Submitted by विडंबनराव on 28 January, 2013 - 12:22
सतीश साहेब धन्यवाद... आमची भूक तुम्ही बरोब्बर जाणता...
मुक्या अप्सरेचा मुका गार होता
मिठीच्या तिचा फक्त आधार होता
तिचा भाव घाऊक होता जगाशी
खुळ्या, तूच झाला निराधार होता
तिचे वजन भारी, कसे मी वदावे
तनावर कशाचा, किती भार होता
मुके का कडू, गोड वाट्यास आले
कळेना, तिथे फार अंधार होता
बरे जाहले तूच शरमून गेला....
तुझ्या मागुती चाप बसणार होता
जरी गाठ धरलीस, सुटलीच पण ती....
तसा पाहुनी तुज नमस्कार होता
मुले झोपती टाकुनी नित्य माना
अशा मास्तराचाच सत्कार होता
खुळ्याने तयाला नमस्कार केला
तया वाटले तोच झुंझार होता
कुले चोळता भ्यायले लोक याला
नको तेथही बोलका मार होता
गजल ही दरिद्री तरी माज आहे
बुडाखालती कोणता पार होता
मनस्वी म्हणे तो, पिण्या मद्य बसला
अरे, शेवटी मारुनी धार होता
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
वोरीजीनल लींक द्यावा ना हो
वोरीजीनल लींक द्यावा ना हो राव!
मंग खासा रंगतो विडंबनाचा डाव!!
-गा.पै.
भारीय हे
भारीय हे
मुके का कडू, गोड वाट्यास
मुके का कडू, गोड वाट्यास आले..
मुले झोपती टाकुनी नित्य माना
अशा मास्तराचाच सत्कार होता
वैयक्तिक वाटतो आहे.