रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते. मी त्या वर्तमानपत्रातील तेवढे कात्रण नेमके कापून उरलेल्याची व्यवस्थित सुरंगळी करून रद्दीच्या पिशवीत भिरकावून दिेली आणि विचारमग्न अवस्थेतच अंत:पुराकडे प्रस्थान केले. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.
तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार.
तर ऐका,
आपले वाचा,
" भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात. "
बसला ना झटका...!!
असेच आणखी दोनचार झेलायची तयारी करून खाली सविस्तर वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------
आधुनिक भारताच्या अत्यानुधिक महिलांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारे वृत्त -
वृत्तसंस्था, झुमरीतलैया
भारतीय महिला दिवसभरात भारतीय पुरुषांच्या तुलनेत सरासरी ७२ मिनिटे अधिक कार्यालयीन काम उपसत असल्याचे एका गुप्त सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक शहरात हीच बाब कमी-अधिक फरकाने अधोरेखित झाली आहे. "नारी शक्ती तिथे युक्ती अन पुरुषांपासून मुक्ती" हे ब्रीदवाक्य असलेल्या "सखी तू होऊ नकोस दुखी" या संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात भारतभर महिला मनुष्यबळाचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
(बातमी इथेच थांबली असती तर काही प्रश्न नव्हता, पण तिच्या उत्तरार्धात पत्रकारसखीने खास बायकांच्याच शैलीत मारलेला तिरकस टोमणा मात्र संभाव्य धोक्याची चाहूल देणारा होता... तर ऐका... आपले वाचा...)
कामाच्या बाबतीत भारतीय पुरुष भारतीय महिलांपेक्षा पिछाडीवर असले, तरी भारतीय पुरुषांनी वेतनाच्या बाबतीत ही कसर भरून काढली आहे. निर्धारित वेळ काम करूनही पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत १७ टक्के अधिक वेतन मिळत असल्याचे देखील या सर्वेक्षणात सामोरे आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
वाक्यावाक्याला भारतीय पुरुष असा उल्लेख वाचून आजवर स्वत:ला जेवढा "भारतीय" असल्याचा अभिमान वाटत होता तेवढीच आता "भारतीय पुरुष" असल्याची लाज वाटू लागली होती. काही नाही, मी ठरवले, या बातमीला उत्तर द्यायचेच. खून का बदला खून, आंख का बदला आंख, तसेच सर्वेक्षण का बदला सर्वेक्षण.... मात्र मला एकट्याला सर्वेक्षण करणे शक्य नसल्याने मी केवळ निरीक्षण करून एक अहवाल बनवायचे ठरवले अन लागलीच कामाला लागलो. महिन्याभरात स्वताच्याच ऑफिसमधील महिला कर्मचार्यांच्या निरीक्षणावरून भारतीय बायकांचे ऑफिसकाम प्रत्यक्षात कसे चालते यावर मी एक दसकलमी अहवाल बनवला. बस तोच पुरुष जनहित मे जारी तुमच्या समोर सादर करत आहे.
७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.
१) सकाळी कार्यालयात शिरल्या शिरल्या या कामाच्या जागेवर न जाता सरळ प्रसाधनगृहाकडे कूच करतात आणि मेकअप शेकअप करत बसतात. कारण घरून आंघोळ अन नीटनेटकी तयारी करून निघाल्या असल्या तरी प्रवासामुळे (भले तो दहा मिनिटांचा अन वातानुकुलीत बसने का असेना) विस्कटलेले केस, ड्रेस, मेकअप वगैरे ठिकठाक करूनच यांना ऑफिसमधील आपल्या इतर सहकार्यांना दर्शन द्यायचे असते.
२) जागेवर आल्यानंतरही कॉम्प्युटरची कळ न दाबता या आधी इतर महिला सहकार्यांवर एक नजर मारतात. आज कोणी काय नवीन विशेष घातले आहे का याचा आढावा घेतला जातो. असल्यास खोट्या खोट्या स्तुतीसुमनांचा मारा होतो. कारण पुढच्यावेळी आपण जेव्हा काहीतरी नवीन घालून येऊ तेव्हा आपलीही अशीच दखल सर्वांनी घ्यावी हा सुप्त हेतू.. गिव एंड टेक.. तू मला लाईक कर मी तुला लाईक करते..!
३) तासाभराने चहा येतो. तेव्हा बरेच पुरुष मुकाट्याने चहा पिऊन लगेच कामाला सुरुवात करतात तर काही जण सिगारेटचा झुरका मारायला बाहेर पॅंट्रीमध्ये जातात, मात्र सिगारेट-चहा संपताच परत येतात. बायकांच्या गटात मात्र चहा आल्या की खुर्च्याच एकमेकींच्या दिशेने वळतात, डब्यातून चिवडा-फरसाण अन क्रीमची बिस्किटे काढली जातात. एकमेकींशी देवाणघेवाण केली जाते. आणि सावकाश गप्पा मारत ज्याला गॉसिपिंग असेही बोलतात त्याच्या जोडीने हा टी-टाईम साजरा केला जातो.
४) त्यानंतर होते दुपारी जेवायची वेळ. ही वेळही काटेकोरपणे पाळली जाते. कारण कितीही अर्जंट काम असले तरी या फारवेळ उपाशी राहू शकत नाहीत. जेवणही यांचे सावकाश असते. डब्यात रोजच्याच भाज्या असतात तरीही त्याची पाककृती उगाचच्या उगाच जेवणाबरोबर चघळली जाते. तसेच जेवण झाल्यावर देखील या तश्याच गप्पा मारत बसून राहतात, लगेच उठत नाहीत. इतर सारे उठले की उलट यांच्या गप्पा जास्त रंगात येतात आणि चुगलीचा कार्यक्रम जोर शोर से चालतो. जाऊ, भावजय, नणंद हे दुर्मिळ शब्द फक्त इथेच ऐकू येतात.
५) पुरुष बापुडे जेवतात आणि डबा तसाच बॅगेत भरून घरी आणतात. या मात्र तिथेच ऑफिसच्या पाणवठ्यावर डबा घासून, पुसून, सुकवून, लखलखीत करूनच बॅगेत भरतात. डबेही यांचे काही कमी नसतात. खाणार जेमतेम दिड चपात्या मात्र लोणचे, पापड, सॅलाड, भाजी, चपाती असे सतरा डबे असतात. धुणीभांडी स्वताच करायची असल्याने वेळप्रसंगी ताट वाटी चमच्याचेही लाड चालतात.
६) जेऊन जागेवर आल्यावर यांचा फोनचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वप्रथम नवर्याला फोन लागतो ते जेवण कसे झाले होते हे विचारायला. पण अर्थातच, तो एक पुरुष असल्याने आणि त्याच्या ऑफिसला असल्याने बरेवाईट काय ते खरेखोटे न सांगता एका शब्दात चांगलेच होते बोलून फोन ठेऊन देतो. त्यानंतर घरी फोन लावला जातो. कोणाचा सासरी लागतो तर कोणाचा माहेरी, मात्र लागतो जरूर. तिकडचे हालहवाल काय आहेत यावर तो फोन किती चालतो हे ठरते.
७) पुन्हा तास दीड तासाने चहाचा कार्यक्रम सकाळसारखाच पार पडतो. एवढ्या गप्पा या दिवसभरात कश्या मारू शकतात, एवढे विषय कुठून येतात या बद्दल कोणालाही शंका नसावी. विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
८) संध्याकाळी ऑफिस सुटायच्या तासभर आधी यांना निसर्गनियमानुसार पुन्हा भूक लागते. यावेळी कोणी चहा तर आणून देणार नसतो. मग एकेकीच्या डब्यातून संत्री केळी अन सफरचंद निघतात. अगदी घरच्यासारखे सुरीने कापून वगैरे ही फळे खाल्ली जातात. इथे ही गप्पा मारणे हे ओघाने आलेच. निव्वळ खाण्यासाठी म्हणून या तोंड कधीच उघडत नाहीत.
९) ऑफिस सुटायच्या दहा ते पंधरा मिनिटे आधीच यांचा कॉम्प्युटर बंद होतो. कारण पुन्हा दिवसभराचा शीण घालवायचा तर तेवढा तगडा मेक अप हा हवाच. याच दरम्यान ऑफिसमधील सार्या बायका रंगरंगोटी करायला रेस्टरूमवर गर्दी करत असल्याने आणि प्रत्येकीला किमान सात-आठ मिनिटे लागत असल्याने यात वेटींगचा एक्स्ट्रा टाईम देखील हिशोबात धरल्यास उत्तम.
१०) उशीरा ऑफिसमध्ये थांबणे हा प्रकार यांच्या बाबतीत अभावानेच आढळतो आणि आढळला तरी रोज रोज नसतो. यांना वरचेवर थांबवायची त्यांच्या बॉसलाही भिती वाटते, न जाणो दुसर्या दिवशी ऑफिसमध्येच भाज्या निवडायला घेऊन आल्या तर......
तर मित्रांनो........ हे असे असते. यावरून असे म्हणता येईल की मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने संथ असून त्यांना दिवसभरात तेच काम करायला ७२ मिनिटे जास्त लागत असण्याची शक्यता असल्याने हा सर्व्हे सर्वस्वी चुकीचा आहे असे नाही म्हणता येणार.
या अहवालाशी सहमत असाल नसाल तरी इथे याच खाली मोठ्या संख्येने स्वाक्षरी करा. येत्या अमावस्येच्या आधी आपल्याला याची एक प्रत दैनिक फेकानंदच्या कार्यालयात सादर करायची आहे. पुढील कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज..!!
धन्यवाद,
अहवाल सादरकर्ता - तुमचा पुरुषमित्र अभिषेक
तळटीप - सदर लेख कल्पनेवर आधारीत असून आपल्या जवळपास असेच काहीसे द्रुष्य दिसल्यास तो निव्वळ योगायोग समजावा........ आणि हो, हलकेच घ्या हं.
एक डिस्क्लेमर टाका आधि! कशाचे
एक डिस्क्लेमर टाका आधि! कशाचे ते नका विचारु
भो.आ.क.फ. (या शिव्या नाही
भो.आ.क.फ. (या शिव्या नाही आहेत याची नोंद घ्यावी)
यस्स!! आमचा अभिषेक इज
यस्स!! आमचा अभिषेक इज बॅक....
ऐ काय रे.. ते डिसक्लेमर चं मनावर घे पाहू आधी
भो.आ.क.फ. (या शिव्या नाही
भो.आ.क.फ. (या शिव्या नाही आहेत याची नोंद घ्यावी) >> अनुमोदन.
|| देवा...लोकांना विनोदी लेखन पचवण्याची क्षमता दे ||
अरे काय डिस्क्लेमर टाकू? आणि
अरे काय डिस्क्लेमर टाकू?
आणि हे भो.आ.क.फ. म्हणजे काय? भले शिव्या नसल्या तरी सकारात्मक प्रतिसाद आहे की नकारात्मक हे तरी सांगाल का?
भो.आ.क.फ. = भोगा आपल्या
भो.आ.क.फ. = भोगा आपल्या कर्माची फळं
का ते तुला काही इतरांच्या प्रतिसादातून समजेलच. वाईच जssssरा कळ सोसा
ही ही ही ही ही...
ही ही ही ही ही...
याला झब्बू म्हणून 'पुरुषांचा
याला झब्बू म्हणून 'पुरुषांचा रविवार ' असा लेख यावा अशी अपेक्षा. विचारांचा प्रतिकार विचारानेच व्हावा या मताचा मी आहे....:)
मस्त !!!
मस्त !!!
@तुमचा अभिषेक अजून एकही भगिनी
@तुमचा अभिषेक
अजून एकही भगिनी पुरुषवर्गाच्या मानसिकतेबद्दल तावातावाने भांडायला आलेली दिसली नाही.
तुम्ही दिलेला ७२ मिनिटांचा हिशेब भगिनी वर्गाला मान्य दिसतोय!
तेव्हा अशा अभ्यासपूर्ण लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन!
काही ठिकाणी जमलय आता
काही ठिकाणी जमलय
आता पुरुषांचा आँफिसातला ७२मिनिटांचा हिशेब कोणी लिहील का
छानच आहे लेख.
छानच आहे लेख.
चहा आणि लंच च्या मधल्या काळात
चहा आणि लंच च्या मधल्या काळात पुरुष सहकार्यांना त्यांची कामे करायला लावतात ते विसरलात तुम्ही.
आता पुरुषांचा आँफिसातला
आता पुरुषांचा आँफिसातला ७२मिनिटांचा हिशेब कोणी लिहील का>> काम काम काम काम आणि काम
शापै नक्की का
शापै नक्की का
आता पुरुषांचा आँफिसातला
आता पुरुषांचा आँफिसातला ७२मिनिटांचा हिशेब कोणी लिहील का
>>>
अब आ गया उंट पहाडके नीचे
हे सगळे बघण्यात आणि त्यावर
हे सगळे बघण्यात आणि त्यावर चर्चा / विचार करण्यात त्यांचे ७२ तास खर्ची पडतात
अभिषेक, तुमच्या ऑफिसात
अभिषेक, तुमच्या ऑफिसात आम्हाला देखील नोकरी मिळेल का? मग वेळेचा असा सदुपयोग आम्ही सुद्धा करु.
एक नंबर
एक नंबर
;एख विनोदी आहे असं का म्हणताय
;एख विनोदी आहे असं का म्हणताय ? त्यांनी निधड्या छातीने सत्य मांडलय. त्याला सपोर्ट करायचं सोडून मुद्दाम भडकवायचे रिप्लाय इलेत. माझ्या एका धाग्यावर असंच एकाने सुरू करून दिलं होतं. अशा एखाद्या पोस्टमुळे मग स्त्रीआयडी झुंडशाहीने हल्ला करतात हे योग्य नाही. मला अभिषेक यांचे विचार कौतुकास्पद वाटले. ऑफीसच्या बाहेरही या महिलां गाई चालवताना जबाबदारीने चालवत नाहीत
रस्त्याच्या मधून स्लो जाणे
डावीकडून जोरात ओव्हरटेक करून आपल्याल उजवीकडे समोरून येणा-या गाईखाली दाबणे.
अचानक ब्रेक लावून रस्त्यात थांबणे\
गाणं म्हणत गाई चालवणे
अचानक हात न दाखवता गाई वळवणे
पेट्रोलपंपावर टाईमपास करणे. आधी गाई सावकाश स्टँडला लावणे. मग डिकी उघडणे. पर्स शोधणे. त्यातून पैसे काढणे. मग आठवण आल्यासारखं पेट्रोलचं ढक्कन उघडणे. पेट्रोल टाकून झाल्यावर उरलेले पैसे निवांत मोजणे. पर्समधे ठेवणे, पर्स डिकीत ठेवणे. ढक्कन लावणे, डिकी बंद करणे, आरशात पाहणे आणि मग गाई सुरू करणे. एका महिलेच्या वेळात पाच दुचाक्या होतात असं पंपवालेच म्हणतात.
डावीकऊन पॅरलल चाललेल्या गाडीच्या पुढून अचानक आडवा टर्न घेणे. आमचा जीव तुमच्या हाती असा हा बाणा असतो. पुन्हा काही विचारलं तर भांडायला तयार असतात.
चुका दाखवलेल्या आवडत नाहीत
मी काही कुणी स्त्री द्वेष्टा नाही. एका स्त्रीनेच जन्म दिलेला असल्याने तसं असणं शक्य नाही. पण महिलांनी आपले दोष ल्पवून पुरुषांना झोडपणं आवडलं नाही. स्त्री-पुरूष असा भेद आपण करत नाही. स्वतःवर जितकं प्रेम आहे तितकंच स्त्रियांवरही प्रेम आहे. ही पोस्ट फक्त सत्य लिहीण्यासाठी लिहीली आहे.
हल्ली गाई चालवल्या जातात???
हल्ली गाई चालवल्या जातात???:)
गाडी हो. बसता येत नाहीय नीट.
गाडी हो. बसता येत नाहीय नीट. घाईघाईत झालं तस
गाई >>>>>>>>>
गाई >>>>>>>>>
स्त्रीआयडी पिसाळल्यासारख्या
स्त्रीआयडी पिसाळल्यासारख्या हल्ला करतात हे योग्य नाही>>>> अॅडमिन. लक्ष द्याल का प्लीज?
गाई नाही बै आम्ही तर कोकरं
गाई नाही बै आम्ही तर कोकरं हाकतो. ऐकतात बिच्चारी.
धन्यवाद विचारवंत टायपो
धन्यवाद विचारवंत
टायपो मिस्टेक पोस्ट संपादन करतेय
पिसाळल्यासारखा हल्ला>>> जरा लिहीताना भान ठेवा
तरीसुध्दा तुमच विधान आक्षेपार्ह आहे
आणि गाई चालवल्या जातात हे विधान मूळ लेखापेक्षा फार्फार विनोदी आहे
पिसाळलेल्या स्रीआयडी असं
पिसाळलेल्या स्रीआयडी असं म्हटलं नाहि. पिसाळल्यासारखा हल्ला म्हटलं. काय चुकलं तेच कळत नाही.
ठीक आहे. पिसाळल्यासारखा हा शब्द काढून टाकला. अनेक जणं एकत्र येऊन तुटून पडतात असं म्हणायचं होतं. झुंअशाही हा पर्यायी शब्द चालेल ना ?
अभ्यास जोरदार आहे पण लेखन
अभ्यास जोरदार आहे पण लेखन सुमार आहे. अत्यन्त घिसेपिटे आहे. नाविन्य तर शब्दाचे नाही. किती वर्षं हेच जोक मारणार काय माहीत?
आणि लिखाणात आणि प्रतिसादात दिसणारा स्त्रिद्वेष, तुच्छता, खिल्ली उडवणे हे नॉर्मल आहे. त्यामुळे पुरुष आयडींची कितीही उकसवायची इच्छा अस्ली तरी उत्तर द्यायला लिहावे इतकं पण काय interesting नाही.
<आधी गाई सावकाश स्टँडला लावण>
<आधी गाई सावकाश स्टँडला लावण> एक सोडून एक 'डी' सायलेंट का? राहू द्या तसेच.
स्त्री मुळी घराला घरपण येते
स्त्री मुळी घराला घरपण येते ........................ तसेच ऑफिसलाही घरपण येते हे आज समजले.
Pages