पुण्यातली खाऊगल्ली !

Submitted by आशूडी on 22 May, 2009 - 04:17

आपल्या पुण्यात कुठे काय चांगलं खायला मिळतं , कुठल्या हॉटेलची काय खासीयत आहे याची चर्चा कितीतरी वेळा पुणेकर बाफ वर होत आली आहे. मग विचार केला की अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती प्रत्येक शहरात, गावात असेल. आपण प्रवासाला गेलो असतानाही अचानक तिथल्या एखाद्या उत्कृष्ट खाऊगल्लीचा आपल्याला शोध लागतो. तेव्हा ही माहिती आपण जर एक स्वतंत्र धाग्यावर साठवली तर ती सर्वांनाच उपयोगी पडेल. नाहीतर वैशाली- वाडेश्वर मध्ये जाऊन, रांगेत वाट पाहूनही जर कुणी पावभाजी खाल्ली तर काय फायदा! तर या धाग्यावर आपण लिहूया, माझ्या पुण्यातल्या खाऊगल्ल्या! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगे .. आस्वाद मधेय थालीपिठ छानच आहे .. पण त्याचे लागणारे पैसे देखिल छानच आहे ..
त्यामुळे ते मला तरी पटल नाही ,,gypsy अतिशय फेमस .. एके दिवशी विचार केला चला आपल अस्सल मराठ्मोळ पदार्थ खाउ .. सहज पोहे घेतले .. ३५ रु एका प्लेट चे ..
प्रश्न पैसे चा नसतो .. पण पोहे साठी ३५ रु अतिच वाट्ले ..
मराठी लोकांच्या एरियात मराठी पदार्थ हे इतके महाग पाहुन फारच आश्च्र्यर्य वाटल..
असो हा वेगळा चर्चेचा विषय होइल .. Happy

हे गौरी Happy

आमच्या राहुल काळेचा वडा आणि सगळेच मराठी पदार्थ घे छान आहेत.. आता तर त्याने लाडू वै. पण सुरू केलेय बहुदा! पण महाग पण आहेत.

त्याची दुकाने -
१. गोरेगाव पूर्व सोनल बिल्डिंग तळमजला - श्री दत्त (बहुदा)
२. वडखळ नाका
३. फूड मॉल, मुम्बै पुणे एक्स्प्रेस्स वे.

ठाण्यात अजुन काही -
१. वडे - ब्राम्हणी - जोश्यांचे श्रद्धा - घंटाळी समोर
२. वडे - जनरल - राजमाता (राम मारुती रोड), गजानन (भगवती शाळेजवळ)
३. समोसे - टिपटॉप - (झणझणीत)
४. चाट - हायजिनीक (?) - प्रशान्त कॉर्नर- पाचपखाडी
५. चाट - रोडसाईड - इव्हनिन्ग स्पॉट - राम मारुती रोडवर राजमाताच्या समोर एक गाडी असते.
६. आईसक्रीम साठी - कूल कॅम्प - राम मारुती रोडवरून नमस्कारकडे जातानाच्या गल्लीत.

३५ रु पोहे? आँ. हे फारच झाले. गरीब हटाओ घोषणा फार सिरीयसली घेतलेली दिसते त्यांनी.

औरंगाबादची खादाडी पाहायची असेल तर http://www.maayboli.com/node/662 इथे जा. एकेरात्री मी, श्यामली, अन आपले व्हेरीओन आडमीनराव औंबाद वर गप्पा मारताना हे सुचले, आणि त्यातून तिने तिच्या टचने लेख लिहीले. Happy औबादला गेल्यावर इथे जायलाच हवे.

पुण्याबद्दल लिहीतो. आशू ती खाउगल्ली नावाची गल्ली खरोखर आहे. मला जाम आश्चर्य वाटले होते तेंव्हा. Happy आणि रामनाथला तू ४ नंबर वर टाकतेस? घोर अपमान झाला रामनाथ संस्कृतीचा. Happy

मागे जुन्या माबो वर औरंगाबादच्या खाद्ययात्रेवर काही पानं होती. तसेच श्यामलीने तिच्या रंगबिरंगी मध्ये लेख पण लिहिला होता (जुन्या माबो अन नव्यावर पण) दोन्हीची तसेच दिल्लीतल्या खादाडीची लिंक टाकते थोड्या वेळात.

इथे काही लोकांनी आधीच सुचवले आहे त्याप्रमाणे प्रत्येक गावासाठी असा वेगळा धागा असेल तर बरे पडेल. तसे काही गावांचे आहेत. तुम्हाला ज्या गावातल्या खादाडीबद्दल लिहायचे आहे त्याचा धागा नसेल तर तुम्ही तयार करु शकता.

मुंबई - पुणे हायवे वर दत्त होटेल आहे. बसेस जिथे थांबतात त्याच्या opposite side ला आहे..इथे पोहे , उपमा, कोथिंबिर वडि , वडे खूप छान मिळतात. खरवस तर नेहेमि मिळतो.

अश्याच पध्दतीची पानं वेगवेगळ्या गावासाठी करता आली तर जास्त सोयीचं होईल.. सगळ्या गावांचं एकत्र लिहिलं तर पुढे शोधायला खुप अवघड होईल.

अगदी योग्य !
कृपया सगळ्या गावांबद्दल एकत्र न लिहता त्या त्या गावांच्या भागात लेखनाचा धागा करून लिहावे.

पुण्यातला चांगला वडा पाव
भोलाचा वडा (आनंद ज्यूस बारच्या गल्लीत सायं. ५ नंतर)
क्रुष्णा वडा पाव -सहकार नगर
बटाटा वडा- भरत नाट्य मंदीरचा
साबुदाणा वडा - रामसुख मार्केट्च्या बाहेरच्या गल्लीत दु. ३.३० नंतर
मसाला पाव - फडके / स.प. च्या बाहेर
भेळ- राजेश :- मंडईच्या अलीकडे रात्री ८ च्या आत जा नाही तर आज ची भेळ संपली हे ऐकु येइल.
खमण ढोकळा - एलोरा पॅलेसची लेन, बालाजी नगर
कट सामोसा - काका हलवाई

असेच अबर चबर...

कांताबेन ची मूगभजी
टिळक स्मारक मंदिर मधला / जोशी / रोहित चा बटाटेवडा
(एक्सप्रेस हायवे ला लागणारं दत्त स्नॅक्स रोहित वडेवाल्यांचंच आहे...)
कल्पना भेळ च्या शेजारच्या गाडीवरची / ताथवडे उद्यान च्या इथली पाणीपुरी आणि रगडा पॅटिस
ग्राहक पेठ मधल्या वृंदाज च्या आऊटलेट मधला चटणी रोल
म्यूझिक लव्हर्स / मल्टिसेल्स च्या इथल्या गाड्यांवरची कच्छी दाबेली
आजूबा (कर्वे रोड) आणि रिलॅक्स (सहकार नगर) चा मसाला पाव
शैलेश चा जंबो ग्लास उसाचा रस
दुर्गा ची कोल्ड कॉफी
आनारसे सामोसेवाले च्या समोरच्या दुकानातली / शिव्-कैलाश ची लस्सी
कमला नेहरू पार्क समोरच्या गाडीवरचा स्पेशल चहा
गणराज / रूपाली ची फिल्टर कॉफी
वाडेश्वर ची इडली (बाजिराव रोड चं, इडली पेक्षा बरोबरची खोबर्‍याची चटणी बेष्ट)
रविवार पेठेतल्या मोहन ची आईस्क्रीम कुल्फी (आता जंगली महाराज रोड वर पण मिळते)
नॅचरल्स चं टेंडर कोकोनट
पीडी च्या शेजारच्या अण्णाकडचा एग राईस विथ एक्स्ट्रा कांदा
हिंदुस्तान बेकरी चे पॅटिस
ऋतुजा बेकरी मधली भुर्जी आणि चिकन फ्रँकी
.....

यादी मोठ्ठी आहे...
सध्या काहिच मिळत नाहिये त्यामुळे आठवणीनीच भूक खवळली...
त्यामुळे काहितरी खायला पळतो...
बाकी यादी सवडीनी पूर्ण करीन...
(चला पण आता पुण्यात गेल्यावर काय काय हदडायचं याची वेगळी यादी करायला नको :फिदी:)
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

गौरी मी पण प्रकाशच्या साबुदाणा वड्याची चाहती आहे...आणि अस्सल मराठमोळ्या जेवणासाठी शिवाजी पार्क चे जिप्सी पण छान आहे...तिथली शेन्गान्ची आमटी..आहाहा..

आणि हो कधी ही न बाधणारी गणेशची पाणीपुरी, अमेरीकन शेव पुरी व इतर चाट प्रकार
कल्याणची भेळ, पवीत्रा hotel नंतर डावीकडे वळलं कि मिळणारी कुल्फी..मनमीत (f.c.college road) ची बास्केट चाट, कुल्फी, व सर्व काही....
शिरीष चे pot ice cream (कमला नेहेरु बागेबाहेर), तिथेच थोड पुढे हेरेकर पार्क मधे मिळणारी
cad-b /m मुळ ठिकाण करीश्माच्या बाहेर, संगम साडी सेंटर समोर मिळणारी मटकी भेळ..BTW राजेश चीच स्पेशल फरसाण भेळ (एक पण चुरमुरा नसतो).. प्रभाचा (केसरी वाड्यासमोर near ABC) बटाटे वडा ( सायं.७ च्या आतच) व उपासाची कचोरी.. अजुन आठवते Happy

अजुन काही नावे
आपटे रोडवरची सन्तोष बेकरी-पॅटीस
श्री उपाहारग्रुह-मिसळ

अ‍ॅन्की, नॅचरल्स, हिंदुस्तान बेकरी, ऋतुजा बेकरी कुठे आहे हे?

नॅचरल्स- घोले रोड (मनपा कडून आल्यावर सिग्नल नंतर लगेच उजवीकडे)
हिंदुस्तान बेकरी- बाजिराव रोड (सरस्वती मंदिर शाळेच्या जवळ)
ऋतुजा बेकरी- हे रेस्टॉरंट आहे, प्रभात रोड वर एका बंगल्यात. पोर्च मधे बसायची व्यवस्था आहे. एंट्रंस च्या इथे मोठ्ठं कुत्रं असतं.
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

एंट्रंस च्या इथे मोठ्ठं कुत्रं असतं.>>> Lol
फ्रँकी आणि बर्गर मस्त असतं इथे.

'कल्याण भेळ' म्हणून एक चेन सुरू झाली आहे. सर्व चाट पदार्थ स्वच्छ आणि मस्त! Happy
------------------------------------------------------------------------------
It is absurd to divide people into good and bad. People are either charming or tedious.

एंट्रंस च्या इथे मोठ्ठं कुत्रं असतं.>>>

माझी १ मैत्रिण या कारणास्तव आत यायची नाही....
मालकाला विनंती करून कुत्रं बाजूला नेलं की ही येणार... Wink
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

आयएमडीआरच्या/ गोखले संस्थेच्या समोर रस्त्यावरची टपरी. तिथली साबुदाणा खिचडी, शेव टाकून, अप्रतिम चटणी टाकून- स्वर्गीय.

रानडेच्या समोरील फर्गसन रस्त्यावरील ईंदूरी फरसाणची टपरी- समोसे आणि चटणी - अप्रतिम

आयएमडीआरच्या/ गोखले संस्थेच्या समोर रस्त्यावरची टपरी
>>
प्रियदर्शनी स्नॅक्स (पीडी) असं नाव आहे
आणि तो आख्खा कट्टा 'पीडी कट्टा' म्हणून फेमस आहे....
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

'कल्याण भेळ' म्हणून एक चेन सुरू झाली आहे. सर्व चाट पदार्थ स्वच्छ आणि मस्त!>>>

सहमत.. सुरुवात एका साध्या गाडीपासून करून मोठा झालेला दुकानदार..
सेव्हन लव्सच्या चौकात गाडी असायची पूर्वी.. आता तिथेच दुकान झालय. आणि बिबवेवाडी कोंढवा रोड वर तर एकदम मोठ्ठ दुकान आहे... तिथली भेळ आणि पाणीपुरी एक नंबर..

नॅचरल्स ची अजून एक शाखा.. हॉटेल पंचमी, सातारा रोड च्या जवळ..

पुण्यात सगळ्यात उत्तम बंगाली मिठाई - काका हालवाई, टिळक रोड आणि ह्यांच्याच शाखा... एकूण काका हलवाईंच्या तीन वेगवेगळ्या शाखा आहेत.. पण सगळ्यात उत्तम पदार्थ इथेच मिळतात...

पराठे.. नंदूज्.. ढोले पाटील रस्ता, चैतन पराठा, फर्गसन कॉलेज रस्ता.. CP म्हणून प्रसिद्ध.
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

आहाहा...
चैतन्य चा पराठा आणि पतियाळा लस्सी....

दिल खूष...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

एफसी रोड वरंच निरंजन मधे क्लब सँडविच अफाट मिळतं असं ऐकलंय...
मी लंडनला आल्यावर एका मित्राला हा शोध लागला...
आता जातोय तेंव्हा खाईनच...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

अँकी- नाही सहमत नाही. निरंजन - हे फक्त उदरभरण. एकतर तिथे उभं राहून, तबेल्यातील घोड्यासारखं खायला लागतं .

ते पीडीच नावच आठवत नव्हतं हां- थॅन्क्स

तबेल्यासारखं Lol
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

रैना...
निरंजन चा मला शून्य अनुभव आहे...
ऐकीव माहिती आहे... पण मित्रानी इतकी तारीफ केलिये की एकदा ट्राय करीनच...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

उत्तम क्लब सँडविच -
सुदाम ए-वन सँडविच, सोन्या मारुती चौक.
टिळक रोडवर म्युझिक लव्हर्स च्या समोर..
आणि नूमवि शाळेच्या मागच्या बाजूला... तिथे तर दोन तीन गाड्या आहेत..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

तिकडेच चाट वगैरे आणि तुपट एकदम असे पदार्थ - मनमीत मध्ये मिळतात. एफसी रोड.

तसेच- जेवणासाठी आम्रपाली (रुपालीच्या मागे) फर्गसन रस्ता. तेथील पुदिनापराठा अफलातून

टिळक रोडवर म्युझिक लव्हर्स च्या समोर..
>>
सहमत...

आम्रपाली मस्तच आहे...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

वाडिया कॉलेजच्या बाहेर मंगलदास रोडवर अण्णाची टपरी आहे. तिथे वडापाव, वडा-सांबार एकदम मस्त मिळतो.
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

लोकहो, हा धागा तुम्हाला आवडला, इथे येऊन तुम्ही चर्चा करताय, लोकांनी आपापल्या गावांचे स्वतंत्र धागे सुरु केले हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. सगळ्यांच्या सूचनेनुसार मी हा धागा फक्त पुण्यासाठी मर्यादित केला आहे. तेव्हा पुण्यातल्याच खाऊगल्ल्यांविषयी इथे लिहीले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. Happy

मुंबई मध्ये, दादर ला

१. प्रकाश - साबुदाणा वडा आणि पियुष
२. श्रीकृष्ण - आयडिअल च्या गल्लीत, छबिलदास शाळेसमोर - बटाटावडा
३. कच्छी फरसाण वाला - दादर (प) स्टेशन कडुन बाहेर आल्यावर, कबुतरखान्याच्या उजव्या हाताला, मारुती मंदिराच्या समोर हा फरसाण वाला आहे. त्याच्याकडे अमेरीखमण म्हणून एक प्रकार मिळतो. खाऊन बघा, छान असतो.

पुण्यात

१. लॉ कॉलेज रोड आणि प्रभात रोड मधल कॅनॉल रोड वरचा भेळवाला - भेळ
२. डेक्कन जिमखाना - आप्पाची खमंग खिचडी (फक्त गुरुवार आणि शनिवारी)
३. कर्वे रोड - आजुबा जवळ भोला चा - वडापाव (संध्याकाळी ५ नंतर. इथे साधारण सगळं टेक महिन्द्र एकदातरी हजेरी लावून जातंच ......... Happy )
४. पौड रोड - दुर्गा - कॉफी (जसजशी रात्र वाढत जाते, तसतशी या कॉफीची चव वाढत जाते ......... Happy )
५. कर्वे रोड - मृत्युंजय मंदिरासमोर जोग शाळेकडे जो रस्ता जातो, त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या टपर्‍यांमध्ये पण बरेच चांगले पदार्थ मिळतात. उदा., कांदेपोहे, खिचडी, उपमा, इडली सांबार इत्यादी.

तसेच, निगडी, प्राधिकरण मध्ये
भक्तीशक्तीकडुन आकुर्डी रेल्वे स्टेशन कडे जाताना, भेल चौकाच्या आधीच्या उजव्या गल्लीत, दिल्ली स्वाद म्हणुन एक जॉइंट आहे. तिथे गरमागरम जिलेबी, गुलाबजाम तसंच पाणीपुरी, वेगवेगळे पराठे, लस्सी असं बरंच काही मिळतं. चव पण छान असते.......... Happy

~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे

सुभद्रा चे सर्वकाही!!! विशेषतः मसाला पापड, वेज बुना

चैतन्य पराठा
कपिला काठीकबाब [वेज नसतात त्यामुळे मी खाल्लेला नाहिये पण ऐकलय]
आईsssग्ग ची पाणीपुरी
सुरभी ची पावभाजी, मसाला-पाव, दही-वडा

Pages