"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
वर्षू, त्या पक्षी गटाचे नाव
वर्षू, त्या पक्षी गटाचे नाव हनीगाईड असेच आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Greater_Honeyguide इथे एक वेबपेज आहे.
त्यातले एक वाक्य ..The tradition of the Bushmen and most other tribes says that the honeyguide must be thanked with a gift of honey; if not, it may lead its follower to a lion, bull elephant, or venomous snake as punishment. However, “others maintain that honeycomb spoils the bird, and leave it to find its own bits of comb” (Short, Horne, and Diamond 2003).
सध्या माझ्याकडे फुललेली फुले.
सध्या माझ्याकडे फुललेली फुले.
पक्ष्यांचा एक प्रोजेक्ट आठ
पक्ष्यांचा एक प्रोजेक्ट आठ वर्षे चालू होता...त्याचा हा ट्रेलर. हे सर्व पक्षी न्यू गीनी तील आहेत.
यात ३९ अभूतपूर्व कधीही न पाहीलेले पक्षी आहेत, कीत्येक तर डिस्क्वरी चॅनलवर सुध्धा नाही पाहीलेत असे आहेत.
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=YTR21os8gTA
दिनेश दा छान माहिती.. तन्मय..
दिनेश दा छान माहिती..
तन्मय.. बाप्रे कसले डिझायनर पक्षी आहेत..... अद्भुत !!!
तन्मय फार सुंदर व्हिडीओ !!
तन्मय फार सुंदर व्हिडीओ !! डिझायनर पक्षी!! वर्षू ने अगदी बरोबर शब्द वापरला आहे. नुसते पक्षी पहाण्यासाठी नाही तर शूटींग करण्यासाठी ही लोकं किती मेहेनत करतात तेही पहा अस सांगून मी काल मुलाच्या फेसबुक पेज वर हा व्हिडीओ शेअर केला.
पपईचं झाड आपोआप उगवलय..२ फूट
पपईचं झाड आपोआप उगवलय..२ फूट वाढलय. अजून फूल किंवा तुरा काही आलं नाहीये. फळं देणारं झाड आहे की नाही हे कसं ओळखायचं ? परागीभवन होण्यासाठी जवळपास दुसरं झाड नाहीये. पपया लागतील का?फुलं आली तर परागकण शोधून ब्रशवर आणावे लागतील का?बरेच प्रश्न पडलेत.....
अरे वा! नि.ग.च्या गप्पा अगदि
अरे वा! नि.ग.च्या गप्पा अगदि रंगात आल्यात ! न्युकमर सौरभने पण मस्त फोटो टाकून निगवर पदार्पण केलेय . सौरभ मस्त फोटो.
शशांकजी, इब्लिस मधमाश्यांविषयी खूप छान माहिती दिलीत.
श्रीकांतजी आणि तन्मय शेंडे ह्याचे विडिओ सुरेख !
जागू, वैशाली छान फोटो !
दिनेशदा, अजून कॅमेराचं ओपनिंग केलं नाही का ?
तन्मय, कसला मस्त व्हिडीओ आहे
तन्मय, कसला मस्त व्हिडीओ आहे तो. त्या डोक्युमेंटरीचे नाव काय आहे आणि ती कुठे मिळू शकेल?
तन्मय, सुंदर आहे व्हीडिओ.
तन्मय, सुंदर आहे व्हीडिओ. त्या डॉक्यूमेंटरीचे नाव हवेच आहे.
अवनी, पपईला आणखी काही दिवसांनी फुले येतील. ती जर लांब दांड्याला आली तर नर झाड आणि खोडाशीच आली तर मादी. पण हे केवळ आडाखे. लांब देठाला पपई येणारे झाड, घाटकोपरला बघितले होते.
नर असेल तर ठेवण्यात अर्थ नाही. मादी असेल तर निसर्ग जोडी जुळवून देईलच. कधी कधी परागीवहन न होताही
पपया वाढतात ( बाजारात कधी कधी बिनबियाच्या पपया दिसतात.) सो वेट अँड वॉच.
प्रज्ञा, कॅमेरा काढला काल वापरायला. ती हळद तर अप्रतिम आहे. रंग तर सुंदर आहेच पण सुगंधही आहे तिला.
बाजारात मिळते, तिचा हा गंध कुठे गायब होतो, कुणास ठाऊक ?
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=OcCP4_R8QBw
ती डॉक्युमेंटरी.
@ तन्मय जी
लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
जागू, किती सुंदर रंग आहे गं
जागू, किती सुंदर रंग आहे गं या दुरंगी फुलाचा ! (झेंडूचं आहे ना ?)
अधुनमधून सारखी डोकावतेय मी या पानावर
हो अवल तो झेंडूच आहे.
हो अवल तो झेंडूच आहे.
त्या डिझाईनर पक्ष्यांची खास
त्या डिझाईनर पक्ष्यांची खास गोष्ट म्हणजे त्याचं झालेल ईव्हॉलूशन हे खूपच वेळग आहे.
ही साईटवर जानेवारी २०१३ ला प्रत्येक पक्ष्याची माहीती/व्हिडीयो येणार आहेत अस म्हटलय, पण अजून माहीती आली नाहीये.
http://birdsofparadiseproject.org/
आता पिकासाच्या पानावर लिंक
आता पिकासाच्या पानावर लिंक द्यायची सोय नाही का ?
इंदूरच्या म्यूझियम च्या आवारात दिसलेले हे वेगळेच झाड. पानांचा आकार गदेसारखा होता. फुले खुरचाफ्यासारखी पण सुगंध नव्हता.
अरे वा किती हटके आहेत पानं या
अरे वा किती हटके आहेत पानं या झाडाची..
दिनेश दा.. इंदौर ला पोहे-जिलेबी खाल्ली कि नाही???
आणी तो ' काँच महल' पाहिला का?? तो खूप इंटरेस्टिंग आहे..
जिलेबी नाही पोहे खाल्ले.
जिलेबी नाही पोहे खाल्ले. मावाबाटी खाल्ली. वेळ खुपच कमी पडला. पॅलेस, छत्री वगैरे बघितले.
काँच महल राहिलाच ( पण लालबाग पॅलेस बघितला.) बडा गणपति बघितला.
आवळे खुपच होते बाजारात. म्यूझियमजवळच एक मोठे आवळ्याचे झाड होते. ( मोह अनावर झाला होता, पण वय आठवले )
उजैनच्या रस्त्यावर मस्त शेती दिसली. गहू / हरभरा होता.
छत्रीचे फोटो काढलेत पण पिकासात काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. फोटो तिथे अपलोड होताहेत पण लिंकची सोयच दिसत नाही. त्या छत्री मधे दोन / तीन रंगाच्या दगडाचे कोरीवकाम दिसले. असे मी इतरत्र कुठेच ( अगदी मार्को पोलोच्या फोटोतही ) बघितले नव्हते.
कुठेही भटकंती करून आल्यावर
कुठेही भटकंती करून आल्यावर आधी कॅमेर्याची बॅटरी चार्ज करून ठेवली पाहिजे.
रविवारी पेणला मित्राच्या फार्महाऊसवर जाऊन आलो. फोटो काढल्यावर बॅटरी संपली. चार्जिंगला लावायाचा कंटाळा केला आणि आज सकाळी सकाळी समोरच्या पिंपळाच्या झाडावर "हळद्या" अगदी मस्त पोझ देऊन कितीतरी वेळ बसला होता. पटकन टेलीलेन्स लावली आणि मग लक्षात आले कि बॅटरी चार्ज नाही. अगदी हँडीकॅप झाल्यासारखे झाले.
काय तो रंग आणि रूप त्या हळद्याच.
रच्याकने, आता जेवल्यानंतर एक ऑफिसभोवती एक राऊंड मारून आलो तेंव्हा पवईच्या बागेत पिवळा टॅबेबुया मस्त फुलला आहे. अगदी रीच पिवळा कलर. संपूर्ण झाड हळद्या रंगान माखलं आहे.
माधव, ऐकताय ना?
छत्रीचे फोटो काढलेत पण
छत्रीचे फोटो काढलेत पण पिकासात काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. फोटो तिथे अपलोड होताहेत पण लिंकची सोयच दिसत नाही.>>>>दिनेशदा, तो अल्बम बहुतेक "Only Me" असेल त्याला "anyone with link" किंवा "Public" करा.
जिप्स्या, घे तूला हे आवळे !!
जिप्स्या, घे तूला हे आवळे !!
आणि आता स्केचिंग पण करायला
आणि आता स्केचिंग पण करायला लागच ! अश्या वेळी कामाला येईल.
धन्स दिनेशदा इतक्या
धन्स दिनेशदा
इतक्या आवळ्यांनी भरलेलं झाड पहिल्यांदा पाहतोय.
रायआवळ्याचे झाड पाहिलय
हे पण आवळे असे भरपूर लागतात.
हे पण आवळे असे भरपूर लागतात. फक्त रायआवळ्यासारखे घोस नसतात.
माझ्यासोबत जर वर्षू किंवा सुलेखा असत्या तर मात्र मला धीर आला असता
आवळ्याचा फोटो मस्तच,
आवळ्याचा फोटो मस्तच,
'फोटो तिथे अपलोड होताहेत पण
'फोटो तिथे अपलोड होताहेत पण लिंकची सोयच दिसत नाही. '.. याचं उत्तर द्यायला आले होते पण जिप्स्याने आधीच उत्तर दिलंय वर ..
एडिट वर क्लिक करून एनी वन विथ लिंक ,हे ऑप्शन सिलेक्ट करा..
हाहा... का बरं मी आणी सुलेखा.. अच्छा.. आम्ही एम्पीयाईट्स म्हणून... हां.. लहानपणी रायाअवळे, आवळे,चिंचा (देसी आणी विलायती दोन्ही),,कैर्या,, सीताफळं,करवंदं, बोरं,पेरू क्वचितच विकत घ्यावे लागलेत.कायम रस्त्याच्या किनारीच्या झाडांवरचा,झुडुपांवरचा मेवा अवेलेबल होता.. स्कूल बॅगेत दगडगोटे, गुलैल ही आयुधे या कामाकरता नेहमीच हाताशी तय्यार असत..
इतक्या आवळ्यांनी भरलेलं झाड
इतक्या आवळ्यांनी भरलेलं झाड पहिल्यांदा पाहतोय. >> +१
ऐकलं रे जिप्सी आणि पाहिलं पण
परक्या राज्यात अशी मुजोरी
परक्या राज्यात अशी मुजोरी करायची, तर स्थानिक संरक्षक असलेला बरा ना !
पंचमरीच्या जंगलात पण बरीच आवळ्याची आणि आंब्याची झाडे आहेत असे वाचले.
तरी हे झाड, महाराष्ट्रात दिसते त्यापेक्षा बरेच मोठे होते. बडा गणपतिच्या आवारात असेच कवठ फळांनी
लगडलेले झाड होते. माझे लक्ष त्याच्याकडेच जास्त !
स्कूल बॅगेत दगडगोटे, गुलैल ही
स्कूल बॅगेत दगडगोटे, गुलैल ही आयुधे या कामाकरता नेहमीच हाताशी तय्यार असत.. >>>>>>
हो गं वर्षू ......आणि स्कर्टच्या खिशात तिखटमिठाच्या पुड्याही!
दिनेशदा, हा पांढरा चाफाच आहे.
दिनेशदा, हा पांढरा चाफाच आहे. ह्याच चाफ्याबद्दल मागे मी शोभाला सांगितले होते की पाडळे पॅलेसच्या दारात आहे हे रोप म्हणून. (पण तिने बहुधा दुसरंच झाड बघितलं असावं.) ही बहुधा गार्डन व्हरायटी असावी असं वाटतंय. पण श्री. इंगळहाळीकरांच्या ट्रीज ऑफ पुणे मधे याचा फोटो आहे. पुण्यात बर्याच ठिकाणी ट्रॅफिक आयलंडमधे ही रोपं लावली आहेत.
लगडलेले आवळे मात्र भारी आहेत!! तोंडाला पाणीच सुटलं बघून!
Dineshda I have that tree.
Dineshda I have that tree. Used to get lots of flowers when it was new. But now no flower at all.
My son makes 'shesh nag' and play with those leaves.
हे माझ्याकडून डोंगरी आवळे.
हे माझ्याकडून डोंगरी आवळे.
Pages