Submitted by समीर चव्हाण on 20 February, 2013 - 12:48
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्या भरवश्यावर मी आलो होतो
तुझ्या भरवश्यावर मी आलो होतो इथवर
स्वतःलाच मी इतके हतबल कधी पाहिले ... उत्तम शेर
नसेल बहुधा वर्तुळात मी फिरत
नसेल बहुधा वर्तुळात मी फिरत राहिलो
वलयांच्या व्योमात विहरणे कधी साधले
दिवसाच्या शेवटास व्याकुळ करते काही
काय नेमके कळेचना मी किती शोधले
हे शेर आवडले!
एक शंका......वलयांचे व्योम म्हणजे प्रसिद्धीचे आकाश असा अर्थ घेतला तर चालेल का?
की, तुझ्या मनात वेगळा अर्थ आहे? असल्यास जरूर कळव, आस्वाद घ्यायला आवडेल!
Dusaraa faar avadala.. 4th
Dusaraa faar avadala.. 4th madhe nasel cha tithala arth kalala nai.
दुसरा शेर आवडला . बाकी शेर
दुसरा शेर आवडला .
बाकी शेर 'दिशाहीन' वाटले . वै म गै न
दुसरा आणि शेवटचा सर्वात
दुसरा आणि शेवटचा सर्वात आवडले.
वृत्त आणि अलामत नीटशी समजली नाही.
कृपया मार्गदर्शन कराल का ?
(मी नवखा असल्याने याबाबत बर्याचदा कन्फ्युज होतो. गैरसमज नसावा.)
"नसेल बहुधा वर्तुळात मी फिरत राहिलो" >>> इथे 'नसेन' असावे का ?
गझल छान आहे. दिवसाच्या
गझल छान आहे.
दिवसाच्या शेवटास व्याकुळ करते काही
काय नेमके कळेचना मी किती शोधले<<< हा आणि दुसरा आवडला
हतबल आणि दोन निमिष हे दोन फार
हतबल आणि दोन निमिष हे दोन फार सुंदर शेर आहेत
नसेल ऐवजी नसेन हा बदल माझ्याही मनात आला
धन्यवाद. नसेन वापरच अधिक
धन्यवाद.
नसेन वापरच अधिक आहे.
मीही तसेच वापरतो.
वृत्त २४ मात्रांचे मात्रावृत्त आहे.
तर अलामत अ आणि इ आहे.
तिथल्यातिथे रुंजी घालीत राहिलो नसेन असा साधारणतः पहिल्या ओळीचा अर्थ आहे.
समीर
उल्हासराव, हे मात्रावृत्त
उल्हासराव, हे मात्रावृत्त आहे. २४ मात्रांच्या ओळी असाव्यात.
अलामतीमध्ये एक सूट चालते, ती म्हणजे अ ऐवजी र्हस्व इ अथवा र्हस्व उ घेतला जातो. (गझल परिचय लेख वाचलात तर त्यात याचा उल्लेख केलेला आहे).
समीरने मतल्यातच अ व र्हस्व इ घेतल्याने पुढे अलामत भंगलेली आहे असे म्हणता येत नाही.
या शिवाय, समजा मतल्यात दोन्ही ठिकाणी 'अ'च असते तरी पुढच्या शेरांमध्ये र्हस्व इ अथवा र्हस्व उ अशी अलामत घेता आली असती, ही ती सूट आहे.
धन्यवाद समीरजी. धन्यवाद
धन्यवाद समीरजी.
धन्यवाद बेफिकीरजी.
गझल परिचयात हे केव्हातरी वाचलं असेल,
पण हे छोटे छोटे डिटेल्स लक्षात रहात नाहीत.
तुमच्या स्पष्टीकरणामुळे आणि समीरजींनी
दोन अलामती वापरल्याने आता हे लक्षात राहील.
सगळे जण म्हणताय्त तर छान
सगळे जण म्हणताय्त तर छान असेलही ही गझल पण मला मनापासून या गझलेला भिडता आले नाही
आतून आली असेलही कदाचित पण वरवरची वाटली ही ...थोड्क्यात रूखीसूखी वाटली
माझे असे वाटणे चुकीचेही असू शकतेच तरी मनात आले ते सांगीतले
वाईट वाटल्यास क्षमस्व
थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करून पाहीन भिडते का ते पहायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैभवः आपल्या मताचा मला बिलकुल
वैभवः
आपल्या मताचा मला बिलकुल राग नाही.
कवीच्या मनःस्थितीशी समरूप होणे नेहमीच शक्य नसते किंवा चांगला कवीही नेहमीच नीट एक्प्रेस होऊ शकेल असे नाही. वरील शेर समजायला खरेतर स्पष्टीकरणाची गरज पडू नये, पण एक गोष्ट शेअर करावीशी वाटतेय.
तुझ्या भरवश्यावर मी आलो होतो इथवर
स्वतःलाच मी इतके हतबल कधी पाहिले
गझलेत हा शेर सगळ्यात अगोदर सुचला.
मी पुण्यात सुट्टीवर आलो होतो. तेव्हा एका स्नेहींनी माझी खाण्याची आवड पाहून एका रेस्टोरेन्टचे नाव सांगितले. मी भर उन्हात ते शोधायला गेलो, सवयीने पायपीट करीत. बराच वेळ शोधले, पण त्या जागी ते मिळेनाच. मनात आलं तुझ्या भरवश्यावर मी इथवर आलो होतो, आता स्वतःला हतबल पाहणे तेवढेच उरलेय. आणि हा शेर सुचला. सजावटीचा शेर सोल स्टेशनच्या भव्यदिव्य भपकेदार गर्दीत हिंडताना सुचला.
मत्ला कालपरवा झाला साइटवर वाद पाहून. इतकेच.
हो हो आता मला या गझलेस
हो हो आता मला या गझलेस गुणगुणण्याची लय मिळालीए.. गागागागा गागागागा गागागागा .....आता मला माझी गाडी स्पीड पकडेल असे वाटते आहे ....
गझलेचे अंतरंग उलगडून दाखवलेत त्यामुळे हिचे सौंदर्य अजून अनुभवता येते आहे तरी माझ्या मनातील काही अव्यक्त असे यातून व्यक्त झालेय का तेही शोधून पाहणार आहेच म्हणजे मला या शेरांशी कसे एकरूप होता येईल ते पाहीनच ........
धन्यवाद समीरजी
....आपणास झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व !
_______________________________________-
बदलाच्या काही जागा खुणावत आहेत ...सहजच आपले उगाच मनात रहायला नको म्हणून सांगतो....
झापड हा स्रीलिंगी शब्द आहे बहुधा .. डोळ्यांवर झापड /झापडी ओढतात अशी वाक्यरचना माझ्यातरी परिचयाची आहे
वर्तुळाच्या शेरात नसेल ऐवजी नसेन असे केल्यास सुलभ ठरावे असे वाटते
समीर, माफ करा. पण मला एकही
समीर,
माफ करा.
पण मला एकही शेर "शेर" असा वाटला नाही.
पुन्हा वाचली. मक्ताही मस्त
पुन्हा वाचली.
मक्ताही मस्त आहे.
झापडबद्दल वैवकु यांच्याशी सहमत.
दुसरा आवडलेला आहेच, पण यासह ३ शेरांत लागोपाठ कधी हा शब्द पुनरूक्त झाल्याने शेर थोडे रटाळ वाटताहेत . वै . म .
तिन्ही ठिकाणी 'कधी'चे प्रयोजन प्रश्नार्थक आहे कि आणखी कुठले हे निश्चित नाही. मात्रापुर्ती हे असू शकते. वै म.
चौथा शेर कृत्रिम वाटला. त्यात कुठलीच सहजता जाणवली नाही. 'नसेन'मुळे संभ्रम आणखी वाढला आहे. वर्तुळात , फिरत , वलयांच्या आणि विहरणे या शब्दांमुळे घेरी येते कि काय असे वाटले. वै म गै न
मासरूळकर अहो उलट वर्तुळाचा
मासरूळकर अहो उलट वर्तुळाचा शेरच सर्वोत्तम आहे या गझलेत अतीशय व्यापक अर्थ लावता येतो याचा फार मस्त आहे तो शेर पहा अर्थ लावून
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्तुळ ..वलय (ही वर्तुळची द्विरुक्ती असू शकते )....व्योम ...फिरत राहणे..... नसेन बहुधा ची जाणीव
शेवटचा शेर खास आवडला.
शेवटचा शेर खास आवडला.
फारच कष्ट पडताहेत अर्थ
फारच कष्ट पडताहेत अर्थ लावायला . जाऊ द्या . एखादा नाही समजला तर नाही समजला. इतक्या क्लिष्ट शेराला खुली दाद मिळणं जरा अवघडच.
राजीवजी: फारच कष्ट पडताहेत
राजीवजी:
फारच कष्ट पडताहेत अर्थ लावायला . जाऊ द्या . एखादा नाही समजला तर नाही समजला. इतक्या क्लिष्ट शेराला खुली दाद मिळणं जरा अवघडच.
ह्या प्रतिसादाचे प्रयोजन लक्षात आले नाही आणि टोनही आवडला नाही.
मला तर हा संवाद वाटतोय वैभव ह्यांच्या सोबत केलेला जो निरोपातूनही करता आला असता.
तसेही कवी फक्त दाद मिळण्यासाठीच लिहितो असे नाही.
इतरांच्या प्रतिसादातून त्याची वैचारिक बैठक किती पक्की आहे हे ताडताही येतेच की.
आतापर्यंत आपण तीन प्रतिसाद दिलेत. आपण आपल्या मतांना कन्ट्रडिक्ट करणारी मते दिलीत.
माणसाने ठोस भूमिका घेऊन जवाबदारीने लिहावे असे वाटले.
धन्यवाद.
समीरजी , मनापासून क्षमस्व
समीरजी ,
मनापासून क्षमस्व .
मी काही ठिकाणी कठोर शब्दांत लिहिलं असल्याचं आता माझ्याही लक्षात आलं आहे. आपल्या कवितांवर थोडं अधिकच.
असो. वाचताक्षणीच किंवा पुन्हा वाचून जे लक्षात आलं ते तसंच लिहिलं , मनात कुठलंही वैमनस्य वगैरे नाही. मी फक्त माझं वैयक्तिक मत मांडलं आहे. ते चूकही असू शकतं. कृपया गैरसमज करून घेऊ नये.
गझ ल आवडली. २४ मात्रांचे
गझ ल आवडली.
२४ मात्रांचे (१२ गुरू )अनलज्वाला आणि १६ मात्रांचे (८ गुरू) पादाकुलक अशी बहुतेक या वृत्तांची नावे आहेत. मराठीत पद्य कविता लिहीण्या साठी ही दोन्ही वृत्ते अतिशय सोईस्कर आहेत.
तुझ्या भरवश्यावर मी आलो होतो
तुझ्या भरवश्यावर मी आलो होतो इथवर
स्वतःलाच मी इतके हतबल कधी पाहिले
दिवसाच्या शेवटास व्याकुळ करते काही
काय नेमके कळेचना मी किती शोधले
दोन्ही शेर मस्त, खूप आवडले.