ गुण वजा करा ' लिहीलं... खूष?
बेफिंनी न्युट्रल म्हटलं तेव्हा शंका आलीच पण म्हटलं दिसतं तसं नसतं म्हणून मी फसत असेन
इन्टरेस्टीन्ग आहे! अ =
इन्टरेस्टीन्ग आहे!
अ = २*१०=२० / ब = २*५=१० /अन क = २६*-५= -१३०, एकुण -१०० (मायनस १००)
१ - नकाशे वाचणे (गूगल मॅपस्, जीपीएस मधले वगैरे रस्ते शोधत असतानाचे नकाशे) तुम्हाला -
क - कसाही नकाशा धरला तरी नीट नकाशाप्रमाणे जाता येते
२ - एखादी कठीण पाककृती / वस्तू टीव्हीवर पाहत/ऐकत करत असताना फोन आला तर तुम्ही -
क - फोन करणार्यास सांगता की नंतर काॅल करेन व कृती करता
३ - मित्रमैत्रीणी घरी येण्यासाठी पत्ता विचारत असताना तुम्ही -
अ - नकाशा काढून देऊन पूर्ण खाणाखुणा सांगता किंवा किंवा दुसर्या कोणाला समजावायला सांगता
४ - एखादी कल्पना किंवा concept समजावून सांगताना तुम्ही शक्यतो -
अ - कागद-पेन, खडू-फळा आणि हातवारे-हालचाल (body language and gestures ) यांचा वापर करता
५ - चांगला चित्रपट पाहून परत येताना तुम्ही -
क - चित्रपटात मुख्यत्वे काय सांगितलेय ते बोलता
६ - चित्रपटगृहामध्ये तुम्हाला बसायला आवडणारी जागा ( बरोबर असलेल्या लोकांच्या )
ब - कुठेही
७ - तुमच्या मित्र/मैत्रिणीकडे काही यांत्रिक वस्तू चालत नाहिये तर तुम्ही सर्वप्रथम -
क - कसे दुरुस्तं करता येईल ते पाहून स्वतः प्रयत्न करता
८ - तुम्ही नवीनच एखाद्या जागी आहात व कोणी तुम्हाला उत्तर दिशा विचारली तर तुम्ही -
)
क - विनासायास बरोबर सांगता (नेहेमीच बरोबर होकायन्त्र ठेवतो
९ - कार पार्किंगसाठी जागा मिळालीय पण कार रिव्हर्स लावावी लागणार आहे तर तुम्ही -
क - व्यवस्थित, एका फटक्यात कार रिव्हर्स लावता
१० - तुम्ही टीव्ही पाहत असताना फोन आला तर तुम्ही -
क - टीव्ही बंद करून इतरांना शांत रहायला सांगून फोन घेता (तेव्हा मनातल्या मनात फोन करणार्याच्या नावाने शन्खही करत अस्तो, बाकीच्यान्ना ऐकू येत नाही तो)
११ - तुमच्या आवडत्या कलाकाराचे नवीनच गाणं तुम्ही ऐकलं तर तुम्ही -
क - नेमकं गाणं कसं होतं ते आठवत नाही पण काही शब्द आठवतात (खर तर काहीच आठवत नाही, चाल मात्र थोडीफार लक्षात रहाते)
१२ - बर्याच गोष्टींमधे शक्यता वर्तवताना तुम्ही -
क - उपलब्ध माहिती व निष्कर्ष वापरता (जोडीला इंट्यूशनही वापरतो पण ती देखिल अदमासे/अंदाजपंचेदाहोदरसे अशी नस्ते, तर पूर्वानुभव्/अनुभूती यावरील अस्ते)
१३ - तुमच्याकडील चावी हरवलीय असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही -
क - चावी शेवटी कधी हातात होती तेव्हापासूनचा तुमचा वावर आठवून पाहता जेणेकरून चावी कुठे ठेवली असेल ते आठवेल व चावी मिळाल्यावर बाकी कामे करता येतील (खर तर अशी कशी चावी हरवली म्हणून सगळे घर डोक्यावर घेतो व सगळ्यान्ना शोधकामात गुन्तवतो)
१४ - तुम्ही एखाद्या हाॅटेलच्या खोलीत किंवा दुसर्या कोणाच्या घरी आहात व तुम्हाला दूरवरून सायरनचा आवाज आला तर तुम्हाला -
क - आवाज कुठून येतोय हे लगेच सांगता येईल
१५ - तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात व तिथे सात-आठ नवीन ओळखी झाल्या तर दुसर्या दिवशी -
)
क - त्यांची नावे लक्षात राहण्याची शक्यता जास्तं आहे त्यांच्या चेहर्यांपेक्षा (सुंदर असो वा कुरूप, मला काहीच लक्षात रहात नाही
१६ - सुट्टीत तुम्हाला फार्महाऊसला जायचेय व तुमच्या साथीदाराला समुद्रकिनार्यावरील रिसाॅर्टमधे. तुमची निवड योग्य आहे हे पटवून देण्यासाठी तुम्ही -
क - मुद्देसूद समजावाल जसे फार्महाऊस जवळ आहे, स्वस्त आहे, खेळ व आराम यासाठी तेथे सगळ्या गोष्टी जास्त व्यवस्थित सांभाळल्या जातात, इ.
१७ - दिवसभरात कायकाय कामे करायचीत ते ठरवण्यासाठी तुम्ही -
क - मनातल्या मनात कोणाला भेटायचेय, कुठे जायचेय, काय करायचेय हे सर्व पाहता ( picture in your mind )
१८ - तुमचे मित्र/ मैत्रिण त्यांच्या काही वैयक्तीक प्रश्नाविषयी तुमच्याशी बोलायला आले तर तुम्ही -
क - अनुकूल पर्याय कोणते आहेत व प्रश्नाचे निरसन कसे करावे याबद्दल सल्ले देता
१९ - दोन वेगवेगळ्या जोडप्यांतील दोघांचे एकमेकांबरोबर काहीतरी गुपचूप लफडे चाललेय तर तुम्हाला ते कधी कळेल ?
ब - थोडा वेळ गेल्यानंतर कळू शकेल
२० - जीवनामधे ढोबळपणे काय असावे तुम्हाला वाटते ?
क - आपली उद्दिष्टे सफल करावी, इतरांकडून मान कमवावा व आपले असे एक स्थान मिळवावे
२१ - पर्याय दिल्यास कसे काम करायला तुम्हाला आवडेल?
क - एकट्याने काम करायला
२२ - तुमची वाचनाची आवड -
क - सत्यकथा व आत्मचरित्रे
२३ - खरेदी करताना बरेचदा -
क - त्यावर काय लिहीलेय, ते कशापासून बनवलेय वगैरे वाचत, किमतींतील फरक पाहून मग घेता
२४ - झोपणे, उठणे , जेवणे हे तुम्ही -
क - बहुतेकदा ठराविक वेळीच..
२५ - तुम्ही नुकतेच नविन नेकरीत रुजू झालात व तेथील बर्याच कर्मचार्यांना भेटलात. त्यातील कोणीतरी तुम्हाला तुमच्या घरी फोन केला तर तुम्हाला -
क - आवाज ओळखणे खूप कठीण जाईल (नविन लोकान्चे कशाला? मला अजुनही लिम्बीचा आवाज ओळखता येत नाही)
२६ - कोणाशी वादविवाद करताना सर्वात जास्त त्रास होतो तो -
क - त्यांचे प्रतिवाद व उचकवणारे प्रश्न ऐकून ( probing and challenging questions)
२७ - शाळेत स्पेलिंग टेस्ट व निबंध लिहीणे
क - दोन्ही तुमच्यासाठी काही फार सोपे नव्हते
२८ - नृत्य, जॅझ इत्यादिंमधे
क - संगीत व वेळ यांचा मेळ घालणे कठीण जाते
२९ - प्राण्यांचे आवाज काढणे तुम्हाला
क - चांगलं जमतं (चान्गले जमते असे उत्तर देणार्या आयडीज ना पुढल्या वविमधे आवाज काढून दाखवावे लागतील ही अट वर लिहीली नाही वाट्टे!)
३० - कंटाळवाण्या दिवसानंरत काय करायला तुम्हाला आवडतं?
क - वर्तमानपत्र वाचणे, टीव्ही पाहणे व न बोलणे
(माझा) मेंदू जागच्या जागीच
(माझा) मेंदू जागच्या जागीच आहे का हे आधी पहायला पाहिजे
लिंबू, तुमच्याबद्दलही
लिंबू, तुमच्याबद्दलही शून्याखालीच गाडी असणार असे गटफीलिंग होते

होकायंत्र ही ' वस्तू ' वापरत असाल तर पाच घ्या मेंदूत होकायंत्र जोडलेले असेल तरच अ माना
व सोनू. | 13 March, 2013 -
व सोनू. | 13 March, 2013 - 04:54 नवीन
ड्यूआयड्यांचा एकच अंब्रेला मेंदू नसतो का?
>>> असतो ना ... असावाच लागतो... त्या शिवाय कोणती प्रतिक्रिया कोणत्या डु आयडीने द्यायची , कुठे कुणाला उचलायचे अन कुठे कुणाला आपटायचे हे कसे लक्षात रहाणार
Pages