Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 12 February, 2013 - 01:25
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले
आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
(मज दोन आसवांना हुलकावता न आले)
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले
जयश्री अंबासकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मज दोन आसवांना हुलकावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले >>> जयश्रीजी क्षमस्व, परंतू हा मिसरा जसाच्या तसा भटसाहेबांनी लिहीलेला आहे एका ठिकाणी. हा योगायोग असू शकतो हेही मला मान्य आहे.
हा शेर,
समजावुनी व्यथेला समजावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
ही गझल वाडकरांनी गायलेलीही आहे त्यांच्या 'रंग मैफिलीचे' ह्या ध्वनीफितीत समाविष्ट आहे.
बाकी मतला आवडला.
विजय ....अहो ही तरही गझल
विजय ....अहो ही तरही गझल आहे.
भीमराव पांचाळेंनी हा मिसरा दिला होता तरही गझल लिहायला.
ओके. दुसरा शेरही मतलाच आहे हे
ओके.
दुसरा शेरही मतलाच आहे हे लक्षात घेतले नव्हते. तसदीबद्द्ल क्षमस्व!
आभाळ पापण्यांना सांभाळता न आले हा मिसरा फार भारी आहे.
धन्यवाद!
अख्खी गझल आवडली
अख्खी गझल आवडली
मस्त गझल जयू वणवा खास
मस्त गझल जयू वणवा खास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राशी अनेक होत्या गाठीस
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले<<<
सुंदर शेर झाले आहेत.
राशी अनेक होत्या गाठीस
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
.
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
फारच उत्तम शेर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाहवा, वाहवा.. बहोत खूब ....
वाहवा, वाहवा.. बहोत खूब ....
खुप आवडली
खुप आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)