नख
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
18
पुन्हा शोधावी का तिला ?
किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब
फुल्या शिवलेले डोळे
फुल्या शिवलेले ओठ
कधी हसत कधी रडत
विचारायची नुसत्या खुणांनी
'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?'
लांबसडक बोटे, न्याहाळायची ती
कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी
बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर
कधी हिंस्रतेने करायची शिकार
धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह
शिवत बसायची तासंतास
तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी
पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास...
पुन्हा शोधावी का तिला ?
मला भेटून ती निराश झाली तर?
मन धजत नाही, हे रिकामेपण झाकता येत नाही
तिने दिलेल्या जखमा पुन्हा पुन्हा गोंजारताना
दीनवाणा झालेला मी
कुठल्याशा कर्तबगारीने लावेन का कधी
मागे राहिलेले तिचे तीक्ष्ण नख
माझ्याच हुंदका संपलेल्या गळ्याला?
विषय:
प्रकार:
शेअर करा
वाह पेशवाजी .............खूप
वाह पेशवाजी .............खूप दिवसांनी पाहिले तुम्हाला आज इथे
कविता .नेहमीप्रमाणे अप्रतीमच आहे आवडलीच
पेशवा, वेदनेने ठराविक मर्यादा
पेशवा,
वेदनेने ठराविक मर्यादा ओलांडली की कविता अशी उग्र होत असावी का?
त्रास झाला, अर्ध्यावर सोडली कविता.. नाहीच वाचू शकले पूर्ण!
बाप रे
बाप रे
जया........
जया........
(No subject)
खूप सुंदर!!!!
खूप सुंदर!!!!
भेदकता उतरलीय
भेदकता उतरलीय
भ्या वाटलं !
भ्या वाटलं !
बापरे काय लिहीलय साँलीड _/\_
बापरे
काय लिहीलय साँलीड
_/\_
जबरदस्त एकदम पेशवे! आवडली!
जबरदस्त एकदम पेशवे! आवडली!
मस्त! ही कशी मिसली होती बरं
मस्त! ही कशी मिसली होती बरं मी?
आवडली.
आवडली.
(No subject)
अंगावर आली! आवडली!
अंगावर आली! आवडली!
आह .......
आह .......
Avadya...
Avadya...
बाप रे... पेशवे.. काय लिहून
बाप रे... पेशवे.. काय लिहून गेलात हे...
खुप भावलेली कविता..एक
खुप भावलेली कविता..एक वर्षापुर्वी मायबोलीवर आल्याआल्या निवडक १० त टाकलेली कविता .