गझलियत वाटुनी बोट खाशी...

Submitted by विडंबनराव on 28 January, 2013 - 11:28

विनायक उजळंबे यांच्या गझलेवरून सुचलेले...

गझलियत वाटुनी बोट खाशी
पेग जाईल जेंव्हा तळाशी

झेप मी घेतली उंच गगनी
काढता जाळ कोणी कुल्याशी

वास सोडीत जातो गझलचा
अत्तराची अपेक्षा जनाशी

झिंगणे हेच आयुष्य बाळा
तेच घडवे सभा अंतराशी

थंड रक्तास पाजून व्हिस्की
जोड नाते तुझे झिंगण्याशी

घोर माझ्या खिशाला कशाला?
आज गुत्त्यातला तू खलाशी

**** हे विडंबन या गझल करणार्‍यावर नाही. मी फक्त कवितांचा आधार घेतो. विडंबन मूळ कवीवर असते असे नाही. गैरसमज करून घेऊ नये. करमणुक म्हणून पहावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विडंबनकार जी ,

विडंबन ठीक झाले आहे . मुळात विडंबन अवघड असते
.त्यातून गझलेचे अजून अवघड . अशा गोष्टी पेलणे अवघड . तुम्ही लीलया पेलताही ..

पण ,
,

दुस-या आणि तिस-या शेरात गाडी घसरली असे वाटले .
विडंबनाच्या नादात शेर किंचित खराब झाले .

म्हणजे असे बघा ,

विडंबन वाचताना मजा यायला हवी शेरानंतर स्मित उमटावे ..किंवा खुदकन हसू ..
या दोन शेरात ते झाले नाही .
काही बदल करता आला तर नक्की करावा !!

आणि सगळ्यात महत्वाचे
शेवटची टीप नसती तरी गैर समज झाला नसता याची खात्री बाळगावी !!

दुसरा आणि तिसरा तुम्हाला समजला नाही हेच खरे...

पुन्हा जरा अर्थ लावून / जुळवून पहा

(इथे काय चालते ते तुम्हाला माहित असेलच. मलाही माहिती होते आहे हळूहळू.)

खरे तर ,
मला अत्तर शब्दाने अंदाज आला ..!!

अनेक दिवसांपासून इथल्या अनेक घटनांचा मी मूक वाचक आहे .
पण
विडंबन करतानाही ते जास्त जनरलायीज असावे !!

इतकेच .

असो .

' हिडीस '

हा शब्द आठवत नव्हता काल !!<<< Lol

मला तो आठवतो कारण भारतीय नावाचे आय डी आहेत ते हा शब्द सतत वापरतात.