ट्रेक: ओल्ड रॅग माउंटन,वर्जिनिया,अमेरिका

Submitted by तन्मय शेंडे on 23 January, 2013 - 12:37

पीक फॉल मध्ये शॅननडोह व्हॅली(shenandoah valley) एक तरी ट्रेक करावा अशी इच्छा होती...मागच्या ऑक्टोबर मध्ये हा योग जुळून आला.

शॅननडोह व्हॅली बद्दल:
शॅननडोह व्हॅली १५० मैल उत्तर-दक्षिण अशी पसरली आहे. डोंगर रांगा, घनदाट जंगल,विपुल वन्य संपदा, उत्तम हवामान आणि सगळे डोंगर माथे जोडणारा साधारण १०० मैलाचा sky line drive. या कारणामुळेच National Geographic ने या पार्कचा अमेरिकेतील पहिल्या दहात समावेश केला आहे.या व्हॅली बद्दल आणि sky line drive बद्दल इथे लिहिलय.

ओल्ड रॅग माउंटन ट्रेक:
ओल्ड रॅग माउंटन ट्रेक हा पूर्व अमेरिकेतील नावाजलेला ट्रेक, शिखरांवरून दिसणारं अवर्णनीय दृश्य , उंच डोगर रांगा, खोल दऱ्या..एकदम 'बर्ड आय व्हयू' च दिसतो!! हा ट्रेक कठीण श्रेणीत मोडतो कारण २km चे hard rock scramblling म्हणजे नळीच्या वाटेने हरीश्चंद्रगड चढण्यासारखा आहे, ३-४ जागा अगदीच संभाळून चढाव लागत, थोडीशी चूक आणि थेट कडेलोट., एका ठिकाणी तर चक्क १.५ फूट उडी मारावी लागते, ईकडे खरोखर घाबरायला होतं कारण जिथून उडी मारणार तो दगड आणि ज्या दगडावर मारणार तो, असे ते दोन्ही उतरते दगड, तोल गेला तर फक्त १५० फूट खाली. .

आही लूप ट्रेक करायचा ठरवलं जेणे करून दोन्ही वाटा बघून होतील...लूप ट्रेक म्हणजे जायचा आणि यायचा मार्ग भिन्न पण सुरवात आणि शेवट एकच. चढताना ६km चा रिज ट्रेल ने जायचं त्यात २km च rock scramblling होत आणि उतरताना सॅडल ट्रेल वरून 'विकली हॉलो फायर रोडला' यायचं आणि तेथून कार पार्किग पर्यंत. हा परतीचा प्रवास ८.५km. बहुतांश ट्रेकर्स असाच लूप ट्रेक मार्ग पसंत करतात.

प्रची १: Sky Line Drive वरून दिसणारा ओल्ड रॅग पर्वत.
Shanendoah_1.jpg

ट्रेकची सुरवात आतिशय सुंदर झाली,डोगाराच्या पायथ्याशी गाडी पार्क केल्या केल्या तेथे नेमलेल्या माहीतगाराने हातात नकाशा दिला,ट्रेकचा मार्ग मार्करने काढून दाखवला, थोडक्यात महत्वाची माहिती सांगितली आणि मदत लागल्यास एक emergency फोन नंबर पण दिला. हे सगळ माहीतगाराच काम साधारण ८-९वी तील विध्यार्थी करत होते.खरच कुतूहल वाटलं हे बघून.

प्रची २: सकाळच्या कोवळ्या उन्हातल सोनेरी गवत.
Shanendoah_2.jpg

सकाळीचे ९ वाजले होते.... बॅगत दुपारच जेवण, पाण्याच्या बाटल्या, कॅमेरा, लेन्स, ट्राय-पॉड एवढ्याच सामानासह सौ सोबत ट्रेक ची सुरवात केली. वातावरणात बऱ्यापैकी थंडी होती म्हणून एक जाड जॅकीट पण चढवल. फॉल सीझन ऎन बहरात होता. एका इग्रजी वाक्याचा पुनश्च प्रत्यय आला Autumn is a second spring where every leaf is a flower!

प्रची ३: कार पार्किग मधून ट्रेकच्या वाटेकडे जाताना, हे अंतर साधारण १ की.मी. आहे.... रस्त्याच्या दुतर्फा निसर्गाची रंग-पंचमी सुरु होती.
Shanendoah_3.jpgप्रची ४: उंच लांबसडक पाईन वृक्ष्याच्या जंगलातून जाणारी वाट....असं वाटत होत की ही वाट कधीच संपूच नये.
Shanendoah_4.jpgप्रची ५: वाटेत बरेच वृक्ष मुळासकट उन्मळून पडले होते, त्यातल्या काही पडलेल्या झाडांची खोडं ओली होती म्हणजे नुकतीच पडलेली असणार कदाचित (४-५ महिने?)...पण बहुतांशी झाडं वादळाने पडली होती आणि काही मोजकीच वीज कोसळून (अश्या झाडांच खोड कोळश्यासारख काळ होत).
असे हे वादळाने पडलेले झाड सौंदर्य अधिकच खुलवत होत.
Shanendoah_5.jpgप्रची ६: पाईन वृक्षांच्या मधून डोकावणारा रवी.
Shanendoah_6.jpgप्रची ७: आमच मार्गक्रमण आतिशय संथ गतीने सुरू होत...अगदी रमत गमत, बरेच ग्रुप आम्हाला मागे टाकून पुढे जात होते...एक ग्रुपतर आमच्या मागून जाउन परत पण आला आणि जाताना टाटा करून गेला Happy वाटेत घेतलेली थोडी विश्रांती.
Shanendoah_7.jpgप्रची ८: घटकाभर विश्रांतीनंतर परत मोहिमेच्या वाटेने.
Shanendoah_8.jpgप्रची ९: वाटेत पडलेल्या झाडांचा वन्य विभागाने फक्त झाडाचा वाटेत येणारा भाग कापला होता...त्यामुळे वाटही नाही बदलली आणि झाड ही जैसे थे.....इथल्या वन्य विभागाला सलाम.
Shanendoah_9.jpgप्रची १०: आभाळाच्या पडद्यावर ओक,पाईन, मॅपल याची मस्त मैफल रंगली होती.
Shanendoah_10.jpgप्रची ११: वर चढता-चढता झाड विरळ होत गेली, आकाश दिसायला लागल आणि वाटेत मोठे दगड दिसायला सुरवात झाली होती, त्यामुळे अंदाज आला की आता कॅमेरा बॅगेत ठेवायची वेळ आहे आली कारण rock scramblingला लवकरच सुरवात होणार होती.
Shanendoah_11.jpgप्रची १२: दुपारचे २ वाजले तरीही आही rock scrambling पर्यंत पोहचलो नव्हतो. माहीतगाराने सांगीताल्यानुसार हा ट्रेक ४-६ तासाचा आहे आणि अजून आम्हाला शिखर गाठायचं होत, त्यात सूर्यास्त ५.३० त्यामुळे या अश्या अपरिहार्य कारणामुळे ट्रेकचा वेग वाढवायला लागणार होता. आता गिअर बदलून निघालो सुसाट rock scramblingच्या वाटेने.
Shanendoah_12.jpgप्रची १३: हूशश....पोहचलो पहिल्या पॅचवर. तसा बराच सोपा होता हा पॅच, पण कॅमेरा-लेन्स आत ठेवाव्या लागल्या...पण नंतरच सगळ scrambling हे गुळगुळीत दगडावरून होतं त्यामुळे कॅमेरा गळ्यात अडकवायची हिंमत नाही झाली आणि वेळ कमी असल्याने कॅमेरा काढ-घाल करण्यात वेळ दडवुन चालणार नव्हत. रॉक स्क्रम्ब्लिंगचे काही फोटो मात्र हुकले Sad
Shanendoah_13.jpgप्रची १४: ओल्ड रेग माउंटनच ३२०० फुट उंच शिखर पहील्यादा नजरेत आल.
Shanendoah_14.jpgप्रची १५: दगडांवरून तर कधी दगडाखालून आमची वाटचाल चालू होती.
Shanendoah_15.jpgप्रची १६: बरोबर चार वाजता आम्ही शिखरावर पोहचलो....डब्बे खात मस्त शिखरावरून वरून व्ह्यू बघताना काय मस्त वाटत.
Shanendoah_16.jpgप्रची १७: शिखरावरून वरून दिसणारा नजारा.
Shanendoah_17.jpgप्रची १८: परतीच्या वाटेने निघालो...निघायला ४.३० वाजले.....सॅडल ट्रेल २.५km आहे, ती झपझप उतरलो आणि 'विकली हॉलो फायर रोडला' लागलो...हा रस्ता दगडी आहे पण ४ चाकी जाईल इतका मोठा आहे.
Shanendoah_19.jpgप्रची १९ :'विकली हॉलो' रस्त्या वरुन चालाताना आहूपे-भिमाशंकरची आठवण आली. आता सूर्य अस्ताला आला होता आणि उरलेला ६km चा रस्ता संधी प्रकाशात संपला.
Shanendoah_20.jpg

फेसबूकचं पान- https://www.facebook.com/Tanmay.Photography
फ्लिकर - http://www.flickr.com/photos/tanmay_photography/

धन्यवाद,
तन्मय शेंडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्प्रिंग (किंवा कधीही) मध्ये ओल्ड रॅग गटग करायला खरच मजा येईल. लांबून येणार्‍या मायबोलीकरांना आदल्या रात्री आमच्याकडे येता येईल मुक्कामाला. माझ्या घरापासून दीड-दोन तासांवर आहे ही जागा.
@ तन्मय, त्या जाड माणसाने नंतर ट्रेक केला की नाही माहित नाही कारण आम्ही तिथून लगेच निघालो. तो या कपारीत अडकण्याच्या एपिसोडने बराच घाबरला होता आणि त्याला दमही खूप लागत होता.
तन्मय तुम्हाला ओल्ड रॅगची ट्रेल आवडली असेल तर व्हाइट ओक/सिडर ट्रेल पण आवडेल. Elevation, length आणि difficulty level साधारण ओल्ड रॅग सारखेच आहे.

वॉव सिंपली ऑसम...
वाटा, जंगल.. सर्व परिकथेतलं दिसतंय.. खरीच निसर्गाची रंगपंचमी स्मित
सुंदर, नेटकं वर्णन.. >>>>> +१००० .......

"१२७ अवर्स" पिक्चरही आठवला ते दगड बघून ...... Wink

जल्ला तन्मया..नाळीच्या वाटेत भेटला होतास नि आता थेट तू तिकडची डोंगररांग दाखवून जळवलास आपल्याला.. !! फोटोज सगळे जबरी ! सुं द र च !

Pages

Back to top