ती आली पुन्हा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 January, 2013 - 09:37

ती आली पुन्हा
आज अचानक
हवेच्या झुळकी गत.
मनी गारवा
एक हवासा
हलका पसरवत.
रूढ रोकडा
होता व्यवहार
थोडी ओळख त्यात.
कसे काय ते
बोलही वरवर
झाले न झाल्यागत.
कितीतरी पण
वर्षानंतर तार
थरथरली आत.

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली तार आलीय.....>>>>>>>>>> अभिप्राय आवडला.

मला फारसं काही कळत नाही. जे कळतंय ते असं ..... 'कोणे एकेकाळी हृदयाच्या अगदी जवळ असण्यार्‍या 'तिची' खूप दिवसांनी आठवण आली आणि किंचीतशी "दिल मे बजी गिटार". त्या आठवणीतदेखील वास्तवामुळे आणि बदललेल्या नात्यांमुळे आलेला परकेपणा विसरता येत नव्हता. ती माझी आहे पण आणि नाही पण! या आठवणींच्या सतारी / गिटार्स काहीवेळच झंकारतात आणि पुन्हा हृदयाच्या गवसणीत निपचीत पडून राहतात...पुन्हा कुठला प्रसंग, उल्लेख त्या गवसणीला हात घालेपर्यंत'

धन्यवाद अश्विनीजी ,तुमचा अभिप्राय आणि अचूक रसग्रहण ,किंवा दुसरी कविता त्या अर्थाची.
जोशी साहेब ,काही गैरसमज होतोय ?