विरह - तान्हूल्याचा

Submitted by देवू on 22 February, 2013 - 06:56

कंठ दाटून आला,
मन ही माझे भरुन आले,
पाऊले माझी जड झाली,
विरहाची ती.... वेळ जवळ आली

हुंकारानी एका तुझ्या
हॄद्याला माझ्या हात घातला
"नको जाऊ तू आई अशी लांब
तान्हुलगं मी तुझं.... तुझाच सहवास बघं हवा मला"

माझ्या डोळ्यांनी तुझ्यासाठी
खुप स्वप्ने अशी बघितलीत बाळा..
राहुदेत कर्तव्यात उभी मला..
सारुदे हा प्रितिचा भाव भोळा...

संध्याकाळ झाली... पाखरांनीही वाट धरली
ओढीची तुझ्या आस लागली...
..... दिसले माझे पाखरुं दारी
भरली प्रेमाने माझी झोळी

कवेत येती.... अश्रु वाहती
पापे घेऊन मला बिलगती
हूं हूं करुन साद घालती.....
वात हळू-हळू पुढे सरकती....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर स्वागत
पहिलीच कविता दिसतेय तुमची त्यामानाने छान आहेच
सिच्युएशनबेसड् आहे हे लगेच लक्षात येते

खूप खूप लेखन शुभेच्छा !!

thanks वैभव आणि जाई ... माबोवर पहिल्याच कवितेच्या स्वागताबद्द्ल... Happy

Back to top