खंडाळ्याशेजारी घाटाखालून वर आकाशात घुसलेला हजारभर फूट सुळका म्हणजेच ड्युक्स नोज. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून, लोहमार्गावरून, अगदी खोपोली स्टेशनवरूनही सहज दिसणारा आणि ओळखू येणारा हा ट्रेकर्स लोकांचा लाडका कडा! गेल्या रविवारी 'ऑफबीटसह्याद्री'तर्फे त्या कड्यावर रॅपलिंग आणि ड्युक्स नोज ते डचेस नोजपर्यंत व्हॅली क्रॉसिंग चे आयोजन करण्यात आले होते. एकूण रॅपलिंग अंदाजे ३०० फूट (थोडेसे जास्तच) होते. मी आतापर्यंत केलेले हे सर्वाधिक उंचीचे रॅपलिंग! एकाच शब्दात वर्णन करायचे झाल्यास - "फाडू!!!" एवढंच म्हणेन!
त्याची ही काही प्रकाशचित्रे -
मोठा कडा ड्युक्स नोज आणि शेजारचा तुलनेने छोटा डचेस नोज -
(ड्युक वेलिंग्टनच्या नाकासारखा दिसतो म्हणून ड्युक्स नोज हे नाव. डचेस नोजचा उगम माहित नाही.)
कड्याच्या उजव्या किनारीवरून (फोटोत) रॅपलिंगचा रूट होता -
माथ्यावर एक मंदिर आहे. त्या मंदिरालाच अँकर करण्यात आले होते. (३००+ फुटांमुळे रॅपलिंग रोपवर येणारा ग्रॅव्हिटॅशनल फोर्स खूप जास्त असतो) -
टेक्निकल चढाईमधले जिव्हाळ्याचे आणि जिवाभावाचे साथीदार -
(फक्त) ११ सहभागी असल्यामुळे रॅपलिंग निवांत पार पडले. रॅपलिंगला सुरूवात (अस्मादिक) -
ड्युक्स नोजवर बाहेरच्या बाजूने ओव्हरहँग आहे. पहिल्या तीस एक फुटांपर्यंत पाय कड्याला टेकवता येतात. नंतर कडा आतल्या बाजूला वळतो आणि आपण आधारहीन होतो. पुढचा जवळजवळ दोनशे फुटांचा पॅच ओव्हरहँग आहे. ओव्हरहँगवर फक्त आणि फक्त रोप एवढाच आधार! वार्यामुळे किंवा कशामुळेही रोप गरगर फिरतो. हा पॅच खरोखर थरारक आहे.
दुसर्या एका पार्टिसिपंटचा हा फोटो. यावरून नेमका अंदाज येईल -
या फोटोमध्ये कड्याच्या जवळजवळ तळाशी उतरून आलेला मुंगीच्या आकाराचा माणूस दिसेल.
हुश्श्श!!! उतरलो एकदाचे!
जेमतेम दहा-बारा मिनिटांची गम्मत! पण एक अत्यंत जब्बर्दस्त अनुभव! खाली उतरलो तेव्हा दोन्ही पंजे आणि फोरआर्म्स बधीर झाले होते. ओव्हरहँगवर तर दोनतीनदा रोप वार्याने कड्यापासून उजव्या हाताला हेलकावला, फिरला. त्या सगळ्यात माझ्या स्वतःभोवती दोनतीन प्रदक्षिणा झाल्या. कड्याकडे पाठ आली की मी डोळे मिटून घेतले होते. उघड्या डोळ्यांनी हजार फूट खाली, अधांतरी, हवेत बघण्याची हिंमत होईना! (ट्रेकपासून काही काळ दूर गेल्याचा परिणाम! बाकी काही नाही!)
थरार इथे संपत नाही!!
उतरल्यावर कड्याच्या पोटातून एक अरूंद खाचवाट आहे. त्या वाटेने वळसा घालून वर चढायचे. ही वाट डचेस नोजच्या बाजूने वर येते.
मदतीसाठी ऑर्गनायझर्सनी क्रॅब अडकवायला दोर लावले होतेच -
खूप दिवसांनंतर लाडक्या सह्याद्रीबाबाच्या अंगाखांद्यावर खेळायला मिळालं. दिल खुश हो गया!
- नचिकेत जोशी
(फोटो: नचिकेत जोशी आणि नितीन जाधव)
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/02/blog-post_27.html)
सहि!
सहि!
खरच फाडु. जबरदस्त.
खरच फाडु.
जबरदस्त.
थराराक. .मस्त..
थराराक. .मस्त..
जबरदस्त रे. तो हवेत
जबरदस्त रे.
तो हवेत गेल्यावरचा अनुभव फाटु असणार. :हाह
व्हॅली क्रॉसिन्गचे फटु???
खत्तरनाक अनुभव!! नुस्ते फोटो
खत्तरनाक अनुभव!! नुस्ते फोटो बघुनच धडधडतेय.. प्रत्यक्षात तर काय होईल!! पण हे पार करताना कस्ले जबर् या थ्रिलिंग वाटत असेल, नाही!! सह्ही रे नचिकेत!!
सही रे आया.
सही रे आया.
जबराट. खत्तरनाक अनुभव!!
जबराट. खत्तरनाक अनुभव!! नुस्ते फोटो बघुनच टरकली प्रत्यक्षात तर काय होईल!... तुम्हा लोक्सना सलाम
एक नंबर! भार्री अनुभव!
एक नंबर! भार्री अनुभव!
मस्तच रे..
मस्तच रे..
थरारक. या सगळ्याचे व्हीडिओ
थरारक. या सगळ्याचे व्हीडिओ शूटींग व्हायला हवे होते.
खरंच सलाम तुम्हा लोकांना
खरंच सलाम तुम्हा लोकांना .....
नुसते फोटो पाहूनच इथे हातपाय लटपटात....
सही!
सही!
आई शप्पथ... खरोखर फाडु अनुभव
आई शप्पथ... खरोखर फाडु अनुभव असणार ... खरच सलाम तुम्हाला
केवळ थरार... ओव्हरहँगचा तीस
केवळ थरार... ओव्हरहँगचा तीस एक फुटाचा थरार आम्ही माहुलीच्या कल्याण दरवाजा वर अनुभवला होता. पण हा ड्युक्सनोजचा थरार वाचून XX XXXX XX
आता पुढचे लक्ष काय? कोकणकडा का?
आय मिस्ड इट जबराट अनुभव
आय मिस्ड इट
जबराट अनुभव 
खत्तरनाक अनुभव!! नुस्ते फोटो
खत्तरनाक अनुभव!! नुस्ते फोटो बघुनच धडधडतेय.. प्रत्यक्षात तर काय होईल!!>>>++१११
फाडु ...................
वॉव्..........सहीच
वॉव्..........सहीच रे..........
नचि पजोने पण केले हॅट्स ऑफ...._____/\_____
बाबौ!!! बघुनच पाय
बाबौ!!! बघुनच पाय लटपटले.
कसलं वेडं साहस आहे हे!
शब्दशः त्या ड्युक्सच्या नाकावर टिच्चुन.....
जबरी, भन्नाट, सह्ही, थरारक
जबरी, भन्नाट, सह्ही, थरारक ......
फोटो व वर्णन भारी ......
"घरी" सांगितलं नसणारंच ना हे आधी !!!
घरी" सांगितलं नसणारंच ना हे
घरी" सांगितलं नसणारंच ना हे आधी !!!>> घरच घेवुन गेलेला तो.
wow!!! मस्त!!! जबरी!!!
wow!!! मस्त!!! जबरी!!!
__/\__ लय भारी राव
__/\__
लय भारी राव
थ्रिल. जबरी.
थ्रिल. जबरी.
awosome.
awosome.
उघड्या डोळ्यांनी हजार फूट
उघड्या डोळ्यांनी हजार फूट खाली, अधांतरी, हवेत बघण्याची हिंमत होईना! (ट्रेकपासून काही काळ दूर गेल्याचा परिणाम! बाकी काही नाही!)
>>> लग्न झाल्याचा इफेक्ट आहे तर (हे कबुल कर आया)
बापरे बाप!!! केवढे प्रचन्ड
बापरे बाप!!! केवढे प्रचन्ड धाडस म्हणावे तुमचे. हयत मुली सुद्धा दिसत आहेत. ग्रेट!!!! मायबोलिवर पहिल्यान्दाच मी ट्रेकचे इतके वेगळे फोटो पाहिलेत. ऐरवी इतकी भव्यता आणि शुरता पहायला मिळाली नाही फोटोत. पण हे चित्र काहीतरी आगळे आहेत. अभिनन्दन! काळजी घेत चला मात्र.
>>> लग्न झाल्याचा इफेक्ट आहे
>>> लग्न झाल्याचा इफेक्ट आहे तर (हे कबुल कर आया) >>
मस्त फोटोज ! जल्ला वॅटरफॉलनंतर रॅपलिंगमधला उत्साह निवळला.. पण तो अधांतरी फॉल बघून तरी असले कायतरी करेन असे दिसतेय..
चित्तथरारक आणि साहसी
चित्तथरारक आणि साहसी आनंदयात्री ! फोटोही छान नचिकेत ,नितीन .अचूक आयोजन ऑफबीट ! याच ठिकाणी एका जोडप्याने ६ फेब्रु २००५ मध्ये 'धूमकेतू'तर्फे व्हली क्रॉसिंग करत लग्न करून घेतले होते . त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स ला केदार भटच्या फोटोसह बातमी आली होती .
जबरी, मस्तच
जबरी, मस्तच
व्वा लय भारी ... एकदम खास
व्वा लय भारी ... एकदम खास
Pages