Submitted by वैभव फाटक on 12 February, 2013 - 22:19
कधीतरी तो चमत्कारही घडेल नक्की
माघारी पाऊल तुझे मग वळेल नक्की
झुगारून जर दिल्या मनाने समाज सीमा
लाख ठेव पिंजऱ्यात, पक्षी उडेल नक्की
भले घाव दे दु:खाचे जीवनात मजला
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की
मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व क्षणांना
सुखात हसऱ्या, दु:ख तुझे विरघळेल नक्की
मरण्यापूर्वी काम असे तू करून जा की,
मेल्यानंतर अवघे जग हळहळेल नक्की
वैभव फाटक (१२-०२-२०१३)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान गझल. "भले घाव दे दु:खाचे
छान गझल.
"भले घाव दे दु:खाचे जीवनात मजला
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की
मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व क्षणांना
सुखात हसऱ्या, दु:ख तुझे विरघळेल नक्की" >>> हे शेर अधिक आवडले.
भले घाव दे दु:खाचे जीवनात
भले घाव दे दु:खाचे जीवनात मजला
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की
चांगली गझल.
छानच जमलीये रे !!
छानच जमलीये रे !!
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की
व्वा. शेर आवडला.
सर्वांचे धन्यवाद..
सर्वांचे धन्यवाद..
सुंदर गझल...आवडली
सुंदर गझल...आवडली
मनापासून धन्यवाद शाम..
मनापासून धन्यवाद शाम..
मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व
मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व क्षणांना
सुखात हसऱ्या, दु:ख तुझे विरघळेल नक्की<<< वा वा
गझलही मस्तच
वैभव, सुंदर
वैभव,
सुंदर गझल..!
मरण्यापूर्वी काम असे तू करून जा की,
मेल्यानंतर अवघे जग हळहळेल नक्की
व्वा..!
ही गझल मी प्रकाशित
ही गझल मी प्रकाशित झाल्यापासून अनेकदा वाचली आहे मला ही खूप आवडते
'थोपु'वर मराठी कविता समूहात वाचलीच होती तेथे एका उपक्रमादरम्यान नक्की ही रदीफ वापरून आलेल्या सर्व तरहीत तुमची ही सर्वोत्तम आहे फाटक साहेब !(तिकडेही मी लाईक केलीच आहे बहुधा )
एकुणएक शेर सुंदर आहेत
दु:ख तुझे विरघळेल नक्की>>> वरून माझा एक शेर आठवला ...........
मी तुला कोरा कुठे पीतोय रे दु:खा
मिसळला माझ्या मनाचा गोडवा आहे
पुनःप्रत्ययाबद्दल धन्स !!
बेफिजी, अजयजी आणि
बेफिजी, अजयजी आणि वैवकु....धन्यवाद..
वैवकु - जबरदस्त खयाल..
सुंदर गझल वैभव.
सुंदर गझल वैभव.
मस्त गझल
मस्त गझल
कधीतरी तो चमत्कारही घडेल
कधीतरी तो चमत्कारही घडेल नक्की
माघारी पाऊल तुझे मग वळेल नक्की
कुठला चमत्कार ? हे स्पष्ट झाले झाले नाही. 'पाऊल माघारी वळणे' हा चमत्कार कधी तरी घडेल, असा विचार असावा असे आधी वाटले. पण तिथे 'मग' आल्याने 'कुठलासा चमत्कार घडल्यावर पाऊल माघारी वळेल' असा विचार मांडायचा आहे, असे वाटले. मतल्यातील ही संदिग्धता नसून, माझ्या अवलोकनातील उणीव असावी, अशी इच्छा आहे.
झुगारून जर दिल्या मनाने समाज सीमा
लाख ठेव पिंजऱ्यात, पक्षी उडेल नक्की
सुंदर शेर ! सहज आणि थेट पोहोचला !
भले घाव दे दु:खाचे जीवनात मजला
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की
ह्म्म्म्.. ठीक वाटला हा शेर. विशेष मजा आली नाही.
मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व क्षणांना
सुखात हसऱ्या, दु:ख तुझे विरघळेल नक्की
अ प्र ति म !!
हा शेर मला खूप आवडला. एकदम आपलासा वाटला ! सानी तर अगदी अलगद उतरला आहे तुझ्या लेखणीतून. ह्या अप्रतिम अनुभूतीसाठी धन्यवाद व अभिनंदन !!
मरण्यापूर्वी काम असे तू करून जा की,
मेल्यानंतर अवघे जग हळहळेल नक्की
अजून धार लावायला हवी होती. हा बोथट वाटला शेर. खरं तर विचार चांगला आहे पण असे वाटले की कुठलाही एक मिसरा वाचला तरी दुसरा मिसरा कल्पिता येतो आहे. एलिमेण्ट ऑफ सरप्राईज आणता आल्यास पाहावे, असे सुचवावेसे वाटते.
एकंदरीत छान गझल आहे. सर्वच्या सर्व शेरांत रदीफ चपखल वाटते. मतल्याव्यतिरिक्त सर्व शेरांतील विचार आवडले. (मतल्याचा कळला नाही, कळल्यावर आवडेलच !!)
धन्यवाद!!
....रसप....
रणजित, मतल्यात खयाल थोडा
रणजित,
मतल्यात खयाल थोडा संदिग्ध झाला आहे हे मान्य.
मला असे म्हणायचे आहे कधीतरी का होईना तुझा माझ्यावरचा राग मावळेल (असे झाल्यास तो गझलकाराच्या दृष्टीने चमत्कारच असेल ) आणि दूर गेलेली तू माघारी वळून माझ्याकडे परत येशील.
हे सगळे सहज उलगडत नसावे वाचताना..!
बाकी शेर तुलनेने चांगले वाटल्याने या गझलेकडून आशा होतीच...मी या गझलेचा मतला काही वेगळा सुचतोय का याचा नक्की प्रयत्न करतो..
विस्तारित प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद..
छान....एकदम छान
छान....एकदम छान