Submitted by अ. अ. जोशी on 3 February, 2013 - 09:23
जीवनात माझ्या आलीस जशी तू
कल्पनेत माझ्या होतीस जशी तू
पाश सैल झाले माझ्या सलगीचे
बंधनात त्याच्या गेलीस जशी तू
मीच राखले वेडे भान दिसाचे
कात टाकण्या कासावीस जशी तू
येत कोवळ्या किरणां बाज रुपेरी
प्रीत आज हृदयीं नेलीस जशी तू
मोर स्वागता आहे सज्ज वसंता
रोज रातच्या तैनातीस जशी तू
जुनी गझल... (२००७)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगले शेर आवडले .एकुणात गजल
सगले शेर आवडले .एकुणात गजल छान आहे.
ही गजल कोणत्या वृत्तात लिहली आहे.? वृत्ताचे नाव काय?
मीच राखले वेडे भान दिसाचे कात
मीच राखले वेडे भान दिसाचे
कात टाकण्या कासावीस जशी तू >>>>>>> कुठेतरी मात्रा गडबड आहेत.
बाकी उत्तम!
येत कोवळ्या किरणां बाज
येत कोवळ्या किरणां बाज रुपेरी
प्रीत आज हृदयीं नेलीस जशी तू<<< छान
'येत' हे येतो किंवा यावा अश्या अर्थी असावे असे गृहीत धरून!
मधुरा.......... >>>> मीच
मधुरा..........
>>>>
मीच राखले वेडे भान दिसाचे
कात टाकण्या कासावीस जशी तू >>>>>>> कुठेतरी मात्रा गडबड आहेत.
<<<<
काहीतरीच काय...?
मी च रा ख ले वे डे भा न दि सा चे
का त टा क ण्या का सा वी स ज शी तू
गा ल गा ल गा गा गा गा ल ल गा गा
मात्रा कशाला म्हणतात हे समजून घ्या....
"मीच राखले वेडे भान
"मीच राखले वेडे भान दिसाचे
कात टाकण्या कासावीस जशी तू" >>> हा अधिक आवडला.
छान आहे गझल
छान आहे गझल
चांगली गझल...
चांगली गझल...
छान .... आवडली
छान .... आवडली
उल्हास, प्राप्ती, वैभव फाटक,
उल्हास, प्राप्ती, वैभव फाटक, संगीता... धन्यवाद..!
सुंदर गझल.
सुंदर गझल.