Submitted by मुग्धमानसी on 11 February, 2013 - 01:21
माझ्या मनात बहर पण सडा तुझ्या दारी,
माझ्या अंगणी सावली पण फुले तुझी सारी!
तुझी ओंजळ सुगंधे तुझी शहारली माती,
मीच झाडाच्या मुळाशी होते पेरलेले मोती!
रोज वेचशील फुले तुझा सजेल देव्हारा,
जरी वाहील पोकळ माझ्या घरातून वारा...
देत राहीन तरीही सर्वस्वाचे दान तुला,
सांग देवाच्या कानात.. नाव माझे... माझ्या फुला..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
धन्यवाद!
धन्यवाद!
अतिशय सुरेख.. आवडलीच ...
अतिशय सुरेख.. आवडलीच ...
धन्यवाद शशांकजी.
धन्यवाद शशांकजी.
वाह वाह! क्या बात है आवडलीच!
वाह वाह!
क्या बात है
आवडलीच!
मस्त आहे. पारिजातचे फुल किती
मस्त आहे. पारिजातचे फुल किती सुंदर असते ना.
खूपच छान !पारिजातक आणि
खूपच छान !पारिजातक आणि बकुळाची फुले खूपच छान असतात
छोटीशी आणि छान आहे
छोटीशी आणि छान आहे कविता
>>माझ्या अंगणी सावली पण फुले तुझी सारी<<
यातील `पण' चा अर्थ नाही नीटसा समजला
कविता छानच
कविता छानच
धन्यवाद!
धन्यवाद!
गोड कविता. शेवट आवडला. पण
गोड कविता. शेवट आवडला. पण तिसर्या कडव्यात यमक जुळत नाहिये ते जरा बघ ना.
"आसवांचा अभिषेक, माझा भिजेल देव्हारा" असे काहीतरी सुचले. आवडले नाही तर संपादन करीन.
धन्यवाद पारिजाता. तिसर्या
धन्यवाद पारिजाता. तिसर्या कडव्यात यमक जुळत नाहिये हे खरंय... पण मला जे म्हणायचं होतं ते यमक जुळवून नव्हतं म्हणता येत. आणि यमक जुळवण्याच्या नादात कवितेचा अर्थ बदलत होता. असो...
तु सुचवलेलेही छान आहे. पण मीही बदल केलाय. कसा वाटतो बघ...
अगं किती मस्त..
अगं किती मस्त..
तुझी ओंजळ सुगंधे तुझी शहारली
तुझी ओंजळ सुगंधे तुझी शहारली माती,
मीच झाडाच्या मुळाशी होते पेरलेले मोती! >>>> .... छान
मस्त कविता ! राधा आणि
मस्त कविता !
राधा आणि रूक्मिणी यांच्यातली एक कथा आठवली या कवितेच्या निमित्ताने .
असो . कविता खूपच आवडली .
धन्यवाद! राजीव, कथा शेअर करा
धन्यवाद! राजीव, कथा शेअर करा की.
छान कविता
छान कविता
सुंदर सुंदर खयाल खूप छान
सुंदर सुंदर खयाल
खूप छान द्वीपदी
सर्वच आवडल्या
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप सुरेख.
खूप सुरेख.
सुंदर लिहिलंय!
सुंदर लिहिलंय!
मस्तच!
मस्तच!