"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
हाय
हाय
जागु.. मस्त आहेत रानआवळे.. तू
जागु.. मस्त आहेत रानआवळे..
तू निसर्गाच्या सान्निध्यात राहात असलेला परिसर पाहायची खूप इच्छा असते नेहमी..
नेक्स्ट टैम पक्क्क्का...........
वॉव ..जागू काय टप्पोरे आवळे
वॉव ..जागू काय टप्पोरे आवळे आहेत! खूप कायकाय करत असशील ना या आवळ्यांचं!
लोणचं, कॅन्डी, सुपारी...........................
मागील पानावर मोनालीपने लिहिले
मागील पानावर मोनालीपने लिहिले आहे - Dineshda I have that tree. Used to get lots of flowers when it was new. But now no flower at all.
My son makes 'shesh nag' and play with those leaves. >>>>> मला नक्की कळले नाही पण हे बहुतेक चाफ्याच्या झाडाविषयीच होते - मागे कुठे तरी वाचले होते की चाफ्याची पाने तोडल्यावर एक दुधट पांढरा द्रव बाहेर येतो - जो माणसाला व प्राण्यांना हानिकारक असतो - आता गुगलून पाहिले तर या गोष्टीला दुजारा मिळाला - तेव्हा चाफ्याच्या त्या द्रवापासून सावधान....
देवचाफ्याच्या शेंगाचे दुधात
देवचाफ्याच्या शेंगाचे दुधात ठराविक वळसे उगाळून ते सर्पदंशावर उतारा म्हणून तीन पिढ्यापूर्वीपर्यंत दिले जात असत.
दिनेशदांना आम्हा सर्वांकडुन
दिनेशदांना आम्हा सर्वांकडुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
वा वेळेवर आलो.... दिनेशदा
वा वेळेवर आलो....
दिनेशदा अभिनंदन आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
सुधीर
दिनेशदा अभिनंदन आणि
दिनेशदा अभिनंदन आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. >>>> +१००००....
दिनेशदा इतक्या कलांमधे निपुण आहेत की त्याची मोजदाद करणेही कठीण - पण तरीही अजून त्यांना काही करावेसे वाटत असल्यास परमेश्वर कृपेने त्यात त्यांना यश लाभो ही ईशचरणी प्रार्थना.....
त्यांच्या सदाबहार व्यक्तिमत्वास निर्मळ आरोग्य प्राप्त होवो ही शुभकामना ...
दिनेश, वाढदिवसाच्या अनेक
दिनेश, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
शशांक, संपूर्ण
शशांक, संपूर्ण प्रतिसादास>>>>>>+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
अरे वा.... दिनेश
अरे वा.... दिनेश वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शशांक + १०००००००००००००००००
Yes shashank that was abt
Yes shashank that was abt chafa. Will chk n mk sure that he stop doing that. Thanks.
Dineshda happy birthday to you.
shashank >>>>> +100000:............
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शशांक >+१
सर्वांचे आभार बरं का ! त्या
सर्वांचे आभार बरं का !
त्या झाडाचे एकंदर रुप पांढर्या चाफ्यासारखे नव्हते. एकेकच ऊभे लवचिक खोड, फांद्या नव्हत्याच.
आपल्याकडचे झाड बघितले तर सांगू शकेन तेच का ते.
०००
इंगळहाळीकरांचा एक लेख वाचला, त्यात कोकीळा, शिंजिराच्या घरट्यात अंडे कसे घालते याचे वर्णन आहे. शिंजिराचे घरटे म्हणजे एका नाजूक काडीला बांधलेला बटवा असतो. त्या बटव्यावर एक झडपही असते. त्यामूळे बाकीचे पक्षी त्यात शिरु शकत नाहीत.
तर कोकीळेने त्याच्या वरच्या फांदीवर बसून जोरात झोके घेतले. एवढ्या जोरात कि तो बटवा पूर्ण उलटा झाला.
उलटा झाल्यावर त्याच्यावरची झडप ऊघडली आणि शिंजिराची सर्व अंडी खाली पडली. ज्या क्षणी झडप ऊघडली त्या क्षणी कोकीळेने त्यावर आपले बूड दाबून धरले आणि क्षणार्धात अंडे घातले.
शिंजिराने भोळेपणाने ते अंडे उबवले. कोकीळेचे पिल्लू तर काही दिवसातच शिंजिरापेक्षा मोठे झाले तरी त्याच्यासाठी तो ( त्याच्या रोजच्या आहारात नसलेले ) बहाव्यावरचे सुरवंट आणू लागला.
यावर काय लिहावे तेच कळत नाही !
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नि.ग. च्या ११ व्या भागातील १००० पोस्ट बद्दल सर्व नि.ग. परिवाराचे अभिनंदन!
जागूबाई, तयारीला लागा पुढच्या
जागूबाई, तयारीला लागा पुढच्या भागाच्या !
दिनेशदा, आज काय जेवायला
दिनेशदा, आज काय जेवायला विशेष?
दिनेश दा... वाढदिवसाच्या
दिनेश दा... वाढदिवसाच्या खूऊऊऊप सार्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!
दिनेशदा .. वाढदिवसाच्या
दिनेशदा .. वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा..
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शोभे, आपण सगळे एकत्र भेटू
शोभे, आपण सगळे एकत्र भेटू त्यावेळी परत खास जेवण !
वर्षू, छत्र्या बघितल्या का ? माहिती हवी आहे !
०००००००००००००
ज्ञानाची, तीसुद्धा इतरांकडे असलेल्या आणि आपल्याकडे नसलेल्या ज्ञानाची भिती वाटायला लागली, कि
र्हासाची सुरवात झाली, असे म्हणायला हवे. जोपर्यंत ज्ञानाची लालसा होती, नवे शिकण्याची ओढ होती,
तोपर्यंत सगळे ठिक होते.. कुणाबद्दल लिहितोय मी, असे वाटतेय का ? तर एकंदर वाळवंटातील अरबांबाबत.
खुप पुर्वी मुसलमान असा धर्मच नव्हता किंवा सर्व अरब जगतात त्याचा प्रसारही झालेला नव्हता. आणि
जरी तो होत राहिला तरी त्या धर्माने ज्ञानाची कवाडे कधीच बंद केली नव्हती.
वाळवंटात पिकणार तरी काय ? पाण्याचेही साठे कायमचे नाहीत मग भटकंती आणि व्यापार तर करायलाच
हवा. वाळवंटात दिवसा प्रवास करणे अशक्य. जो काय करायचा तो रात्रीचाच. सभोवार वाळवंट. दाखवण्यासारख्या खुणा नाहीत. आज दिसणार्या वाळूच्या टेकड्या उद्या असतील, याची शाश्वती नाही.
अशावेळी मार्गदर्शक होते ते आकाशातले ग्रहतारे. रोजच्या निरभ्र आकाशात ते न्याहाळून त्यांचा अभ्यास
पक्का झाला.
धुळीचा / वाळूचा सामना रोजचाच. पण जिथे पाणी उपलब्ध होईल तिथे शरीराची स्वच्छता आवश्यक वाटली.
त्यातूनच साबणाचा शोध लागला. त्यानूसारच मग "अल्केमिस्ट" ( आणि केमिस्ट्री ) आली. मग "अल्कली"
शोधली.
दिवसा अंधार्या तंबूत राहताना, कनातीला पडलेल्या बारीकश्या छिद्रातून, बाहेरच्या दृष्याची प्रतिमा
दिसली. त्या "कमर्या"त कॅमेराची कल्पना रुजली.
व्यापारानिमित्त, आजच्या पाकिस्तान ते आजच्या स्पेन पर्यंत भटकंती होत होती. प्रत्येक देशीचे ग्रंथ
आपल्या फारसी भाषेत, अनुवादीत करण्याची चढाओढ होती. व्यापारानिमित्त गणिताशी ओळख झाली,
त्यातून "अलजिब्रा" जन्माला आला. वाळवटातील तुरळक वनस्पति आणि रसायने, अंगी औषधी गुणधर्म
बाळगून होते. त्यातून मग "युनानी" उपचारपद्धती विकसित झाली.
पाण्याचे तर फार अप्रूप. जिथे सापडले तिथून आणून बागा फुलवल्या. त्यासाठी पंप आणि कारंजी यांचे
तंत्र शोधले. ऊंचावर वाहणार्या वारे पकडून, ते घरात खेळवले.
मग मात्र कुठेतरी हि व्यापारी वृत्ती हरवली. बंडखोरी माजली. हसन अल साबा जन्माला आला. त्याचा अड्डा,
उंचावरच्या गढीत आजही इराणमधे अवशेषरुपात आहे. त्याने पदरी गुंड बाळगले आणि राजघराण्यातील
लोकांच्या हत्या घडवल्या. अशा हत्या सुखासुखी कोण करेल, म्हणून त्या गुंडांना हशीशच्या अंमलाखाली
ठेवण्यात आले. हशीश घेतात हे हशीशी आणि ते ज्या हत्या करतात त्या हशीशीन झाल्या, त्यावरूनच
इंग्रजीत, "असासीन" हा शब्द आला... पण ती ज्ञानलालसा मात्र हरवली.
आता कदाचित, तेलाच्या सुबत्तेमूळे ती परत वाढेल. कातार मधली युनिव्हर्सिटी, सौदी मधले आधुनिक
शिक्षणाचे वारे, मला आशावादी करतात.
दिनेशदा.. तुम्हाला
दिनेशदा.. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक >> +१००
आता कदाचित, तेलाच्या
आता कदाचित, तेलाच्या सुबत्तेमूळे ती परत वाढेल. कातार मधली युनिव्हर्सिटी, सौदी मधले आधुनिक
शिक्षणाचे वारे, मला आशावादी करतात. >>>> आमेन ....
दिनेशदा वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचा भाग लवकरच टाकते. जिप्स्या एखादा छान कोलाज मेल कर.
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!....:स्मित:
हे आयरीस आमच्यातर्फे...
कोकिळा अशी दुसर्याच्या
कोकिळा अशी दुसर्याच्या घरट्यात अंडी घालून, त्यांच्याकडून ती उबवून घ्यायची लबाडी का करत असावी ?
एक मातृसुलभ भावना, काळजी कशी नाही तिच्याकडे ?
इतर कोणी पक्षी असं करतात का ?
दिनेशदा तुम्हाला
दिनेशदा तुम्हाला वाढ्दिवसाच्या खुप शुभेच्छा!
शांकली आयरिस खुप छान आहे!
फुले सुंदरच ! हो अवनी,
फुले सुंदरच !
हो अवनी, पावश्या पण असेच करतो.
मातृभावना वगैरे प्राण्यांतच असाव्यात. पक्षी कर्तव्यभावनेने पिल्लाना वाढवतात. जिवाच्या आकांताने धावपळ करतात. पण ती करतानादेखील फारसे तारतम्य नसते. सर्व पिल्लांना सारखाच खाऊ द्यायचा, असा न्यायही त्यांच्या डोक्यात नसतो. अनेक पक्ष्यांत आधी जन्मलेले पिल्लू धिटाई करुन, बलदंड होते. आपल्याच भावंडाच्या जीवावर ऊठते. उडताना खाली पडलेले, शिकार झालेले पिल्लू बघून पक्षी आकांत जरुर करतात, पण ते लगेच विसतातदेखील.
अरे वा ! दिनेशजींचा वाढदिवस
अरे वा ! दिनेशजींचा वाढदिवस आहे? दिनेशजी वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत आणी निरोगी, आनंदी वाटचाल असु दे हीच देवाजवळ प्रार्थना. दूर देशात, घरच्यांपासुन आणी मित्र परीवारापासुन शरीराने लांब पण मनाने जवळ आहात हा सध्याचा आनंद.
सर्व जग फिरुन मग कायमचे भारतात या.
Pages