गुपित

Submitted by rmd on 29 January, 2013 - 00:27

( माझ्या मैत्रिणीची कविता इथे पोस्ट करत आहे अर्थात तिची परवानगी घेऊनच! Happy )

आकलनाच्या पलिकडले
पण अनाकलनाच्या अलिकडले
आयासाच्या पलिकडले
पण अनायासाच्या अलिकडले
विचारांच्या क्षितीजावरचे
आचारांच्या डोहाखालचे
एक गुपित सांगते सख्या...

रात्री घोरणे बंद कर!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कविता पेरेस्त्रॉइनिका आणि ग्लासनोस्त या कालावधीतील आहे. कोणाला माहीत होते की सोव्हिएट युनियनचे विघटन होईल आणि अमेरिकेचा हस्तक असलेला गोर्बाचेव्ह अमेरिकेत पळून जाईल! नरसिंहरावांनी राजीव गांधींच्या पश्चात सूत्रे हातात घेऊन मनमोहन सिंगाच्या हातात अर्थरथाचे लगाम दिले आणि इकॉनॉमी ओपन झाली. बड्या बड्या देशातील बड्या बड्या कंपन्यांनी भारतातील निद्रानाशाने पछाडलेल्या कामगार वर्गाची ताकद स्वस्तात मिळते हे पाहून येथे आपल्या राहुट्या ठोकल्या त्या कायमच्याच! त्यातून पैसा झुळझुळ वाहू लागला. एक मध्यमवर्गीय, जो फार तर रिटायर्ड झाल्यानंतरचे पॅकेज कसे वाचवून वाढवायचे याचा विचार करत असे तो आता सेकंड होमच्या मागे लागला. बायका जोडीने नोकर्‍या करू लागल्या आणि होम डिलीव्हरी देणार्‍या फूड जॉईंट्सची संख्या अचानक वाढू लागली. परिणामतः गेलेली झोप येऊ लागली व घोरण्याचे प्रमाण वाढले.

हे रसग्रहण मायबोलीच्या प्राईम टाईमला वाचावे.