Submitted by समीर चव्हाण on 6 February, 2013 - 07:42
उदासीचेच गाणे हृदय गावे
सुखाच्या सावलीशीही चळावे
तुला जगण्यात मी झालो नकोसा
मला जगणे नकोसे का न व्हावे
तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे
मला झाले दिसेनासे तुझे जग
तुला मी सोडुनी सगळे दिसावे
कशाला आस ताणावी, उगाचच
कशासाठी पुन्हा वळुनी पहावे
(हौस संग्रहातून)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिला सोडून सगळे फार
पहिला सोडून सगळे फार आवडले!
मला झाले दिसेनासे तुझे जग
तुला मी सोडुनी सगळे दिसावे
यात पहिली ओळ एकतर कमी पडली किंवा मला पोचली नाही...
तुमची गझल नेमकी कशामुळे इतकी
तुमची गझल नेमकी कशामुळे इतकी छान असते हे समजायला मला अजून तितकी गझल समजत नाही याची खंत वाटते
पण ही गझल खूप छान आहे हे स्पष्ट्पणे जाणवते आहे
माझा एक जुना शेर आहे .....आता सहजच आठवला ...
गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी ..व्वा व्वा रे जादूगारा
धन्यवाद समीरजी
तुझी उंची तुला ठाऊक नाही किती
तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे
व्वाह... या शेराला मुशायर्यात अफाट दाद मिळते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे.
मस्तच गझल.
वाह..
वाह..
समीर, ही गझल हौसमध्ये वाचलेली
समीर, ही गझल हौसमध्ये वाचलेली आहेच. गझल उत्तमही आहेच.
मतला समजला नाही,
मतला समजला नाही, समीर!
उदासीचेच गाणे हृदय गावे की, हृदयाने गावे?
उदासीचेच मधील च चे प्रयोजन कळले नाही!
मतल्यातील दोन ओळींचे नाते समजले नाही!
तुझी उंची तुला ठाऊक नाही किती
तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे
मला झाले दिसेनासे तुझे जग
तुला मी सोडुनी सगळे दिसावे
कशाला आस ताणावी, उगाचच
कशासाठी पुन्हा वळुनी पहावे..
वा वा !! सुरेख!
धन्यवाद. आनंदयात्री: यात
धन्यवाद.
आनंदयात्री:
यात पहिली ओळ एकतर कमी पडली किंवा मला पोचली नाही...
शक्य आहे. हा शेर तसा अर्थाच्या अंगाने मर्यादित झालाय.
भूषणः
मी अप्रकाशित कविता, गझला द्यायचा प्रयत्न करीन.
सतीशजी:
अर्थ-स्पष्टीकरण निरोपातून दिलेय.
समीर
वा वाह वा! सरळ-साधे पण थेट
वा वाह वा!
सरळ-साधे पण थेट शेर असतात आपले
हरएक शेर जणू एकसंघ हिरा जडवलेली अंगठीच!
-धन्यवाद!
(अवांतर- 'हौस ' आम्ही वाचलेला नसल्याने कृपया त्यातील गझला येवू द्यात ! )
-सुप्रिया.
समीर, तुझ्या विपुत लहिले आहे,
समीर,
तुझ्या विपुत लहिले आहे, बघशील का?
तुझी उंची तुला ठाऊक नाही किती
तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे
हा शेर अतिशय आवडला.
अतिशय उत्तम गझल... तुमच्या
अतिशय उत्तम गझल...
तुमच्या गझला वाचण्यासाठी नेहमीच मी उत्सुक असतो...
तुला जगण्यात मी झालो नकोसा
मला जगणे नकोसे का न व्हावे
तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे
मला झाले दिसेनासे तुझे जग
तुला मी सोडुनी सगळे दिसावे
वरील तिन्ही शेर अतिशय सुरेख..
शुभेच्छा...
तुझी उंची तुला ठाऊक नाही किती
तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे >>> खल्लास शेर आहे
सुखाच्या सावलीशीही चळावे >> हा मिसरा पण आवडला
तुला जगण्यात मी झालो
तुला जगण्यात मी झालो नकोसा
मला जगणे नकोसे का न व्हावे >>> हा शेर विशेष आवडला.
सुरेख.....
सुरेख.....
धन्यवाद.
धन्यवाद.
'उंची' शेर अप्रतिम आहे!
'उंची' शेर अप्रतिम आहे!
हृदय हा शब्द मी हृद्य असा
हृदय हा शब्द मी हृद्य असा वाचला .
कारूण्य अधिक वाढल्यासारखे वाटले .
बाकी सर्वच शेर चांगले .
बढिया!
बढिया!
तुझी उंची तुला ठाऊक नाही किती
तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे
>>>>>>>>>>>>>>>>>>
क्लासिक
सुंदर गझल.
सुंदर गझल.